मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत!
प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये!
१. कथा शक्यतो १च भागात द्यावी किंवा जास्त स्क्रोल करायला लावून कुणाकडूनही 'भाग थोडे मोठे टाका' किंवा 'हात दुखला स्क्रोल करून' अशी प्रतिक्रिया मिळवून आपल्या अतिशहाणपणाचा प्रत्यय देऊ नये. (त्यांना १ ते४ या वेळेत 'अकु-मोजी' नामक (कथेची) वाट कशी लावावी या शाळेत पाठवले जाईल.)
२. 'पुभाप्र' नामक पळवाटी प्रतिक्रियेचा मान ठेवून पुढचा भाग लवकर न टाकल्यास त्याला पुण्यात लुंगी घेण्याच्याही लायकीचा समजला जाणार नाही!
३. स्वत:च्या लेखनाशिवाय दुसर्या कुणाच्या लेखनावर प्रतिसाद न टाकल्यावर आपण हावरे आहात असा अर्थ काढण्यात येईल.
४. व्यनि करून ओळखी काढण्याचा प्रयत्न करु नये. इथे खरडफ़ळा, खरडवही सजावट म्हणून ठेवलेली नाहीये!
५. रिकामे सल्ले देऊ नये, मिसळपावावरची पोरं तुम्हाला टेम्पोत बसवायला फ़ाट्यापर्यंत येतील हे ठाऊक असू द्या.
६. "अय्या किती छान लिहिलेय मी!" असे समजून आपल्या लिखाणावर चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा करु नये, आमच्याइथे नुसत्या आयडीने समोरच्याला थंडगार करण्याची ख्याती असणारे आयडी आहेत!
७. ही कथा आधी कुठेतरी प्रसिद्ध झाली आहे म्हणून इथेही डकवायचा प्रयत्न करु नये. आमच्या इथे नुकतेच रुची आणि दिवाळी अंक प्रसिद्ध झाली आहेत!
८. नसत्या चुका करू नयेत. चुकीला माफी नाही!
९. "(इथे)लिहिले हेही थोडे नव्हते हो!" म्हणून हिणवू नये. आम्ही मग नेहमी दोन (प्रतिक्रिया) जास्त'च' देतो.
१०. आता आपल्या थोड्याचा अनुभव आम्हांस कसा माहित हे विचारू नये. असल्या क्षुल्लक प्रश्नांची उत्तरे आमचा 'आयर्न मॅन' नामक रोबोगडीही हल्ली देत नाही!
११. आपण आठवड्यातून फक्त एकच भाग टाकला तर तर हे समस्त वाचकांवर परोपकार होतील याची आम्हांस जाणीव आहे.
आणखी पथ्ये कशाला?
प्रतिक्रिया
27 Nov 2015 - 6:29 pm | चांदणे संदीप
ह्या गल्ली चुकलेल्या लेखाला बरोबर जागेत नेऊन ठेवील काय कोण?
27 Nov 2015 - 8:14 pm | जव्हेरगंज
८. नसत्या चुका करू नयेत. चुकीला माफी नाही!
╰_╯
27 Nov 2015 - 8:06 pm | वडाप
निऊ की.आपला धंधाच हाइ त्यो.फकस्त गावाभाइर रातच्या टैमामला रिटन भाडं बसतंया.
27 Nov 2015 - 8:17 pm | यशोधरा
खिक! रोचक! :D
27 Nov 2015 - 8:27 pm | DEADPOOL
मस्त लिवलय!
27 Nov 2015 - 8:38 pm | अजया
अय्या कित्ती छान लिहिलंय ;)
27 Nov 2015 - 9:05 pm | आदूबाळ
विडंबनाला आवश्यक असे "कोडाई कनाल" आणि "गरम पाण्याचे कुंड" हे सिलेक्ट न केल्याने हा फाऊल धरणेत येत आहे.
28 Nov 2015 - 4:06 pm | टवाळ कार्टा
आणि भूछत्र सुध्धा ;)
28 Nov 2015 - 12:52 pm | रातराणी
बरं बरं. तुम्ही ओरिजिनल पुणेकर नाही वाटतं. खरा पुणेकर एवढे नियम वाचायचेसुद्धा कष्ट घेणार नाही तुम्ही तर लिहीत बसलात! ;)
28 Nov 2015 - 5:37 pm | चांदणे संदीप
पुणेकर आहे, एवढच म्हणेन!
"पुणेरी" किंवा "पुणेकर" किंवा नुसतंच "पुणे" हा शब्द वापरून टीआरपी गोळा करणारा - पुणेकर नाही!
पुणेरी - पुणेकर हे सतरांदा लिहीणा-या जिलबीटाकू लोकांसाठी लिहिलेल आहे हे.
ह्या लेखाचा आणि पुण्याचा काही संबंध नाही. तसा उल्लेखही टाळलाय.
28 Nov 2015 - 9:09 pm | रातराणी
:)
28 Nov 2015 - 12:59 pm | महासंग्राम
दगडी चाळ -२ येतोय त्यात हे नाहीये सबब
हा डायलॉग रद्द
चुकीला माफी आहे
(दुसर्यांचा चुका दाखवणारा दुत्त) मंदार
28 Nov 2015 - 5:00 pm | कविता१९७८
मस्त
28 Nov 2015 - 5:37 pm | उगा काहितरीच
हॅहॅहॅहॅ !
30 Nov 2015 - 12:07 pm | चांदणे संदीप
:D
30 Nov 2015 - 1:08 pm | पीके
पु. भा. ल. टा.