✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव

च
चित्रगुप्त यांनी
Sun, 09/04/2011 - 12:17  ·  लेख
लेख
.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत...... प्रश्नः हे नेमके काय असावे, मनस्विदांनी यावर कोणते संशोधन केलेले आहे, जगभरातील प्राचीन साहित्यात असे उल्लेख आहेत का, आणि तुमच्या अनुभवात वा ऐकीवात असे काही प्रसंग आले आहेत का? घटना १: माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे. घटना २: माझ्या एका मित्राचे वडील अंतकाळी त्यांच्या खोलीत सतत कुणाशीतरी बोलत असायचे. मात्र त्यांचे वर्तमानाचे भान शाबूत होते. ते त्यांच्या मुलाला वा सुनेला दहा-बारा कप चहा करून आणायला सांगायचे. एवढा कुणासाठी? असे विचारले, की "अरे हे बघ सर्व जण बसले आहेत... असे म्हणून जमिनीकडे बोट दाखवायचे. कोण कोण आहेत? असे विचारले की ते ज्यांची नावे घेत, ते सर्व त्यांचे मृत नातेवाईक व मित्र असायचे. घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला. "वातात बरळणे" असे ज्याला म्हणतात, तसा माझा स्वतःचा अनुभव असा, की मी सतरा वर्षाचा असताना टायफॉइड च्या तापात तासनतास उर्दू शेरो-शायरी बरळत असे. मला उर्दू भाषा येत नाही, किंवा शेर वगैरे काहीही माहीत नाहीत.... याचे काय स्पष्टीकरण असावे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
164004 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

पटले, अगदी पटले

चित्रगुप्त
Tue, 09/13/2011 - 11:34 नवीन
....आपण व आपल्या यजमानांना - दस्तूरखुद्द राज यम, त्यांनाही ती अट लागू करावी ...... पटले, अगदी यमरा़जांनासुद्धा पटले. आता भारतातील सगळ्या शहरात जशी नाडी केन्द्रे उघडली आहेत, तसे इकडे स्वर्गलोकात उघडण्यासाठी यमराजांनी जागा सुद्धा अलॉट केली. बोला, तुमचे ते लुंगीधारी व नाड्यांची बंडले 'उचलून' आणायला यमदूतांना केंव्हा पाठवू ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

हिशोब चुकता झाला असेल तर उचला एकेकांना.

शशिकांत ओक
Wed, 09/14/2011 - 01:00 नवीन
चित्रगुप्त जी,
तुमचे ते लुंगीधारी व नाड्यांची बंडले 'उचलून' आणायला यमदूतांना केंव्हा पाठवू ?
मला का विचारत आहात. ते आपले काम आहे. हिशोब चुकता झाला असेल तर कानावरची पेन्सिल काढून, आपण ठरवा अन उचला एकेकांना. पण तेथे आधी पोहोचलेल्या अंनिसवाल्याची नाडी पट्टीनिघाली व त्यांची पळता भुई झाली तर ते बिचारे पृथ्वीतलावर परतू शकणार नाहीत. तेंव्हा ठरवा नक्की काय ते.
  • Log in or register to post comments

सध्या चाललेल्या...

चित्रगुप्त
Sun, 04/22/2012 - 20:57 नवीन
सध्या चाललेल्या धाग्यांशी हा विषय काहीसा संबंधित आहेसे वाटल्याने हा धागा पुन्हा वर काढत आहे.
  • Log in or register to post comments

माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू

चौकटराजा
Tue, 05/14/2013 - 13:10 नवीन
माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे. माझी आई मे ४ २०१३ रोजी जग सोडून गेली. वरील प्रकारच्या अनुभवाच्या जवळ जवळ ८५ टक्के अनुभव मलाही आला. आमच्या आईच्या बाबतीत दादा आले ऐवजी बाबुराव ( मृत्यू ४० वर्षापूर्वी) असे येई. यावर शास्त्रीय कारण असे की शेवट आला असता बाह्य मेंदू मृत पावत जातो.अंतर्भागात जुन्या आठवणी असल्याने त्याच भागाचा वापर होतो.
  • Log in or register to post comments

मरणानंतरचे जीवन

महेश नामजोशि
गुरुवार, 05/16/2013 - 11:43 नवीन
वरील विषयाला धरूनच एक माझ्या आठवणीत आहे. माझे आईवडील लवकरच गेले. मी तेवीस वर्षाचा असताना ते एकापाठोपाठ वारले. काही वर्षानंतर माझ्या लग्नाच्या वेळची आठवण आहे. मुलगी पाहायला माझ्या काकांबरोबर आम्ही एका ठिकाणी गेलेलो असतांना, त्या ठिकाणी पहिले कधीही गेले नसतांना काका म्हणाले मी येथे अगोदरच येउन गेलो आहे. माझ्या वडिलांना भाऊ म्हणत. काका म्हणाले माझ्या स्वप्नात भाऊ आले होते व मला म्हणाले चल महेशकरिता मुलगी बघायची आहे. मी व भाऊ याच बिल्डींगमध्ये आलो होतो व भाऊंनी मुलगी लांबूनच बघून छान आहे म्हणाले. आणि स्वप्न संपले. आज आपण या ठिकाणी आलो तेव्हा मला स्वप्नात मी भावूंच्याबरोबर येथे मुलगी बघायला आलो होतो ती आठवण झाली. हा जिना, हि बिल्डींग पूर्ण लक्षात आहे. काय आश्चर्य आहे या पूर्वी आपण येथे कधीही आलो नव्हतो. तरी मला हि जागा पाहिल्याचे पूर्ण आठवते.
  • Log in or register to post comments

असे धागे मिपावर येछृणं कमी

उगा काहितरीच
Mon, 01/04/2016 - 15:24 नवीन
असे धागे मिपावर येछृणं कमी झालंय राव !
  • Log in or register to post comments

शात्रीय कारण

नितीनचंद्र
Mon, 01/04/2016 - 16:37 नवीन
नैसर्गीक कारणाने/ वाढत्या वयाने जेव्हा मृत्यु होणार असतो तेव्हा माणसाच्या शरीरात अनेक बदल होत असतात. शरीरातले सोडीयम्/पोटॅशियमचे प्रमाण घटणे हा त्या पैकी एक असावा. माझ्या वडीलांचे मृत्यु पुर्वी असेल सोडीयम्/पोटॅशियम घटले आणि ते एक दिवस लोकांना ओळखणे त्यांना कठीण झाले. प्रश्नांना उत्तरे असयुक्टिक होती. माझा मेहुणा ( बायकोचा भाऊ ) भेटावयास आल्यावर मी विचारले पहा कोण आले आहे ? त्यांनी महाराष्ट्रातल्या एका प्रतिथयश नेत्याचे नाव घेतले जो जिवंत होता आणि त्यांचा माझ्या वडीलांशी कुठलाही वैयक्तीक स्ंपर्क नव्हता. डॉक्टरांनी काही औषधे सलाईन द्वारे दिल्याने सोडीयम्/पोटेशियम नियंत्रणात आले. यानंतर मात्र डॉक्टरांनी वडीलांना घरी घेऊन जा म्हणुन सांगईतले पुढे आणखी काही महत्वाची चिन्हे दिसली ज्यामुळे मृत्यु जवळ आला हे समजले. १. कानाच्या पाळ्या मागच्या बाजुला झुकणे. २. शरीरात बेड सोर्स ( Bed sores ) होणे. ३. जिवेष्णा संपणे ( आयुर्वेदीक टर्म) जगण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडणे. यातुन मृत्युचे निदान करता येते. प्रत्यक्ष मृत्यु होण्याचे आधी काही लक्षणे दिसतात. १. घर घर लागणे ( श्वास घेताना मोठा आवाज होणे ) २. पाय गार लागणे या लक्षणावरुन मृत्यु दिवसांवरुन काही तासांवर आल्याचे निश्चित होते.
  • Log in or register to post comments

निदाने

प्रदीप
Wed, 01/06/2016 - 18:48 नवीन
पुढे आणखी काही महत्वाची चिन्हे दिसली ज्यामुळे मृत्यु जवळ आला हे समजले. १. कानाच्या पाळ्या मागच्या बाजुला झुकणे. २. शरीरात बेड सोर्स ( Bed sores ) होणे. ३. जिवेष्णा संपणे ( आयुर्वेदीक टर्म) जगण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडणे. ह्यातील १ विषयी काही माहिती नाही. पण २ हे काही मृत्यू जवळ आल्याचे लक्षण नाही. एकाच पोझिशनमधे दिवसेंदिवस झोपल्याने हे सोअर्स होतात. तसे ते होऊ नयेत, म्हणून उत्तम नर्सिंगची जरूरी असते. बेड सोअर्स होऊनही अनेक वर्षे जगलेली माणसे माझ्या पहाण्यात आहेत. ३ बद्दलचा माझा अनुभव वेगळा आहे. दुर्धर रोगामुळे बिछान्याला खिळलेली, तसेच केवळ वयामुळे अशक्त झालेली माणसे 'आता मला मरू द्या रे' असे अनेकदा म्हणत असतात. जगण्याची उर्मी जाऊनही अनेक वर्षे काढलेली माणसेही माझ्या पहाण्यात आहेत. तेव्हा तुमचे हे दोन्ही निकष चुकीचे व अपुर्‍या माहितीवर/ विदा असतांना बेतलेले आहेत. साती ह्या तिन्हींविषयी व्यवस्थित सांगू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र

१. कानाच्या पाळ्या मागच्या

श्रीगुरुजी
Wed, 01/06/2016 - 23:03 नवीन
१. कानाच्या पाळ्या मागच्या बाजुला झुकणे. २. शरीरात बेड सोर्स ( Bed sores ) होणे. ३. जिवेष्णा संपणे ( आयुर्वेदीक टर्म) जगण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडणे. यातुन मृत्युचे निदान करता येते. प्रत्यक्ष मृत्यु होण्याचे आधी काही लक्षणे दिसतात. १. घर घर लागणे ( श्वास घेताना मोठा आवाज होणे ) २. पाय गार लागणे
माझी आजी १९८९ साली वृद्धापकाळामुळे गेली. मृत्युच्या साधारणपणे २४ तास आधी तिचे पाय तळपायापासून थंडगार पडायला सुरूवात झाली होती. ३-४ ब्लँकेट्स पायावर घालुन सुद्धा गुडघ्यापासून खालचे पाय थंडगार पडले होते. मृत्युपूर्वी ६-७ दिवस पूर्ण दिवसरात्र तिचे डोळे पूर्ण मिटलेले असायचे व डोळे मिटलेल्या अवस्थेतच ती बोलत होती, परंतु हाकेला ओ देऊनसुद्धा डोळे उघडत नव्हती. मात्र मृत्युपूर्वी साधारण दीड तास आधी तिचे डोळे लख्ख उघडले होते व दोन्ही बाजूला सतत नजर फिरवित ती सर्वांकडे पहात होती. जणू ती जाण्यापूर्वी सर्वांना डोळ्यात सामावून घेत होती. दीड तासानंतर तिचा श्वास हळूहळू संथ होत गेला व एका क्षणी पूर्ण थांबला आणि एक आत्मा परतात्म्यात विलीन झाला. ती जेथून आली तिथेच परत गेली. म्रुत्युनंतर तिचे कान बरेच काळे पडले होते. या संपूर्ण घटनेच्यावेळी मी तिथेच उपस्थित होतो म्हणून अजूनही सर्व नीट आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र

धागा

तिमा
Mon, 01/04/2016 - 18:40 नवीन
धागा वर काढलाच आहे तर माझा अनुभव नोंदवतो. माझी आई १९९९ साली गेली. ती धडधाकट असताना आम्ही एक करार केला होता. मरणानंतर जर अस्तित्व असेल तर तिने ते कुठल्याही प्रकारे माझ्यापर्यंत पोचवायचं. त्यावर ती गंमतीने असे देखील म्हणाली ती, आत्म्याला जर हात पाय, वाणी, स्पर्श हे काहीच नसेल तर मी कम्युनिकेट कसं करणार ? त्यावर मी तिला म्हणालो, की बघ, जे काही करता येईल ते कर. आमच्या घरांत एक मोठा डबा होता. तो तिने बोहारणीकडून घेतल्यामुळे, त्याचे झाकण नीट लागत नसे आणि लागलेच तरी कधी, मोठ्ठा आवाज करुन उडत असे. तिच्या अंतकाळात आम्ही हे बोलणे विसरुन गेलो होतो. ज्या दिवशी रात्री ती गेली, त्यावेळेस तिच्या उशाशी माझी पत्नी होती. आई तर कोमातच होती. मी घरी मुलांना बघायला थांबलो होतो, पण अस्वस्थ होतो. बरोबर रात्री ८ वाजता फोन वाजला. ही सांगत होती, एक मिनिटापूर्वीच आई गेल्या. मी फोनवर बोलत असतानाच स्वयंपाकघरांत मोठ्ठा आवाज होऊन त्या डब्याचे झाकण निघून आवाज करत खाली पडले होते. याचा अर्थ कसा लावायचा, ते प्रत्येकाने ठरवावे.
  • Log in or register to post comments

योगायोग. दुसरं काय !!!

जिन्क्स
Tue, 01/05/2016 - 19:51 नवीन
योगायोग. दुसरं काय !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

वाचतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/04/2016 - 19:04 नवीन
येऊ द्या अनुभव. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

ohhh!!!!

याॅर्कर
Mon, 01/04/2016 - 19:21 नवीन
I Hope कि मिपावर सगळे well educated आहेत.
  • Log in or register to post comments

अनुभव

सावि
Mon, 01/04/2016 - 20:28 नवीन
माझे आजोबा (वय ८४) असतांना त्यांना एकदा अति दक्षता विभाग मध्ये होते. डॉक्टर ने सांगितले दिलेल्या औषधांमुळे पुढचे ५-७ दिवस थोडा असंबद्ध बडबड करतील. मेंदू ला कमी रक्तप्रवाह आणि शक्तिशाली औषधे यामुळे असे होते हेही सांगितले. नंतर ३-४ दिवस ते ३०-३५ वर्षापूर्वी च्या काळात पोचले होते. मला ते त्यांचा लहान मुलगा म्हणून बोलत होते. घरच्यांना पुरेपूर कल्पना दिल्यामुळे आम्हीही तसेच वागत होतो. नंतर ते ठीक झाले पुढचे २ वर्ष अगदी ठणठणित घालवले. शेवटच्या क्षणी मात्र अशी काही बडबड वगैरे केल्याचा आठवत नाही. सगळे सुप्त मेंदू चे खेळ असतात, कोणी केमिकल लोचा म्हणतं तर कोणी भास …
  • Log in or register to post comments

अवयव दान करा आपले मरणानंतरचे

प्रकाश घाटपांडे
Tue, 01/05/2016 - 19:23 नवीन
अवयव दान करा आपले मरणानंतरचे अस्तित्व इतरांना जाणवेल https://www.facebook.com/JaanAryaa/videos/10153332404900682/
  • Log in or register to post comments

+१०००

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/05/2016 - 19:47 नवीन
+१००० मेलेल्या माणसाच्या शरीराचा, शरीरदान अथवा अवयवदान यासारखा उत्तम उपयोग दुसरा नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

डॉ सुहास मात्रे

नितीनचंद्र
Wed, 01/06/2016 - 10:33 नवीन
मेलेल्या व्यक्तीच्या शरीराचा नक्कीच देहदाना साठी उपयोग आहे. चर्चा आहे आत्मा विषयाची. मृत्यु नंतरचे जीवन या बाबत. आपल्या माहिती साठी लिहतो की ही व्यक्ती ( अनिस किंवा अन्य लोकांनी ) कितीही वादग्रस्त ठरवली असली तरी ते नुसतेच एम बी बी एस नाहीत तर पुण्यात अनेक वर्ष प्रॅक्टिस करत आहेत/ होते. आज त्यांचे वय ९० च्या पुढे असेल. डॉ प. वि. वर्तक त्यांचे नाव. त्यांनी पुनर्जन्म या विषयावर पुस्तक लिहले आहे. आपण जर पुर्वग्रह दुषीत न करता वाचले तर आपल्याला अतिशय तर्क शुध्द वाटेल. या शिवाय पुण्यातल्याच मेधा खासगीवाले नावाच्या स्त्री विदुषी २०० तिकीट लाऊन या विषयावर व्याख्यान देतात. आपण वाचावे आणि अनुभव घ्यावा.
  • Log in or register to post comments

माहितीसाठी धन्यवाद ! माझा

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/06/2016 - 10:47 नवीन
माहितीसाठी धन्यवाद ! माझा प्रतिसाद घाटपांडे याच्या देहदानासंबंधीच्या प्रतिसादावर होता... पुनर्जन्माबाबत नव्हता, वा त्यांत तसा उल्लेखही नाही. पुनर्जन्म, मृत्युसमीपचे (नियर डेथ) अनुभव व अश्या सर्वच अतर्क्य वाटणार्‍या घटनांकडे मी नेहमीच कुतुहलाने पाहतो व त्यांची कारणपरंपरा आधुनिक शास्त्राच्या परिघात बसेल काय हे शोधण्याचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र

डॉ प. वि. वर्तक

मोदक
Wed, 01/06/2016 - 13:44 नवीन
डॉ प. वि. वर्तक मंगळावर जावून आलेले ते हेच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र

माझा एक अनुभव, ऐकलेला.

आनन्दा
Wed, 01/06/2016 - 13:21 नवीन
माझा एक अनुभव, ऐकलेला. एक वृद्ध गृहस्थ, तसे ठणठणीत, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अचानक सन्ध्याकाळी म्हणाले, चला पटपट आवरा, माझी जायची वेळ झाली. त्यांनी घाई करून लक्ष्मीपूजन लवकर करायला लावले, आणि १-२ तासांमध्ये गेले पण.
  • Log in or register to post comments

@मोदक

नितीनचंद्र
Wed, 01/06/2016 - 14:22 नवीन
@ मोदक, बरोबर आहे. डॉ प वि वर्तकांचे या विषयातले मुळ लेखन वाचावे. त्याच्या आत्मचरित्रात त्यांनी म्हणले आहे की योगाभ्यासात खालील सुत्र आहेत. यांचा अभ्यास सुरु असताना त्यांनी मंगळ ग्रहावर संयम केला ( धारणा म्हणजे सातत्याने त्याचा विचार - ध्यान म्हणजे एकाग्रता- व समाधी म्हणजे त्या पुढची अवस्था - या तिन्हीच्या एकत्रीकरणाला संयम असे योगसुत्रात म्हणले आहे. ) एक दिवस डॉ प वि वर्तक यांना त्यांच्या सुक्ष्म देहाने मंगळावर पोहोचलो हे जाणवले. त्या अवस्थेत त्यांनी मंगळाची २१ निरिक्षणे केली. जसे मंगळावर कधी काळी पाणी होते इ. परंतु तुमच्या सारखे लोक उपहास करतील म्हणुन मानवाने सोडलेले यान मंगळावर पोहोचण्या आधी एक लेख छापुन २१ निरिक्षणे प्रसिध्द केली. या पैकी २० निरीक्षणे नासा च्या निरीक्षणाशी जुळणारी होती म्हणुन माझा प्रयोग यशस्वी झाला असे ते म्हणतात. या नंतर निव्वळ असुये पोटी लोकांनी त्यांना आव्हान दिले जे त्यांनी मानले नाही. मग तुमच्या सारखे लोक हेटाळणी करत राहिले परंतु एकाही सुशिक्षीत माणसाने त्यांचे तर्कसंगत लेखन वाचुन ते किमान तर्कसंगत असल्याचा निर्वाळा दिला नाही. अर्थातच डॉ वर्तकांना त्याची आवश्यकता वाटली नाही. योगसुत्रातल्या विभुती पादातल्या अनुक्रमे ४२ आणि ४८ सुत्रे व त्याचे विवरण - लेखांक एकूण ४ पैकी ३ रा http://www.maayboli.com/node/12306 घेतले आहे या करीता मायबोली आणि मुळ लेखकांना धन्यवाद. ४२. कायाकाशयोः संबन्धसंयमाल् लघुतूलसमापत्तेश्चाकाशगमनम् । शरीर आणि आकाश ह्यांचा जो संबंध त्यावर संयम केला असता आणि कापसासारख्या हलक्या असणार्‍या पदार्थावर समापत्तिरूप तन्मयता प्राप्त करून घेतल्याने योग्याला 'आकाशगमन' हि सिद्धी प्राप्त होते. ४८. ततो मनोजवित्वं विकरणभावः प्रधानजयश्च । मनाच्या वेगासारखा गतीलाभ शरीरास होणे हे मनोजवित्व आणि कोणत्याही देशांतील आणि काळांतील विषयांचे सेवन इंद्रिय-निरपेक्ष घडू शकणे हा विकरणभाव. मागील सूत्रांत सांगितलेला इंद्रियजय प्राप्त झाला असता मनोजवित्व आणि विकरणभाव ही व्यष्टिनिष्ठ संयमाची फले आणि प्रधानजय हे समष्टिनिष्ट संयमाचे फल अशी तीन प्रकारची फले योग्यास प्राप्त होतात. डॉ म्हात्रे - मृत्यु पुर्वीच्या विषयावर आपली चर्चा सुरु होती. देहदान विषयावरच्या आपल्या म्हणण्याला मी दुजोराच दिला आहे. केवळ सुरवात तिथुन होती म्हणुन मी आपले नाव घेतले इतकेच. यार्कर यांनी I Hope कि मिपावर सगळे well educated आहेत. असे लिहले म्हणुन मी उच्च शिक्षीत व्यक्तीचा हवाला देत पुढचे लिहले. प्रकाश घाटपांडे त्यांनी मृत्यु पुर्वीच्या विषयाला मृत्युनंतर देहदान अशी बगल दिली . मृत्युनंतर जिवात्मा आणि शरीर वेगळे होतात. त्यांनी शरीरासंदर्भात लिहले म्हणुन मी मृताम्या संदर्भात लिहले. लिहताना माझे स्वतः चे संशोधन नसल्यामुळे त्या संदर्भात डॉ प वि वर्तकांच्या पुनर्जन्म पुस्तकाचा उल्लेख केला. हा केला रे केला की मंगळ येणार हे उघड होते म्हणुन त्यावरही लिहले. आता मुळ विषयावर चर्चा सुरु रहाण्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments

सुक्ष्म देहानी पाकीस्ताना त

प्रसाद१९७१
Wed, 01/06/2016 - 14:54 नवीन
सुक्ष्म देहानी पाकीस्ताना त जाऊन दाऊद कुठे लपला आहे ते रॉ/छोटा राजन /अजित डोवल ह्यांना सांगण्याची विनंती करणार का वर्तक साहेबांना ( त्यांना डॉक्टर म्हणणे बरोबर वाटत नाही )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र

+१

सूड
Wed, 01/06/2016 - 18:43 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

त्यासाठी सुक्ष्म देहाची काय गरज आहे?

एक सामान्य मानव
गुरुवार, 01/07/2016 - 12:15 नवीन
दाउदचा ठावठिकाणा सरकारला नीट माहीत आहे. प्रश्ण त्याला पकडून आणण्याचा किंवा मारण्याचा आहे. त्यासाठी सुक्ष्म देहाचा उपयोग नाही. तिथे "टायगर" सल्लुमिया, एजंट विनोद सैफ किंवा कमांडो अक्षयकुमार यांना पाठवायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

अहो मालक - ते उपहासानी लिहीले

प्रसाद१९७१
गुरुवार, 01/07/2016 - 13:45 नवीन
अहो मालक - ते उपहासानी लिहीले होते. मला इतकेच म्हणायचे होते की जर मंगळावर जाऊन निरीक्षण करण्यापेक्षा इथल्याच मानवजाती साठी उपयोगी पडतील अशी निरीक्षणे केली वर्तक बाबांनी तर कीती बरे होईल. अमेरीके ने ओसामाचा ठावठीकाणा शोधण्यासाठी कीती कष्ट केले, त्यापेक्षा भारतानी अमेरीकेला वर्तक बाबा १ दिवस भाड्यानी दिले असते तर कीती सोप्पे झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव

तुम्ही उपहास (आणि / किंवा)

मोदक
गुरुवार, 01/07/2016 - 13:47 नवीन
तुम्ही उपहास (आणि / किंवा) हेटाळणी का करत आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

परंतु तुमच्या सारखे लोक उपहास

मोदक
Wed, 01/06/2016 - 19:29 नवीन
परंतु तुमच्या सारखे लोक उपहास करतील म्हणुन मग तुमच्या सारखे लोक हेटाळणी करत राहिले मी उपहास केला किंवा हेटाळणी केली हे अनुमान कशावरून काढलेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र

दाऊद

नितीनचंद्र
Wed, 01/06/2016 - 15:01 नवीन
हे शोधायला डॉ वर्तकांची आवश्यकता नाही. त्याला मारण्याचा प्लॅन मुंबई पोलीसांनी फोडला आणि तो वाचला ही कथा वाचली असेलच. तुम्ही त्यांना डॉ म्हणले नाही म्हणुन काही बिघडणार नक्कीच नाही. वैशम्य अशाचे की त्यांचे लेखन न वाचता हे लिहायचे.
  • Log in or register to post comments

जिवात्म जगाचे कायदे नावाचे

palambar
गुरुवार, 01/07/2016 - 00:34 नवीन
जिवात्म जगाचे कायदे नावाचे पुस्तक एका पारशि स्त्रि ने लिहिले आहे. तिचे जुळे मुलगे अपघातात एकदम गेले त्यानंतर तिचे अनुभव यात सांगितले आहेत. पुढे आत्म्याचे काय होते, त्यांच्या हि लेवल असतात वगेरे आहे.
  • Log in or register to post comments

भावनगरी..

योगी९००
गुरुवार, 01/07/2016 - 08:44 नवीन
ते पुस्तक मी वाचले आहे. त्या पारशी बाईचे नाव खोर्दशेड भावनगरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar

अ.वि.साठे(?)

अनिरुद्ध प्रभू
Mon, 04/25/2016 - 10:54 नवीन
कहि वर्षापूर्वी तरुण भारत या व्रुत्तपत्रात गूढ्जाल नावाच एक सदर येत असे. त्याचे लेखक बहुदा अ.वि.साठे होते.(९९% खात्रि आहे पण १% नाहि. जाणकार प्रकाश टाकतिलच.) त्यात अशा विषयावर लेख येत असे. अब्राहम लिन्कन आणि त्याच भूत हे प्रकरण तिथेच कळाल. तसच अत्रे यान्च्या बाबत हि कळाल. ते गेल्यानन्तर त्यान्च्या बन्ग्ल्यात ते नोकराला हाका मारत असत अस ऐकिवात आहे.
  • Log in or register to post comments

मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे

प्रकाश घाटपांडे
Fri, 02/10/2017 - 12:35 नवीन
मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे नेमके काय होते? तो जिवंत असतो म्हणजे काय असते? हे चैतन्य म्हणजे नेमके काय? मी कोण आहे? असे प्रश्न मला पुर्वीही पडत असत. अलिकडे ही पडतात. विज्ञान या प्रश्नाकडे कसे पहाते? अध्यात्म कसे पहाते? तत्वज्ञान कसे पहाते? असो शतकानुशतके हे प्रश्न असेच आहेत
  • Log in or register to post comments

मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे

सूड
Fri, 02/10/2017 - 13:03 नवीन
मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे नेमके काय होते? तो जिवंत असतो म्हणजे काय असते? हे चैतन्य म्हणजे नेमके काय?
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

+१

संदीप डांगे
Fri, 02/10/2017 - 13:15 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नमस्कार प्रकाशजी,

शशिकांत ओक
गुरुवार, 02/16/2017 - 20:44 नवीन
नमस्कार प्रकाशजी, मृत्यू नंतर काय किंवा मृत्यू म्हणजे काय या प्रकरणी विज्ञान, अध्यात्म आणि तत्वज्ञान काय म्हणतात हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे म्हणून सुचवतो. प्रा अद्वयानंद गळतगेंची यावर तिन्हीअंगांनी विपुल लेखन केले आहे. ते वाचले तर काही खुलासे होण्यासाठी मदत होईल. आपल्याला गळतगे सरांचे वावडे नसेल तर इतर तपशील सांगता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

गळतगे सरांचे लेखन परिचित आहेच

प्रकाश घाटपांडे
Sat, 02/18/2017 - 13:34 नवीन
गळतगे सरांचे लेखन परिचित आहेच. त्यांची काही मते पटत नसली तरी त्यांच्याविषयी आदर आहेच. विपुल, चिकाटीने व सातत्याने लेखन हे फार कमी लोक करतात. मी,रिसबूड व ते असा पत्रव्यवहार आठवतो. त्यांच नवीण विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन पुस्तक वाचायला पाहिजे एकदा. http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5607134768146518443?BookName=Vidnyan-Ani-Andhashraddhanirmulan
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन

शशिकांत ओक
Sun, 02/19/2017 - 08:46 नवीन
नमस्कार प्रकाशजी, जेंव्हा आपण (कै रिसबुड आणि तुम्ही) हे पुस्तक वाचा म्हणून आम्ही म्हटलं तेंव्हा वाचलेत कि नाही माहित नाही. कदाचित असेल. पण आता ही वाचायची उत्सुकता आहे ते ही चांगले आहे. नाडी ग्रंथांवर आपले विचार सध्या काय आहेत माहिती नाही. पण प्रत्यक्षात प्रमाण पहायला, आपले नाव वअन्य माहिती घेतली पाहिजे आहे. ती घेतली काय? आता माझा इंटरेस्ट संपला आहे. असे म्हणून आपण पळ काढू शकत नाही. कारण आपले नाडीग्रंथांचे खंडन करणारे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. म्हणून नाडी ग्रंथांवर 'मला काय त्याचे?' अशी भूमिका घेऊन चालणार नाही. म्हणून आपल्याला विनंती करतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

आता माझा इंटरेस्ट संपला आहे.

प्रकाश घाटपांडे
Sun, 02/19/2017 - 10:16 नवीन
आता माझा इंटरेस्ट संपला आहे. असे म्हणून आपण पळ काढू शकत नाही. कारण आपले नाडीग्रंथांचे खंडन करणारे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे.
असेल ना! त्यातील मते सर्वांना पटतील असे नाही हे ही उघड आहे. पण ती कोणत्याही परिस्थितीत पटलीच पाहिजे असाही आग्रह नस्तो. तेच तेच प्रतिवाद करण्याचाही कंटाळा येतोच की! प्रतिवाद केला नाही म्हणजे पळ काढला अशी समजूत कोणी करुन घेतली तर घेवो. राजा भिकारी माझी टोपी चोरली राजा घाबरला माझी टोपी दिली ही गोष्ट आपल्याला माहित असतेच. आपली मते मधून मधून तपासत राहावी त्यात बदल करावासा वाटला तर तोही करावा असे माझे मत आहे. विज्ञानात अंतिम सत्य शाश्वत सत्य अशी भानगड नस्से. आता काही विज्ञानांध ही लोक असतात. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

आपण विज्ञानांधांचे प्रतिनिधीत्व करत होता.

शशिकांत ओक
Sun, 02/19/2017 - 11:33 नवीन
आपण असे म्हणता का की मी नाडीग्रंथ प्रत्यक्ष अनुभवून पाहून मत तपासणी करून बदल करायला तयारआहे. तर वरील इश्वरन यांनी केलेले निवेदन वाचून पूर्व ग्रह न ठेवता प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

आपण असे म्हणता का की मी

प्रकाश घाटपांडे
Sun, 02/19/2017 - 12:06 नवीन
आपण असे म्हणता का की मी नाडीग्रंथ प्रत्यक्ष अनुभवून पाहून मत तपासणी करून बदल करायला तयारआहे
मी अस म्हणालोच नाही. मी फक्त एक जनरल विधान केल. त्याचा तुम्ही तो अर्थ काढलात. माझी नाडी सापडलीच नव्हती तेव्हा. असो पण त्यासाठी वेळ व श्रम खर्च करायची तयारी नाही. कारण त्यात रस नाही. प्राधान्यक्रमावर ही ते नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

मी असे म्हणालोच नाही!

शशिकांत ओक
Sun, 02/19/2017 - 17:56 नवीन
आपली मते मधून मधून तपासत राहावी त्यात बदल करावासा वाटला तर तोही करावा असे माझे मत आहे.
अहो असे मोघम उल्लेख करता म्हणून मी खुलाशासाठी नाडीग्रंथाबद्दलचे मत आधून मधून तपासणी करून आधीच्या मतात बदल करावासा वाटून झाला आहे का हे नक्की करायला विचारणा केली असता आता त्यात रस नाही असे म्हणता!म्हणजे नाडीग्रंथ भविष्य विषयावर आपण हरून काडीमोड घेतला आहे का? तर ते ही दिसत नाही.. सध्याच्या काळात हा विषय प्राधान्य क्रमांकावर नाही म्हणजे खाली कुठेतरी तोआहे का? नाडीग्रंथ भविष्य विषयावरआपण पुस्तक लिहून असल्याने बुद्धिजीवी लोकांचे प्रतिनिधीत्व आपण करता आहात. ती बाब फक्त वैयक्तिक आवडी निवडीची राहात नाही. हे आपण जाणता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

नाडीग्रंथ भविष्य विषयावरआपण

प्रकाश घाटपांडे
Mon, 02/20/2017 - 09:35 नवीन
नाडीग्रंथ भविष्य विषयावरआपण पुस्तक लिहून असल्याने बुद्धिजीवी लोकांचे प्रतिनिधीत्व आपण करता आहात. ती बाब फक्त वैयक्तिक आवडी निवडीची राहात नाही. हे आपण जाणता.
असहमत आहे. मी असे मानत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

आता - मी तसे मानत नाही, आधी-मी तसे म्हणालोच नाही!

शशिकांत ओक
Mon, 02/20/2017 - 15:02 नवीन
असहमत आहे. मी असे मानत नाही.
वन लाईनर उत्तर देता आहात. त्यामुळे अडकायला नको इतपत अंनिसवाल्यांच्या बाजूने पुस्तके लिहायचा छकडा हाकायचा. पण नंतरच्या जबाबदारीचे जू मानेवर बसायला नको... ही खबरदारी दाखवत. अंनिससोबत सामाजिक जबाबदारी अंगावर यायला नको अशी खबरदारीची वाक्य रचना इथे किंवा तत्सम माध्यमातून करायला जागा करून ठेवायची.... छान... चालू द्या मतपरिवर्तन करायची मोहीम! जन्म दिलेल्या मुलांचे भरण पोषण करायची जबाबदारी पालकांची तसेच प्रकाशित पुस्तक हे त्याच्या लेखकाचे वैचारिक अपत्य असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या जबाबदार्‍या टाळता येत नाहीत! तशी जबाबदारी तुमच्या न मानण्याने टळत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

पुस्तक वाचणार्‍या प्रत्येक

प्रकाश घाटपांडे
Mon, 02/20/2017 - 21:19 नवीन
पुस्तक वाचणार्‍या प्रत्येक वाचकाचे मतपरिवर्तन झाले पाहिजेच व ती लेखकाची जबाबदारी असे मानणार्‍यातला मी नाही. जबाबदारी झटकतो असे समजायचे असल्यास आपण तसे समजू शकता. मी वर राजा भिकारी चे उदाहरण दिले आहेच. हा वाद म्हणजे चर्‍हाट आहे. आपली मते वेगळी आहेत हे परस्परांना माहित आहे तर उगाच किती उगाळत बसायच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

मत परिवर्तन!

शशिकांत ओक
Mon, 02/20/2017 - 23:56 नवीन
मला वाचकांचे मत परिवर्तन अपेक्षित नाही. पुस्तक लेखकाने आपले मत तपासून पाहिले व त्यांत बदल करावासा वाटला तर तो प्रांजळपणे कबूल करून विविध माध्यमातून प्रकाशित करावा. राजा आणि टोपी कथानकात शाब्दिक विजय मिळवल्याचे समाधान आपल्याला असेल. स्वतःच्या पट्टीचा शोध पूर्ण झालेला नाही म्हणता व नाडीग्रंथातील भविष्यकथनाला प्रत्यक्ष प्रमाण न अवलोकन करता पुस्तक प्रकाशित करता याचा संदर्भ कसा लावायचा यावर विचार वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

घाटपांडे साहेब....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/19/2017 - 11:46 नवीन
नाडीपट्टी एक थोतांड असा नवीन लेख लिहाच पुन्हा मिपावर तुम्ही. नवीन लोक तरी वाचतील आणि नाडीच्या नादीतरी किमान लागणार नाहीत. काय म्हणता ? -दिलीप बिरुटॆ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

नाडी च्या नादी!

शशिकांत ओक
Tue, 02/21/2017 - 00:03 नवीन
डॉ. प्रा दिलीप बिरुटे सर, पका काका लागतील असे वाटत नाही! नाडीग्रंथातील विविध पैलूंवर विपुल साहित्य उपलब्ध आहे. ब्लॉग्ज, वेबसाईट्स, अॅड्रॉईड अॅप्स वगैरे... कदाचित आपल्याला वाचनात आली असलील...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाडीवरील जुन साहित्यच इतक

प्रकाश घाटपांडे
Tue, 02/21/2017 - 11:28 नवीन
नाडीवरील जुन साहित्यच इतक प्रचंड होतय आणि नवीन असे मुद्दे त्यात कालौघात आले आहेत असे वाटत नाही. नवीन फक्त वाचक असू शकतो. उत्सुकतेपोटी नाडीचा अनुभव घेणे व नाडी अ‍ॅडिक्ट होणे यातील फरक लोकांना अधूनमधून सांगत राहणे एवढेच. नाडीपट्टीतील मजकूर आपोआप बदलतो या ओकांच्या स्पष्टीकरणामुळे मी अगदी दिग्मूढ झालो होतो त्याकाळात व आताही.तेच तेच उगाळत राहणे हा एक मनोविकार ( ओसीडी) आहे. हल्ली संगणकावर फारसे बसवत नाही. ओक साहेबांच्या नाडी भविष्याच्या कार्यक्रमाला मधे मी श्रोता म्हणून गेलो होतो तेव्हा गप्पा झाल्या. मतभेद मतभेदाच्या जागी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाडी ग्रंथ भविष्य विषयावर भले भले बुद्धिवादी काय म्हणतात.

शशिकांत ओक
Sun, 02/19/2017 - 11:12 नवीन
http://naadiastrologystudycircle.blogspot.in/2010/02/blog-post.html?m=1 . Saturday, February 20, 2010 आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे. (संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य) आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे. प्रेषक – जी. ईश्वरन पुण्या व मुंबईतील नाडी केंद्राचे संचालक. वाचक मित्रहो, नुकतेच मला इंटरनेटवर एका नाडी ग्रंथप्रेमी फोरमवर काही मते प्रदर्शित केली गेल्याचे कळले. त्या संदर्भात माझ्या जवळची माहिती मी आपणांशी शेअर करू इच्छितो. प्रथम मी माझी ओळख करून देतो. सन १९९९ पासून माझा संपर्क मुंबईतील नाडी ग्रंथांशी आला. प्रथम भाषांतरकार व त्यानंतर संचालक या नात्याने मी अंबरनाथला एक व पुण्यात सध्या दोन केंद्रे गेल्या ९-१० वर्षांपेक्षा अधिक काळ चालवतो. त्यामधून अगस्त्य, वसिष्ठ, महाशिव, कौशिक आदि अनेक महर्षींच्या नाडी पट्ट्या आम्ही हाताळतो व वाचायला घेतो. याशिवाय गेली ६-७ वर्षे अत्री जीव नाडीमधून अनेकांना आमच्या केंद्रातून मार्गदर्शन केले जाते. या व्यवसायात येण्याआधी मी एक फॅशन डिझायनर म्हणून परदेशातही नाव कमावले. मी तमिळ असलो तरी जन्म मराठी मुलखातील असल्याने मला मराठी व हिंदी भाषा अवगत आहेत. त्या ज्ञानाचा फायदा मित्रत्वाच्या नात्याने माझ्या घराशेजारील नाडी केंद्र थाटल्यांनी घ्यायला सुरवात केली. नंतर मी माझी नाडी ग्रंथ पट्टी पाहिली. त्यात तुला हेच काम आता या पुढे करावयाचे आहे. असे आल्यावर थोड्याशा नाराजीने मी या कामाला लागलो. नंतर मला या कामात रस आला व मी या व्यवसायात पडलो. माझे दोनही भाऊ सध्या मला या कामात मदत करतात. मोठा पशुपती थेरगावचे तर कृपानंद डोंबिवलीला केंद्र चालवतो. अशा तऱ्हेने माझी इथल्या अनेक केंद्रातील नाडीवाचकांशी व तमिळनाडू मधील त्यांच्या पालक नाडीकेंद्रांच्या संचालकांशी व्यावसाय़िक संबंध आहेत. नाडीभविष्यामुळे माझी विंग कमांडर ओकांशी ओळख झाली. त्यांच्या विविध भाषेतील लेखांमुळे, चर्चांमधून भाषणांमधून प्राचीन अनेक महर्षींच्या दिव्यज्ञान चक्षूंच्याज्ञानव भांडाराचे देशातील अनेक भागातील लोकांना मार्गदर्शन झाले. त्यांच्या बोलण्यातून असे कळले की श्री. बसव प्रेमानंद नावाचे एक आंतरराष्ट्रिय कीर्तीचे नास्तिकवादी संस्थाचालक इंडियन स्केप्टिक या नावाच्या मासिकातून आपले विचार प्रकट करत असतात. अनेक भारतीय व विशेषतः महाराष्ट्रातील निरीश्वरवादी चळवळीची ज्योत सन ८२-८३मधे पेटवण्याला त्यांचे मार्गदर्शन कारणीभूत होते. त्यामुळे त्यांचा दरारा व प्रभाव संपूर्ण भारतात फार मोठा मानतात. त्यांची मते ही दगडावरील रेघ मानणारे अनेक मराठी नेते मंडळी आहेत. अशा या नरोत्तमांची नाडी ग्रंथांवरची मते अंतिम सत्य मानली गेली तर नवल नाही. अशा या बी. प्रेमानंदांचा व महाराष्ट्रातून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्याचा चंग बांधलेल्या एका ग्रहस्थांचा (श्री. मा. श्री. रिसबुड हे त्यांचे नाव. त्यांचे सन २००७ मधे निधन झाले.) पत्रव्यवहारातून जी चर्चा झाली ती नोव्हेंबर १९९६च्या अंकातून एकत्रिक प्रसिद्ध झाली. फलज्योतिषशास्त्राचे अभ्यासक श्री रिसवबूड अंनिस संस्थेतर्फे ज्योतिषाच्या विरोधाचा गड तेंव्हा सांभाळत असत. बी प्रेमानंदांनी संकलित केलेल्या ‘एस्ट्रॉलॉजी सायन्स ऑर ईगो ट्रिप’ नावाच्या पुस्तकात त्यांनी ज्योतिष विषयावर संयुक्तपणे लेखन केले होते. उभयतांची इतकी वैचारिक घनिष्ठता असूनही या लेखात बी.प्रेमानंद त्यांच्याशी कसे वागतात हे रंजक आहे. असो. नोव्हेंबरच्या अंकातील सादरीकरण प्रश्नोत्तर स्वरूपाचे आहे. ते साधारणतः तसेच ठेऊन त्यांच्या विचारांवर मी माझे स्पष्टीकरण / प्रतिक्रिया देत आहे. रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात असून माझे स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे. आशयाप्रमाणे काही प्रश्नांना एकत्रिक करण्याची स्वतंत्रता घेतली आहे. एकंदरीत असे वाटते की बी प्रेमानंदांनी दिलेल्या उत्तरानी रिसबुड समाधानी नसावेत वा सहमत नसावेत. या लेखाची दखल इतक्या वर्षांनी घेण्याचे कारण एक तर मला कळले इतक्या उशीरा. पण हा विषय न शिळा होणारा व सामान्यांच्या जिव्हाळ्याचा असल्याने उत्तर देणे माझ्यासारख्याला उशीरा का होईना क्रमप्राप्त आहे. असो. 1. रिसबुडांचा प्रश्न - ‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी? बी.प्रेमानंदांचे उत्तर – मला काही मोजके (a few) प्रश्न विचारून त्याची उत्तरे मिळाल्यावर तो (नाडीवाचक) आत गेला आणि त्याने आतून एक ताडपट्टी आणली. त्यातून त्याने जी वाचायला सुरवात केली त्यातून माझ्या जीवनाचा संपूर्ण भूतकाळ अगदी १००टक्के बरोबर होता. पण ते नाडीवाचन जे केले गेले ते चुकीच्या म्हणजेच माझ्याबरोबर आलेल्या एका लेडी डॉक्टरच्या पत्रिकेवरून केले गेले होते.(बी प्रेमानंद आपल्या लेखात म्हणाले होते की नाडीवाचकाला गोंधळात टाकण्यासाठी त्यांनी व बरोबर आलेल्या लेडी डॉक्टरनी आपल्या पत्रिकांची आदलाबदल करण्याची हातचलाखी केली होती.) नंतर असे समजले की आमची व आमच्या आई-वडिलांची नावे त्या पत्रिकांवर लिहिलेली होती. ती व अन्य माहिती नाडी वाचकांनी बेरकेपणाने गर्भित (सटल) प्रश्न विचारून विचारून आमच्याकडून मिळवली होती. खरेतर नाडीभविष्य पहायला आलेल्यात आपली काही माणसे (stooges) बेमालूमपणे मिसळून त्यांच्याकडून व नाडीवाचकाकडून माहिती अलगदपणे मिळवून ती ताडपत्रे बनवली गेली होती. (अधोरेखित माझे) य़ात आश्चर्यचकीत होण्याची काहीच गरज नाही. कारण जातकाकडून चलाखीने माहिती काढून तीच त्याला पत्रिकात पाहून भविष्य म्हणून सांगण्याची युक्ती अन्य ज्योतिषी देखील इतकी सर्रास वापरतात. हीच साधी चलाखी नाडीवाले करतात. माझे स्पष्टीकरण – 1. अशा तऱ्हेचा लेखात की ज्यात नाडी पट्टयांचे खोटेपणा उघड केला गेल्याचा दावा केला जातो, अचुक व नेमकी माहिती अतिशय महत्वाची ठरते. मात्र संपूर्ण लेखात ते दोघे कोणत्या तारखेला, कोठल्या नाडी केंद्रात जाऊन आपली नाडी पट्टी पाहिली, त्यावेळी नाडीरीडर कोण होता. याचा सालेम या गावाच्या नावाव्यतिरिक्त पुसटसा उल्लेखही त्यात नाही. 2. दक्षिण भारतातील प्रचलित नाडी पट्टी शोधण्याचे काम व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्याच्या ठशांवरून केले जाते. त्यासाठी नाडीकेंद्रात जाताच ठसे घेतले जातात. पत्रिका किंवा कुंडली जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर ती नाडीपट्टीतून येणाऱ्या कुंडलीशी ताडून पहायला उपयोगी पडते. कुंडलीची-पत्रिकेची मागणी नाडीपट्टी शोधायला केंद्रातून केली जात नाही. बी प्रेमानंदांच्या संपूर्ण लेखात त्यांनी व बरोबरच्या व्यक्तीने अंगठ्याचा ठसा दिला असा ते उल्लेख करत नाहीत. हे नमूद करण्यासारखे आहे. 3. त्यांनी नाडी भविष्याला ठोकभावात थोतांड ठरवण्याबद्दलचे त्यांचे मत फक्त एका नाडी पट्टीच्या अनुभवावरून आधारित आहे. एका कुठल्यातरी निनावी केंद्रात कुंडलीवरून घेतलेल्या अशा परीक्षणातून नाडी पट्टीत व्यक्तीची नावे व अन्य मजकूर कोरून लिहिलेला असतो का नसतो हे ठरवण्यासाठीचा तो अंतिम पुरावा म्हणून मानता येणार नाही. २. प्रश्न – जेंव्हा त्या नाडी वाचकाने त्या लेडी डॉक्टरच्या नावाचा व व्यसायाचा अचुक उल्लेख सांगितला त्यात ती बालरोगतज्ञ( Paediatrician) आहे की बाळंतपणाची (gynec) तज्ञ आहे ह्या फरकाला फारसे महत्व रहात नाही. उत्तर – नाही कसा, त्यामुळे फार मोठा फरक पडतो. कारण नाडी वाचक तिच्या बद्दलचे भविष्यकथन माझ्या कुंडलीवरून करत होता. यारून असे सिद्ध होते की तो ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून ते करत नव्ह्ता. आम्ही आमच्या कुंडल्या आमची व आमच्या पालकांची नावे खोडून त्याला दिल्या होत्या. त्याच्या चुकीच्या कुंडल्यांवर आधारित भविष्यकथनामुळे आम्हाला हसू दाबुन ठेवणे अशक्य झाले. माझे स्पष्टीकरण – 1. श्री.प्रेमानंद आपण केलेल्या हातचलाखीचा उगीचच गवगवा करत आहेत. कारण त्यांनी कुंडल्यांची अदलाबदल केल्याने नाडी वाचकाच्या दृष्टीने फारसा फरक पडत नाही. बऱ्याचदा अनेकजण आपल्याजवळच्यांच्या नाडी पट्ट्यापहायला त्यांचे हाताच्या आंगठ्याचे ठसे आणतात. जेंव्हा नाडीपट्टी सापडते तेंव्हा भविष्य कथन करताना त्याचा अर्थ असा होत नाही की ज्याने ते ठसे प्रस्तूत केले त्याचे ते भविष्यकथन असते. पट्टी वाचली जात असताना ती व्यक्ती समोर हजर आहे किंवा नाही याचा यामुळे फरक पडत नाही. 2. या ठिकाणी ते म्हणतात की आम्ही आमच्या कुंडल्यांवरील नावे खोडून त्याला दिल्या होत्या. पण त्या आधीच्या उत्तरात ते म्हणतात (अधोरेखित केलेले वरील वाक्य वाचा ) की आमच्या कुंडल्यांवरील नावे वाचून त्यांनी नाडी पट्टीतील माहिती असल्याचे भासवले. यातले खरे काय ? प्रश्न - मला तर उलट त्या नाडीवाचकाच्या हातचलाखीवर हसण्याऐवजी त्याने १०० सत्यमाहिती शोधण्याच्या त्याच्या कसबाचे कौतुक वाटले असते. पुढे आपण असे ही म्हटले आहे की त्या नाडीवाचकाच्या हातून तुम्ही ती नाडीपट्टी हिसकाऊन घेतलीत व त्यात वाचनाच्या वेळी त्या खोलीत एक व्यक्ती पायात सँडलघालून आल्यामुळे केंद्राच्या शुचितेचा भंग केला गेला असे जे त्या आलेल्या एका व्यक्तिच्या संदर्भातील कथन होते ते त्या पट्टीत नसल्याचे आढळले असे म्हटले आहेत. याचा अर्थ त्या पट्टीवरील लिखाण व त्याची भाषा आपणांस वाचता येते असा होतो. तसे असेल तर मी एक फोटो आपणांस पाठवू इच्छितो. हा फोटो श्री. ‘ओका’ यांनी डॉ. जयंत नारळीकर(ज्या खगोलशास्त्रज्ञाला २००४ साली ‘पद्मविभूषण’ म्हणून सम्नान्मानित केले गेले होते.) यांना पाठवला होता.(श्री. रिसबुड विंग कमांडर ओक (Oak) नावाचा उच्चार ‘ओका’ असा मुद्दाम करून त्यांचा शक्यतो पाणउतारा करण्याचा प्रयत्न करत असत. त्याचा हा पुरावा) आणि नंतर तो फोटो डॉ दाभोळकर (जे गेले अनेक वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची निरीश्र्वरवादी संस्था महाराष्ट्रात चालवतात) यांनी एका सभेत पुण्यातील तमिळभाषा जाणणाऱ्या लोकांनी त्या पट्टीतील मजकूर वाचावा असे जाहीर आवाहन केले होते. उत्तर – जर मला आपण चांगल्या दर्जाची फोटोची कॉपी पाठवली तर मी त्यात काय लिहिले आहे ते कळवीन. जर मला नाडीपट्टीचे ताडपत्र पाठवलेत तर त्याची कार्बन कसोटी करून त्या पट्टीचे आयुष्य किती हे देखील शोधून सांगेन. पण तुम्ही ते पाठवण्याची तसदी घेतली नाहीत. माझे स्पष्टीकरण - 1. श्री बी. प्रेमानंदांनी त्यांना स्वतःला तमिळभाषेतील मजकूर वाचायला येतो किंवा नाही ही बाब मुद्दामच गुलदस्तात ठेवली आहे. अर्थातच येत नाही. कारण त्यांना कूटतमिळ वाचायला आले असते तर तात्काळ लक्षात आले असते की जे भविष्य म्हणून सांगितले जात आहे, ते ग्राहकाकडून कोणत्या ना कोणत्या युक्तीने मिळवून सांगितले जात नसून ते त्या पट्टीत खरोखरच कोरलेले आहे. हे मान्य करावे लागले असते. कधी क्वचित प्रसंगी वाचनाच्या वेळी घडणाऱ्या घटनांचा उल्लेख ही केला जातो. पायात सँडल घालून त्या खोलीत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीबाबत तसे झाले असण्याची शक्यता आहे. 2. श्री रिसबुडांनी त्यांना तो फोटो न पाठवण्यामागे कारण असावे. पुण्यात २९ सप्टेंबर १९९५ रोजी जो फोटो शो केला गेला त्याचे ते कारण असावे. त्या सभेत अंनिसचे १००हून जास्त सभासद हजर होते. त्यामधे वर्तमानपत्रातील आवाहन वाचून तीन तमिळ भाषा जाणणारे लोक उपस्थित होते. त्यांना तो फोटो दाखवण्यात आला तेंव्हा मीडियाच्या दोन कॅमेऱ्यासमोर (नंतर लेखी) त्यांनी जाहीर केले की त्या फोटोतील भाषा तमिळच आहे. जुनी लिपी असल्याकारणाने ती वाचायला सामान्यपणे अवघड आहे. 3. कोणतेही नाडी केंद्र आपल्याकडील नाडी पट्ट्यांची कार्बन कसोटी करायला देण्याच्या फंदात पडणार नाही कारण ज्या संस्थांचा मूळ हेतूच नाडी भविष्याला कोणत्याही थराला जाऊन बदनाम करण्याचा आहे अशांना सहकार्य कोण का म्हणून करील? मात्र विंग कमांडर ओकांसारख्या निस्पृह व सचोटीने वागणारऱ्यां शोधकांना प्राचीन महर्षींनी केलेल्या या लोकोत्तरसेवेचा शोध घेण्यासाठी आमच्यापैकी कितीतरी नाडीकेंद्रांनी त्यांना आपणहून फोटो काढायची नुसती परवानगी दिली नाही तर त्यांना फोटो उपलब्ध करून देण्याला तत्परतेने मदत केली आहे. 4. हे मात्र नक्कीच आश्चर्य आहे की बी. प्रेमानंदांसारख्या व्यक्तीने, ज्याने आपले सर्व आयुष्य पत्रिकेवरून किंवा अन्य मार्गांनी केल्या जाणाऱ्या भविष्यकथनाला थोतांड म्हणून सिद्ध करण्याचा वसा घेतला आहे, त्यांनी जर-तरची भाषा वापरून, ‘मला जर कोणी नाडी पट्टीचे पान आयते आणून दिले तर मी माझ्या मर्जीच्या प्रयोगशाळेतून त्या पट्टीची तपासणीकरून त्या ताडपट्टीचे आयुष्य ठरविन’ अशी नुसती गर्जना करणे, त्यांना किंवा त्याच्या सारख्या विचारांच्या व्यक्तींना व संस्थांना किती लांछनास्पद आहे? अशांना आपणहून शोधकाम करायला कोणी अडवले आहे ? जर ते आमच्या केंद्रात नाडी महर्षींच्याकडे श्रद्धाभावाने नाडी भविष्याचे रहस्य जाणून घ्यायला आले तर आम्ही त्यांना नक्कीच योग्य ती मदत करू. पण नाडी वाचकांची व पर्यायाने नाडी महर्षींची मस्करी करायला आलात तर मात्र आपल्याकडून सहकार्य मिळणार नाही. प्रश्न – असे मानले जाते की शके ३०० च्या सुमारानंतर भविष्यशास्त्राच्या संदर्भात ऋर्षींचा उल्लेखांना सुरवात होते.त्यामुळे अस्सल नाडी पट्यांचे आयुष्य १७०० वर्षांपेक्षा जुने नसावे. हे मात्र नक्की की नाडी पट्ट्यात ऋषींचे उल्लेख येतात. उत्तर – ओरिजिनल किंवा अस्सल ताडपट्टया असतात हे मानणेच मुळात चुकीचे आहे. त्या पट्ट्या ग्राहक जेंव्हा ते ऐकायला येतो त्यावेळी तयार केल्या जातात. पण त्या प्राचीन दिसाव्यात यासाठी त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया केलेली असते. तथापि त्या पट्यांचे आयुष्य मात्र शोधता येईल. त्यावरून नाडी पट्टयांचा खोटेपणा सिद्ध करता येईल. माझी प्रतिक्रिया – 1. या ठिकाणी नोंद करायला हवी की जर्मनीतील एका थॉमस रिटर नावाच्या व्यक्तीने भारतातून एक नाडी पट्टी मिळवून त्याची कार्बन १४ कसोटी त्यांच्या देशातील अत्यंत प्रगत अशा प्रयोग शाळेत केली आहे. शिवाय त्यांनी त्या नाडी पट्टीतील मजकुराची जर्मनीतील तमिळभाषा तज्ज्ञांकडून स्वतंत्रपणे करवून घेतली आहे. त्यात त्या तज्ज्ञांनी असे म्हटले की पट्टीतील मजकूर कोणत्या तरी धार्मिक ग्रंथांचा किंवा पौराणिक कथांचा नसून खरोखरच कोणा एकाचे भविष्यकथन आहे. कार्बन कसोटीच्या निर्णयात असे म्हटले गेले की ती पट्टी कमीतकमी ३५० ते ४०० वर्षे जुनी असावी. जर एका परदेशी व्यक्तीला कार्बन कसोटी करता येत असेल तर आम्हा भारतीयांना ती करायला कोणी आडवले आहे? 2. विविध नाडी केंद्रातून असे अनेकदा सांगितले जाते की सध्याच्या उपलब्ध नाडी पट्ट्या तंजावूरच्या सर्फोजी राजे भोसले (१७९२ ते १८३२) या मराठा राजाच्या काळात पुनर्लेखित केल्या गेल्या. त्यामुळे असे शक्य आहे की ताडपट्टयावरीन मजकूर प्राचीन असावा मात्र त्यामानाने ताडपट्ट्या ३०० वर्षांच्या आसपासच्या जुन्या असाव्यात. हे म्हणणे जर्मनीतील कार्बन १४ कसोटीच्या शोधकार्याच्या उपपत्तीवरून ही सिद्ध होते. प्रश्न - मी आपणांकडून हे जाणून घेऊ इच्छितो की तुम्ही म्हणता की तुमचा भूतकाळ त्यांनी अगदी १०० टक्के तंतोतंत सांगितला. त्याने तुमच्या कडून सर्व माहिती कशी काढून घेतली (थोडक्यात तुम्ही त्याच्या खोटेपणाला कसे उघडे पाडू शकला नाहीत) त्याचे तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? आपल्या लेखात याचे उत्तर मिळत नाही. उत्तर – वस्तुस्थिती अशी आहे की आपण माझा लेख अत्यंत काळजीपुर्वक वाचलेला नाही.(श्री. प्रेमानंदांनी रिसबुडांनी आपला लेख नीट काळजीपुर्वक वाचलेला नाहीत असे लेखात आधुनमधून फटकारले आहे. त्यातलाच हा एक उल्लेख) ती अशी - 1. नंतर असे लक्षात आले की कुंडल्यांवर आमची व आमच्या आई-वडिलांची नावे लिहिलेली होती. अन्य माहिती गर्भित (सटल) प्रश्न विचारून मिळवली गेली. 2. काही प्रश्न विचारून त्यांची उत्तरे मिळवल्यावर तो (नाडीवाचक) आत गेला.त्याने एक (सुटी) ताडपट्टी आणली. (म्हणजे प्रश्न विचारते वेळी वाचल्या गेलेल्या माळेसारख्या दोरीने ओवून बंद केलेल्या ताडपट्टयांच्या व्यतिरिक्त) आणि त्यातून त्याने आमचे भूतकाळाचे वर्णन वाचले जे १०० टक्के सत्य होते. 3. सत्यता ही आहे की नाडीकेंद्रातर्फे काही लोक पेरून ठेवलेले असतात त्यांनी व नाडीपट्या शोधायसाठी नाडीवाचकाने विचारलेल्या प्रश्नातून सर्व माहिती मिळवली जाते. नंतर त्या आधारे नाडीपट्टी बनवून वाचली जाते. चुकीची उत्तरे दिली गेली तर भविष्य कथन ही चुकेल. तुम्ही दुसऱ्याची पत्रिका आपली म्हणून दिलीत तर भविष्यकथन तुमच्याकडून काढलेल्या माहितीच्या आधारे होईल ना की त्या पत्रिकेच्या आधारावरून. आपले नाव व व्यवसाय सोडता जी बरीचशी माहिती सांगितली जाते ती त्या ताडपट्टीवर नसणार. जे भविष्य कथन म्हणून केले जाते ते ढोबळमानाने सर्वांना लागू पडेल असेच असते. माझी प्रतिक्रिया – 1. मी आधी म्हटल्याप्रमाणे व्यक्तीची नाडीपट्टी स्त्रियांच्या डाव्या व पुरुषांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या ठशावरून शोधली जाते. पत्रिका वा कुंडलीवरून नाही. श्री. प्रेमानंदांनी अंगठ्याच्या ठशांचा पुसटसा देखील उल्लेख आपल्या लेखात केलेला नाही. हे कसे काय? खरे तर त्यांच्यासारख्या प्रखर बुद्धिवादी व्यक्तीने या बाबत खुप ढोल पिटायला हवे होते, कि अंगठ्यांच्या ठशांच्यावरून भविष्य कथन करतो असे म्हणणे म्हणजे निव्वळ देखावा असावा. आदि. 1. त्यांचे हे कथन की तो नाडीवाचक आत गेला व त्याने आतून आणलेल्या एका ताडपट्टीतून त्यांचे भविष्यकथन करण्यात आले. त्यात त्यांचा भूतकाळ १०० टक्के बरोबर आला. यात काही गफलत आहे. कारण सर्व नाडी पट्टयांना असलेल्या भोकातून दोरी माळेप्रमाणे ओवून बंद केलेल्या असतात. अशा ताडपट्ट्या दोन लाकडी बॅटन सारख्या पट्ट्यांच्यामधे घट्ट बंद करुन वर उरलेल्या दोरीने ते पॅकेट जाम गच्च बांधून टाकले जाते. जेंव्हा केंव्हा नाडी पट्टीत आपली पट्टी सापडली असे ग्राहक म्हणतो तेंव्हा ती पट्टी त्या ओवून बांधलेल्या पॅकेटमधलीच असते. त्त्यामुळे श्री. प्रेमानंद कोणत्या नाडीकेंद्रात गेले होते याबद्दल प्रश्न पडतो. अशी एक सुटी नाडीपट्टी आतल्या खोलीतून आणून जर भविष्यकथन केले जात होते तर त्याच वेळी त्यांनी वाचकाला व केंद्र प्रमुखाला तशी विचारणा का केली नाही? आश्चर्य असे की त्यांच्यासारखा प्रत्येकाचा खोटारडेपणे उघडे पाडण्याच्या कलेत तज्ञ, शिवाय जो स्वतः कुंडल्यांची अदलाबदल करण्याची हातचलाखी करतो त्यालाही नाडी वाचकांच्या खोटेपणाला उघड करता आले नाही ? ‘असे असेल-तसे असेल’ असे शुष्क तर्क करण्यापलिकडे ते गप्प बसतातच कसे? आणि त्या नाडी वाचकाने केलेल्या ‘भविष्यकथनात १०० टक्के सत्य सांगण्यात आले’ या भुलावणीला बळी कसे पडलो असे सांगतातच कसा व का? पुन्हा पुन्हा नाडी केंद्रांना स्वतः वा आपले तरबेज चेले पाठवून नाडी केंद्रांचा खोटेपणाचा धंदा आजही चालवू का देतो? 2. याचे साधे व सोपे कारण असे आहे की श्री. प्रेमानंदांनी वर सुचवलेला पर्याय नाडी पट्टया ऑर्डर प्रमाणे आत खोलीत बसून तयार केल्या जातात वगैरे सर्व अत्यांतिक कल्पनाविलास आहेत. नाडी केंद्राचे लोक बाहेर बसवून त्यांच्यामार्फत व नाडी वाचकाने चतुराईने प्रश्न विचारून मिळवलेल्या माहितीवरून केंद्रातल्या एका खोलीत बसून गुप्ततेने ताडपट्ट्यावर लिखाण करून काहीतरी कारण काढून नाडीवाचकाच्या हाती गुपचुप पोचवल्या जातात हे म्हणणे इतके हास्यास्पद आहे की त्यांच्या सारख्या आंतरराष्टीय दर्जाच्या कृतीशील बुद्धिवाद्याला ते शोभत नाही. अशी फालतू कारणे दाखवून नाडी केंद्रवाचकांना ताडपट्ट्यात कूटलिपित त्वरित लेखनाची कला अवगत असल्याचा मान देऊन त्यांचा भाव मात्र त्यांनी उगीचच वाढवला आहे. 3. नाडीकेंद्रातील वाचक फक्त नाडीपट्टयातील मजकूर वाचू शकतात. त्यांना तो मजकूर कोरुन लिहिता येत नाही असे ते स्वतः प्रांजळपणे वेळोवेळी कबूल करतात. पण श्री. प्रेमानंदांसारखे लोक आपले तर्क खरे आहेत असे भासवण्याकरता त्यांना जबरदस्तीने ताडपट्ट्यात कोरून लेखनकरण्याच्या कार्यातील तज्ञ मानतात! श्री. प्रेमानंदांना ते ताडपट्टया लिहित असतात असे जर वाटत होते तर त्यांनी नाडी केंद्रवाल्यांना आत जाऊन पकडले का नाही त्यामुळे पुराव्याशिवाय बोलण्यात काय मतलब आहे? 4. या संदर्भात एक नाडी केंद्रचालक व नाडीपट्टयांचा सांभाळकरणारा म्हणून मी यावर प्रकाश टाकू शकतो. जेथे नाडी पट्टया ठेवल्या जातात त्या खोलीत अन्य कोणाला प्रवेश दिला जात नसला तरी तेथे काय असते व काय चालते याचा खुलासा माझ्यासारखा नाडी केंद्रसंचालकच करू शकतो. त्या खोलीत गुप्तपणे लिखाण वगैरे काहीही चालत नाही. पुण्यासारख्या शहरात गेली १०-१२ वर्षे नाडी केंद्रचालवणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तिचे जबाबदारीपुर्वक हे लेखन आहे याचे भान ठेऊन मी जे सांगतो त्याचे महत्व वाचकांनी जाणावे. कोणत्याच नाडीकेंद्रातून असे लपवून नव्या ताडपट्ट्या तयार करण्याचे काम केले जात नाही. 5. नाडीपट्यांची पॅकेट्स नीट व्यवस्थित एकावर एक लावून ठेवलेली असतात. नाडी वाचक कधी कधी बसून तर बहुतेक वेळा उभ्याने त्या पट्ट्याच्या पॅकेट्स मधून योग्य त्या अंगठ्याच्या ठशाच्या समुहाच्या पट्ट्यांचे पॅकेट शोधत राहतो. तमिळनाडूच्या बाहेर चालू असलेल्या नाडीकेंद्रात एकावेळी नाडी पट्यांची सीमित पॅकेट्स मागवली जातात. त्या अनेकदा सुटकेसेसमधे ठेवलेल्या असतात. या व्यतिरिक्त काही पाने झाडावरून उतरवलेल्या झावळ्या, पैकी काही एक सारख्या कापून तयार ठेवलेल्या, मजकूर न लिहिलेल्या वा काही जागा मजकूर लिहायला मोकळा ठेवलेल्या, अशा ताडपट्ट्या जर नाडीकेंद्रात ग्राहकाच्या मिळवलेल्या माहितीस तात्काळ लिहायला ठेवलेल्या असाव्या लागतील पण तशा त्या नसतात. त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया (म्हणजे नेमके काय?) करण्याचा प्रश्नच येत नाही. 6. नाडी भविष्य पहायला आलेल्यात केंद्रातील आपल्या माणसे बसवायची शक्कल तमिळनाडू राज्यात कदाचित अमलात आणणे शक्य होईल.(तशी ती केली जात नाही तो भाग वेगळा) मात्र युक्तीने एखाद्या अनोळख्या व्यक्तीच्या नकळत त्याच्यी व त्याच्या आई-वडिलांचे, पत्नी-पतीचे नावे, शिक्षण, नोकरी-व्यवसाय, भावाबहिणींची, संततीची संख्या, जन्मदिवस आदि माहिती अत्यंत कमी वेळात काढण्यासाठी असामान्य वाकपटुत्व व तमिळभाषेवर प्रभुत्व असावे लागेल. त्याशिवाय अशी मिळवलेली माहिती जशीच्या तशी लक्षात ठेऊन ती एका ताडपत्रावर कोरून तयार करायची आदि तर्क करायला सोपे पण अमलात आणायला अशक्य आहेत. माणसे पेरण्याची शक्कल तमिलळनाडू राज्याबाहेरील भागातील केंद्रात चालवणे तर सर्वस्वी अशक्य आहे. कारण तमिळेतर भागात परिस्थिती नेमकी उलटी आहे. तेथे बाहेर बसलेल्या ग्राहकांची भाषा नाडीकेंद्रातील लोकांना येत नाही. नाडीवाचकांच्या संकोची स्वभावामुळे व भाषेच्या दुराव्यामुळे अनेक वेळा तोडक्यामोडक्या संभाषणांतून गैरसमज निर्माण होतात. या उप्पर कोणा नाडीकेंद्रातील माणसाने ग्राहकांशी घोळात घ्यायचा प्रयत्न केलाच तर त्यांच्या भाषेच्या-बोलण्याच्या धाटणीवरून व सामान्यतः रंगावरून तो केंद्राचा माणूस म्हणून तात्काळ पकडला जाईल. 7. या शिवाय हे ही लक्षात ठेवले पाहिजे की नाडी भविष्य पहायला गेलेला व्यक्ती इतका मूर्ख वा भोळसट नक्कीच नसतो की परक्याला आपली माहिती तो आपणहून देईल. खरे तर नाडी भविष्य प्रथम पहायला गेलेला प्रत्येकजण नाडीकेंद्राच्या व ते पहायला आलेल्या अन्य लोकांकडे साशंकतेने व सावधानतेने इतरांकडे पहात असतो. या शिवाय आम्ही, नाडीकेंद्रातील कर्मचारी, अंगठ्याचा ठसा घेताना ग्राहकांना सावध करतो की पट्टी शोधायची पद्धती काय असते व त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांना फक्त हो किंवा नाही यातच उत्तरे द्या. आपणहून माहिती आम्हाला किंवा इथे जमलेल्या कोणाला देऊ नका. 8. सध्या आमची तमिळेतर भागातील नाडी केंद्रांची समस्या अशी आहे की आम्हाला बाहेर जमलेल्या ग्राहकांची भाषा बोलणारी माणसे मिळत नाहीत. भविष्य कथन टेप करून देताना भाषांतराचा दर्जा फारच खालचा असतो अशी सर्वसाधारणपणे तक्रार असते. 9. नाडी केंद्रांची जागा शहरी भागात मिळेल त्या ठिकाणी एक बेडरुमच्या फ्लॅटमधे असते.त्या तेवढ्या जागेत जर आम्ही ताडाच्या पानांच्या झावळ्या व कातरकाम करून कचरा करू लागलो तर शेजारपाजारचे रहिवासी आमच्यावर नजर ठेऊन आमचे ते काम बंद पाडतील. 10. बी. प्रेमानंदांनी म्हटल्याप्रमाणे केंद्राची माणसे लोकात मिसळवणे, पट्ट्या केंद्रात लिहित बसून तयार करणे या सर्व त्यंच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत. कारण आम्हाला तसे करायची गरज नाही. नाडीवाचक उपलब्ध असलेल्या पट्टयातील मजकूर वाचतो तो त्या व्यक्तीला जुळत असेल असे त्या व्यक्तीने मान्य केले तरच त्या पट्टीतील मजकूर एका ४० पानी वहीत उतरवून त्याच्यावरून ग्राहकाला त्याच्या भाषेत त्यातील कथन टेप करून देतो. त्या आधी मोबदला घेतला जात नाही. अर्थात हे सर्व नाडी विरोधकांना पक्के ठाऊक आहे की त्यांच्या या तकलादू, निरर्थक सबबींमधे काही दम नाही. तरीही महर्षींच्या दिव्यदृष्टीने नाडी ग्रंथांची निर्मिती झाली आहे. हे सत्य अशा संस्थांना वा व्यक्तींना तत्वतः मान्य करता येत नाही कारण मग त्यांच्या आधी ठरवलेल्या तत्वांचा - बुद्धिवादाचा - पायाच निखळतो अशी त्यांची धारणा असल्याने त्यांना अशा सबबींवर भिस्त ठेऊन खोटी व भलतीसलत कारणे द्यावी लागतात. 11. त्यामुळे अशा बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाली आहे पण ते तो लोकलज्जेस्तव कधीच मान्य करणार नाहीत. नाही तर मग त्यांची सार्वजनिक छी थू झालेली त्यांना परवडण्यासारखी नाही. 12. या इथे मी सर्वांना स्पष्ट करू इच्छितो की जर कोणाला नाडी ग्रंथांचा अभ्यास करायची इच्छा असेल तर अशा अभ्यासकार्याला मी आनंदाने तयार आहे. मात्र ते अभ्यास कार्य पुर्वग्रहदूषित नसलेल्या श्रेष्ठ व नामवंत शास्त्रज्ञांच्या मंडळाच्या निर्देशनाखाली एकत्र येऊन करावे. त्यात नाडी ग्रंथ भविष्याला थोतांड असा शिक्का मारून खोटे ठरवणाऱ्या संस्था वा व्यक्तींचा समावेश नसावा. (श्री. जी. ईश्वरन यांचे विचार - विंग कमांडर शशिकांत ओकांचा शब्दांकन) Shashikant Oak at 5:31 PM ‹ › Home View web version About Me My photo Shashikant Oak View my complete profile Powered by Blogger.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

महाराष्ट्रातून नाडी ग्रंथांना

प्रकाश घाटपांडे
Sun, 02/19/2017 - 13:28 नवीन
महाराष्ट्रातून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्याचा चंग बांधलेल्या एका ग्रहस्थांचा (श्री. मा. श्री. रिसबुड हे त्यांचे नाव. त्यांचे सन २००७ मधे निधन झाले.)
रिसबूडांचे निधन १६ मार्च २००३ रोजी झाले. केवळ चुकीची माहिती लोकांपर्यंत जाउ नये म्हणून हा प्रतिसाद ज्यांना रिसबूड म्हणजे नेमके कोण असा प्रशन पडला असेल त्यांनी कै. माधव रिसबूड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक हा लेख वाचावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा