मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा सदस्यांना भेटण्याविषयी.

शान्तिप्रिय · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सदस्य मित्र मैत्रिणींनो, मी मिपावर तसा अगदीच नवा (सदस्य) म्हणून. जेमतेम तीन महिन्यांपूर्वी मी सभासद झालो. मिपा हे मराठी अभिव्यक्तीचे एक उत्तम माध्यम आहे यात दुमत नसावेच! मिपा हे चेपु सारखे उथळ माध्यम नसावे असे माझ्यासकट सर्वांना वाटत असेल. मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि कल्पना माझ्या मनात आहेत. तसेच मिपा च्या काहि सदस्यांना माझी भेटण्याची इच्छा आहे. मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे. सर्व क्षेत्रांतील दिग्गज सदस्य मायबोलीवर इतके प्रेम करताना पाहुन छान वाटते. सुरुवातीला अगदी कट्टा न जमल्यास मी काहि मिपा सदस्यांना भेटु शकेन का? मी अंधेरी सीप्झ येथे काम करतो. जर कोणी या भागातच असल्यास याच आठवड्यात किंवा नंतर काहि आठवड्यांनी दुपारच्या जेवणावेळी भेट होणे शक्य होइल का? कोणी जर येथेच असेल तर काखेत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार होणार नाहि. किंवा अन्धेरी पूर्व येथे कोणी असल्यासही ठरवता येइल. एकदा ही भेट झाल्यास कट्ट्याला येण्यास मला उत्साह येइल . - कळावे आणि कळ्वावे मी शान्तिप्रिय! (प्रगल्भ प्रतिसादांच्या अपेक्षेत! )

वाचने 17855 वाचनखूण प्रतिक्रिया 113

गॅरी ट्रुमन Mon, 02/15/2016 - 16:12
मी वांकुसं (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) मध्ये नोकरीला आहे आणि राहायला वाशीला आहे.गेले एकामागोमाग एक असे किमान ८-१० कट्टे मी मिस केले आहेत. तेव्हा इतर मिपाकरांना भेटायला नक्कीच आवडेल.

होबासराव Mon, 02/15/2016 - 16:13
मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि कल्पना माझ्या मनात आहेत. मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे. ब्वॉर्र. प्रगल्भ प्रतिसादांच्या अपेक्षेत!...इथे आपला पास वेलकम टु मिपा..

पक्षी Mon, 02/15/2016 - 16:44
मी मिपा गेल्या २ वर्ष पासून follow करत आहे. पण आत्ताच थोडी वळवळ सुरु केली आहे. जरी मिपाकर मला ओळखत नसले तरी मी जवळजवळ सर्वाना ओळखतो आणि भेटण्याची इच्छा आहे.

शान्तिप्रिय Mon, 02/15/2016 - 16:54
हलकेच घेतोय. तरिही मजेशीर प्रतिसादांबरोबर आपली मुंबैकर मिपाकरांना भेटण्याबद्दल मतेही कळवा. वाट्ल्यास दहावीच्या परिक्षेनंतर कट्टा घेउया. आता ज्यांच्याकडे दहावी बाराविचे पाल्य आहेत त्यांना सवड असणार नाही हे मी जाणून आहे.

In reply to by शान्तिप्रिय

होबासराव Mon, 02/15/2016 - 17:56
मुवि नि एक धागा काढलाय बघा आगामि कट्ट्या साठि मांडा तुमचे मत स्थळ, वेळ, जागा इत्यादि. हाकानाका ;)

In reply to by गॅरी ट्रुमन

टवाळ कार्टा Wed, 02/17/2016 - 12:52
इथेच लिहा नैतर मला व्यनीत अ‍ॅडवा...आम्चा संचार जुनी/नवी/बृहद मुंबै सकट ठाणे/डोंबोली/पाल्घर्/पन्वेल असा सर्वत्र असतो :)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा Mon, 02/15/2016 - 19:30
ते काय कोर्टात जायचे नाहीयेत. मिपावर म्हणजे प्रशांत किंवा नीलकांतकडेच जाणार ना! थांब, मीच बोलावून आणते कोणालातरी.

In reply to by टवाळ कार्टा

अजया Mon, 02/15/2016 - 18:56
टका सालस तर मी महासालस आहे. पुरावा म्हणून पकडलेला चालेल.जरा मला आय डी घेऊ दे. *आमच्याइथे कंपूबाजांना कट्टा स्पाॅन्सर करुन मिळेल. सही- महासालस© अतीसालस© फारसालस©

प्रचेतस Mon, 02/15/2016 - 18:41
क्या बात है शान्तिप्रियजी..!!! अगदी मनातलं बोललात. मलाही मिपाकरांना भेटायची खूप खूप इच्छा आहे. भेटतंच नाहित मेले. तुम्ही पुण्यात कट्टा ठरवा. अवश्य येईन.

In reply to by टवाळ कार्टा

गवि Tue, 02/16/2016 - 12:47
बिगरीतच अ‍ॅमेचा प्रश्न घालताय त्यांना =))
मी चुकून "अ‍ॅम्वेचा" प्रश्न वाचलं. आणि कट्ट्याच्या प्रयोजनाविषयी अनेक शंका पिंगून गेल्या.

In reply to by होबासराव

सूड Mon, 02/15/2016 - 19:15
कोथरूड त्यातल्या त्या ठीकाय, एरवी सिंहगड मार्ग, जंगली महाराज मार्ग, फर्ग्युसन महाविद्यालय मार्ग इत्यादि ठिकाणच्या कट्ट्यांना प्राधान्य देण्यात येईल.

एस Mon, 02/15/2016 - 19:55
मिपा सदस्यांना तुम्हांला कशासाठी भेटायचे आहे? इथला आभासीपणाही तितकाच रोचक नाहीये का?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मुक्त विहारि Mon, 02/15/2016 - 21:25
तो नियम पुणे कट्ट्याला... मुंबई कट्ट्यासाठी १ धागा पुरेसा होतो.

In reply to by मुक्त विहारि

मुंबईकरांचं मध्यवर्ती ठिकाणाच्या बाबतीत एकमत कधीचं होत नाही. मुंबैवाले डोंबिवली मुंबैचा भाग कसा नाही म्हणुन ओरडाआरडा करायला लागतात. धागे तीन नाही काढायला लागले तरी व्हायचा तो सावळा गोंधळ होतोचं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मुक्त विहारि Mon, 02/15/2016 - 21:33
१००% मान्य... पण आमचे कट्टे मात्र लगेच ठरतात. सध्या विषय कट्ट्याबाबत असल्याने, कट्ट्याबाबतच चर्चा करावी असे नाही.ते मिपाधर्माला योग्य पण नाही. बाद्वे, पुण्यात पण नक्की कुठे कट्टा करावा? सध्या तरी आकुर्डी हेच पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे, असे माझे मत.

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस Mon, 02/15/2016 - 21:36
मला चालेल. तिथे जवळच गणेश तलाव नामक एक निसर्गरम्य ठिकाण आहे म्हणे. तेथे सर्व मिपाकरांस भेटायला मला निश्चित आवडेल.

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा Mon, 02/15/2016 - 21:44
पण आमचे कट्टे मात्र लगेच ठरतात. >>तुमचे कट्टे ठरतात, पुणेकरांचे होतात, इतकाच फरक! =))

In reply to by यशोधरा

मुक्त विहारि Mon, 02/15/2016 - 22:00
हो ना, होतात ना.... पण कट्टे ठरवायलाच इतका वेळ खर्ची पडतो की विचारता सोय नाही. पुण्यात कट्टा ठरेपर्यंत आमच्या डोंबोलीत ३-४ कट्टे होतात.

In reply to by यशोधरा

मुक्त विहारि Mon, 02/15/2016 - 22:10
आमच्या डोंबोलीत ३-४ कट्टे होतात....असेच म्हणायचे आहे... कधी-कधी मुद्दाम धागे काढून तर कधी-कधी फोना-फोनी करुन.

In reply to by मुक्त विहारि

सूड Mon, 02/15/2016 - 22:24
असतील हो होत, पण आम्हाला पुण्यात बघा कशी वेगवेगळी ठिकाणं आहेत. तुमचं एक ते नंदी प्यालेस सोडलं तर आहे काय त्या डोंबोलीत कट्टा करण्यासारखं!!

In reply to by सूड

मुक्त विहारि Mon, 02/15/2016 - 22:34
तुमचं एक ते नंदी प्यालेस सोडलं तर आहे काय त्या डोंबोलीत कट्टा करण्यासारखं!! एकदम खरी गोष्ट... उगाच १० ठिकाणी १० गोष्टी चाखायला जाण्यापेक्षा (आणि ते पण रांगा वगैरे लावून,) एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळण्यातले सूख काही औरच. पण मी काय म्हणतो, तुम्ही एकदा "नंदी पॅलेसला" याच. कुवैतकर, जर्मनीकर येवून गेले आणि जातांना "नंदी पॅलेसचे" कौतूक पण करून गेले. .तुमच्या बदलापूर पासून डोंबोली काही जास्त दूर नाही. बाद्वे, नंदी पॅलेस मध्ये श्रीखंडाचे पाणी (ज्याला पुण्यात "पियुष" असे म्हटले जाते) ते मात्र मिळत नाही. डिस्केमर : मी नंदी पॅलेसचा मालक पण नाही आणि जाहीरात पण करत नाही.पुढे मागे जर "नंदी पॅलेस" पेक्षा उत्तम हॉटेल निघाले तर तिथे जाऊ.

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा Mon, 02/15/2016 - 22:44
उगाच १० ठिकाणी १० गोष्टी चाखायला जाण्यापेक्षा >>आहेत म्हणून जाऊ शकतो. तुमच्याकडे नाईत? घ्या!पाणीसुद्धा मिळत नै त्या पॅलेसात??..काय उपेग! नुसतंच नाव पॅलेस! :P

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा Tue, 02/16/2016 - 12:09
आणि इतकं छान छान ते नंदी पॅलेस असूनसुद्धा तुम्ही शेवटी त्या "श्रीखंडाच्या पाण्याचीच" आठवण काढता की नै?

In reply to by यशोधरा

मुक्त विहारि Tue, 02/16/2016 - 12:21
पुण्यात जिथे जाऊ त्या घरी "पुणेरी श्रीखंडाचे पाणी" हा विषय निघतोच. त्यामुळे आम्हाला वाटले की, समस्त पुणेरी जन तिन्ही-त्रिकाळ ह्या श्रीखंडी पाण्यानेच तहान भागवत असावीत. अगदीच नाही भागली तहान तर, मग ते जेमतेम अर्ध्या बशीतले अमृत-तुल्य नामक पेय आहेच. वट्ट ५ रुपये घेतलेन त्याने. पुणेरी जन मात्र भलतेच सहनशील हो... तरी पण आम्ही सध्या आकुर्डी वर मात्र खूष आहोत. बहूदा आकुर्डी, पुणे महानगर पालिकेत येत नसल्याने, उत्तम हवा, रुंद रस्ते, तरणतलावावर जास्त नसलेली गर्दी, इत्यादी सामान्य माणसांसाठी आवश्यक गोष्टी अद्याप तरी टिकून आहेत.

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा Tue, 02/16/2016 - 12:28
पुण्यात जिथे जाऊ त्या घरी "पुणेरी श्रीखंडाचे पाणी" हा विषय निघतोच. >> ह्याच त्या अपुणेकरांच्या सवयी! पुण्यातल्या घरी जातील, पाहुणचार झोडतील आणि मागून उग्गाच गळे काढतील! तरी पण आम्ही सध्या आकुर्डी वर मात्र खूष आहोत.>> ह्या, ह्या, ह्या! =)) असणारच तुम्ही, तुम्हांला चॉईसच नाहीये! हळूहळू पुण्याबाबत हेच म्हणाल. लिहून घ्या. अपुणेकरांची सवय आता आम्हां पुणेकरांना नवीन नाही.

In reply to by यशोधरा

मुक्त विहारि Tue, 02/16/2016 - 12:38
आणि मागून उग्गाच गळे काढतील! होना एक कप भर (घोट सुद्धा भरत नाही हो.) चहा पण धड देत नाहीत. (गोव्यातला एका मिपासदस्या कडून मिळालेली ऐकिव माहिती.) "हळूहळू पुण्याबाबत हेच म्हणाल. लिहून घ्या. अपुणेकरांची सवय आता आम्हां पुणेकरांना नवीन नाही." काय करणार? मनुष्य स्वभाव आहे.एकदा पुणेकर झालो तर, पुण्याबाबत अभिमान बाळगायलाच लागतो.बरं नुसता अभिमान काही कामाचा नाही.तो जाज्वल्यच असायला लागतो. (लग्न झाल्या पासून आम्ही. अभिमान नावाचा शब्द विसरलो.पण पुण्याबाबतीत मात्र हा नियम तोडायला लागणार.)

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा Tue, 02/16/2016 - 12:41
त्या पण पुण्याच्या नैत. तेव्हा, ह्या, ह्या, ह्या... पण पुण्याबाबतीत मात्र हा नियम तोडायला लागणार - एक म्हण आठवतेय ब्वॉ. पण ठीके, या आमच्या पुण्यात.

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस Tue, 02/16/2016 - 12:29
अगदी खरंय मुविकाका. आमचं पिंपरी चिंचवड भारतातल्या सर्वाधिक स्वच्छ १० शहरापैकी एक म्हणून निवडलं गेलंय आणि तुमचं कल्याण डोंबिवली .....ह्या ह्या ह्या.... =))

In reply to by प्रचेतस

गवि Tue, 02/16/2016 - 12:54
पिंपरी चिंचवडचे हार्दिक अभिनंदन. या आनंदाप्रीत्यर्थ प्रचेतसजी पिंचिमधे अभामिपासंमेलन (संपूर्ण स्पॉन्सर्ड) कधी करणार आहेत ?

In reply to by पैसा

यशोधरा Tue, 02/16/2016 - 13:30
सगळ्यांना पुणेकरांकडूनच काही ना काही हवे असते! पुणेकरांना मात्र कोणी काही बोलावत नाही, हे निरीक्षण नोंदवत आहे!!!

In reply to by गवि

यशोधरा Tue, 02/16/2016 - 13:59
आम्ही येऊच हो. अपुणेकरांना खाऊ पिऊही घालू. कोणाला श्रीखंडाचे पाणी हवे असल्यास तेही पाजू. पुरावे म्हणून फोटोही काढू!