संभाजीराजांच्या मुक्ततेसाठी एकही प्रयत्न ????

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in काथ्याकूट
9 Dec 2015 - 10:49 am
गाभा: 

मिपाकरांनो, मला एक प्रश्न सतावतोय,

संभाजीराजे संगमेश्वर येथील मुख्य सरदारांची बैठक संपवून रायगडाकडे 1 फेब्रुवारी 1689 रोजी रवाना होत असताना औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संगमेश्वरवर हल्ला करून संभाजी महाराजांना व कवी कलशांना पकडले व त्यांचा छळ करून 13 मार्च 1689 रोजी हत्या केली. पण या 40 दिवसाच्या काळात एकाही मराठी सरदाराने, वतनदाराने व मंत्र्याने शंभुराजांना सोडवण्याचा एकही प्रयत्न केला नाही अथवा तहाची बोलणी करायला व शंभुराजांना सोडवायला एकही वकील औरंगजेबाच्या दरबारी पाठवला नाही. जनतेनेही कसलाही उठाव केला नाही. यामागचे काय कारण असू शकेल ?

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

9 Dec 2015 - 10:52 am | प्रसाद१९७१

जनतेनेही कसलाही उठाव केला नाही

भारतातल्या जनतेने गेल्या २ हजार वर्षात एकदा तरी उठाव वगैरे केला आहे का? काहीतरीच अपेक्षा तुमच्या हेला काका

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Dec 2015 - 10:58 am | कैलासवासी सोन्याबापु

असोच!

प्रमोद देर्देकर's picture

9 Dec 2015 - 11:01 am | प्रमोद देर्देकर

अरे किती वेळा तेच तेच काका.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Dec 2015 - 11:22 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/mechanic-smiley-emoticon.gif

पिवळा डांबिस's picture

9 Dec 2015 - 11:10 am | पिवळा डांबिस

यामागचे काय कारण असू शकेल ?

तुमची मुलगी जर आमच्या पराला देत असाल (कारण आमचं आता लग्नाचं वय राहिलं नाही!) तरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन!!!
-मिपावीर पिडांकाका
:)

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2015 - 11:20 am | परिकथेतील राजकुमार

मी स्वतः जातो सोडवायला महाराजांना पण ह्या पिडांकाकांचे काही ऐकू नका.

त्यांचा प्रश्न काय.. तुमच्या चर्चा काय?..
बाकि चालुदे..

हेमंत लाटकर's picture

9 Dec 2015 - 12:41 pm | हेमंत लाटकर

@ पिंडाकाका, तुम्हाला राजकारणातल्या वाचाळ साठी बुद्धी नाठींची बाधा झाली का?

@ अतृप्त आत्मा, आदळआपट का करता. तुमच्या पत्रिकेतील राहू केतू आज बरोबर नाहीत का.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Dec 2015 - 1:02 pm | अत्रुप्त आत्मा

@ अतृप्त आत्मा, आदळआपट का करता. >> आपला सदस्यकाळ :- 4 months 2 weeks ...,आणि तरी तुम्हाला माझं जुन नाव पूर्ण म्हैत आहे!

@तुमच्या पत्रिकेतील राहू केतू आज बरोबर नाहीत का. >> असो!

नाखु's picture

9 Dec 2015 - 2:48 pm | नाखु

सत्य वचन, सुमारे ७ महिन्यापूर्वी केलेल्या काव्यातून

अदा अदा जोजवी कविवृंदा गोंधळाला यावे ||
बदा बदा प्रसवी बोबडकांदा गोंधळाला यावे ||१२||

स्वघोषीत होऊ कैवारी गोंधळाला यावे ||
अघोषीत भेटू रैवारी गोंधळाला यावे ||१३||

नसे मनाची तरी आस मानाची गोंधळाला यावे ||
नसे मानाची तरी आस मिपाची गोंधळाला यावे ||१४||

संपूर्ण काव्य इथे आहे

अवांतर (नसलेले) : बाकी सध्या कुठली शांती करताय इथे मिपावर काही शांती करायचीय वेळ काढणे..

बेकार तरुण's picture

9 Dec 2015 - 12:05 pm | बेकार तरुण

मला प्रश्न हा पडला आहे की त्या ८० दिवसाबद्दल मधल्या ३२६ वर्षात कोणीच असा धागा काढायचा विचार का नाही केला?
नवीन धागा काढावा म्हणतो ह्या प्रश्नावर

बबन ताम्बे's picture

9 Dec 2015 - 2:35 pm | बबन ताम्बे

हे घ्या. मिपावर या विषयावर खूप चर्चा झालीय. बरीच नवीन माहीती मिळेल येथे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय?

आनन्दा's picture

9 Dec 2015 - 12:10 pm | आनन्दा

हे घ्या.

आदिजोशी's picture

9 Dec 2015 - 2:26 pm | आदिजोशी

असले धागे काढण्याआधी वाचन वाढवा, म्हणजे चारचौघात हसे होणार नाही.

कविता१९७८'s picture

9 Dec 2015 - 2:27 pm | कविता१९७८

हेमंत लाटकर , तुम्ही मायबोलीकर रुन्मेष चे डु आय तर नाही आहात? तो ही असे धागे काढुन लोकांची डोकी खराब करत असतो.

छावा नावाची कादंबरी वाचनात आली होती त्यात असे वर्णन आहे की जी चूक औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या वेळेला केली.(आग्र्याहून सूटका) ती चूक त्याला करायची नव्हती. मराठे प्राणपणाने उठाव करतील अशी औरंग्याला खात्री होती म्हणून त्याने विशेष खबरदारी घेतली होती. जनता उठाव करेल म्हणून आजूबाजूच्या गावातील सर्व घोडे आणि जनावरे जप्त केले होते. पुरुषमंडळींना अटक केली होती. जो भेटेल त्याला भरपूर चोप दीला होता जेणेकरून उठाव करण्याची हींमत होणार नाही.

खरे खोटे देव जाणे.