गांधी.

कलंत्री's picture
कलंत्री in जनातलं, मनातलं
14 Dec 2008 - 11:43 pm

वाघ म्हटला तरी खातो वाघाबो म्ह्टला तरी खातो तर वाघ्याच का न म्हणावं? एक वाक्प्रचार.

सध्या बंगालच्या वाघीणी या लेखाद्वारे आम्हाला गांधीवर इतरत्र चर्चा करा असे सांगितल्यामुळे हा वेगळा पंक्तिप्रपंच.

आता मुळ विषयाकडे.

गांधीबद्दल सरळसरळ चर्चा करण्यासाठी हा लेख सुरु करत आहे. काही मुद्दे मांडत आहे. कृपया आपले रोखठोक विचार मांडावे ही विनंती.

गांधीचा स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान होते का?

गांधी नसते तरी स्वातंत्र्य मिळाले असते का?

गांधींनी सत्याग्रहाचा पुरस्कार करुन देशाचा घात केला का?

गांधींनी हरिजन, हिंदू-मुस्लिम ऐक्य, स्त्री सहभागाचा प्रयत्न केला यात काही वावगे आहे का?

गांधींचे धोरण देशाच्या विरुद्ध होते का?

५५ कोटीचा मुद्दा नेमका काय आहे?

गांधींना प्रत्येक क्षेत्रात जसे अनुयायी( नेहरु, पटेल, विनोबा इत्यादी) मिळाले तसे अन्य समकालिन नेत्यांना मिळाले का?

गांधी जर राजकारणात आले नसते तर एक वकिल, एक लेखक अथवा जागतिक विचारवंत होऊ शकले असते का?

गांधी प्रामाणिक होते का?

गांधींनी एकाच वेळेस वेगवेगळ्या क्षेत्रात जसे काम केले ( निसर्गोपचार, हिंदी राष्ट्रीय सभा, आश्रमाचे जीवन, साध्य-साधन विवेकाचा आग्रह, सत्याग्रह हे योग्य होते का? )

गांधी अन्य समाजात जन्माला आले असते तर असे प्रभावी राहिले असते का? किंवा ब्रिटीश ऐवजी वेग़ळी राजवट असतीतर गांधी प्रभावी ठरले असते का?

स्वातंत्र्य युध्दात जसे गांधींना मोठी खेळी खेळता आली ( १९१७ ते १९४७) तशी गांधींना स्वातंत्र्य काळानंतर मिळाली असती तर आजचे चित्र वेगळे असले असते का?

गांधींचे विरोधक उदा. सावरकर, भगतसिंग, जीना, सुभाषबाबु इत्यादीच्या तुलनेत गांधी कोठे कमी पडले /कोठे वरचढ ठरले.

गांधीच्या बाबतीत शासनाचे धोरण काय आहे? ( पूर्वी आकाशवाणीवर गांधीवंदना हा कार्यक्रम येत असे तो बंद झाला.)

गांधीविचार आजच्या काळात अप्रस्तुत आहे काय? दहशतवादावर गांधीविचाराने काही तोडगा निघु शकेल का?

किंवा आपल्याला जे काही योग्य वाटेल ते विचार जरुर मांडा.

समाजसंदर्भमाध्यमवेधप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

अवलिया's picture

15 Dec 2008 - 12:04 am | अवलिया

गांधीचा स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान होते का?
होय

गांधी नसते तरी स्वातंत्र्य मिळाले असते का?
होय

गांधींनी सत्याग्रहाचा पुरस्कार करुन देशाचा घात केला का?
होय

गांधींनी हरिजन, हिंदू-मुस्लिम ऐक्य, स्त्री सहभागाचा प्रयत्न केला यात काही वावगे आहे का?
होय (हिंदु मुस्लीम ऐक्या संदर्भातच वावगे कारण त्यांनी मुस्लीमांना झुकते माप दिले बाकी ठीक आहे)

गांधींचे धोरण देशाच्या विरुद्ध होते का?
होय

५५ कोटीचा मुद्दा नेमका काय आहे?
संदर्भहीन प्रश्न. कोणते ५५ कोटी?

गांधींना प्रत्येक क्षेत्रात जसे अनुयायी( नेहरु, पटेल, विनोबा इत्यादी) मिळाले तसे अन्य समकालिन नेत्यांना मिळाले का?
अर्थातच

गांधी जर राजकारणात आले नसते तर एक वकिल, एक लेखक अथवा जागतिक विचारवंत होऊ शकले असते का?
नाही

गांधी प्रामाणिक होते का?
असावेत. (नसल्याचा पुरावा नाही म्हणुन असावेत असा संशयाचा फायदा)

गांधींनी एकाच वेळेस वेगवेगळ्या क्षेत्रात जसे काम केले ( निसर्गोपचार, हिंदी राष्ट्रीय सभा, आश्रमाचे जीवन, साध्य-साधन विवेकाचा आग्रह, सत्याग्रह हे योग्य होते का? )
पुन्हा संदर्भहीन. मी कंपनी चालवतो, मिपावर लिहितो सामाजिक काम करतो हे योग्य का अयोग्य असा प्रशनच होवु शकत नाही. मला वाटते मी करतो. तसेच त्यांना वाटले त्यांनी केले.

गांधी अन्य समाजात जन्माला आले असते तर असे प्रभावी राहिले असते का? किंवा ब्रिटीश ऐवजी वेग़ळी राजवट असतीतर गांधी प्रभावी ठरले असते का?
मला नाही वाटत. ब्रिटिशांनी गांधींना प्याद्याप्रमाणे वापरले.

स्वातंत्र्य युध्दात जसे गांधींना मोठी खेळी खेळता आली ( १९१७ ते १९४७) तशी गांधींना स्वातंत्र्य काळानंतर मिळाली असती तर आजचे चित्र वेगळे असले असते का?
अजुन अवस्था वाईट झाली असतौ

गांधींचे विरोधक उदा. सावरकर, भगतसिंग, जीना, सुभाषबाबु इत्यादीच्या तुलनेत गांधी कोठे कमी पडले /कोठे वरचढ ठरले.
तुलना अप्रस्तुत. नाना व तात्या जशी तुलना होवु शकत नाही तसेच हे पण.

गांधीच्या बाबतीत शासनाचे धोरण काय आहे? ( पूर्वी आकाशवाणीवर गांधीवंदना हा कार्यक्रम येत असे तो बंद झाला.)
ते शासनाला विचारा की माहितीच्या अधिकाराखाली.

गांधीविचार आजच्या काळात अप्रस्तुत आहे काय?
होय

दहशतवादावर गांधीविचाराने काही तोडगा निघु शकेल का?
नाही

अजुन काही?

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

आजानुकर्ण's picture

15 Dec 2008 - 12:04 am | आजानुकर्ण

गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिल्याचा मुद्दा वारंवार काढला जातो. हे पैसे भारताने किंवा गांधींनी सप्रेम भेट किंवा बक्षीस म्हणून दिलेले नाहीत. त्या पैशावर पाकिस्तानचा हक्कच होता.

फाळणीपूर्वी भारतीय रिझर्व बॅंकेत ३७५ कोटी रुपयांची गंगाजळी उपलब्ध होती.त्यात पाकिस्तानचा वाटा ७५ कोटी आणि भारताचा ३०० कोटींचा होता. पाकिस्तान निर्मितीच्या सुरुवातीच्या दिवसांत पाकिस्तानची तातडीची निकड भागवण्यासाठी २० कोटी देण्यात आले होते. उरलेले पैसे भारताने नंतर देण्याचे मान्य केले होते. तशी कायदेशीर तरतूद करण्यात आली होती.

पाकिस्तानच्या रिझर्व बँकेने ६ जानेवारी १९४८ ला हे पैसे देण्याची अधिकृत मागणी भारताकडे - तत्कालीन गवर्नर चिंतामणराव देशमुखांकडे केली. सीडी देशमुख यांनी ही मागणी मिळाल्याची माहिती पाकिस्तानला दिली.

तेव्हा भारत सरकारने पाकिस्तानला कर्ज म्हणून १० कोटी रुपये उपलब्ध करण्याची तयारी केली व चिंतामणरावांना रिझर्व बँकेची स्थिती पाहून निर्णय घेण्यास सांगितले. मात्र हा कर्जाचा मुद्दा समोर आल्याने तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान लियाकत अली यांनी, पाकिस्तानच्या हक्काचे पैसे परत करावेत हा धोशा लावून धरला.

स्वप्नात दिलेले वचन मान्य करणारा हरिश्चंद्र राजा आणि वडिलांनी दिलेले वचन पाळण्यासाठी वनवास पत्करणाऱया रामाचे हिंदू संस्कार गांधींवर असल्याने त्यांना भारताने आधी मान्य केलेल्या तरतुदीचे पालन करणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत होते.

याचबरोबर त्यावेळेस असलेला भारत - पाकिस्तानमधील द्वेष थंडावण्यास मदत होईल यासाठी त्यांनी भारताने (याआधीच मान्य केलेल्या) ५५ कोटींच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली व त्यासाठी उपोषण सुरू केले.

याचे विस्तृत विश्लेषण य.दि. फडके यांच्या नथुरामायण या पुस्तकात पाहा.

आपला
मोहनदास करमचंद आजानुकर्ण

छोटा डॉन's picture

15 Dec 2008 - 12:57 am | छोटा डॉन

आजानुकर्णाने जे काही "५५ कोटी रुपयांबाबत" लिहले आहे त्याच्याशी सहमत आहे.
मी जेवढा काही इतिहासाचा अभ्यास केला आहे त्यातुन मला " पाकीस्तानला त्याच्या हक्काचे ५५ कोटी रुपये दिले गेले" असेच समजले आहे.
अभ्यास न करता "५५ कोटी कशाला दिले ?" असे म्हणणे अप्रस्तुत ठरते. तुर्तास आजानुकर्णाशी सहमत.

शिवाय गांधींनी सुद्धा केवळ "वचनपुर्ती / शब्द पाळणे / केलेया तरतुदींचे पालन करणे / करार पाळणे " ह्या हेतुंकरीताच उपोषण केले असे ( मलातरी ) ज्ञात आहे.
उगाच लावायचा म्हणुन त्याचा अन्य कशाशी संबंध लावणे अयोग्य ठरते.

छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,

क्लिंटन's picture

15 Dec 2008 - 2:18 pm | क्लिंटन

५५ कोटी रुपये पाकिस्तानच्या वाट्याचे होते याबद्दल काहीच दुमत नाही. भारत सरकारचाही पैसे देण्यास विरोध नव्हता. पण काश्मीरवरील पाकिस्तानचे आक्रमण मागे घेतल्याशिवाय ते देण्यास मंत्रीमंडळाचा विरोध होता. त्यात चूक काय?पण गांधींनी आपल्या उपोषण नामक हट्टाने ते पैसे पाकिस्तानला द्यायला सरकारला भाग पाडले त्याला मात्र विरोध आहे.

भारत पाकिस्तानातील द्वेषभावना भारताने पैसे द्यायची जबाबदारी पार पाडून कमी झाली असती या तर्काला काय आधार आहे? सामान्य जनतेच्या कत्तली, लुटालूट, सक्तीचे धर्मांतर यांनीच त्यांचा इतिहास रक्ताळलेला आहे.कलकत्यातील प्रत्यक्ष कृतीदिनापासून पुढील वर्ष-सव्वा वर्ष चाललेला हैदोस दुसरे काय सांगतो?

सापाला दूध पाजून साप डंख मारायचे सोडत नाही. आणि त्याला दूध पाजून सापाच्या विषाचे रूपांतर अमृतात होईल ही अपेक्षा अत्यंत भाबडी आहे. तशीच भाबडी अपेक्षा ठेऊन पृथ्वीराज चौहानने घौरी हातात जिवंत सापडूनही सोडून दिले.पुढच्या वर्षी पृथ्वीराज घौरीच्या हातात सापडल्यावर घौरीनामक साप डसलाच ना?असे अनेक अनुभव गाठीशी असूनही परत परत अशी भाबडी अपेक्षा ठेवणे म्हणजे सर्वनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे.

भारतीय जनतेत स्वतःचे स्थान लक्षात घेऊन स्वतःचा जीव उपोषणाने पणाला लावणे आणि देशहिताविरूध्द निर्णय घ्यायला भाग पाडणे हे योग्य होते का? स्वतःची भाबडी स्वप्ने उराशी बाळगून शत्रूचे नक्की ध्येय काय हेच मुळात लक्षात न घेऊन वर माझे ऐकले नाहीत तर मी उपोषणाला बसतो ही धमकी देणे याला ब्लॅकमेल सोडून दुसरे काय नाव देता येईल?

गांधींचा शास्त्रीय प्रगतीला विरोध होता. सर्वांनी पूर्वीच्या काळाप्रमाणे गावांमध्ये राहून अंगमेहेनतीची कामे करत आयुष्य जगावे असे त्यांचे मत होते. (संदर्भः रॉबर्ट पेन यांचे गांधींचे चरित्र). त्याप्रकारची जीवन पध्दती त्यांनी आश्रमांमध्ये आणली पण होती. ते मत प्रत्येकाच्या प्रकृतीच्या आणि प्रदुषण कमी करायच्या दृष्टीने उपयोगी पडले असते पण सर्व जग वैज्ञानिक क्षेत्रात उत्युंग झेप घेत असताना भारताने मात्र घड्याळाचे काटे उलटे फिरवून २००० वर्षे मागे जावे हे म्हणणे योग्य होते का?काळाची चक्रे उलटी फिरवणे अगदी गांधींनाही शक्य झाले असते असे नाही पण स्वातंत्र्योत्तर काळात नेहरूंनी भाक्रा नांगल धरण किंवा स्टील उद्योगाला चालना देणे, आय.आय.टी ची स्थापना यासारखे चांगले निर्णय घेतले त्याला मात्र गांधींनी विरोध केला असता असे म्हणायला जागा आहे असे मला वाटते. आणि प्रत्येकवेळी माझे ऐका नाहीतर बसतो मी उपोषणाला असे गांधींनी ते १२५ वर्षे जगून केले असते तर?

मागे एकदा जुन्या रद्दीच्या दुकानात मला १० एप्रिल १९७१ चा महाराष्ट्र टाइम्स बघायला मिळाला होता.त्यावेळी पूर्व पाकिस्तानात (आताच्या बांगलादेशात) पाकिस्तानी सैन्याचे हिटलरला लाजवतील असे अत्याचार सुरू होते.त्यावर गांधींचे पट्टशिष्य विनोबा भावे यांचे विधान होते-'सैन्य लोकशाहीचे रक्षण करू शकत नाही हे पूर्व पाकिस्तानातील घटनांवरून स्पष्ट झाले आहे. तेव्हा भारताने आपले सैन्यच काढून टाकावे'. विनोबा भाव्यांच्या भूदान किंवा सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच आदर आहे. पण त्यांचे भारताने सैन्यच काढून टाकावे हे म्हणणे योग्य आहे का?भाव्यांनी भारताने सैन्य काढून टाकावे हे विधान त्यापूर्वीही केले होते. त्यावर आचार्य अत्र्यांनी 'सैन्य काढलेत तर सीमेवर तुमचे पंचे वाळत टाकणार आहात का?' असा प्रश्न विचारला होता असे आमच्या एन.टी.एस. च्या इतिहासाच्या सरांनी सांगितले होते. अत्र्यांनी खरोखरच असा प्रश्न विचारला होता याविषयीचा खात्रीलायक संदर्भ माझ्याकडे नाही पण माझा प्रश्न हा की, सैन्य काढले असते तर पंचे वाळत घालायला भारताची सीमा तरी शिल्लक राहिली असते काय? भारताने सैन्य काढावे या विधानाचा उगम गांधींच्या विचारात आहे का? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.

मुस्लिम आक्रमकांनी इराणपासून उत्तर आफ्रिकेपर्यंतचा विस्तृत भूभाग १००-१५० वर्षांत पादाक्रांत केला. इराण, अरबस्थान, इजिप्त यासारख्या ठिकाणी त्यापूर्वीच्या संस्कृतीचे पालन करणारा माणूस आता औषधालाही शिल्लक नाही. भारतात त्यांना पहिले यश ७१२ मध्ये मिळाले. पण नंतरच्या काळात बाप्पा रावळसारख्या वीरांनी अगदी सिंध प्रांत पण परत जिंकून घेतला. गझनीच्या महंमदाने लाहोर आणि त्याजवळचा भाग जिंकला ११ व्या शतकाच्या सुरवातीला आणि ते दिल्लीपर्यंत पोहोचले ते १२ व्या शतकाच्या शेवटी म्हणजे जवळजवळ २०० वर्षांनंतर! तेव्हा सिंध प्रांतापासून दिल्लीपर्यंत भूभाग पादाक्रांत करायला त्यांना ७१२ ते ११९२ अशी ४८० वर्षे थांबावे लागले याचे कारण हिंदूंनी (विशेषतः राजपुतांनी) अत्यंत कडवा प्रतिकार केला होता. आणि त्यानंतर राणा प्रताप, शिवाजी महाराज, गुरू गोविंद सिंह आणि दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याने त्या आक्रमणाचा कडवा प्रतिकार केला. या वीरांनी शत्रूला तो प्रसन्न व्हावा म्हणून दक्षिणा दिल्या नाहीत आणि तलवारीचा मुकाबला तलवारीनेच केला म्हणून इराण आणि इजिप्त मध्ये घडले ते भारतात घडले नाही. या वीरांनी गांधींचा भाबडा विश्वास उराशी बाळगला असता तर?

अगदी अलिकडचे उदाहरण द्यायचे झाले तर हिटलरचे आक्रमण झाल्यावर रशियन जनतेने हिटलर प्रसन्न व्हावा म्हणून त्या सापाला दूध पाजले असते तर? लंडनवर जर्मन विमाने हल्ले करत असताना चर्चिल सत्याग्रहाला आणि उपोषणाला बसले असते तर?संसदभवनावर हल्ला झाला असताना आपल्या सुरक्षारक्षकांनी तो भाबडा आशावाद दाखवला असता तर?मुंबईतल्या हल्ल्यात संदिप उन्नीकृष्णन आणि गजेंद्र सिंह आणि त्यांच्यासारख्या अनेकांनी अहिंसाधर्म आचरला असता तर?

आपला सर्वनाश हाच एक उद्देश घेऊन आलेल्या शत्रूला सामोपचाराची भाषा कळत नाही. औरंगजेब, हिटलर आणि मुंबईवर हल्ला करणारे आणि त्यांच्या सारखे अनेक हल्ले करणारे दहशतवादी या क्रूरकर्म्यांना उत्तरे द्यायला अनुक्रमे शिवछत्रपती, चर्चिल आणि संदिप उन्नीकृष्णनच हवेत. तिथे गांधींचे काम नाही.

जर सगळे जग शांततावादी असेल तर गांधीवादासारखा महान सद्गुण दुसरा नाही. पण प्रत्यक्ष परिस्थिती तशी नाही ना. आणि ही परिस्थिती उघड डोळ्याने दिसत असूनही परत परत गांधीवाद आणि अहिंसा यांचे चर्वितचर्वण करणे योग्य नाही असे मला वाटते.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

बैलोबा's picture

15 Dec 2008 - 2:29 pm | बैलोबा

"आपला सर्वनाश हाच एक उद्देश घेऊन आलेल्या शत्रूला सामोपचाराची भाषा कळत नाही. औरंगजेब, हिटलर आणि मुंबईवर हल्ला करणारे आणि त्यांच्या सारखे अनेक हल्ले करणारे दहशतवादी या क्रूरकर्म्यांना उत्तरे द्यायला अनुक्रमे शिवछत्रपती, चर्चिल आणि संदिप उन्नीकृष्णनच हवेत. तिथे गांधींचे काम नाही."

एकदम मनातलं बोललातं.
गांधीजींच्या आडमुठ्या धोरणामुळे राष्ट्राला खुप मोठी किंमत वेळो वेळी चुकावाली लागली.
अहिंसा आजच्या काळात व मागच्या काळात योग्य नव्हतीच, शक्ती असली तर अहिंसेला महत्व आहे.

आज भारताचे सैन्य जगातील तीन नंबरचे सैन्य आहे तरी देखील आपण पाकिस्तानला वेळोवेळी अहिंसेनेच उत्तर दिले ह्यातून जगाने जरी भारताची वाहवाह केली असली तरी ह्या अहिंसे मुळे सामान्यजनांचे खुप नुकसान झाले हजारो भारतीयांना आपले प्राण त्यागावे लागले ते पाकीस्तान व त्याच्या आतंकवाद मुळे !

आतंकवादासमोर गाधींवाद , अहिंसा काहीच कामाची नाही... !
एके-४७ /५६ च्या जगात तुम्ही पंचा व काठी हात घेऊन समोरच्या शत्रुचे मतपरिवर्तन नाही करु शकणार हे नक्की.

ह्या अहिंसेच्या नादापाईच भारत वंशातील अनेक शुर राजांना आपले राज्य व प्राण गमवावे लागले हे आपण वर दिलेल्या घोरीच्या उदाहरणावरुन समजतेच आहे.

लिखाळ's picture

15 Dec 2008 - 4:09 pm | लिखाळ

>> गांधींचा शास्त्रीय प्रगतीला विरोध होता. सर्वांनी पूर्वीच्या काळाप्रमाणे गावांमध्ये राहून अंगमेहेनतीची कामे करत आयुष्य जगावे असे त्यांचे मत होते. (संदर्भः रॉबर्ट पेन यांचे गांधींचे चरित्र). त्याप्रकारची जीवन पध्दती त्यांनी आश्रमांमध्ये आणली पण होती. <<

गांधीजी त्यांच्या जाहिर भाषणाच्या वेळी माईक-लाऊडस्पीकरचा वापर करत असत का? की जून्या काळाप्रमाणे हजारो लोकांसमोर ते मोठ्या आवाजात भाषण करत?
पेपर मध्ये त्यांची प्रसिद्धी होत असे ते पेपर हाताने लिहिले जात असत की छापखान्यात?
-- (बळंचकर) लिखाळ.

क्लिंटन's picture

15 Dec 2008 - 4:23 pm | क्लिंटन

>>गांधीजी त्यांच्या जाहिर भाषणाच्या वेळी माईक-लाऊडस्पीकरचा वापर करत असत का

अहो तसा गांधींनी रेल्वेचा पण प्रवास अनेकदा केला होता. ते पदयात्रा करत अनेक ठिकाणी जात पण रेल्वेचा पण वापर करतच असत. तसेच काँग्रेसमधील आपल्या सहकार्‍यांना तारा पण पाठवत असत. त्यांनी सांडणीस्वार किंवा निरोपे पाठविल्याचे वाचलेले नाही. (चु.भू.दे.घे)

गांधींचा शास्त्रीय प्रगतीला विरोध म्हणजे माणसाला निसर्गापासून आणि अंगमेहेनतीपासून दूर नेणार्‍या यंत्रांना होता. रॉबर्ट पेन यांनी लिहिलेल्या चरित्रात तरी असेच लिहिले आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

बैलोबा's picture

15 Dec 2008 - 4:27 pm | बैलोबा

>गांधींचा शास्त्रीय प्रगतीला विरोध म्हणजे माणसाला निसर्गापासून आणि अंगमेहेनतीपासून दूर नेणार्‍या यंत्रांना होता.

सहमत.
त्यासाठीचे निसर्गोपचार तथा आश्रम जिवनावर भर देत.

लिखाळ's picture

15 Dec 2008 - 4:31 pm | लिखाळ

होय.. त्यांना काय अभिप्रेत असावे याचा अंदाज आहेच. मी उगीच मजा म्हणून लिहिले होते.
-- लिखाळ.
महापुरुषांचे पाय मातीचे असू शकतात हे मान्य करायला अवघड असले तरी वास्तव तसे असू शकते.

केदार's picture

15 Dec 2008 - 12:59 am | केदार

कलंत्री साहेब हा प्रश्न होय नाही उत्तरात संपू शकत नाही. :)

५५ कोटीवर त्यांचा हक्क जरी होता तरी त्यांनी आक्रमन केल्यामूळे तो हक्क नाहीसा झाला. उलट ते देउन शत्रूराष्ट्राची सोय पाहिल्या गेली. त्यामूळे माझा ह्या ५५ कोटी देन्याला विरोध आहे. जर त्यांनी काश्मीरच्या हरि सिंगला उचकवले नसते तर ५५ काय ६० कोटी देखील द्यायला तयारी होती. पण गांधीना शत्रू राष्ट्राने केलेला हल्ला ह्या घटने मूळे मान्य होता असे लोकांना वाटायला लागले. व खर्या अर्थाने आम जनता गांधीविरुध्दा जायला सुरुवात झाली. तशी सुरुवात आधी बंगाल मध्ये १९४२ ते १९४६ मध्ये झालेल्या हिंदू शिरकानातच दिसेल. तेव्हा गांधीनी काहीही केले नाही असे आमचे मत आहे.

दे दी हमे आजादी बिन खडग हे गाणे तर आझाद, चाफेकर, भगतसिंग, नेताजी, सावरकर, आणी कैक हजारो भारतीयांना मुर्ख ठरवीते. असे गाणे गाणारे धन्य अन त्याचा संदर्भ देणारे धन्य.

दहशतवादावर गांधीविचाराने काही तोडगा निघु शकेल का? >> हो नक्कीच निघू शकेल. अखंड पाकीस्थान ज्याचे नाव मुगलीस्थान असेल तो निघून.

आधीलिहील्या प्रमाने एका वाक्यात होय वा नाही ह्याने ही चर्चाच होउ शकत नाही. डिटेलात उत्तर लिहावे लागनार. ते पुढे.

धम्मकलाडू's picture

15 Dec 2008 - 2:35 pm | धम्मकलाडू

त्यामूळे माझा ह्या ५५ कोटी देन्याला विरोध आहे.

हाहाहाहाहा. तुमच्या विरोधाने काय होते! ते देऊन झालेले आहेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विसोबा खेचर's picture

15 Dec 2008 - 1:04 am | विसोबा खेचर

सध्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे (जिवाणू संसर्ग) पोट अंमळ बिघडले आहे. प्रतिजैविके सेवन करून त्या जिवाणूंची हिंसा करण्याऐवजी सत्याग्रह अन् अहिंसेचे डोस पाजून त्या जिवाणूंचे मन वळवणे चालले आहे. त्यांचे एकदा मन वळले की आपोआपच आमच्या पोटाचा विकार काबूत येईल. त्यानंतर शांतचित्ताने आम्ही वरील प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करू..

तोवर चालू द्या...

आपला,
(अहिंसावादी) तात्या गोडसे.

विनायक प्रभू's picture

15 Dec 2008 - 10:23 am | विनायक प्रभू

लै भारी तात्या.
तुमच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणुन मी सुद्धा लंघन करीन. बापुंच्या कॅसेट्स बघीन.

टारझन's picture

15 Dec 2008 - 1:55 pm | टारझन

मी परवा पब मधे गेलो होतो ... तिथं मला एक (ब्राऊन) पोरगी( की आयटम) लैच आवडली ... पण ती जरा हाय क्लास असावी !! मी तसाही पोरींबरोबर मितभाषी( ए कोण हसतोय रे तिकडे ? ) ... एक दोनदा बोलण्याचा ट्राय केला .. पण पोरगी काही "मन" लावून लक्षच देत नव्हती .. ईव्हन ड्रिंग ऑफर केली तरी ... च्यायला म्हंटलं आता काय करावं ? मग मला कलंत्री साहेबांचा लेख जसाच्या तसा आठवला ... मी त्यामुली ला गांधीवादाने जिंकायचं ठरवलं ..
शुक्रवारी डाळ शिजली नाही ... म्हणून शनिवारी गेलो ... फक्त तिच्याकडे पहात "ॐ **येन नमः ! ॐ ***येन नमः !! " चा जाप करत होतो ..
तिला वाटलं मी काही जादू वगैरे करतो की काय आणि ती घाबरली असावी .. जास्त बोलली नाही ... पण थोडी लुक्स द्यायला लागली ... मी मंत्रोच्चाराचा स्पीड वाढवला ... मग काय ... पोरगी स्वतःहून माझ्या जवळ आली .. नेस्ट डे मी तिला गांधीवातलं प्रतिक म्हणून गुलाबाचं फुल दिला !! आणि ............. (काय विचारता) लगेच गुलकंद तयार झाला हो ... तर अशा रिती ने मी एका खडूस मुलीचे गांधीवादाने हृदयपरिवर्तन केलं ..

- (डोळस गांधीवादी) टारझन

ता.क. : मा.पु. महात्मा गांधीजी हे आम्हाला माननिय आहेत .. त्यांचा आदर आम्ही हात राखून का होईन ,.. पण करतो .. त्यांचा अवमान हा हेतू नाही .. मला जो फायदा झाला तो इथं नमुद केला ... "मजेशीर आहे मजा घ्या " --> हे मात्र साभार उचललेंलं आहे हं

मृगनयनी's picture

15 Dec 2008 - 2:19 pm | मृगनयनी

फक्त तिच्याकडे पहात "ॐ **येन नमः ! ॐ ***येन नमः !! " चा जाप करत होतो ..

=)) =))

तिला वाटलं मी काही जादू वगैरे करतो की काय आणि ती घाबरली असावी .. जास्त बोलली नाही ... पण थोडी लुक्स द्यायला लागली ... मी मंत्रोच्चाराचा स्पीड वाढवला ... मग काय ... पोरगी स्वतःहून माझ्या जवळ आली ..

टार्‍या... "मान्त्रिक" शोभलास खरा!
गान्धीवादी मान्त्रिक!!

नेस्ट डे मी तिला गांधीवातलं प्रतिक म्हणून गुलाबाचं फुल दिला !! आणि ............. (काय विचारता) लगेच गुलकंद तयार झाला हो ... तर अशा रिती ने मी एका खडूस मुलीचे गांधीवादाने हृदयपरिवर्तन केलं ..

व्वा!!.. टार्‍या.. तेरा जवाब नै!!

तू आता इन्डियात आल्यावर "गुलकन्द कन्सल्टन्सी" उघड....
लाईन लागेल गुलाबांची...... ;)

:)

बगाराम's picture

16 Dec 2008 - 6:47 am | बगाराम

... मी त्यामुली ला गांधीवादाने जिंकायचं ठरवलं ..
शुक्रवारी डाळ शिजली नाही ... म्हणून शनिवारी गेलो ... फक्त तिच्याकडे पहात "ॐ **येन नमः ! ॐ **येन नमः !! " चा जाप करत होतो ..

'महापुरुषांची विटंबना' ह्यामध्ये वरील वाक्ये येत नाहीत का? उद्या छत्रपती शिवाजी महाराजां विषयी कुणी असली ओंगळवाणी चेष्टा केली आणि हसुन लो़ळले तर ते खपवुन घेतले जाईल का? गांधीजी हे महापुरुष होते हे मिपाला मान्य नाही का? कारण नसताना कलंत्रीजींची टर उडवण्याची मुभा सगळ्यांना आहे का? मराठी मनांची स्पंदने म्हणुन कार्यरत असणार्‍या संकेतस्थळावर असा चुकिचा मेसेज दिला जाउ नये. मस्करीची कुस्करी होत आहे इथे

कृपया संबंधितांनी योग्य ती कारवाई करावी ही विनंती.

योग्य ते बदल केलेले आहेत. - संपादक

पिवळा डांबिस's picture

15 Dec 2008 - 2:22 am | पिवळा डांबिस

गांधीबद्दल सरळसरळ चर्चा करण्यासाठी हा लेख सुरु करत आहे. काही मुद्दे मांडत आहे. कृपया आपले रोखठोक विचार मांडावे ही विनंती.
आजवर मिपावरच्या या चर्चेपासून दूर राहिलो होतो कारण वातावरण संवेदनाशील होते आणि आम्ही आमच्या लाडक्या मुंबईत झालेल्या विध्वंसाचा दुखवटा पाळत होतो. आता तुमच्या प्रश्नांना आमची आमच्या अल्पमतीप्रमाणे उत्तरे....

गांधीचा स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान होते का?
नि:संशय!
गांधी नसते तरी स्वातंत्र्य मिळाले असते का?
होय! गांधींच्या चळवळीबरोबरच दुसर्‍या महायुद्धात झालेली ब्रिटिश साम्राज्याची धूळधाण, भारतीय नौदलाने पुकारलेले बंड व त्याला विमानदलाने दिलेला पाठिंबा असे इतर फॅक्टरही महत्वाचे होते.
गांधींनी सत्याग्रहाचा पुरस्कार करुन देशाचा घात केला का?
नाही
गांधींनी हरिजन, हिंदू-मुस्लिम ऐक्य, स्त्री सहभागाचा प्रयत्न केला यात काही वावगे आहे का?
मुळीच नाही. उलट गांधींनी स्वातंत्र्याची चळवळ काही वकिलांपुरती मर्यादित न ठेवता जनसामान्यांपर्यंत नेली. त्यांच्यामुळे परंपरागत भारतीय समाजातल्या स्त्रियाही चळवळीत भाग घेऊ लागल्या इतकेच काय पण तुरूंगातही गेल्या हे त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी जनसामान्यांना निर्भयता शिकवली...
गांधींचे धोरण देशाच्या विरुद्ध होते का?
मला वाटत नाही
५५ कोटीचा मुद्दा नेमका काय आहे?
दोन्ही बाजूने उलटसुलट गोष्टी वाचनात आलेल्या आहेत. निश्चित माहिती नाही म्हणून या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही.
गांधींना प्रत्येक क्षेत्रात जसे अनुयायी( नेहरु, पटेल, विनोबा इत्यादी) मिळाले तसे अन्य समकालिन नेत्यांना मिळाले का?
संदर्भ कळला नाही. तत्कालीन जागतिक राजकारणाचा विचार केला तर देशोदेशींच्या नेत्यांना अनुयायी होतेच. इथे गांधीजींच्या या अनुयायांचा उल्लेख चांगल्या की वाईट दृष्टीने तुम्ही केलायत हे समजले नाही. कारण उल्लेख केलेल्या अनुयायांमध्ये जसे काही अलौकिक गुण होते तसे काही दोषही होतेच.
गांधी जर राजकारणात आले नसते तर एक वकिल, एक लेखक अथवा जागतिक विचारवंत होऊ शकले असते का?
कुणास ठाउक? या जर-तर च्या गोष्टी झाल्या.
गांधी प्रामाणिक होते का?
महात्मा म्हणून विचारत असाल तर होय!
राजकीय नेते म्हणून विचारत असाल तर संशय घेण्यास अनेक जागा आहेत.
गांधींनी एकाच वेळेस वेगवेगळ्या क्षेत्रात जसे काम केले ( निसर्गोपचार, हिंदी राष्ट्रीय सभा, आश्रमाचे जीवन, साध्य-साधन विवेकाचा आग्रह, सत्याग्रह हे योग्य होते का? )
राजकीय नेता म्हणून गांधीजींसंबंधी जर ही चर्चा चालली असेल तर वरील मुद्दे माझ्या मते गौण आहेत.
गांधी अन्य समाजात जन्माला आले असते तर असे प्रभावी राहिले असते का?
पुन्हा जर-तर चा प्रश्न! चर्चिल फ्रान्समध्ये जन्माला आले असते तर केवळ आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या आधारे ते फ्रान्स स्वतंत्र ठेऊ शकले असते का? द्या उत्तर....
किंवा ब्रिटीश ऐवजी वेग़ळी राजवट असतीतर गांधी प्रभावी ठरले असते का?
५०-५०% चान्स!! गांधी ब्रिटीशांच्या विरुद्ध यशस्वी ठरले. पण त्यांचे तत्व नेहमीच यशस्वी ठरले असते असे नाही. खुद्द भारतातच सत्याग्रहाने गोवा मुक्तीचा प्रयत्न करणार्‍या सत्याग्रहींना गोळ्या खाव्या लागल्या. ब्रिटिशांना जगभर आपण लोकशाहीवादी देश आहोत ही प्रतिमा जपायची होती. पोर्तुगालच्या सालाझार हुकुमशहाला लोकशाहीशी काही देणं-घेणं नव्हतं. म्हणून त्याने सरळ बंदुका चालवल्या. अखेर भारत सरकारला (गांधींच्या शिष्यांना!) आर्मी पाठवून गोवा भारतात विलीन करावा लागला ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही.
स्वातंत्र्य युध्दात जसे गांधींना मोठी खेळी खेळता आली ( १९१७ ते १९४७) तशी गांधींना स्वातंत्र्य काळानंतर मिळाली असती तर आजचे चित्र वेगळे असले असते का?
चित्र वेगळे निश्चितच दिसले असते, पण ते चांगले असते कि वाईट हे ठरवणे कठीण आहे. कदाचित हिंदू-मुस्लीम ऐक्य जास्त वाढले असते (चांगले) पण त्यावरोबरच भारताची इतकी औद्योगिक प्रगती (अवजड उद्योग वगैरे!) झाली असती का याबद्दल मी साशंक आहे.

गांधींचे विरोधक उदा. सावरकर, भगतसिंग, जीना, सुभाषबाबु इत्यादीच्या तुलनेत गांधी कोठे कमी पडले /कोठे वरचढ ठरले.
गांधींचे व या इतरांचे मार्ग वेगवेगळे होते त्यामुळे ही तुलना मला पटत नाही. माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट ही की वरील सर्व लोक (हो अगदी जीनाही, त्यांचे काँग्रेसमधील स्थान डावलले जाईपर्यंत!) हे देशभक्त होते.
गांधीच्या बाबतीत शासनाचे धोरण काय आहे? ( पूर्वी आकाशवाणीवर गांधीवंदना हा कार्यक्रम येत असे तो बंद झाला.)
अजिबात माहिती नाही. तुम्हाला याबाबतीत आपल्या शासनाचे धोरण समजले की आम्हालाही कळवा....
:)
गांधीविचार आजच्या काळात अप्रस्तुत आहे काय?
विचार अप्रस्तुत नाही. पण तो फक्त अनेक तोडग्यांपैकी एक आहे. सर्व प्रकारच्या परिस्थीतीवर ते रामबाण औषध नाही हे ध्यानात ध्यायला हवे...
दहशतवादावर गांधीविचाराने काही तोडगा निघु शकेल का?
मला असे वाटत नाही. ज्यांचे ध्येय केवळ जास्तीत जास्त "निरपराध" माणसे मारून खळबळ उडवणे हे आहे (आणि त्यापायी ज्यांना स्वतःच्या जीवाचीही पर्वा नाही) त्यांच्यापुढे गांधीवादाचा काही उपयोग नाही असे मला वाटते.
मला आपल्या मराठमोळ्या संतांचे वचन जास्त पटते.
"देव्हार्‍यावर विंचू आला, देवपूजा नावडे त्याला...
तेथे पैजाराचे काम, अधमासी तो अधम ||"
आता आपले संत खरे की गांधीजी खरे, तुम्हीच सांगा...
किंवा आपल्याला जे काही योग्य वाटेल ते विचार जरुर मांडा.
आपण सुचवल्याप्रमाणे माझे विचार मी मोकळेपणाने मांडले आहेत. आपण जेष्ठ आहांत. मी काही अधिक-उणे लिहिले असेल तर क्षमा असावी.
आपला,
पिवळा डांबिस

राघव's picture

15 Dec 2008 - 11:22 am | राघव

पिडांकाका,
अगदी सहमत. खूप संतुलित प्रतिक्रीया. आमच्याच मनातले आपण मांडले असे म्हटले तर यत्किंचितही वावगे ठरणार नाही!!
गांधी ब्रिटीशांच्या विरुद्ध यशस्वी ठरले. पण त्यांचे तत्व नेहमीच यशस्वी ठरले असते असे नाही. खुद्द भारतातच सत्याग्रहाने गोवा मुक्तीचा प्रयत्न करणार्‍या सत्याग्रहींना गोळ्या खाव्या लागल्या. ब्रिटिशांना जगभर आपण लोकशाहीवादी देश आहोत ही प्रतिमा जपायची होती. पोर्तुगालच्या सालाझार हुकुमशहाला लोकशाहीशी काही देणं-घेणं नव्हतं. म्हणून त्याने सरळ बंदुका चालवल्या. अखेर भारत सरकारला (गांधींच्या शिष्यांना!) आर्मी पाठवून गोवा भारतात विलीन करावा लागला ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही.
चपखल उदाहरण!

मला आपल्या मराठमोळ्या संतांचे वचन जास्त पटते.
"देव्हार्‍यावर विंचू आला, देवपूजा नावडे त्याला...
तेथे पैजाराचे काम, अधमासी तो अधम ||"
आता आपले संत खरे की गांधीजी खरे, तुम्हीच सांगा...

हा तर कळस केलात राव!! ब्येश्टेश्ट!

कलंत्रीकाका,
गांधीचे योगदान आहेच, त्याबद्दल दुमत नाही. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंगाची चळवळ यांचे मोल कुणीच अमान्य करणार नाहीत. सर्व देश स्वातंत्र्याचा विचार करू लागण्यामागे गांधींचे योगदान खूप मोठे आहे.
पण गांधी सर्वस्वी बरोबर होतेच अन् केवळ त्यांच्याचमुळे स्वातंत्र्य मिळाले हे स्वतः गांधीसुद्धा मान्य करणार नाहीत.

वाईट वाटून घेऊ नका पण, असंबद्ध प्रतिक्रिया आली तर कसे वाटते, अगदी तस्सेच वाटते दहशतवाद अन् गांधीविचार यांचा संयुक्त विचार करतांना. बाकी पिडांकाकांनी उत्तरे दिलेली आहेतच. व्यक्तीगत रोख नव्हता/नाही हे पुन्हा एकदा सांगू इच्छितो.

मुमुक्षु

अभिजीत's picture

15 Dec 2008 - 5:38 am | अभिजीत

५५ कोटीचा मुद्दा नेमका काय आहे?
वर विवेचन आलेच आहे. पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला होता. अशा परिस्थितीत पैसे दिले तर त्याचा उपयोग ते युद्ध अधिक जोमाने लढण्यात होइल ही रास्त शक्यता होती. त्यामुळे राजकीय विरोध केला गेला, पण गांधीजी या मुद्द्यावर अधिकच आग्रही बनले होते आणि त्यांनी उपोषण केले. पुढचा इतिहास तर जग जाहिर आहे.

गांधींचे विरोधक उदा. सावरकर, भगतसिंग, जीना, सुभाषबाबु इत्यादीच्या तुलनेत गांधी कोठे कमी पडले /कोठे वरचढ ठरले.
राजकीय शक्ती मिळवण्यात गांधींचे विरोधक कमी पडले किंवा गांधी (/समर्थक) वरचढ ठरले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष नैसर्गीक राज्यकर्ता पक्ष म्हणून उदयास आला. याचे कारण स्वातंत्र्य लढ्यात जनमताचा लोंढा आणि पर्यायाने राजकीय शक्ती काँग्रेस पक्षाकडेच होती. स्वतंत्र भारताचे राज्यकर्ते म्हणून काँग्रेसचे नेते (प्रामुख्याने नेहरु) हे गांधीवादी होते. तसेच, भारत-पाकिस्तान देशात दोन्हीकडे स्विकारले जाणारे व इंग्रजांना सोयीचे गांधी हेच एक नेते होते.

गांधीविचार आजच्या काळात अप्रस्तुत आहे काय? दहशतवादावर गांधीविचाराने काही तोडगा निघु शकेल का?
अहिंसा, सत्याग्रह या मार्गाने जाणारे गांधीविचार संपुर्णपणे अप्रस्तुत नाहीत. पण दहशतवादावर यावर तोडगा निघु शकणार नाही.

- अभिजीत

विकास's picture

15 Dec 2008 - 10:09 am | विकास

गांधीचा स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान होते का?

नक्कीच होते...

गांधी नसते तरी स्वातंत्र्य मिळाले असते का?

अर्थातच. तसे म्हणत असताना गांधीजींचे योगदान कमी करत नाही आहे अथवा अनादर करत नाही आहे.

गांधींनी सत्याग्रहाचा पुरस्कार करुन देशाचा घात केला का?

नाही.

गांधींनी हरिजन, हिंदू-मुस्लिम ऐक्य, स्त्री सहभागाचा प्रयत्न केला यात काही वावगे आहे का?

या प्रश्नातून असा सूर दिसतो की असे फक्त गांधीजीच वागले आणि नकळत असे "इंप्रेशन" दिले जाते की इतर कुणालाच अशी दृष्टी नव्हती. म. फुले, शाहू महाराज, महर्षी कर्वे, सावरकर आणि अजूनही अनेकांनी या संदर्भात कामे केली आहेत. वास्तवीक गांधीजींनी हरिजन हा शब्द करून नकळत पण एका अर्थी समाजात एकी तयार करण्याऐवजी भेदच तयार केला. तसेच गांधीजी चातुर्वण्याश्रमास मानायचे ते वेगळेच. याहून ही महत्त्वाचे म्हणजे पुणे करारादरम्यान प्राणांतिक उपोषण करून एकाअर्थी आंबेडकरांवर दडपण आणत "हरीजनां"ना राजकारणात वरती येण्यात मदत करण्याऐवजी खो च घातला असे म्हणता येईल. शिवाय हिंदू-मुस्लीम ऐक्याचे बोलत असताना मुसलमानांना वेगळे मतदार संघ मान्य होते का?

गांधींचे धोरण देशाच्या विरुद्ध होते का?

गांधीजींची काही धोरणे ही देशाच्या विरोधी ठरली असावीत असे म्हणावेसे वाटते. याचा अर्थ गांधीजी देशाच्या विरोधात होते असा अर्थ होत नाही.

५५ कोटीचा मुद्दा नेमका काय आहे?

आंतर्राष्ट्रीय राजकारणात कोणी कोणाचे शत्रू नसते आणि कोणी कुणाचे मित्र नसते, असतात ते केवळ राजनैतिक संबंध ज्यात प्रत्येक डोळस नेतृत्व आपल्या राष्ट्राचे आणि लोकांचे परकीय वक्रदृष्टितून हितसंबंध सांभाळते. भारताने पाकीस्तानला पंच्चावन्न कोटी देण्याचा जो प्रश्न होता तो स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला एकमेकांचे नव्याने मिळालेले सार्वभौमत्व मानून पुढे जाण्याच्या भागातील होता. पण जेंव्हा पाकीस्तानने काही महीन्यातच काश्मिरवर हल्ले करून पहीले युद्ध सुरू केले तेंव्हा एका अर्थी भारताचे सार्वभौमत्वच अमान्य केले गेले. म्हणून आता पंचावन्न कोटी त्यांना का द्यावेत असा सरकारचा विचार होता. त्याला विरोध करताना गांधीजींनी प्राणांतिक उपोषण करून एका अर्थी परत भावनीक दडपण आणले. आता काही जणांना असे वाटू शकेल की जे मान्य केले ते देणे हेच खरे सत्य. तर तसे शिवाजीने अफझलखानाला मारणे म्हणजे फसवले आणि तत्त्वाने वागला नाही (तेच पुढे जाऊन खोटेच आजारी आहे म्हणून दिल्लीतून पळून गेला) असेपण म्हणणारे महाभाग पाहीले आहेत. ज्याचे त्याचे मुद्दे. माझ्या लेखी पच्चावन्न कोटींचा मुद्दा आता इतिहासजमा झाला आहे. त्यात अमुक केले असते अथवा तमुक केले असते असे म्हणून आत्ताच्या परीस्थितीत आता काहीच फरक पडणार नाही...

गांधींना प्रत्येक क्षेत्रात जसे अनुयायी( नेहरु, पटेल, विनोबा इत्यादी) मिळाले तसे अन्य समकालिन नेत्यांना मिळाले का?

नक्की अनुयायी कोणाला म्हणावे? जे अनुनय करतात त्यांना... पंडीत नेहरूंनी नक्की काय अनुनय केला (तसा केला असता तर अधुनिक तिर्थक्षेत्रे तयार झाली असती का?), पटेलांनी नक्की काय गांधीगिरी केली ते समजेल का? विनोबांना अनुयायी म्हणले तर योग्य आहे.

गांधी जर राजकारणात आले नसते तर एक वकिल, एक लेखक अथवा जागतिक विचारवंत होऊ शकले असते का?

कुणाला आत्या म्हणायचे कुणाला काका म्हणायचे असल्या चर्चेचा काय उपयोग? कुणासंबंधातच अशी चर्चा अयोग्य वाटते. मात्र इतिहासाकडे बघताना त्यात ज्या काही चुका झाल्या असतील त्या डोळसपणे पाहून आपण परत त्याच चुका करत वेगळ्या परीणामांची अपेक्षातर करत नाही ना इतके पहावे असे वाटते. (गांधीजींना मानणार्‍या आईनस्टाईनच्या नावे एक वाक्य सांगितले जाते, "“insanity is doing the same thing over and over again and expecting different results.”)

गांधी प्रामाणिक होते का?

प्रामाणिकपणा आणि हट्टीपणा हा एकत्र असू शकतो. बर्‍याचदा नेतृत्वाचे गूण असलेल्यांमधे हे दोन्ही गूण एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखे दिसतात. पण प्रत्येक वेळेस त्याचे परीणाम ("आउटकम्स") चांगले असूच शकतात असे नाही.

गांधींनी एकाच वेळेस वेगवेगळ्या क्षेत्रात जसे काम केले ( निसर्गोपचार, हिंदी राष्ट्रीय सभा, आश्रमाचे जीवन, साध्य-साधन विवेकाचा आग्रह, सत्याग्रह हे योग्य होते का? )

ज्या माणसात ताकद असते अशीच माणसे एकाच वेळेस विविध क्षेत्रात कामे करत असतात. गांधीजींमधे तशी ताकद नक्कीच होती.

गांधी अन्य समाजात जन्माला आले असते तर असे प्रभावी राहिले असते का? किंवा ब्रिटीश ऐवजी वेग़ळी राजवट असतीतर गांधी प्रभावी ठरले असते का?

परत जर-तर चा मुद्दा आहे. कुठल्याही बाजूने बॅटींग सहजशक्य आहे :-)

स्वातंत्र्य युध्दात जसे गांधींना मोठी खेळी खेळता आली ( १९१७ ते १९४७) तशी गांधींना स्वातंत्र्य काळानंतर मिळाली असती तर आजचे चित्र वेगळे असले असते का?

परत जर-तर चा मुद्दा आहे. फक्त एकच म्हणेन की गांधीजी जर खरेच प्रामाणिक असते (नुसतेच स्वत:च्या तत्त्वासाठी इतरांना ओलीस धरण्याचा हट्टीपणा करणारे नसते) तर त्यांनी त्यांचे विचार परत बदलले असते आणि त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे ते नंतरचे विचार असल्याने त्यांच्या लेखी जास्त ग्राह्य ठरले असते.

गांधींचे विरोधक उदा. सावरकर, भगतसिंग, जीना, सुभाषबाबु इत्यादीच्या तुलनेत गांधी कोठे कमी पडले /कोठे वरचढ ठरले.

ह्यावर प्रत्येक पुढार्‍यासाठी वेगळी चर्चा होऊ शकेल.

गांधीच्या बाबतीत शासनाचे धोरण काय आहे? ( पूर्वी आकाशवाणीवर गांधीवंदना हा कार्यक्रम येत असे तो बंद झाला.)

धोरण आहे? आणि कशाला हवे धोरण जे पाळले जाणार नसले तर? शिवाय गांधींसदर्भातच का?

गांधीविचार आजच्या काळात अप्रस्तुत आहे काय? दहशतवादावर गांधीविचाराने काही तोडगा निघु शकेल का?

कुठे वापरणार त्यावर ह्याचे उत्तर अवलंबून आहे आणि त्यातील (आज गांधीवाद सांगणार्‍यांचे) स्वचरण किती असेल यावर त्याचा प्रामाणिकपणा अवलंबून असेल. "आधी केले मग सांगितले," या उक्तीप्रमाणे "माझे गांधीवादाचे प्रयोग" ऐकायला आवडतील - व्यक्तीगत आणि सामाजीक आयुष्यातील. त्यातूनच मग आमच्या सारख्यांना प्रेरणा मिळेल - मागे येण्याची अथवा मागच्या मागे निघून दुसरा मार्ग शोधण्याची...

किंवा आपल्याला जे काही योग्य वाटेल ते विचार जरुर मांडा.

तुर्तास इतके पुरे! इतकेच म्हणतो की गांधीजींबद्द्ल मनापासून आदर आहे. पण गांधीवादाबद्दल अंधश्रद्धा नाही!

टग्या's picture

16 Dec 2008 - 5:13 am | टग्या (not verified)

भारताने पाकीस्तानला पंच्चावन्न कोटी देण्याचा जो प्रश्न होता तो स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला एकमेकांचे नव्याने मिळालेले सार्वभौमत्व मानून पुढे जाण्याच्या भागातील होता. पण जेंव्हा पाकीस्तानने काही महीन्यातच काश्मिरवर हल्ले करून पहीले युद्ध सुरू केले तेंव्हा एका अर्थी भारताचे सार्वभौमत्वच अमान्य केले गेले. म्हणून आता पंचावन्न कोटी त्यांना का द्यावेत असा सरकारचा विचार होता.

माझ्या त्रोटक माहितीप्रमाणे दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळाले तेव्हा कराराप्रमाणे प्रत्येक संस्थानास भारत अथवा पाकिस्तान यांपैकी कोणत्याही देशात विलीन होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा अधिकार होता. पाकिस्तानने जम्मू-कश्मीरवर आक्रमण केले तेव्हा तोपर्यंत कश्मीरच्या महाराजाने कोणताच निर्णय घेतलेला नव्हता. केवळ दोन्ही देशांबरोबर 'स्टँडस्टिल अग्रीमेंट' केलेले होते. भारताचे जम्मू-कश्मीरवर सार्वभौमत्व प्रस्थापित झाले ते 'इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन'वर कश्मीरच्या महाराजाने सही केली तेव्हा. ही घटना पाकिस्तानी हल्ल्याच्या बर्‍याच नंतर घडली. हल्लेखोर जेव्हा श्रीनगरपर्यंत पोहोचणार असे वेध दिसू लागले, तेव्हा दबावाखाली येऊन कश्मीरच्या महाराजाने भारतीय सैन्याच्या मदतीच्या बदल्यात विलीनीकरणाच्या करारनाम्यावर (इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशनवर) सही केली.

त्यामुळे पाकिस्तानने कश्मीरवर हल्ला केला तेव्हा जम्मू-कश्मीरवर भारताचे सार्वभौमत्व नव्हते. त्यामुळे "जेव्हा पाकिस्तानने काही महिन्यांतच कश्मीरवर हल्ले करून पहिले युद्ध सुरू केले तेव्हा एका अर्थी भारताचे सार्वभौमत्वच अमान्य केले गेले" (मूळ उद्धृताची शुद्धलेखनदुरुस्ती माझी.) या दाव्यात तथ्य नाही.

विकास's picture

16 Dec 2008 - 9:42 am | विकास

पण जेंव्हा पाकीस्तानने काही महीन्यातच काश्मिरवर हल्ले करून पहीले युद्ध सुरू केले तेंव्हा एका अर्थी भारताचे सार्वभौमत्वच अमान्य केले गेले.

भारत-पाकीस्तान १९४७ साली ब्रिटीश पार्लमेंटच्या "इंडीया इंडीपेंडन्स ऍक्ट" ने स्वतंत्र राष्ट्रे म्हणून जन्माला आली. त्या "भारतीय स्वातंत्र्य कायद्याप्रमाणे" ५५२ संस्थाने ही स्वतंत्र होती (कारण ती प्रत्यक्ष ब्रिटीश अधिपत्याखाली नव्हती) आणि त्यांनी स्वतंत्र रहायचे का कुठल्याही राष्ट्रात विलिन होयचे ह्या संबंधी त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य होते, हे आहेच. फक्त ते स्वातंत्र्य दोन्ही बाजूंनी (भारत-पाक) मान्य करणे हा पण स्वातंत्र्य कराराचा भाग होता. अर्थातच जेंव्हा पाकीस्तान ते मान्य न करता "टोळीखोर" म्हणत स्वतंचे सैन्य काश्मिर मधे घुसवून भारताच्या तत्कालीन सीमारेषेवर आणले तेंव्हा भारताला दिलेले ते आव्हान होते आणि आज काश्मिर घेतले उद्या अजून पुढे येऊ असे म्हणत "एका अर्थी" भारताचे सार्वभौमत्व अमान्य केले अथवा त्याहून योग्य शब्द म्हणजे सार्वभौमत्वाला आव्हान दिले असे म्हणले तर त्यात माझ्या दृष्टीने चुकीचे नाही. पाकीस्तानच्या आत्तापर्यंतच्या कागाळ्या आणि पाठीत वार करण्याची धोरणे पाहीली तरी देखील यात काही गैर वाटत नाही.

बाकी काश्मिरच्या महाराजाला स्वतंत्र रहायचे होते पण पाकीस्तानच्या (२२ ऑक्टोबर १९४७) आक्रमणानंतर केवळ चार दिवसात (२६ ऑक्टोबर १९४७ ला) भारत जवळचा वाटला आणि २७ ऑक्टोबरला भारतीय सैन्य श्रीनगर मधे घुसले हा इतिहास मान्यच आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Dec 2008 - 12:08 pm | परिकथेतील राजकुमार

>गांधीचा स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान होते का?
= असण्याची शक्यता नाकारता येत नाहि. शाळेत इतिहासाच्या पुस्तकात असेच काहि वाचल्याचे स्मरते.

>गांधी नसते तरी स्वातंत्र्य मिळाले असते का?
=नक्किच ! बहुदा अधीक लवकर व 'एकसंध' मिळाले असते.

>गांधींनी सत्याग्रहाचा पुरस्कार करुन देशाचा घात केला का?
=त्यांची प्रत्येक क्रुती हा देशाचा घात करणारी व स्वतःचा उदो उदो वाढवणारी होती असे आमचे वैयक्तीक मत आहे.

>गांधींनी हरिजन, हिंदू-मुस्लिम ऐक्य, स्त्री सहभागाचा प्रयत्न केला यात काही वावगे आहे का?
= तो त्यांच्या आधिपासुन सुद्धा बरेच जण करत होते. त्यात वावगे काहिच न्हवते.

>गांधींचे धोरण देशाच्या विरुद्ध होते का?
= माणुसच देशाविरुद्ध होता ! धोरणाचे काय घेउन बसलात ?

>५५ कोटीचा मुद्दा नेमका काय आहे?
= मुद्दा काय आहे माहित नाहि पण त्याचा जो 'गुद्दा' बनला तो आम्हास अतिप्रिय आहे !

>गांधींना प्रत्येक क्षेत्रात जसे अनुयायी( नेहरु, पटेल, विनोबा इत्यादी) मिळाले तसे अन्य समकालिन नेत्यांना मिळाले का?
= अनुयायी कोणास म्हणावे ? दाउदला जसे 'अनुयायी' मिळाले तसे अरुण गवळीला मिळाले का ?

>गांधी जर राजकारणात आले नसते तर एक वकिल, एक लेखक अथवा जागतिक विचारवंत होऊ शकले असते का?
= नसते. त्या क्षेत्रांमध्ये तेव्हा स्वतःचा उदो उदो करुन घेणे अवघड होते. (असा आमचा समज आहे)

>गांधी प्रामाणिक होते का?
= लहानपणी त्यांनी एकदा चोरी केल्याचे वाचनात आहे. पुढे ती सवय पुर्णपणे सुटली का चोरी पचवता यायला लागली ते आम्हास ठाउक नाहि !

>गांधींनी एकाच वेळेस वेगवेगळ्या क्षेत्रात जसे काम केले ( निसर्गोपचार, हिंदी राष्ट्रीय सभा, आश्रमाचे जीवन, साध्य-साधन विवेकाचा आग्रह, सत्याग्रह हे योग्य होते का? )
= स्टिव वॉ क्रिकेट खेळतो, कुष्टरोग्यांसाठी काम करतो, वर्तमानपत्रामध्ये लिहितो, कोचिंग करतो , हे योग्य आहे का ? तसेच ह्या क्षेत्रात त्यांनी काम केले म्हणजे नक्की काय केले ? क्रुपया अधिक माहिती द्यावी.

>गांधी अन्य समाजात जन्माला आले असते तर असे प्रभावी राहिले असते का? किंवा ब्रिटीश ऐवजी वेग़ळी राजवट असतीतर गांधी प्रभावी ठरले असते का?
= अन्य समाजत त्यांना तोंड तरी उघडुन दिले असते का ? दुसर्‍या राजवटित ते प्रभावी ठरले असते का नाही हे त्या त्या राजवटी वर अवलंबुन.

>स्वातंत्र्य युध्दात जसे गांधींना मोठी खेळी खेळता आली ( १९१७ ते १९४७) तशी गांधींना स्वातंत्र्य काळानंतर मिळाली असती तर आजचे चित्र वेगळे असले असते का?
= हो नक्कीच. मी आत्ता उर्दु मध्ये लिहित असतो व माझा सुंता झालेला असता !

>गांधींचे विरोधक उदा. सावरकर, भगतसिंग, जीना, सुभाषबाबु इत्यादीच्या तुलनेत गांधी कोठे कमी पडले /कोठे वरचढ ठरले.
= जिना व गांधी ह्यांच्या तुलनेस आमचा आक्षेप नाही. परंतु भगतसिंह , सुभाषबाबु, सावरकार ह्या दैवतुल्य लोकांना ह्या पातळी वर आणु नये.

>गांधीच्या बाबतीत शासनाचे धोरण काय आहे? ( पूर्वी आकाशवाणीवर गांधीवंदना हा कार्यक्रम येत असे तो बंद झाला.)
= आमच्या मते ह्यांचा फोटो प्रत्येक चलनावर वापरला जावा असे काहिसे आहे.

>गांधीविचार आजच्या काळात अप्रस्तुत आहे काय? दहशतवादावर गांधीविचाराने काही तोडगा निघु शकेल का?
= आमच्या मते गांधी हेच अप्रस्तुत होते तर त्यांचे विचार काय घेउन बसलात ?

वरिल उत्तरे हि अतिशय उर्मट व पुर्वग्रहदुषीत वाटल्यास आमची हरकत नाही. एका गांधीवाद्याला गांधी द्वेष्ट्याचे हे उत्तर आहे.
"कोणाच्य भावना वगैरे दुखःवायचा हेतु नाहि" वगैरे खोटि वाक्ये आम्हि लिहिणार नाहि.

अखंड हिंदुस्तानचे स्वप्न बघणारा

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

बैलोबा's picture

15 Dec 2008 - 1:13 pm | बैलोबा

=D>

विसोबा खेचर's picture

15 Dec 2008 - 1:25 pm | विसोबा खेचर

= जिना व गांधी ह्यांच्या तुलनेस आमचा आक्षेप नाही. परंतु भगतसिंह , सुभाषबाबु, सावरकार ह्या दैवतुल्य लोकांना ह्या पातळी वर आणु नये.

सहमत आहे...!

प.रा. यांनी दिलेली उत्तरे आम्हास अतिशय आवडली/पटली...

बाय द वे, मिपावर सतत गांधींचा आणि त्यांच्या विषयीच्या धाग्यांचा/लेखांचा मारा करून कलंत्रीसाहेबांनी बर्‍याचश्या मिपाकरांची एक प्रकारे मानसिक हिंसाच चालवली आहे असे आमचे वैयक्तिक मत आहे..

असो, बाकी चालू द्या..

तात्या.

विनायक प्रभू's picture

15 Dec 2008 - 4:56 pm | विनायक प्रभू

अरे एवढ्या लवकर जिवाणुचे मतपरिवर्तन. अभिनंदन तात्या.
चला प्याक मारायला मो़कळा.
आज ड्राय डे नाय ना?

मदनबाण's picture

15 Dec 2008 - 2:42 pm | मदनबाण

वाघ म्हटला तरी खातो वाघाबो म्ह्टला तरी खातो तर वाघ्याच का न म्हणावं? एक वाक्प्रचार.

वाघाला कंपल्सरी उपोषण करण्यास बसवावे व जिव हत्या हे पाप असते असे त्यास समजवावे !! एक गांधीगिरी चा प्रयत्न !!

(शाकाहारी)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

आम्हाघरीधन's picture

15 Dec 2008 - 4:44 pm | आम्हाघरीधन

महात्मा गान्धी यान्चे विचार योग्य होतेच यात शन्का नाही, परन्तु ज्या पद्धतिने त्यान्ची अमलबजावनी करायची आहे तो मार्ग चुकिच्या पद्धतिने दाखविला जात आहे.

आजच्या काळात गान्धीवाद आदर्श आहे परन्तु विविध प्रसन्गी शिवतन्त्र वापरावे हे आपण विसरलो आहोत किन्वा त्यास पात्र राहिलेलो नाही असे म्हणावे लागेल.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

कोलबेर's picture

16 Dec 2008 - 12:36 am | कोलबेर

ह्या विषयावर पूर्वी मिपावर झालेली ही चर्चा, आणि अजानुकर्ण ह्यांनी दिलेला अवचटांचा लेख दोन्हीही वाचण्यायोग्य.

रामपुरी's picture

16 Dec 2008 - 3:55 am | रामपुरी

गांधीबद्दल सरळसरळ चर्चा करण्यासाठी हा लेख सुरु करत आहे. काही मुद्दे मांडत आहे. कृपया आपले रोखठोक विचार मांडावे ही विनंती.
ठिक आहे.

गांधीचा स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान होते का?
होते. ते नसते तर स्वातंत्र्य कदाचित लवकर मिळाले असते.

गांधी नसते तरी स्वातंत्र्य मिळाले असते का?
नक्कीच. लुटण्यासारखे सगळे संपल्यावर ब्रिटिश निघून गेलेच असते.

गांधींनी सत्याग्रहाचा पुरस्कार करुन देशाचा घात केला का?
सध्याचा त्याचा गैरवापर बघता 'हो'

गांधींनी हरिजन, हिंदू-मुस्लिम ऐक्य, स्त्री सहभागाचा प्रयत्न केला यात काही वावगे आहे का?
हो. या गोष्टी प्रसिद्धी मिळवण्यासाठी केल्या होत्या असे वाटते. (तुलना करा: फुले पतिपत्निंचे या क्षेत्रातले योगदान)

गांधींचे धोरण देशाच्या विरुद्ध होते का?
बरीच धोरणे देशाच्या विरुद्ध आणि स्वहितार्थ होती. (उदा. सरदार पटेलाना डावलून नेहरुना पंतप्रधानपद देणे)

५५ कोटीचा मुद्दा नेमका काय आहे?
मुस्लिमधर्जिण्या धोरणांचा अतिरेक

गांधींना प्रत्येक क्षेत्रात जसे अनुयायी( नेहरु, पटेल, विनोबा इत्यादी) मिळाले तसे अन्य समकालिन नेत्यांना मिळाले का?
निश्चितच. कदाचित जास्तच.

गांधी जर राजकारणात आले नसते तर एक वकिल, एक लेखक अथवा जागतिक विचारवंत होऊ शकले असते का?
नाही. तो एक सामान्य कुवतीचा माणूस होता.

गांधी प्रामाणिक होते का?
कुठला राजकारणी प्रामाणिक असतो?

गांधींनी एकाच वेळेस वेगवेगळ्या क्षेत्रात जसे काम केले ( निसर्गोपचार, हिंदी राष्ट्रीय सभा, आश्रमाचे जीवन, साध्य-साधन विवेकाचा आग्रह, सत्याग्रह हे योग्य होते का? )
एक ना धड भाराभर चिंध्या

गांधी अन्य समाजात जन्माला आले असते तर असे प्रभावी राहिले असते का? किंवा ब्रिटीश ऐवजी वेग़ळी राजवट असतीतर गांधी प्रभावी ठरले असते का?
सांगता येत नाही.
स्वातंत्र्य युध्दात जसे गांधींना मोठी खेळी खेळता आली ( १९१७ ते १९४७) तशी गांधींना स्वातंत्र्य काळानंतर मिळाली असती तर आजचे चित्र वेगळे असले असते का?
हो. वाईट अर्थाने.

गांधींचे विरोधक उदा. सावरकर, भगतसिंग, जीना, सुभाषबाबु इत्यादीच्या तुलनेत गांधी कोठे कमी पडले /कोठे वरचढ ठरले.
राजकारणात वरचढ ठरले आणि देशभावनेत (देशभक्तित) कमी पडले.

गांधीच्या बाबतीत शासनाचे धोरण काय आहे? ( पूर्वी आकाशवाणीवर गांधीवंदना हा कार्यक्रम येत असे तो बंद झाला.)
माहीत नाही.

गांधीविचार आजच्या काळात अप्रस्तुत आहे काय? दहशतवादावर गांधीविचाराने काही तोडगा निघु शकेल का?
शक्य नाही.

किंवा आपल्याला जे काही योग्य वाटेल ते विचार जरुर मांडा.
स्पष्ट मतः- गांधी हे फक्त राजकारणी होते. त्याना देशभक्त मी तरी मानत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच, सत्याग्रहाचा सुद्धा. कृष्णानेसुद्धा हेच सांगितले आहे. तेव्हा 'खटासि खट धटासि धट' हेच आपलं आवडतं धोरण.

आजानुकर्ण's picture

16 Dec 2008 - 7:17 am | आजानुकर्ण

जालावर भटकताना ही जाहिरात सापडली... आणि वाईट वाटले. बाहेरच्या लोकांना - त्यातही इटालियन म्हणजे फारच बेक्कार - गांधींविषयी काय म्हणावे वाटते आणि आपल्याला काय वाटते.

येथे चित्रफीत येथे पाहा..

कृपया युट्यूबची चित्रफीत येथे परस्पर चिकटवू नये असे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे आय ई वापरणार्‍यांना अडचण येते. चित्रफितीचा येथे केवळ दुवा द्यावा.

आपला,
(इटालियन) सोनिया आजानुकर्ण

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार. उद्धवा अजब तुझे सरकार.

बगाराम's picture

16 Dec 2008 - 7:46 am | बगाराम

छान क्लिप! जगभरातुन लोकांच्या भावना गांधीजींविषयी अश्याच दिसतील. मात्र वरच्याच प्रतिसादातील आपल्या देशवासियांचे मत बघा.
"तो एक सामान्य कुवतीचा माणूस होता."

(कुवत ओळखुन असलेला) बगाराम

कलंत्रीसाहेबांनी सतत गांधीवादी धागे सुरू करून मिपावर जो गोंधळ चालविला आहे त्याकडे आपण सर्वांनी दुर्लक्ष करून त्याला काहीही प्रतिसाद न देणे हा एक उत्तम मार्ग आहे असे मला वाटते. त्यांना त्यांची कंडू शमवून घेता येईल आणि आपल्यालाही लिहिण्याचा त्रास नाही. :))

कलंत्री's picture

19 Dec 2008 - 7:38 pm | कलंत्री

आपलीही परवानगी असली तर लिहितो बुवा...

माझ्यामनात अनेक विषयावर लिहायचे आहे.

मिपावरचे तरुण लोक आहेत त्यांना आमच्या वयाचा अनुभवाचा उपयोग व्हावा अशीच आमची ईच्छा आणि प्रयत्न असतात.

पिवळा डांबिस's picture

18 Dec 2008 - 10:19 am | पिवळा डांबिस

मागे तुम्ही मुंबई हल्ल्याच्या वेळेस गांधीवादावर लेख लिहिलेत आणि आपल्या पोरांनी जळजळीत आणि त्या वेळेला अनुसरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या म्हणुन तुम्ही वैतागलांत...
पोरंच ती, तरूण वयात रक्त उसळतं असायलाच हवं.....
चला ठीक आहे....
पण आता तुम्हीच लोकांना मनमोकळे विचार मांडा म्हणून उद्युक्त केलंत.....
आणि त्यांनी विचार मांडल्यावर चर्चा करायचं सोडून तुम्ही हो कुठं गायब झालांत?
आता आम्ही मांडलेल्या मतांवर येऊद्या की तुमचा मुद्देसूद प्रतिवाद!
नाहीतर चर्चा कशी पुढे सरकणार?

चर्चा करण्यास उत्सुक,
पिवळा डांबिस

टारझन's picture

18 Dec 2008 - 10:26 am | टारझन

मागे तुम्ही मुंबई हल्ल्याच्या वेळेस गांधीवादावर लेख लिहिलेत आणि आपल्या पोरांनी जळजळीत आणि त्या वेळेला अनुसरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या म्हणुन तुम्ही वैतागलांत...
पोरंच ती, तरूण वयात रक्त उसळतं असायलाच हवं.....
चला ठीक आहे....
पण आता तुम्हीच लोकांना मनमोकळे विचार मांडा म्हणून उद्युक्त केलंत.....
आणि त्यांनी विचार मांडल्यावर चर्चा करायचं सोडून तुम्ही हो कुठं गायब झालांत?
आता आम्ही मांडलेल्या मतांवर येऊद्या की तुमचा मुद्देसूद प्रतिवाद!
नाहीतर चर्चा कशी पुढे सरकणार?

वा ! :)

पिवळा टारझन
(अफ्रिकन ब्रांच)
आमची हेड ऑफिस हामेरिकेत हाय

कलंत्री's picture

18 Dec 2008 - 8:49 pm | कलंत्री

माझीही इच्छा अशीच होती की उलट सुलट प्रतिक्रिया याव्यात आणि माझ्या परिने मी उत्तरे द्यावीत.

दुर्दैवाने तात्याचा प्रतिसाद वाचला तर लक्षात येईल, " कलंत्री यांनी मिपाकरांची मानसिक हिंसा केली आहे, करत आहे" इत्यादी इत्यादी.

तात्या या संकेतस्थळाचे चालक / मालक आहे आणि त्यांचा अधिक्षेप मला तत्वतः मान्य नाही. म्हणून मी चुप राहणे हे मान्य केले आहे.

शेवटी आपण येथे विरंगुळा म्हणून येतो. मी माझे विचार / त्याची यथार्थता मिपा एक प्रयोग शाळा म्हणून पाहतो.

येथे कोणलाही त्रास व्हावा अशी माझी स्वप्नात सुद्धा कल्पना येणार नाही.

असो. आपल्या अगत्याबद्दल मी ऋणी आहे.

भास्कर केन्डे's picture

18 Dec 2008 - 11:32 pm | भास्कर केन्डे

आदरणीय द्वारकानाथजी,

तात्या या संकेतस्थळाचे चालक / मालक आहे आणि त्यांचा अधिक्षेप मला तत्वतः मान्य नाही. म्हणून मी चुप राहणे हे मान्य केले आहे.
हा रडीचा डाव झाला असे मनोमन वाटते आहे. बाकी तुमच्या हातात. आम्ही तुम्ही कराल ती गांधीगिरी समजतो.

आपला,
(तटस्थ) भास्कर
आम्ही येथे वसतो.

कोलबेर's picture

18 Dec 2008 - 11:33 pm | कोलबेर

हा रडीचा डाव झाला असे मनोमन वाटते आहे.

हे कलंत्रींना का सांगताय?

भास्कर केन्डे's picture

19 Dec 2008 - 12:59 am | भास्कर केन्डे

कोमबेरशेट,

याचे कारण खुद्द द्वारकानाथजींना चांगलेच माहित आहे. तुमच्या माहितीस्तव सांगतो...
--मनोगत बाळसे धरू लागले होते त्या काळात द्वारकानाथजी गांधीवाद/अहिंसा या विषयांचा असाच भडिमार करत. अर्थातच त्यांची री ओढत तेथील दिग्गज संघावर येऊन ठेपत व मनसोक्त वाट्टेल ते खोटेनाठे सुद्धा ठोकत. त्यांना मी दिलेली उत्तरे तिथल्या मालकाच्या विचारसारणीत बसणारी नव्हती म्हणून आमची मुस्कटदाबी करण्यात आली. त्याचा निषेध म्हणून आम्ही त्या संकेतस्थळाला कायमचा रामराम ठोकला. आता सुद्धा पुन्हा त्यांनी येथे तसाच भडीमार सुरु केला आहे. याउलट त्यांना वेळोवेळी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे टाळून ते पुन्हा तेच तेच उगाळत बसत आहेत. शिवाय या वांझोट्या चर्चांचा काहीच निष्कर्ष निघत नाहीये. तेव्हा तात्यांनी या विषयाला आवर घेण्याचा सल्ला दिला असल्यास आश्चर्य नको. यासोबतच हे लक्षात घ्या की मनोगतकारांप्रमाणे प्रस्तुत लेखकाची मुस्कटदाबी न करता "चालू द्या" असा मोठ्या मनाचा पवित्रा तात्यांनी घेतला आहे.

या संकेतस्थळाचे मालक म्हणून हे संकेतस्थळावर केवळ एकाच विषयाचे धृवीकरण न होता अनेकानेक विषायांवर लेखन व्हावे असा त्यांचा हेतू असेल तर तो बरोबरच आहे. शेवटी हे काही काँग्रेसी सरकारने लिहायला घेतलेले पाठ्यपुस्तक नव्हे ज्यात भारताचा इतिहास म्हणजे केवळ गांधी-नेहरू हे समिकरण बद्ध व्हावे.

कलंत्री साहेबांना खरेच मनोमन तात्यांच्या भावनांचा आदर करायचा असेल तर त्यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांना बगल न देता थोडक्यात व सुस्पष्ट उत्तरे द्यावीत व पुन्हा-पुन्हा त्याच त्याच विषयाचा अतिरेक करायचे टाळावे असे मला वाटते. त्यांचा इतर विषयांचा सुद्धा चांगला अभ्यास आहे. त्यावर लेखन केल्यास आपणा सर्वांनाच आनंद होईल असे वाटते.

आपला,
(स्पष्टोक्ता) भास्कर
आम्ही येथे वसतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Dec 2008 - 7:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रस्तुत लेखकाची मुस्कटदाबी न करता "चालू द्या" असा मोठ्या मनाचा पवित्रा तात्यांनी घेतला आहे.

सहमत आहे !

दुर्दैवाने तात्याचा प्रतिसाद वाचला तर लक्षात येईल, " कलंत्री यांनी मिपाकरांची मानसिक हिंसा केली आहे, करत आहे" इत्यादी इत्यादी.

असे म्हटले असले तरी त्यांनी आपण म. गांधी विषयावर लिहूच नका असे कुठे म्हटले आहे.

तात्या या संकेतस्थळाचे चालक / मालक आहे आणि त्यांचा अधिक्षेप मला तत्वतः मान्य नाही. म्हणून मी चुप राहणे हे मान्य केले आहे.

तात्या हे या संस्थळाचे मालक असले तरी त्यांनी कोणालाही असेच लिहा \ असेच लिहु नका असे कुठेही सांगितल्याचे आठवत नाही.
त्यामुळे आपला चुप राहण्याचा विचार काही पटला नाही.

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

19 Dec 2008 - 12:42 am | विसोबा खेचर

दुर्दैवाने तात्याचा प्रतिसाद वाचला तर लक्षात येईल, " कलंत्री यांनी मिपाकरांची मानसिक हिंसा केली आहे, करत आहे" इत्यादी इत्यादी.

अहो पण ते माझे व्यक्तिगत मत आहे. तसे ते असू नये काय? आपल्याला ते न पटल्यास आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकता. यात मालकीचा प्रश्न आलाच कुठे?

तात्या या संकेतस्थळाचे चालक / मालक आहे आणि त्यांचा अधिक्षेप मला तत्वतः मान्य नाही.

अहो पण मी एक सभासदही आहे आणि माझे मत मी केवळ एका सभासदाच्या भूमिकेतून व्यक्त केले आहे. आपल्याला मिपावर आपले विचार मांडायला मी मनाई केलेली नाही, ना कधी मी अथवा संपादन मंडळाने आपले लेखन अप्रकाशित करून अथवा संपादित करून मुस्कटदाबी केली आहे!

असे असतांना आपण चालक/मालकाचा मुद्दा इथे का आणताय हे कळले नाही.. इन फॅक्ट, तो मुद्दा इथे आणणे पूर्णत: गैर आहे. कारण आपल्याला दिलेला एकही प्रतिसाद मी चालक/मालकाच्या भूमिकेतून लिहिलेला नाही!

असो,

आपल्याला कुणाला काय उत्तर द्यायचे ते द्या, काय चर्चा/खुलासे करायचे आहेत ते अवश्य करा अथवा करू नका, परंतु कृपया माझ्या मालकत्वाचा मुद्दा इथे उपस्थित करू नका...

तात्या.

भास्कर केन्डे's picture

19 Dec 2008 - 12:56 am | भास्कर केन्डे

आपल्याला मिपावर आपले विचार मांडायला मी मनाई केलेली नाही, ना कधी मी अथवा संपादन मंडळाने आपले लेखन अप्रकाशित करून अथवा संपादित करून मुस्कटदाबी केली आहे!
--हेच तर म्हणतो. असे उघड उघड दिसत असूनही "येडा बनके पेडा खाओ" अशी ही चाल आहे दुसरे काय?

आपल्याला कुणाला काय उत्तर द्यायचे ते द्या, काय चर्चा/खुलासे करायचे आहेत ते अवश्य करा अथवा करू नका
-- हाच तर कळीचा मुद्दा आहे. अशा प्रकारे त्यांना विचारलेल्या प्रश्नांना सरळ सरळ उत्तरे न देता बगल देण्यात कलंत्री साहेब पुन्हा एकदा चतुरपणा दाखवत आहेत.

विसोबा खेचर's picture

19 Dec 2008 - 1:05 am | विसोबा खेचर

अशा प्रकारे त्यांना विचारलेल्या प्रश्नांना सरळ सरळ उत्तरे न देता बगल देण्यात कलंत्री साहेब पुन्हा एकदा चतुरपणा दाखवत आहेत.

ही गांधीबाबांचीच शिकवण! स्वत:ला अडचणीत आणणारे प्रश्न आले की "चला, माझी आता प्रार्थनेची वेळ झाली!" असे म्हणायचे! :)

असो..

चला, माझीही आता झोपायची वेळ झाली! उद्या सकाळी लौकर उठून शेळीचे दूध काढायचे आहे व पोट साफ होण्याकरता ते निरसेच प्यायचे आहे! तिच्या पायाची जखम आता बरी आहे! :)

आपला,
तात्यामोहन गोडसे! :)

भास्कर केन्डे's picture

19 Dec 2008 - 1:21 am | भास्कर केन्डे

तात्यामोहन गोडसे!
काय हे तात्या? तुम्हाला शेळीच्या निरस्या दुधाची अंमळ आवश्यकता आहे असे दिसते ;) गोडश्यांच्या घरी मोहन कधी जन्माला आले?? :)

बाकी तुमच्या शेळीचे हाबिणंदन!

आपला,
(ना-मोहन, ना-गोडसे)

धम्मकलाडू's picture

21 Dec 2008 - 11:20 pm | धम्मकलाडू

भास्करराव, गांधींपुढे नतमस्तक झालेले आहेत असे दिसते. हा तर गांधीजीं बद्दल त्यांच्या मनात असलेला अथांग आदर आहे.

(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कलंत्री's picture

19 Dec 2008 - 7:31 pm | कलंत्री

तात्या,

माझा थोडा गैरसमज झाला. आपल्या दोन्ही भूमिकेत ( सभासद / मालक) मी नकळतच गोंधळ केला आणि माझ्या मनाची सोयीस्कर समजूत करुन घेतली. याबद्दल थोडा पूर्वग्रह बाजूला ठेऊन आपणास खरडवही अथवा व्यनिचा वापर करायला हवा होता. आपला भ्रमणसंचही आहेच पण असो ही बाब माझ्याकडून राहुन गेलीच.

असो. आपल्या मोठेपणाचा आणि औदार्याचा मी मान ठेवतो आणि ठेवेन.

गांधीवरच्या आक्षेपांना / वेगळ्या विचारांना मी नक्कीच यथायोग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन.

भास्करराव,

लोकांच्या जखमा भरतात आणि व्रण बाकी राहतात. आपल्या मनोगतवरच्या जखमाही अजूनही ओल्याच आहेत. आपला माझ्यावर विश्वास असेले तर मी निक्षुन सांगतो, की मनोगतच्या त्या संघांच्या बंदीवर आपण आणि प्रवासी यावर अन्याय झाला आणि नकळतच आपण एका चांगल्या संवादाला मूकलो हे आजही मला वाटते.

भास्करराव, मी कितीही प्रामाणिकपणे उत्तरे दिली तर तुमचे समाधान होणार आहे काय?

असो, आपल्याही प्रश्नांना उत्तरे देण्यात मला समाधानच मिळेल.

स्नेहाच्या अपेक्षेत,

(नगण्य) द्वारकानाथ

परिकथेतील राजकुमार's picture

19 Dec 2008 - 7:53 pm | परिकथेतील राजकुमार

माझा थोडा गैरसमज झाला. आपल्या दोन्ही भूमिकेत ( सभासद / मालक) मी नकळतच गोंधळ केला आणि माझ्या मनाची सोयीस्कर समजूत करुन घेतली. याबद्दल थोडा पूर्वग्रह बाजूला ठेऊन आपणास खरडवही अथवा व्यनिचा वापर करायला हवा होता. आपला भ्रमणसंचही आहेच पण असो ही बाब माझ्याकडून राहुन गेलीच.

मी कायम कलंत्री साहेबांच्या गांधीवादाला विरोधच करत आलोय पण त्यांनी ज्या पटकन आणी त्वरेने सगळ्यांसमोर आपली चुक झाली हे मान्य केले तसे आम्ही कधि उभ्या आयुष्यात पटकन करु शकु की नाही, हि मला सुद्धा खात्री नाहि :)

कलंत्री काका ह्या तुमच्या कृतीबद्दल तुम्हास मानाचा मुजरा !

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

विसोबा खेचर's picture

20 Dec 2008 - 1:23 am | विसोबा खेचर

माझा थोडा गैरसमज झाला. आपल्या दोन्ही भूमिकेत ( सभासद / मालक) मी नकळतच गोंधळ केला आणि माझ्या मनाची सोयीस्कर समजूत करुन घेतली. याबद्दल थोडा पूर्वग्रह बाजूला ठेऊन आपणास खरडवही अथवा व्यनिचा वापर करायला हवा होता. आपला भ्रमणसंचही आहेच पण असो ही बाब माझ्याकडून राहुन गेलीच.

आपण खुलासा केलात, बस बात खतम!

गांधीवरच्या आक्षेपांना / वेगळ्या विचारांना मी नक्कीच यथायोग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन.

लगे रहो... आमची कधीच ना नाही!

तात्या.

लिखाळ's picture

19 Dec 2008 - 7:46 pm | लिखाळ

या योगे गांधींबद्दल फारशी माहिती अजून मिळाली नसली तरी मनोगत-गांधी-मुस्कटदाबी यांवर थोडी माहिती समजली हे ही नसे थोडके.
-- (इतिहासाचा विद्यार्थी) लिखाळ.

कलंत्री's picture

19 Dec 2008 - 8:01 pm | कलंत्री

मनोगतवाल्यांनी संघाची मुस्कटबाजी केली होती. उलट गांधीविचाराच्या प्रचारासाठी त्यांनी सर्वांनाच मदत केली होती. संघावरची स्वातंत्र्तानंतरची चौथी बंदी असेल.

लिखाळ's picture

19 Dec 2008 - 8:03 pm | लिखाळ

होय होय.. ते समजले.. मला मनोगत- गांधी- संघ- मुस्कटदाबी-वगैरे .. असे म्हणायचे होते.
-- लिखाळ.

कोलबेर's picture

19 Dec 2008 - 8:23 pm | कोलबेर

मनोगतवाल्यांनी संघाची मुस्कटबाजी केली होती. उलट गांधीविचाराच्या प्रचारासाठी त्यांनी सर्वांनाच मदत केली होती. संघावरची स्वातंत्र्तानंतरची चौथी बंदी असेल.

मनोगतावर ओव्हरऑलच मुस्क्टदाबी केली जायची. अर्थात हे सगळ्याच संकेतस्थळांवर चालते पण मनोगतावर जरा विशेषच होते. संघाशी निगडीत लेखांचा मारा कमी व्हावा आणि मनोगत हे संघाचे मुखपत्र वाटू नये म्हणून त्यांनी नंतर काहिशी ही भूमिका घेतल्याचे आठवते आहे. (अर्थात हे योग्य की अयोग्य ठरवणारा मी नाही, संकेतस्थळ मालक ह्या नात्याने ते ठरवण्याचा हक्क फक्त मालकांना असतो कारण लोकशाही हा प्रकार मराठी संकेतस्थळावर शक्य नाही)

पण मनोगतावर संघाविषयी जितके गोडवे गायले गेले ते अजुन तरी मिपावर बघीतलेले नाहीत. मनोगतावर फक्त संघा विषयि माहिती देणारे प्रचारकी थाटाचे लेख टाकण्या विषयी बंदी घातली होती की जसेकी 'संघ नावाचा वटवृक्ष' हा केंडेंचा लेख ज्यावरुन सगळा गदारोळ झाला होता.

संघ हा विषय चर्चा करण्यास बंदी अजीबात नव्हती. उलट गांधीं विषयी कसलीही चर्चा करण्यास देखिल मनाई होती. तसेच सर्वसाक्षींचे लेख अजुनही मनोगतावर येतात आणि त्यांनी क्रांतीकारकांवर मनोगतावर जेवढे लिखाण केले आहे तेवढे कु़णीच आतापर्यंत कुठल्याही मराठी साईटवर केल्याचे पाहण्यात नाही. तेव्हा मनोगत हे गांधीवादाकडे झुकणारे होते/आहे हे विश्लेषण मला तरी मान्य नाही.

ह्या चर्चेमध्ये मनोगताचा विषय का यावा हे समजले नाही!

आजानुकर्ण's picture

19 Dec 2008 - 8:52 pm | आजानुकर्ण

गांधी-फाळणी, तत्कालीन मुसलमान-हिंदू दंगली आणि ५५ कोटी यावर जितके म्हणून चघळायचे आहे तो सगळा रवंथ करुन झाला आहे. उगीच स्वतःबरोबरच दुसऱ्यांच्या आणि मनोगताच्या डेटाबेसच्याही तोंडाला फेस येऊ नये म्हणून हे नियंत्रण घातले असावे. तशा चर्चांबाबतची पाटीही काही दिवस लावली होती.

त्यात काहीही वावगे नव्हते. मनोगत आणि मिसळपाव दोन्ही संकेतस्थळांचा तोंडवळा सांघिकच आहे. (येथे संचालकांचा संबंध नसून सभासदांबाबतचे निरीक्षण आहे.) त्यामानाने उपक्रम हे थोडे तटस्थ वाटते. याचे कारण बहुतेक सदस्य हे बुद्धिवादावर भर देणारे आहेत. भावनातिरेकाने होणाऱ्या चर्चांची तेथे खिल्ली उडवली जाते.

किंबहुना तशी चर्चा मागे मनोगतावर झालीही होती. (त्यानेळी मिसळपाव नव्हते. आणि असा तोंडवळा असण्यात मला काहीही वावगे वाटत नाही नाही. प्रत्येकाला आपली बरीवाईट कशीही राजकीय मते असावीत. मात्र मनोगतकारांनी संघ किंवा गांधी दोघांची टवाळी होणार नाही हे जपले होते. ) मिसळपावनेही ह्याबाबत काळजी घेतली पाहिजे. सुनीलरावांनी म्हटल्याप्रमाणे पंचा फेडला की हाफप्यांट फेडली जाणारच.

आपला,
(मराठी संकेतस्थळांचा इतिहास या आगामी प्रबंधाचा लेखक) वि.का. आजानुकर्ण

लिखाळ's picture

19 Dec 2008 - 9:19 pm | लिखाळ

त्यात काहीही वावगे नव्हते. मनोगत आणि मिसळपाव दोन्ही संकेतस्थळांचा तोंडवळा सांघिकच आहे. (येथे संचालकांचा संबंध नसून सभासदांबाबतचे निरीक्षण आहे.) त्यामानाने उपक्रम हे थोडे तटस्थ वाटते. याचे कारण बहुतेक सदस्य हे बुद्धिवादावर भर देणारे आहेत. भावनातिरेकाने होणाऱ्या चर्चांची तेथे खिल्ली उडवली जाते.

संघविचाराचे बुद्धीवादावर भर असलेले आणि गांधीविचाराचे बुद्धीवादावर भर असलेले लोक असतात असे तुम्हाला वाटते का?

सुनीलरावांनी म्हटल्याप्रमाणे पंचा फेडला की हाफप्यांट फेडली जाणारच.

मी चार प्रतिसादपूर्वी जो प्रश्न विचारला होता तोच पुन्हा पडला. गांधींना विरोध केला की संघाला विरोध हा तर्क कळला नाही. या संकेतस्थळांवर वावरणार्‍या लोकांच्या मतांमुळे ही सांगड आहे की खरेच संघाच्या विचारांचा आणि गांधींच्या विचारांचा आभ्यास केल्यामुळे ही सांगड घातली गेली आहे?

-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

टग्या's picture

19 Dec 2008 - 9:06 pm | टग्या (not verified)

कारण लोकशाही हा प्रकार मराठी संकेतस्थळावर शक्य नाही

प्रतिसादाच्या बाकीच्या भागाशी बर्‍यापैकी सहमत, पण हे एक वाक्य कळले नाही. ("कळले नाही". "असहमत आहे" असे नव्हे. "सहमत आहे" असेही नव्हे.)

(स्पष्टीकरण: हा उपप्रतिसाद कोलबेर यांच्या प्रतिसादाला आहे, आजानुकर्ण यांच्या प्रतिसादाला नव्हे. चुकून इथे पडला. योग्य ठिकाणी हलवण्याचा कंटाळा करत आहे.)

विसोबा खेचर's picture

20 Dec 2008 - 1:11 am | विसोबा खेचर

मनोगतावर ओव्हरऑलच मुस्क्टदाबी केली जायची.

सहमत आहे!

असो...!

तात्या.

धम्मकलाडू's picture

21 Dec 2008 - 11:25 pm | धम्मकलाडू

या योगे गांधींबद्दल फारशी माहिती अजून मिळाली नसली तरी मनोगत-गांधी-मुस्कटदाबी यांवर थोडी माहिती समजली हे ही नसे थोडके.

हो ना. पण सत्यासत्यतेचा शहानिशा कसा करायचा?
(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आजानुकर्ण's picture

21 Dec 2008 - 11:29 pm | आजानुकर्ण

हा शब्द स्त्रीलिंगी आहे. (निशा मुळे का?) त्यामुळे शाहनिशा/शहानिशा करायची असे हवे.

आपला
(वैयाकरणी) आजानुकर्ण पाणिनी

भास्कर केन्डे's picture

20 Dec 2008 - 6:20 am | भास्कर केन्डे

आदरणीय द्वारकानाथजी,

गांधीचा स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान होते का? गांधी नसते तरी स्वातंत्र्य मिळाले असते का?
भारताला हजारो वर्षांचा संतपरंपरांचा इतिहास आहे. संतांनी त्यांना ज्या ज्या पद्धतीने जमले त्या त्या प्रकारे जनजागरणाचे कार्य सतत पार पाडलेले आहे. गांधीजींनी हा मार्ग चांगलाच वापरला असे वाटते. रामायणावरील त्यांची व्याख्याने बरीच प्रसिद्ध होती व त्यांना अनेक मोठ्या संतांपैकी एक म्हणून चांगलेच ओळखले जायचे.

गांधी उदयाच्या अगोदर स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभागी असणार्‍या भारतीयांचे प्रमाण खूपच कमी होते. गांधींनी अगदी सामान्य जनतेला सुद्धा स्वातंत्र्य चळवळीत आणले व लोकांना त्यामुळे राजकीय जागरुकता आली. स्वातंत्र्यानंतर लोकशाही यशस्वी करण्यासाठी लोकांचा सहभाग फार आवश्यक होता. स्वातंत्र्य चळवळीत झालेल्या समाज जागृतीमुळे नैसर्गिकपणे जनता लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाली. हे गांधींच्या लोकाधाराचे यश आहे असे मला वाटते.
जर गांधीजी स्वातंत्र्य लढ्यात नसले असते तर हे शक्य झाले असते का? याचा तर्क बांधण्यासाठी आपल्याला गांधीपूर्व इतिहासाकडे बघावे लागेल. १८५७ पासून ते टिळक युगापर्यंत विषेशतः टिळकांच्या काळात स्वातंत्र्य चळवळीचा जनाधार प्रचंड वाढत आला होता. जर गांधी नसले असते तर बोस, जीना आदी विभूतींकडे काँग्रेसची सुत्रे गेली असती. बोसांसारख्या नेत्याने काँग्रेसविना सुद्धा प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वतःचे स्थान बनवले होते. त्यांच्या सारख्या नेत्याने काँग्रेसमध्ये राहून निश्चितच जनाधाराचा आलेख वाढता ठेवला असता असे ठामपणे मांडता येते. म्हणजेच गांधी नसले असते तरी पुढे लोकशाहीच्या मजबुतीकरणाला योग्य तो जनाधार मिळाला असताच. अर्थात त्यामुळे गांधींचे कार्याला दुजे समजायची गरज नाही.

गांधींनी हरिजन, हिंदू-मुस्लिम ऐक्य, स्त्री सहभागाचा प्रयत्न केला यात काही वावगे आहे का?
"हरिजन" या नव्या शब्दाची उत्पत्ती करुन चातुर्वर्ण्याला पाठिंबा देणे व मुस्लिमांच्या लांगुलचानाची (खिलाफत चळवळ) अनावश्यक सवय काँग्रेसला लावणे हे भाग सोडले तर काही वावगे वाटत नाही. हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या नावे हिंदूंना मारा खायला लावणे व फाळणीच्या वेळी पाकिस्तानात मुस्लिमांनी हिंदूंच्या कत्तली चालावलेल्या असताना सुद्धा त्यांना वाचवायचे सोडून तिथेच मरायला थांबायचा सल्ला देणे अशा बाबी सुद्धा खटकतात. यावर आपले मत जाणून घ्यायला आवडेल.

गांधींचे धोरण देशाच्या विरुद्ध होते का?
नक्कीच नव्हते. त्यांच्या देशप्रेमाबद्दल शंका घेणे करंटे पणाचे ठरेल. पण राजकीय मुत्सद्देगिरित ते फार कमी पडले असे वाटते.

५५ कोटीचा मुद्दा नेमका काय आहे?
जनतेने निवडून दिलेल्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध स्वतःच्या हेकटपणाचे दर्शन देऊन जनतेपेक्षासुद्धा आपण श्रेष्ठ व शहाणे आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न वाटतो व जनमताचा अवमान देखील.

गांधींना प्रत्येक क्षेत्रात जसे अनुयायी( नेहरु, पटेल, विनोबा इत्यादी) मिळाले तसे अन्य समकालिन नेत्यांना मिळाले का?
गांधीजींना अनुयायी मिळाले असतीलही. पण त्यांनी निवडणुकीद्वारे उभारी घेत असलेल्या नैसर्गिक नेतृत्वाला (बोस) दाबून स्वतःचे प्यादे (नेहरु) पुढे दामटले. अर्थात या प्याद्यांनी गांधीजींचा अनुनय करत सक्षम नेत्यांची फळी निर्माण केली/होऊ दिली नाही.उलट स्वतःच्या कुटुंबाला एक प्रकारे राजेशाही प्रदान केली. त्यामुळे पुढील पिढ्यांत काँग्रेस नेतृत्वहीन बनली.

गांधी प्रामाणिक होते का?
एक महान गांधीवादीच हा प्रश्न उपस्थित करतो आहे तेव्हा शंकेला वाव मिळू शकतो बॉ. ;) ह.घ्या.

गांधींचे विरोधक उदा. सावरकर, भगतसिंग, जीना, सुभाषबाबु इत्यादीच्या तुलनेत गांधी कोठे कमी पडले /कोठे वरचढ ठरले.
प्रत्यक्ष मैदानात उतरण्या अगोदर भरपूर तयारी व आखणी करणारे गांधी हे त्या काळातले एकमेव नेते होते असे म्हणता येईल. भारतात येण्या अगोदरच त्यांनी पत्रके, वृत्तपत्रे आदी प्रसार माध्यांचा अत्यंत प्रभावी वापर करून भरपूर हवा निर्माण केली. त्यामुळे त्यांचे काँग्रेसी वर्तुळातले आगमन हे त्या काळी त्यांच्यापेक्षा कर्तुत्वाने कित्येक मैल पुढे असणार्‍या नेत्यांच्या अस्तित्वाला हदरा देणारे ठरले. बरेच काँग्रेस नेते यामुळे दुखावले गेले तसेच काही दुरावलेही गेले. टिळकांचा खटला लढणार्‍या जीनांप्रमाणे काही जनांनी सवता सुभा उभा केला तर गांधीजींनी पद्धतशीर पणे काटा काढलेल्या सुभाषचंद्रांनी स्वतःसाठी वेगळा मार्ग निर्माण केला. प्रत्येक कृतीला प्रसिद्धी देण्याचे गांधींचे तंत्र त्या काळच्या एकाही नेत्याला वापरता आले नाही. ज्यांच्यात ते करण्याची कुवत होती व ते वापरायचा प्रयत्न केला त्यांना इंग्रजांनी पद्धतशीरपणे संपवले (उदा. सावरकर) व गांधींना स्वतःच्या फायद्यासाठी महत्व देत मोठे केले. एकंदरीत गांधींना जाब विचारू शकेल असा नेता काँग्रेसमध्ये वा काँग्रेसबाहेर कार्यरत राहू शकला नाही. पर्यायाने गांधीजी हे स्वातंत्र्य चळवळीवर राक्षसी पकड निर्माण करु शकले व पुढे तिला पाहिजे तसे वाकवू शकले.

तुर्तास एवढेच. आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत...

आपला,
(निष्पक्ष) भास्कर
आम्ही येथे वसतो.

कलंत्री's picture

20 Dec 2008 - 9:11 am | कलंत्री

भास्करराव,

आपला प्रतिसाद खुपच आवडला. एकंदरीतच आपण गांधींच्या कारकिर्दीचा, यशापशाचा, दोष आणि सद्गुणाचा चांगला आढावा घेतला आहे. यावर काही उत्तरे देणे हे सर्वावरच अन्यासकारक ठरेल. काही प्रश्नांची ( ५५ कोटी) उत्तरे अगोदरच देण्यात आली आहे त्यात मी वेगळी अशी भर ती काय टाकणार?

सुभाषबाबू हे भारताच्या राजकारणासाठी एक सशक्त पर्याय ठरले असते यात काही शंका नाही. गांधींकडुन याबाबतीत थोडा अन्याय झाला असावा असे माझेही मत आहे. अर्थातच त्याकाळच्या संघटना आणि शिस्त याचा विचार करता हे क्षम्यही रहावे.

आपल्या किंवा कोणाच्याच प्रश्नांना अगदीच समाधानकारक उत्तरे देणे कोणालाही हे अशक्यच असते. कृपया आपले समाधान झाले नसल्यास समजुन घ्यावे.

आपला,

द्वारकानाथ कलंत्री