टीव्ही वरची धूळ
लेखनविषय:
काव्यरस
टीव्ही वरची धूळ
नेहमीच्या भांडणाला कारण मिळाल
पण देव-दयेने त्याच टीव्हीतल्या सासू-सुना योग्यवेळी भांडल्या
अन त्या रोजच्या भांडणात
आमच भांडण विरलं
तीच वाढत वजन
आमच्या भांडणाला पुन्हा एक कारण बनल
पण त्याच वेळी पिझ्झा हट वाल्यांची
फ्री होम डिलिव्हरी मी स्मरली
अन
आमच भांडण विरलं
फिरायला जाऊया म्हणे
गमतीत गाडी पेट्रोल पंपावर टाकली
नेहमीचं भांडणाला कारण बनलं
अन त्याच वेळी नेमका गाडीनी ड्रायचा दिवा लावला
त्या क्षीण प्रकाशात
आमच भांडण विरलं
आमच्या भांडणाच सदाहरित कारण
तिच्या दिसण्यावर मी दिलेली कॉमेंट
पुन्हा एकदा कारण बनल
पण नेमका त्याच वेळी आय सर्जन मित्राचा फोन यावा
तिच्या डोळ्यांची त्याने चौकशी करावी
भौजींच्या त्या चौकशीत आमच भांडण विरलं
तिचा नि माझा
स्वयंपाक घरातला प्रवेश
दिसण्या इतकच आमच्या भांडणच सदाहरित कारण बनल
पण नाही म्हटल तरी पंजाब्यांच कौतुक
त्यांनी सगळीकडे धाबे काढले
त्या प्लान मध्ये
आमचं भांडण विरलं
-समीर
वाचन
4711
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
च्यायला कुठला कुठला माल डंप
In reply to च्यायला कुठला कुठला माल डंप by अभ्या..
तुच का रे तो भ्रूणहत्या
In reply to तुच का रे तो भ्रूणहत्या by टवाळ कार्टा
डिमोशन करु नकोस सांगितले ना.
In reply to डिमोशन करु नकोस सांगितले ना. by अभ्या..
खिक्क
In reply to तुच का रे तो भ्रूणहत्या by टवाळ कार्टा
छे छे, आपला अभ्या टोप्या
In reply to छे छे, आपला अभ्या टोप्या by दमामि
टोप्या नाय रे...टी-शर्ट :)
In reply to छे छे, आपला अभ्या टोप्या by दमामि
दमामि, तुम्ही खास माझ्यासाठी
In reply to दमामि, तुम्ही खास माझ्यासाठी by अभ्या..
अरे वा!!! धन्यवाद हो!
In reply to च्यायला कुठला कुठला माल डंप by अभ्या..
प्रोत्साहण रे मेल्या
In reply to च्यायला कुठला कुठला माल डंप by अभ्या..
च्यामायला खातरजमा न करता
In reply to च्यायला कुठला कुठला माल डंप by अभ्या..
शांत गदादारी भीम . शांत .
In reply to शांत गदादारी भीम . शांत . by अद्द्या
खिक्क
समीर्भाऊ, खूप प्रयत्न करूनही
In reply to समीर्भाऊ, खूप प्रयत्न करूनही by आदूबाळ
शुभ बोल रे.. ही म्हण ऐकून तरी
In reply to शुभ बोल रे.. ही म्हण ऐकून तरी by यशोधरा
=))
In reply to समीर्भाऊ, खूप प्रयत्न करूनही by आदूबाळ
आधी मला आमंत्रण दाखवा मी
In reply to आधी मला आमंत्रण दाखवा मी by समीर_happy go lucky
ओपन फोरम वर तुम्ही काहीही
In reply to आधी मला आमंत्रण दाखवा मी by समीर_happy go lucky
तुम्ही लोकांनी वाचावी म्हणून
समीर भौ, मस्त लिहिलंय.
In reply to समीर भौ, मस्त लिहिलंय. by प्यारे१
+१
In reply to +१ by जव्हेरगंज
"फ़ळाफ़ळा" या द्वयर्थीउपमेसाठी
आवडली
राजे!!! जे सांगायचं ते पोचलं!
च्छ्या.....
आमचाच एक जुना(ट) प्रीतीसाद इथे चोप(डा) पेस्त(वा) करीत आहोत. फक्त या वेळेला पदावर नवीण नेमणूक केली आहे इशारा... नाद खुळा - Sat, 28/02/2015 - 14:54 नवौन्मेषी साहित्यकांना भाकड प्रतिसादप्रभूंचा आणि मिपा लेखकूंचा शून्य उपयोग आहे. कारण ह्या प्रतिसादप्रभूंचा, लेखकांचे लेखन आणि मार्गदर्शन फ़ारतर घराच्या उंबर्यापासून उसगावापर्यंत वाचकांना पोहचवून देऊ शकते. वाचकांच्या (का याचकांच्या) सवंग लोकप्रियतेची गुरुकिल्ली यांनाच अजून गवसलेली नाही मग या मंडळींचे काढे नवौन्मेषी साहित्यकांना लोकभक्तीचा मार्ग कसा दाखवू शकेल? तरीही नवौन्मेषी साहित्यकांना फुकटाचा नको तो सल्ला देणार्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एक उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना दोन साहित्यप्रसवात (हो साहित्यच उगा गैरसमज नको) योग्य अंतर ठेवायला सांगतो , दुसरा उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना अर्थपूर्ण आणी अ-पाल्हाळीक लिहायला सांगतो, तिसरा उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना प्रतिसादावर चिंतन आणि जमले तरच मनन करायला सांगतो, चवथा उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना ललीत लेखन कसे करावे हे शिकवू पाहतो. त्यामुळे नवौन्मेषी साहित्यक गोंधळतो एवढेच नव्हे तर या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे सल्ले तद्दन फालतू, फडतूस आणि अव्यवहार्य असल्याने नवौन्मेषी साहित्यकांना ते वापरायचा प्रयत्न केल्यास नवौन्मेषी साहित्यकंची उर्मी आणि उर्जा दबली जाते. (त्या दबलेल्या साहित्याचा सर्वांनाच त्रास होतो ते वेगळे) त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या प्रतीसदाखाली क्षुब्ध नवकविता टंकली पाहिजे जेणेकरून निदान प्रतीसाद तरी बंद होईल. साहित्य स्फुरत असेल तर स्फुरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा. नवौन्मेषी साहित्यकांना तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. फक्त नवौन्मेषी साहित्यक विस्मृतीत जावा म्हणून मिपा वाचकीय पातळीवरून होणार्या कटकारस्थास तुम्ही जो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावता आहात, तेवढा बंद करा. नवौन्मेषी साहित्यक स्वतःचे स्वतःच बघून घेईल. तुम्ही काहीच करण्याची गरज नाही फक्त नवौन्मेषी साहित्यकाचे धाग्यावरून उठा. तुम्ही साहित्यकाचे धाग्यावरून उठलात तर नवौन्मेषी साहित्यक स्वतःच स्वतःचा (बहिर्गमनाचा) मार्ग शोधण्यास समर्थ आहे. त्याला तुमच्या भाकड सल्ल्याची आवश्यकता तर नाहीच नाही. सुमार बालक चिट(क्)वणीस भुसभसा भुस्काट साहित्याचा भरमार साठा
नवौन्मेषी साहित्यकांच्या हिताची आभासी काळजी घेणारी एक्मेव संघटना
In reply to च्छ्या..... by नाखु
=))
छान