नमस्कार मंडळी,
८ नोव्हेंबर २०१६ रोजी अमेरिकेत होणार्या अध्यक्षीय निवडणुकांचे पडघम वाजू लागलेच आहेत.त्यासंदर्भातील घडामोडींविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे. या निमित्ताने मला जेवढी अध्यक्षीय निवडणुकांविषयीची माहिती आहे ती सर्वप्रथम लिहितोच.त्यातील चुका/त्रुटी दाखविणे, नवीन माहितीची भर टाकणे इत्यादी गोष्टी मिपाच्या परंपरेप्रमाणे होतीलच.मराठी आंतरजालावर अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांसाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल असे स्वरूप या धाग्याला द्यायचा उद्देश आहे.तो उद्देश कितपत साध्य होतो हे बघू.
भारतात कुठल्याही निवडणुकांसाठी वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार निवडणे ही प्रक्रिया बरीचशी अपारदर्शक असते.म्हणजे वेगवेगळे पक्ष आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहिर करतात पण नक्की कोणत्या आधारावर हे उमेदवार निवडले या प्रश्नाचे नक्की उत्तर नसते. अमेरिकेत मात्र अध्यक्षीय निवडणुकांसाठीचे उमेदवार निवडण्यासाठीची प्रक्रिया ठरलेली आहे.
अमेरिकेतील दोन महत्वाचे पक्ष--डेमॉक्रॅटिक आणि रिपब्लिकन आपले अध्यक्षीय निवडणुकांसाठीचे उमेदवार जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार्या पक्षांच्या राष्ट्रीय अधिवेशनात निवडतात.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन १८ ते २१ जुलै २०१६ रोजी ओहायो राज्यात क्लिव्हलँड येथे तर डेमॉक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन २५ ते २८ जुलै २०१६ रोजी पेन्सिल्व्हेनिया राज्यातील फिलाडेल्फिया या ऐतिहासिक शहरात होणार आहे.या अधिवेशनांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे एकूण २४७२ प्रतिनिधी तर डेमॉक्रॅटिक पक्षाचे एकूण ४७६४ प्रतिनिधी त्यांच्या पक्षांचे उमेदवार निवडणार आहेत.निवडणुकांसाठी पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी या प्रतिनिधींपैकी अर्ध्यापेक्षा जास्त प्रतिनिधींचे अनुकूल मत मिळणे गरजेचे आहे. म्हणजेच रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी १२३७ तर डेमॉक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी २३८३ मते मिळणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून नक्की कोण सहभागी होणार याची निवड विविध राज्यांमधील प्रायमरी आणि कॉकस यातून होते.काही राज्यांमध्ये प्रायमरी होतात तर काही राज्यांमध्ये कॉकस होतात.प्रायमरी आणि कॉकस यांच्यातील फरक म्हणजे दोन्ही पक्षांच्या प्रायमरी म्हणजे त्या त्या राज्यातील राज्य सरकारने घेतलेल्या सरकारी खर्चाने घेतलेल्या निवडणुका असतात तर कॉकस म्हणजे विविध ठिकाणी पक्षाने स्वखर्चाने आयोजित केलेले मेळावे असतात. प्रायमरी या निवडणुका म्हणजे नोव्हेंबर मध्ये होणार्या निवडणुकीसारखी छोटेखानी निवडणुकच असते.प्रायमरी मध्ये कोण मतदान करू शकतो? तर हे नियम राज्यांप्रमाणे बदलतात.ओपन प्रायमरीमध्ये त्या राज्याच्या मतदारयादीत नाव असलेला कोणीही मतदार आपले मत देऊ शकतो तर क्लोज्ड प्रायमरीमध्ये संबंधित पक्षाचे सदस्यच मत देऊ शकतात.त्याचप्रमाणे ओपन कॉकसमध्ये त्या राज्यातील कोणीही आणि क्लोज्ड कॉकसमध्ये संबंधित पक्षाचे सदस्यच मत देऊ शकतात. प्रायमरीमधील मतदान प्रत्यक्ष निवडणुकांमधील मतदानाप्रमाणेच (मतपत्रिका/मशीनद्वारे) तर कॉकसमधील मतदान खुल्या पध्दतीने--एक तर हात वर करून किंवा संबंधित उमेदवाराच्या समर्थकांना गटांमध्ये एकत्र करून होते. अमेरिकेतील राज्यांपैकी केवळ अलास्का, कोलोरॅडो, हवाई, कॅन्सस, मेन, मिन्नेसोटा, नेवाडा, नॉर्थ डॅकोटा, वायोमिंग आणि आयोवा या राज्यांमध्ये कॉकस तर इतर सर्व राज्यांमध्ये प्रायमरी होतात.
दोन्ही पक्ष विविध राज्यांमधून राष्ट्रीय अधिवेशनासाठी नक्की किती प्रतिनिधी जाणार याचे आकडे ठरवितात. उदाहरणार्थ डेमॉक्रॅटिक पक्षाचे कॅलिफॉर्नियामधून ५४६ तर व्हर्जिनियामधून १०९ प्रतिनिधी आहेत तर रिपब्लिकन पक्षाचे या दोन राज्यांमधून अनुक्रमे १७२ आणि ४९ प्रतिनिधी आहेत.या प्रतिनिधींमध्ये दोन प्रकारच्या प्रतिनिधींचा समावेश होतो. पहिला प्रकार असतो तो म्हणजे प्रायमरी-कॉकसमधून निवडलेले प्रतिनिधी आणि दुसरा प्रकार असतो तो म्हणजे इतर प्रतिनिधी. डेमॉक्रॅटिक पक्षाचे ज्येष्ठ नेते (माजी अध्यक्ष, आजीमाजी सिनेटर वगैरे) यांना सुपरडेलिगेट असेही म्हणतात.डेमॉक्रॅटिक पक्षासाठी वर दिलेल्या आकड्यांमध्ये सुपरडेलिगेटचाही समावेश आहे.रिपब्लिकन पक्षात असाच काहीसा 'अनबाऊंड डेलिगेट' हा प्रकार असतो.
राज्यांमधून हे प्रतिनिधी (डेलिगेट) कसे निवडले जातात हे बघणे पण रोचक आहे.डेमॉक्रॅटिक पक्षांच्या उमेदवारांना विविध राज्यांमध्ये त्या राज्यात मिळालेल्या मतांच्या (प्रायमरी किंवा कॉकसमधून) प्रमाणात असतात.तर रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना बहुतांश राज्यांमध्ये 'विनर टेक्स ऑल' म्हणजे एखाद्या राज्यातून सर्वाधिक मते मिळविलेल्या उमेदवाराला त्या राज्यातून निवडून गेलेले सर्व प्रतिनिधी मिळतात. टेक्साससारख्या काही राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांनाही मिळालेल्या मतांच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळतात.तर न्यू हॅम्पशायर सारख्या राज्यांमध्ये राज्याच्या कायद्याप्रमाणे उमेदवारांना त्यांना मिळालेल्या मतांच्या प्रमाणात प्रतिनिधी द्यावे लागतात. थोडक्यात हे सगळे नियम राज्यांप्रमाणे आणि पक्षाप्रमाणे बदलतात.समजा एखाद्या उमेदवाराला एखाद्या राज्यातून २० प्रतिनिधी मिळणार असतील तर ते २० प्रतिनिधी नक्की कोण असावेत हे संबंधित उमेदवार ठरवितो/ते.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आयोवा आणि न्यू हॅम्पशायरपासून प्रायमरी आणि कॉकसना सुरवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या प्रायमरी आणि कॉकसमधील निकाल बघण्यापूर्वी दोन्ही पक्षांचे महत्वाचे उमेदवार कोण हे बघू. मूळ लेखात सर्व उमेदवारांची विविध प्रश्नांवरील मते वगैरे विस्तारभयास्तव लिहित नाही. ते नंतर कधीतरी प्रतिसादांमधून लिहेन किंवा ही माहिती अन्य कोणी मिपाकराने लिहिली तर उत्तमच.
डेमॉक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार
१. माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन
२. व्हरमाँट राज्याचे सिनेटर बर्नी सँडर्स
रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार
१. उद्योगपती डॉनल्ड ट्रम्प
२. टेक्सास राज्याचे सिनेटर टेड क्रुझ
३. फ्लॉरिडा राज्याचे सिनेटर मार्को रुबिओ
४. ओहायो राज्याचे गव्हर्नर जॉन कॅसिच
५. बाल्टीमोरमधील जॉन हाफकिन्स मेडिकल सेंटरमधील माजी डॉक्टर बेन कार्सन
आता बघू आतापर्यंत झालेल्या कॉकस आणि प्रायमरीमध्ये लागलेले निकाल---
१. आयोवा कॉकस (१ फेब्रुवारी २०१६)
डेमॉक्रॅटिक पक्ष
| | |
| | आयोवा कॉकस | १ फेब्रुवारी २०१६ |
| डेमॉक्रॅटिक पक्ष उमेदवार | मते % | प्रतिनिधींची संख्या |
| हिलरी क्लिंटन | 49.9% | 23 |
| बर्नी सँडर्स | 49.6% | 21 |
| मार्टिन ओ'मॅली | 0.6% | 0 |
मार्टिन ओ'मॅली यांना आयोवा कॉकसमध्ये फार प्रभाव दाखवता आला नाही.त्यानंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.
रिपब्लिकन पक्ष
| आयोवा कॉकस | १ फेब्रुवारी २०१६ |
| रिपब्लिकन पक्ष उमेदवार | मते % | प्रतिनिधींची संख्या |
| टेड क्रुझ | 27.6% | 8 |
| डॉनल्ड ट्रम्प | 24.3% | 7 |
| मार्को रुबिओ | 23.1% | 7 |
| बेन कार्सन | 9.3% | 3 |
| रॅन्ड पॉल | 4.5% | 1 |
| जेब बुश | 2.8% | 1 |
२. न्यू हॅम्पशायर प्रायमरी (९ फेब्रुवारी २०१६)
डेमॉक्रॅटिक पक्ष
| | |
| | न्यू हॅम्पशायर प्रायमरी | ९ फेब्रुवारी २०१६ |
| डेमॉक्रॅटिक पक्ष उमेदवार | मते % | प्रतिनिधींची संख्या |
| बर्नी सँडर्स | 60.4% | 15 |
| हिलरी क्लिंटन | 38.0% | 9 |
रिपब्लिकन पक्ष
| न्यू हॅम्पशायर प्रायमरी | ९ फेब्रुवारी २०१६ |
| रिपब्लिकन पक्ष उमेदवार | मते % | प्रतिनिधींची संख्या |
| डॉनल्ड ट्रम्प | 35.3% | 11 |
| जॉन कॅसिच | 15.8% | 4 |
| टेड क्रुझ | 11.7% | 3 |
| जेब बुश | 11.0% | 3 |
| मार्को रुबिओ | 10.6% | 2 |
३. नेवाडा कॉकस
डेमॉक्रॅटिक पक्ष (२० फेब्रुवारी २०१६)
| | |
| | नेवाडा कॉकस | २० फेब्रुवारी २०१६ |
| डेमॉक्रॅटिक पक्ष उमेदवार | मते % | प्रतिनिधींची संख्या |
| हिलरी क्लिंटन | 52.6% | 19 |
| बर्नी सँडर्स | 47.3% | 15 |
रिपब्लिकन पक्ष (२३ फेब्रुवारी २०१६)
| | |
| | नेवाडा कॉकस | २३ फेब्रुवारी २०१६ |
| रिपब्लिकन पक्ष उमेदवार | मते % | प्रतिनिधींची संख्या |
| डॉनल्ड ट्रम्प | 45.9% | 12 |
| मार्को रुबिओ | 23.9% | 5 |
| टेड क्रुझ | 21.4% | 5 |
| बेन कार्सन | 4.8% | 0 |
| जॉन कॅसिच | 3.6% | 0 |
४. साऊथ कॅरोलायना प्रायमरी
रिपब्लिकन पक्ष (२० फेब्रुवारी २०१६)
| | |
| | साऊथ कॅरोलायना प्रायमरी | २० फेब्रुवारी २०१६ |
| रिपब्लिकन पक्ष उमेदवार | मते % | प्रतिनिधींची संख्या |
| डॉनल्ड ट्रम्प | 32.5% | 50 |
| मार्को रुबिओ | 22.5% | 0 |
| टेड क्रुझ | 22.3% | 0 |
| जेब बुश | 7.8% | 0 |
| जॉन कॅसिच | 7.6% | 0 |
| बेन कार्सन | 7.2% | 0 |
डेमॉक्रॅटिक पक्षाची साऊथ कॅरोलायना प्रायमरी २७ फेब्रुवारी रोजी आहे.
आतापर्यंत डेमॉक्रॅटिक पक्षात (सुपरडेलिगेट मिळून) हिलरी क्लिंटन ५०३ प्रतिनिधींसह आघाडीवर आहेत तर बर्नी सॅन्डर्स ७० प्रतिनिधींसह दुसर्या क्रमांकावर आहेत. तर रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प ६८ प्रतिनिधींसह आघाडीवर आहेत तर टेड क्रुझ ११ प्रतिनिधींसह दुसर्या क्रमांकावर आहेत.मार्को रुबिओ,जॉन कॅसिच आणि बेन कार्सन यांना अनुक्रमे ९, ५ आणि ३ प्रतिनिधी मिळाले आहेत.
यानंतर १ मार्चला अलाबामा, अलास्का, अरकॉन्सॉ,कोलोरॅडो,जॉर्जिया,मॅसॅच्युसेट्स,मिन्नेसोटा,ओक्लाहोमा,टेन्नीसी, टेक्सास, व्हरमॉन्ट आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये प्रायमरी किंवा कॉकस असतील. या मंगळवारला सुपर ट्युजडे म्हणतात.जशी या प्रायमरी-कॉकसचे निकाल येतील तसे ते इथे लिहिणारच आहे.
या विषयात रस असलेल्या सर्व मिपाकरांना विनंती आहे की तुम्हीही या लेखात जेव्हा जमेल तेव्हा आणि तशी भर टाका. मला एकेकाळी अमेरिकेच्या राजकारणात भारताच्या राजकारणाइतकाच रस होता.पण आता तो खूप कमी झाला आहे.त्यामुळे माझ्या माहितीत काही चुका/त्रुटी असतीलच.त्या पण कोणी दूर केल्या तर फारच उत्तम.मी पण वेळ मिळेल त्याप्रमाणे प्रतिसादांद्वारे नवी माहिती लिहिणारच आहे.
माझ्या जुन्या धाग्यांची जाहिरात
\/
In reply to \/ by खालीमुंडी पाताळधुंडी
या संदर्भात...
Reasons to vote Trump
A handy list of all the reasons to vote Trump. Show America who to vote for!वाचतेय.
मस्त लेख. या प्रकारा बद्दल
अमेरीकेचे नागरीक शास्त्राचे
आपल्यासाठी कोण चांगलं आहे?
In reply to आपल्यासाठी कोण चांगलं आहे? by बोका-ए-आझम
हो
मस्त लेख
हिलरी क्लिंटन मोदींना व्हिसा
In reply to हिलरी क्लिंटन मोदींना व्हिसा by होबासराव
स्वार्थी : संधीसाधू अप्पलपोटे
त्यामुळे आपल्या देशात डावी
In reply to त्यामुळे आपल्या देशात डावी by होबासराव
होबासराव सरजी अन बोका-ए-आझम साहेब
In reply to होबासराव सरजी अन बोका-ए-आझम साहेब by नाना स्कॉच
डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ
In reply to डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ by होबासराव
भावना अन त्याची तीव्रता
In reply to भावना अन त्याची तीव्रता by नाना स्कॉच
(एकाच पुर्ण आइडियोलॉजीची
In reply to (एकाच पुर्ण आइडियोलॉजीची by होबासराव
तुम्हाला त्या आइडियोलॉजी
In reply to भावना अन त्याची तीव्रता by नाना स्कॉच
ह्या विचारसरणी खुद्द
In reply to ह्या विचारसरणी खुद्द by निनाद मुक्काम …
ट्रम आलाच पाहिजे.
In reply to ट्रम आलाच पाहिजे. by नाना स्कॉच
भारतीयांना अमेरिकन सरकार कडून
In reply to भारतीयांना अमेरिकन सरकार कडून by निनाद मुक्काम …
+/-
In reply to +/- by विकास
चकाकणारे सारेच सोने नसते आणि
In reply to +/- by विकास
अमेरिकन वे ऑफ लाईफ?
In reply to होबासराव सरजी अन बोका-ए-आझम साहेब by नाना स्कॉच
डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ
In reply to डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ by प्रसाद१९७१
उजवा विचार मानवी स्वभावाला
In reply to उजवा विचार मानवी स्वभावाला by नाना स्कॉच
मानवी स्वभावाला धरुन म्हणजे
In reply to मानवी स्वभावाला धरुन म्हणजे by प्रसाद१९७१
हां!! हे पटण्यासारखे आहे :)
In reply to डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ by प्रसाद१९७१
सहमत आहे
In reply to होबासराव सरजी अन बोका-ए-आझम साहेब by नाना स्कॉच
डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ
In reply to डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ by बोका-ए-आझम
बोका-ए-आझम सर
In reply to बोका-ए-आझम सर by नाना स्कॉच
इथे मिपावर डाव्यांच्या
In reply to इथे मिपावर डाव्यांच्या by बोका-ए-आझम
एकच वाटते
In reply to एकच वाटते by विकास
मला नेहमी पडणारा प्रश्न या
In reply to मला नेहमी पडणारा प्रश्न या by सतिश गावडे
सोशॅलिझम
In reply to सोशॅलिझम by विकास
थोडं असहमत विकासजी
In reply to इथे मिपावर डाव्यांच्या by बोका-ए-आझम
दोन मुद्दे
In reply to होबासराव सरजी अन बोका-ए-आझम साहेब by नाना स्कॉच
आम्हि ना होसाबराव, ना बोकासाहेब
In reply to आम्हि ना होसाबराव, ना बोकासाहेब by अर्धवटराव
+१
In reply to +१ by बोका-ए-आझम
ही चर्चा मस्त चालू आहे बरं का
In reply to आम्हि ना होसाबराव, ना बोकासाहेब by अर्धवटराव
माझे एक निरीक्षण आहे.
उत्तम introductory लेख. वाचतो
In reply to उत्तम introductory लेख. वाचतो by निशदे
minority voters(मराठी
In reply to minority voters(मराठी by उगा काहितरीच
बरोब्बर......
आतापर्यंत डेमॉक्रॅटिक पक्षात
In reply to आतापर्यंत डेमॉक्रॅटिक पक्षात by प्रसाद१९७१
५०५
In reply to ५०५ by विकास
त्या ५०५ मधे सुपर डेलिगेट चा
In reply to त्या ५०५ मधे सुपर डेलिगेट चा by प्रसाद१९७१
हो
In reply to हो by गॅरी ट्रुमन
थोडक्यात माहिती.....
In reply to ५०५ by विकास
५०५
फ्लॉरिडा राज्याचे सिनेटर
In reply to फ्लॉरिडा राज्याचे सिनेटर by नाना स्कॉच
हो
In reply to हो by गॅरी ट्रुमन
>
In reply to > by निशदे
वरील प्रतिसाद ""अमेरिकन
In reply to हो by गॅरी ट्रुमन
>>
In reply to >> by हुप्प्या
टेड क्रुझ
In reply to टेड क्रुझ by गॅरी ट्रुमन
नाही
In reply to हो by गॅरी ट्रुमन
बरोबर
हिलरी क्लिंटन यांना
In reply to हिलरी क्लिंटन यांना by विशाखा पाटील
""यातले ते डॉ. महाशय
एक निरीक्षण
In reply to एक निरीक्षण by विकास
सँडर्स आणि ट्रम्प
"" रिपब्लीकन्स हे त्या
मागील दोन दशकात दहा वर्ष
सुधारणा
छान लेख आणि रोचक चर्चा.
वा! छान माहिती, रोचक चर्चा
In reply to वा! छान माहिती, रोचक चर्चा by मयुरा गुप्ते
हो
In reply to हो by गॅरी ट्रुमन
इमेल्स बद्दल किंचीत वेगळे
ख्रिस ख्रिस्ती
In reply to ख्रिस ख्रिस्ती by विकास
फ्लोरिडामध्ये ट्रंप रुबिओला
In reply to फ्लोरिडामध्ये ट्रंप रुबिओला by निशदे
रूबिओ
In reply to फ्लोरिडामध्ये ट्रंप रुबिओला by निशदे
ट्रंप विरुद्ध ट्रंप
In reply to ट्रंप विरुद्ध ट्रंप by विकास
+१
बाकी या स्पर्धेचा आढावा
In reply to बाकी या स्पर्धेचा आढावा by निशदे
मस्त व्यंगचित्रे!
मस्त लेख आणि चर्चा!
चर्चा वाचतो आहे...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पायलिया हो हो हो... :- DeewanaIn reply to चर्चा वाचतो आहे... by मदनबाण
बेनगाझी प्रकरणाची तर
In reply to बेनगाझी प्रकरणाची तर by निशदे
आत्ताच जालावर बेनगाझी प्रकरणा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पायलिया हो हो हो... :- DeewanaIn reply to आत्ताच जालावर बेनगाझी प्रकरणा by मदनबाण
व्हिडिओ पाहिला. रिपब्लिकन अ
In reply to व्हिडिओ पाहिला. रिपब्लिकन अ by निशदे
ओके....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पायलिया हो हो हो... :- DeewanaIn reply to ओके.... by मदनबाण
अहो हे सगळं मान्य आहे आणि हे
In reply to अहो हे सगळं मान्य आहे आणि हे by निशदे
इतके सगळे करून ह्या बाईला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पायलिया हो हो हो... :-DeewanaIn reply to चर्चा वाचतो आहे... by मदनबाण
१००% सहमत
In reply to १००% सहमत by हुप्प्या
स्वार्थ कशा स्वरूपाचा?
In reply to स्वार्थ कशा स्वरूपाचा? by बोका-ए-आझम
सत्तेचा आणि पैशाचा स्वार्थ
In reply to १००% सहमत by हुप्प्या
इराक युध्दावरील मत
In reply to इराक युध्दावरील मत by गॅरी ट्रुमन
इराक युध्द समर्थन
In reply to इराक युध्द समर्थन by हुप्प्या
सहमत! हिलरी क्लिंटन यांनी
In reply to सहमत! हिलरी क्लिंटन यांनी by विशाखा पाटील
सहमत
In reply to सहमत by गॅरी ट्रुमन
किंवा अमेरिकन प्रसारमाध्यमांचा
In reply to किंवा अमेरिकन प्रसारमाध्यमांचा by बोका-ए-आझम
शक्य आहे
In reply to शक्य आहे by गॅरी ट्रुमन
हा Pro-Democratic Party bias
In reply to हा Pro-Democratic Party bias by अनुप ढेरे
अवास्तव अपेक्षा
In reply to शक्य आहे by गॅरी ट्रुमन
इझराईलसाठी अमेरिकेला जबाबदार धरणे
In reply to इझराईलसाठी अमेरिकेला जबाबदार धरणे by बोका-ए-आझम
अजून एक
In reply to अजून एक by विकास
ट्रम्प
In reply to ट्रम्प by गॅरी ट्रुमन
हा मुद्दा थोडा पटला नाही गॅरीभौ.
In reply to हा मुद्दा थोडा पटला नाही गॅरीभौ. by बोका-ए-आझम
नंतरच्या काळाशी संबंधित मुद्दा
In reply to ट्रम्प by गॅरी ट्रुमन
ट्रंपच नाही
In reply to इझराईलसाठी अमेरिकेला जबाबदार धरणे by बोका-ए-आझम
हो बरोबर
In reply to शक्य आहे by गॅरी ट्रुमन
सुसंगत
In reply to सुसंगत by नंदन
रोचक
In reply to रोचक by विकास
+१
In reply to रोचक by विकास
If you want to live like a Republican, vote for a Democrat
In reply to सुसंगत by नंदन
रोचक प्रतिसाद. काही प्रश्न
In reply to रोचक प्रतिसाद. काही प्रश्न by गॅरी ट्रुमन
लीप सिम्पथी = तोंडदेखली
In reply to रोचक प्रतिसाद. काही प्रश्न by गॅरी ट्रुमन
An idea whose time has come...
In reply to An idea whose time has come... by नंदन
It's economy, stupid!!
In reply to सहमत by गॅरी ट्रुमन
काही मुद्दे
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
े. पण लाखो सैनिकांनिशी पूर्ण
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
सहमत आहे
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
अहो
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्याझाल्या हुरळून त्याला नोबेलचे शांततेचे
साऊथ कॅरोलायना डेमॉक्रॅटिक प्रायमरीचा निकाल
प्रायमरीमध्ये सगळे मतदार
In reply to प्रायमरीमध्ये सगळे मतदार by प्रसाद१९७१
हो
In reply to हो by गॅरी ट्रुमन
प्रायमरीमध्ये सगळे मतदार
In reply to प्रायमरीमध्ये सगळे मतदार by प्रसाद१९७१
थोडे गणित करू
In reply to थोडे गणित करू by गॅरी ट्रुमन
मी फक्त साऊथ कॅरोलायना बद्दल
In reply to मी फक्त साऊथ कॅरोलायना बद्दल by प्रसाद१९७१
कारण
In reply to हो by गॅरी ट्रुमन
डेमॉक्रॅटिक विरूध्द रिपब्लिकन
In reply to डेमॉक्रॅटिक विरूध्द रिपब्लिकन by गॅरी ट्रुमन
मराठी आंतरजालावर 'वन स्टॉप शॉप' असा हा धागा व्हावा...
तुलसी गॅब्बार्ड यांचा इराक युद्धावरून हिलरींना विरोध
साउथ कॅरोलिना प्रायमरीबद्दल थोडेसे....
In reply to साउथ कॅरोलिना प्रायमरीबद्दल थोडेसे.... by निशदे
ट्रम्प उवाच
In reply to ट्रम्प उवाच by गॅरी ट्रुमन
गेली काही दशके आफ्रिकन
वाचत आहे, या निवडणुकीचे
गॅरी आपल्या या धाग्यावरुन एक
In reply to गॅरी आपल्या या धाग्यावरुन एक by हाडक्या
इलेक्टोरल कॉलेज
छान
In reply to छान by मिहिर
सध्या कोणालाच नाही
In reply to सध्या कोणालाच नाही by गॅरी ट्रुमन
भारतविषयक धोरण
In reply to भारतविषयक धोरण by नंदन
हो बरोबर
In reply to भारतविषयक धोरण by नंदन
+ १
Super Tuesday पहिले निकाल
सध्याचे चित्र
मार्च महिन्यातील यापुढील महत्वाच्या तारखा
Super Tuesday चे निकाल
सँडर्सचे सल्लगार दिग्विजय
जरा गमंत.
In reply to जरा गमंत. by नन्द्या
धन्यवाद
रिपब्लिकन पक्षात ट्रम्पविरोधी वारे
In reply to रिपब्लिकन पक्षात ट्रम्पविरोधी वारे by गॅरी ट्रुमन
डिट्रॉईट येथील रिपब्लिकन उमेदवारांची चर्चा
In reply to रिपब्लिकन पक्षात ट्रम्पविरोधी वारे by गॅरी ट्रुमन
रॉमनी-हिलरी-ट्रंप (गिल्ट बाय असोसिएशन)
In reply to रॉमनी-हिलरी-ट्रंप (गिल्ट बाय असोसिएशन) by विकास
ट्रंप यांचे कैसे बोलणे आणि कॉन्स्पिरसी थिअरी
In reply to ट्रंप यांचे कैसे बोलणे आणि कॉन्स्पिरसी थिअरी by विकास
+१
In reply to +१ by बबलु
तस झालं तर
In reply to +१ by बबलु
प्रायमरीत डेलिगेट्सचा मॅजिक
In reply to ट्रंप यांचे कैसे बोलणे आणि कॉन्स्पिरसी थिअरी by विकास
>>ज्यात ते म्हणाले की जर