Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सर्वसाक्षी on Sun, 12/14/2008 - 01:07
  • Log in or register to post comments
  • 28668 views

प्रतिक्रिया

Submitted by ऋषिकेश on Sun, 12/14/2008 - 21:40

In reply to आपली कीव येते by सर्वसाक्षी

Permalink

हुतात्मे

आता जरा आपण प्राणांतिक उपोषणाने हौतात्म्य पावलेल्या तीन गांधीवाद्यांचा तपशिल द्याल का? स्वतः गांधींनी तरअसे काही केले नव्हते.
यामुळे माझी उत्सुकता चाळवली. जालावर बरेच शोधले. "पोट्टी श्रीरामुलु" ही एकमेव भारतीय गांधीवादी उपोषणाने हुतात्मा झाली आहे या निष्कर्षाप्रत येणार तो पर्यंत अजून दोघे नि:शस्त्र क्रांतीकारी मिळाले... मात्र ते गांधीवाअदी होते की नाहि कल्पना नाहि. (अनेक परदेशी गांधीवादी मात्र हुतात्मा झालेले आढळतात)
  • पोट्टी श्रीरामुलु (एकत्र आंध्र प्रदेशसाठी सत्याग्रह, उपोषण आणि त्यातच मृत्यू. कट्टर गांधीवादी)
  • मोहन किशोर नामो दास
  • मोहीत मोईत्रा
(वरील दोन हुतात्मे, हुतात्मा महाविरसिंह बरोबर उपोषण केलेले त्याचे अंदमानमधील मित्र. मला जी थोडीशी माहिती मिळाली त्यानूसार हे सशस्त्र क्रांतीकारी नव्हते, स्वांतंत्र्यलढ्याशी नक्की निगडीत होते. मात्र गांधीवादी होते की नाहि कल्पना नाहि) बाकी तुमचे लेख मला नेहमीच आवडतात. विचारात टाकतात. हा लेखही आवडला. :) -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Sun, 12/14/2008 - 22:03

In reply to हुतात्मे by ऋषिकेश

Permalink

हुतात्मे

ऋषिकेशमहाशय, पोट्टी श्रीरामुलु हे गांधीवादी होते व त्यांनी आमरण उपोषण केले होते हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. मात्र हे उपोषण आपल्याच स्वतंत्र भारतात घडले, स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांविरुद्ध नव्हे. अर्थात त्याने पोट्टीजींच्या त्यागाचे महत्व कमी होत नाही. मात्र मी उल्लेख अशासाठी केला की इथे संदर्भ वेगळा होता. उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद. इतर दोन हुतात्म्यांची माहिती शोधायचा प्रयत्न आपण अवश्य करुया, मात्र शांततापूर्ण आंदोलन करणार्‍या गांधीवाद्यांना अंदमानला काळ्या पाण्यावर पाठवले जात नसे, तो मान क्रांतिकारकांनाच मिळायचा त्यावरुन ते क्रांतिकारकच असावेता से अनुमान आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sun, 12/14/2008 - 22:12

In reply to हुतात्मे by सर्वसाक्षी

Permalink

केवळ उत्सुकता

वर म्हटल्याप्रमाणे ही माहिती प्रतिवादासाठी म्हणून मुद्दाम न शोधता उत्सुकता म्हणून शोधली. असो.
इतर दोन हुतात्म्यांची माहिती शोधायचा प्रयत्न आपण अवश्य करुया,
जरूर. अंदमानच्या सेल्युलर जेलच्या एका साईटवर या तिघांनी उपोषण केले व त्यांचा मृत्यू झाला. हे कोणालाहि कळू नये म्हणून जेलरने त्यांची प्रेते समुद्रात फेकून दिली होती :( अशी माहिती मिळाली आहे. -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by टग्या (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 12/16/2008 - 03:59

In reply to हुतात्मे by सर्वसाक्षी

Permalink

फ्लोरा फाउंटन

पोट्टी श्रीरामुलु हे गांधीवादी होते व त्यांनी आमरण उपोषण केले होते हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. मात्र हे उपोषण आपल्याच स्वतंत्र भारतात घडले, स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांविरुद्ध नव्हे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोरारजीभाईंच्या गोळीबाराला बळी पडलेल्या १०५ (की ८०? मोरारजीभाईंच्या मते ८०.) जणांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाउंटनचे नाव बदलून 'हुतात्मा चौक' केले गेले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ स्वतंत्र भारतात घडली, इंग्रजांविरुद्ध नव्हे, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. (तसेही मारले गेलेले नि:शस्त्र होते अशी निदान माझी तरी समजूत आहे. चूभूद्याघ्या.) आता हे १०५ (किंवा ८०) हे केवळ स्वातंत्र्योत्तर काळात मारले गेले म्हणजे ते हुतात्मे होत नाहीत काय? मग 'हुतात्मा चौक' हे नामकरण चुकीचे आहे काय? हुतात्मा चौकाचे नाव बदलून पुन्हा 'फ्लोरा फाउंटन' असे (किंवा 'स्व. मीनाताई ठाकरे कारंजे' असे) करण्यासाठी आंदोलन करण्यास शिवसेनेस सांगावे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Tue, 12/16/2008 - 19:25

In reply to फ्लोरा फाउंटन by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

जयचंद टग्या

स्व. मीनाताई ठाकरे कारंजे निषेध निषेध. येथे खरे तर तीन मुद्दे आहेत. तुम्ही स्व. कोणाला म्हटले आहे? कारंज्याला म्हटले असेल तर ठीक. पण मग मीनाताई ठाकरे स्व. कारंजे असे हवे होते. त्यामुळे तुम्ही स्व. हे मीनाताईंबाबत म्हटले आहे हे सिद्ध होते. मराठीत स्व. या शब्दाचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. येथे कै. किंवा वै. चालले असते. (पुण्यश्लोकही म्हणायला हरकत नाही.) मात्र स्व. असे लिहून आपण इतिहासातील चुका पुन्हा करत आहोत असे वाटते मुस्लिम आक्रमकांनी इराणपासून उत्तर आफ्रिकेपर्यंतचा विस्तृत भूभाग १००-१५० वर्षांत पादाक्रांत केला. इराण, अरबस्थान, इजिप्त यासारख्या ठिकाणी त्यापूर्वीच्या संस्कृतीचे पालन करणारा माणूस आता औषधालाही शिल्लक नाही. भारतात त्यांना पहिले यश ७१२ मध्ये मिळाले. पण नंतरच्या काळात बाप्पा रावळसारख्या वीरांनी अगदी सिंध प्रांत पण परत जिंकून घेतला. गझनीच्या महंमदाने लाहोर आणि त्याजवळचा भाग जिंकला ११ व्या शतकाच्या सुरवातीला आणि ते दिल्लीपर्यंत पोहोचले ते १२ व्या शतकाच्या शेवटी म्हणजे जवळजवळ २०० वर्षांनंतर! तेव्हा सिंध प्रांतापासून दिल्लीपर्यंत भूभाग पादाक्रांत करायला त्यांना ७१२ ते ११९२ अशी ४८० वर्षे थांबावे लागले याचे कारण हिंदूंनी (विशेषतः राजपुतांनी) अत्यंत कडवा प्रतिकार केला होता. आणि त्यानंतर राणा प्रताप, शिवाजी महाराज, गुरू गोविंद सिंह आणि दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याने त्या आक्रमणाचा कडवा प्रतिकार केला. या वीरांनी शत्रूला तो प्रसन्न व्हावा म्हणून दक्षिणा दिल्या नाहीत आणि तलवारीचा मुकाबला तलवारीनेच केला म्हणून इराण आणि इजिप्त मध्ये घडले ते भारतात घडले नाही. या वीरांनी तुमचा भाबडा विश्वास उराशी बाळगला असता तर काय झाले असते? वरील आक्रमणासारखेच हे भाषिक आक्रमणही धोक्याचे आहे. मराठीचा वेगळा ठसका आहे. तिथे हिंदाळलेले शब्द वापरून तुम्ही उत्तरेच्या सांस्कृतिक आक्रमणापुढे शरणागती पत्करत आहात. सावरकरांनी केलेल्या भाषाशुद्धीच्या प्रयत्नांची तरी थोडी चाड ठेवा. आपला, (मोनिकाचा प्रियकर) विल्यम जेफरसन आजानुकर्ण हां. आता 'स्व. मीनाताई ठाकरे कारंजे' असे लिहून शिवसेनाच मराठीची कशी वाट लावत आहे हे निर्देशित करण्याचा आपला प्रयत्न असेल तर आम्ही वरील विधाने मागे घेतो. आपला, (टगवंतरावांचा फ्यान) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Tue, 12/16/2008 - 22:39

In reply to जयचंद टग्या by आजानुकर्ण

Permalink

धन्यवाद

धन्यवाद. हुतात्मा स्मारकातील कारंज्याच्या निमित्ताने का होईना आपण मुस्लिम आक्रमण भारतासाठी धोक्याचे होते हे मान्य केलेत ही कमी महत्वाची गोष्ट नाही.मात्र माझा वेगळ्या चर्चेतील वेगळ्या संदर्भातला प्रतिसाद थोडासा बदलून (गांधींचा भाबडा विश्वास ऐवजी तुमचा भाबडा विश्वास असा शब्दप्रयोग करून) इथे आणणे हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखे आहे असे माझे स्पष्ट मत आहे. मी इतरांइतक्या नियमितपणे मिसळपाववर लिहित नसलो तरी मी मनोगतवर असल्यापासून गेल्या २.५ वर्षांत कमितकमी ५० चर्चांमध्ये तरी भाग घेतला आहे.त्यात कोणाचाही एका चर्चेतला प्रतिसाद उघडउघड किंवा आडवळणाने मी वेगळ्या चर्चेत आणलेला नाही आणि व्यक्तिगत पातळीवर जाऊन चर्चा केलेली नाही. असे प्रकार करणे मिसळपाव सारख्या संकेतस्थळावर निकोप चर्चा होण्यासाठी योग्य नाही असे मला स्वत:ला वाटते. तरी सरपंचांचा निर्णय मान्य. तेव्हा यावर अजून काही लिहित नाही. बाकी या चर्चेत क्रांतिकारकांची तुलना तालिबानींबरोबर करायचा प्रयत्न चालला आहे असे वाटते. वयाच्या १४ व्या वर्षी देशासाठी काही करावे अशी कळकळीची भावना असलेली मुले फारच थोडी आणि त्यापुढे जाऊन स्वत: काहीतरी करणारी मुले म्हणजे लाखांमध्ये हाताच्या बोटावर बघायला मिळतील. आमच्या छत्रपतींनी रांझ्याच्या पाटलाचे एका स्त्रीची बेअब्रू केल्याबद्दल हातपाय १४-१५ वर्षी तोडायचा हुकुम दिला होता.पुढे १६ व्या वर्षी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.सांगा त्यांचा कोणी ब्रेनवॉश केला होता? संत ज्ञानेश्वरांनी १२ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. तसेच ’ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणणारी मुक्ताबाई वयाने त्यांच्याहूनही लहान होती. सांगा त्यांचा कोणी ब्रेनवॉश केला होता? सावरकरांनी वयाच्या १५ व्या वर्षी स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता झुंजेन अशी प्रतिज्ञा घेतली तेव्हा त्यांचा कोणी ब्रेनवॉश केला होता? श्री. एकलव्य यांनी म्हटल्याप्रमाणे तेजाला वयाचे वलय नसते.आणि तरीही देशासाठी त्याग करणार्‍या क्रांतिकारकांना तालिबान्यांच्या पंगतीत आणून बसवायच्या प्रवृत्तीचा निषेध आणि बंगालच्या वाघिणींना मानाचा मुजरा. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Tue, 12/16/2008 - 22:43

In reply to धन्यवाद by क्लिंटन

Permalink

वैयक्तिक टीका नाही

इथे वैयक्तिक टीका केलेली नाही. तसे वाटले असल्यास माझा नाईलाज आहे. मला सगळ्या क्रांतीकारकांविषयी संपूर्ण आदर आहे. मुद्दा असा आहे की १४व्या वर्षी मुलांच्या हातात शस्त्र देणे या प्रसंगाचे गौरवीकरण सध्याच्या काळात योग्य आहे का. आपला (सम्यक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Sun, 12/14/2008 - 21:14

In reply to या लहान by बगाराम

Permalink

बगाराम साहेब, कृपया लेख पुन्हा पुन्हा वाचा!

बंगाली वाघीणींनी देशबांधवांवर अत्याचार करणार्‍याला मारले. शस्त्रास्त्रे घेऊन निरपराध लोक, ज्यात कोवळी मुले, स्त्रीया यांचा समावेश होतो त्यांना नव्हे. तालीबानी आणी भारताचे स्वातंत्र्य सैनीक ह्यात फरक आहे. जालीयनवाला बागेत निरपराध्यांना मारणारा आणी त्या बद्दल अजीबात खंत न बाळगणार ज. डायर हा तालीबान्यांच्या पठडीतला होता. आपल्या क्रांतीकारकांनी इंग्लंड मध्ये जाऊन, त्यांच्या रेल्वे स्थानकांवर बेछूट गोळीबार केला होता काय? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Sun, 12/14/2008 - 04:21

Permalink

फार सुरेख

फार सुरेख लेख. बंगालच्या वाघिणींची ओळख करून दिल्याबद्द्ल सर्वसाक्षींना धन्यवाद. शांती आणि सुनिती यांना त्यांच्या अतुलनीय पराक्रमाबद्द्ल अभिवादन. >>कॉंग्रेसने मात्र ’उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणास नाही’ या व्रताला जागुन त्यांचा निषेध केला. कॉंग्रेसचा धिक्कार असो.
  • Log in or register to post comments

Submitted by बगाराम on Sun, 12/14/2008 - 05:06

Permalink

इथल्या

इथल्या सभासदांना क्वेश्चन केल्या बद्दल माझे काही प्रतिसाद उडवल्याचा खुलासा सरपंचांनी केलेला आहे. आणिबाणी असल्याने त्यांचा निर्णय मान्य आहे. मी ह्या धाग्यावर केलेले लेखन कुणीही क्वेश्चन म्हणून घेउ नये, ती फक्त माझी मते आहेत. अभिवादन करण्यापूर्वी, ही आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील काळी पाने आहेत. हुतात्मा भगतसिंह राजगुरू ह्यांनी केली ती खरी सशस्त्र क्रांती. जाणत्या वयात. त्यांनी कधी अवघ्या १४ वर्षाच्या कोवळ्या मुलींना प्रशिक्षण देउन पुढे केले नाही.ह्यावर विचार करावा इतकेच म्हणतो. कसलेही स्पष्टीकरण अपेक्षीत नाही. बगाराम
  • Log in or register to post comments

Submitted by _समीर_ on Sun, 12/14/2008 - 07:00

In reply to इथल्या by बगाराम

Permalink

हुतात्मा

हुतात्मा भगतसिंह राजगुरू ह्यांनी केली ती खरी सशस्त्र क्रांती. जाणत्या वयात. त्यांनी कधी अवघ्या १४ वर्षाच्या कोवळ्या मुलींना प्रशिक्षण देउन पुढे केले नाही.ह्यावर विचार करावा इतकेच म्हणतो. हम्म... विचारकरण्याजोगा मुद्दा आहे खरा.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Sun, 12/14/2008 - 06:21

Permalink

सुंदर लेख....

साक्षीजी सुंदर लेख... अप्रतिम लेख. अशा क्रांतिकारी स्त्रियांच्या चरित्राची ओळख करून दिल्याबद्दल आपले आभारी आहोत. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by कलंत्री on Sun, 12/14/2008 - 07:50

Permalink

वयाचे बंधन नाही.

बगारामजी, आपले प्रतिसाद वाचले. त्यात तथ्यांश असला तरी कोणत्याही बाबीचा सर्वांगीण विचार व्हावा. १. जिल्हाधिकार्‍यानीच सविनय सत्याग्रहीवर अत्याचार केले. २. पुरुष क्रांतिकारकानी त्या कृत्याचा बदला घेण्याचा विचार केला.त्या साठी त्यांनी आपला अथवा परका असा विचार न करता हम है हिंदुस्थानी असा स्तुत्य विचार केला. ३. परिस्थिती मात्र त्यांना अनुकुल नव्हती. ४. जिल्हाधिकारी भेकडासारखा आपल्या घरातच होता. ५. अश्या वेळेस अपवाद आणि आपदधर्म म्हणून या कोवळ्या मुलींनी हे कृत्य करण्याचे मनावर घेतले आणि पार पाडले. ६. त्यानंतर मात्र सशस्त्र विचारानंतर योग्य वेळी निषेध अथवा सत्याग्रहाचे हत्यार वापरले. असा जर क्रम असेल आणि तो आहे ( सर्वसाक्षीची तशी विश्वासार्हता आहे) तर आपल्याला या भगिनीबद्दल आदरच वाटला पाहिजे. अपवाद म्हणून कोणताही मार्ग त्याज्य नाही. सर्वसाक्षीजी : आपली निष्ठा आम्हास कौतुकास्पदच वाटते. आपल्याकडून आमच्या मोठ्या अपेक्षा आहे. आपण क्रांतिकारकांच्या लढ्याबद्दल एखादे चांगले पुस्तक प्रकाशित करा. भारताच्या इतिहासातले हे पर्व दुर्लक्षितच आहे आणि आपण ठरविले तर त्याला योग्य तो न्याय देऊ शकता. क्रांतिकारकांचे समयोचित स्मरण केल्याबद्दल सर्व मिपाकरातर्फे आपले आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sun, 12/14/2008 - 09:49

Permalink

सर्वसाक्ष

सर्वसाक्षीजी, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by एकलव्य on Sun, 12/14/2008 - 12:22

Permalink

वय

पराक्रमाला आणि तेजाला वय नसते. १६ व्या वर्षी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले... त्यांचे सवंगडी आणि महाराजांनीही १४ व्या वर्षीही काही हरामखोरांना यमसदनाला पोहचविले असण्याची दाट शक्यता आहे. दिल्ली हादरविणारा थोरला बाजीराव मराठी दौलतीचा पंतप्रधान झाला तो १७ व्या वर्षी. इंग्रजांना नमविणारा माधवराव तर त्याहूनही लहान असताना सूत्रे सांभाळू लागला. अकबर वयाच्या १४ व्या वर्षी दिल्लीच्या तख्तावर बसला. अनेक नावे देता येतील... स्वतंत्र भारतासाठी कोवळ्या वयात बलिदान देणार्‍या बंगालच्या वाघिणींना प्रणाम. (ऋणी) एकलव्य
  • Log in or register to post comments

Submitted by कलंत्री on Sun, 12/14/2008 - 12:27

In reply to वय by एकलव्य

Permalink

आपलेही नाव असावे.

५० वर्षानंतर अशी यादी जर बनली तर आपलेही नाव यात असावे हीच सदिच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by एकलव्य on Sun, 12/14/2008 - 12:30

In reply to आपलेही नाव असावे. by कलंत्री

Permalink

लायकी नाही

आमची **कीही लायकी नाही. (काही बाबतीत पायरी ओळखून वागणारा) एकलव्य
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 12/14/2008 - 13:06

In reply to वय by एकलव्य

Permalink

पराक्रमाल

पराक्रमाला आणि तेजाला वय नसते. एकलव्यराव, वरील अवघ्या पाच शब्दात आपण फार मोठी गोष्ट सांगून गेलात! आपल्याला सलाम..! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sun, 12/14/2008 - 15:15

In reply to वय by एकलव्य

Permalink

मनातले बोललात

एकलव्य मी अगदी आणी अगदी ह्याच शब्दात प्रतिक्रिया देणार होतो. माझ्या मनातले शब्द आपण इथे उतरवले आहेत त्या बद्दल शतशः धन्यवाद ! ह्या वाघिणींना आमचा मानाचा मुजरा. सर्वसाक्षी ह्यांचे मनःपुर्वक आभार ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sun, 12/14/2008 - 18:32

In reply to वय by एकलव्य

Permalink

चुकीची तुलना

महाराजांविषयीचा आदर त्यांनी कितव्या वर्षी तोरण बांधले यात नसावा. तो त्यांनी आयुष्यभर दिलेला लढा आणि केलेला राज्यकारभार यात आहे. अकबरापासून ते माधवरावांपर्यंत आलेली उदाहरणे ही आधीचा राजा नसणे या तत्कालिक परिस्थितीमुळे आली आहेत. राजांकडे असलेली मार्गदर्शनाची साधणे - वजीर-दिवाण-अमात्य किंवा कारभार चालवणारे राघोबादादांसारखे लोक वेगळेच परंतु नामधारी जबाबदारी त्यांच्याकडे असा प्रकार असावा. त्यामुळे कोणीतरी ब्रेनवॉशिंग केल्याने हल्ले करणे आणि राज्यकारभाराची जबाबदारी लहान वयात अंगावर येणे यात गुणात्मक फरक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by एकलव्य on Sun, 12/14/2008 - 19:23

In reply to चुकीची तुलना by आजानुकर्ण

Permalink

तुलना

कर्णसाहेब, तुलना वरील महापुरुषांच्या आणि बंगालच्या वाघिणींच्या एकूण कर्तबगारीची नाही. १४ व्या वर्षी किती जाण असते याची सर्वांना माहिती असलेली उदाहरणे देण्याचा प्रयत्न आहे. जबाबदारी स्वतःहून घेतली की अंगावर आल्यावर सांभाळली हा किडा निघेल याची खात्री होती. (दिलेली उदाहरणे अंगावर आल्यावर सांभाळली या गटात सरसकटपणे टाकणे हे खूपच ढोबळ होईल हा भाग अलहिदा! ) अकबरापासून ते माधवरावांपर्यंत आलेली उदाहरणे ही आधीचा राजा नसणे या तत्कालिक परिस्थितीमुळे आली आहेत. राजांकडे असलेली मार्गदर्शनाची साधणे - वजीर-दिवाण-अमात्य किंवा कारभार चालवणारे राघोबादादांसारखे लोक वेगळेच परंतु नामधारी जबाबदारी त्यांच्याकडे असा प्रकार असावा. धक्का बसला. आपला आवाका वरील अंदाजदर्शनापेक्षा अधिक असावा अशी अपेक्षा होती. एनिवे... जबाबदारी कशीही आलेली असो... पण आपल्या थोरपणाचा स्पार्क या वीरांनी -- महाराज/बाजीराव/माधवराव/अकबर -- अगदी "कोवळ्या" वयात दाखविला असे वाक्ये आणि दाखले अजरामर आहेत. इतिहास बदलणारी ही माणसे आहेत. अवांतर - वरील उदाहरणे नाममात्र आहेत. पानिपतावर विश्वास गेला तोही कोवळ्या वयात आणि लाखो मराठी वीरांनी प्राण टाकले तेही कोवळ्या वयातीलच असावेत. पण इतक्या दूरवर पल्ला मारण्याची हिंमत त्या वयात त्यांच्याकडे होती इतकाच मुद्दा येथे आहे. (घाईघाईत) एकलव्य
  • Log in or register to post comments

Submitted by बगाराम on Sun, 12/14/2008 - 21:21

In reply to तुलना by एकलव्य

Permalink

तुलना

महाराजांनी जे केले त्याची तुलना इथे होऊ शकत नाही. महाराज कुठतरी जाउन प्रशिक्षण घेउन मुघलांच्या सैन्यात सुसाईड किलर म्हणून गेले नाहीत. त्यांनी स्वराज्य बांधणी केली. केवढी मोठी जिद्द दाखवली. त्यांच्या राज्यात जर १४ वर्षाच्या बालिकांना प्रशिक्षण देउन जीवावर उदार करुन पाठवण्यात आले असते तर त्यांना तरी ते खपले असते का? असला प्रकार करण्यापेक्षा ते स्वतः तलवार घेउन शत्रुच्या छावणीत घुसले असते. हा मोठा फरक इथे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sun, 12/14/2008 - 21:28

In reply to तुलना by बगाराम

Permalink

महाराजांन

महाराजांनी जे केलं त्याची सुरुवात तर त्यांनी लहान वयातच केली ना??
  • Log in or register to post comments

Submitted by बगाराम on Sun, 12/14/2008 - 21:32

In reply to महाराजांन by यशोधरा

Permalink

होय

होय अर्थातच लहान वयात केले. इथे कधी केले वर नसुन काय केल े त्यावर फरक केला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sun, 12/14/2008 - 21:45

In reply to होय by बगाराम

Permalink

>>इथे कधी

>>इथे कधी केले वर नसुन काय केल... लहान वयात महाराजांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली, कारण त्यांच्या आजूबाजूला जे चालले होते ते त्यांच्या संवेदनाशील मनाला रुचत नव्हते. जिजाबाई आणि दादोजी कोंडदेवांचे मार्गदर्शन त्यांना होते (या बाबतही हल्ली वाद आहेत हे ठाऊक आहे, कृपया तो फाटा फोडू नये), भल्यावाईटाची जाण अंगच्या बुद्धीमत्तेमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे लहान वयातच आली होती, म्हणून त्या काळाला जे सर्वप्रथम करणे योग्य होते, की जसे आपल्या सोबत्यांच्या मनात स्वराज्याची इच्छा जागवणे.. ते त्यांनी केले. लहान वयात मोहीमाही केल्याच ना? (काय केले..) जसे वातावरण असेल, तशी कृती असावी लागते, काही जण वेडे ध्येयवादी तशी कृती करु शकतात,काही जणांना ते जमत नाही. या कन्यकाही तश्याच होत्या म्हणावे लागेल. आजच्या दहशतवाद्यांशी, त्यांच्या मनोवृत्तीशी क्रांतीवीरांचा आणि वीरांगनांचा संबंध जोडणे योग्य वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Sun, 12/14/2008 - 21:48

In reply to तुलना by बगाराम

Permalink

आपली विचारसरणी

आपण पुन्हा पुन्हा असे ठसवु पहत आहात की त्या मुलींना स्वतःची अक्कल नव्हती व त्यांना चिथावले गेले. असो. आपण स्वतःला हवे ते निष्कर्शे काढु शकता. मात्र यावरुन आपल्या स्त्री व क्रांतिकारक यांच्या विषयीच्या भावना समजल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sun, 12/14/2008 - 22:35

In reply to आपली विचारसरणी by सर्वसाक्षी

Permalink

स्रीविषयी?

बगाराम यांनी स्रीविषयक काहीही वावगे विधान केलेले नाही असे वाटते. शांतपणे पाहिल्यास एका विचारसरणासाठी असलेला क्रांतीकारक हा दुसऱ्या विचारसरणीसाठी अतिरेकी वाटू शकतो. या विचारस्वातंत्र्याला आक्षेप असण्याचे कारण नाही आपला (शांतताप्रेमी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sun, 12/14/2008 - 21:56

In reply to वय by एकलव्य

Permalink

वा वा! एकलव्य, उत्तम विचार मांडलाय!

पराक्रमाला आणि तेजाला वय नसते. लाख बोललात!! ह्याच संदर्भात सारेगमप लिटल चँप्स ह्या कार्यक्रमात हृदयनाथांनी सांगितलेला किस्सा चपखल ठरावा. सावरकर बारा वर्षाचे असताना भगूरहून नाशिकला आले एका गाण्याच्या स्पर्धेसाठी. त्यांनी लिहिलेले 'हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा' हे ओजस्वी गाणे ते स्वतः गायले. त्यांना पहिले बक्षीस मिळाले. लोकमान्य टिळक परीक्षक होते. १२ वर्षांचा मुलगा हे ओजस्वी शब्द, हे अलंकार, हे वृत्त पेलू शकत नाही, लिहू शकत नाही ह्या शंकेतून स्पर्धेनंतर छोट्या विनायकाला जवळ बोलावून त्यांनी विचारले "बाळा, आता मला खरंखरं सांग की हे शब्द, हे गाणं तुझंच की तुझ्या वडिलांनी, गुरुजींनी, मोठ्या भावाने कोणी लिहून दिले?" सावरकरांनी वयाच्या १२ व्या वर्षी दिलेल्या उत्तरातून ते असामान्य का होते ह्याची प्रचिती येते - सावरकर लोकमान्यांना म्हणाले "ज्ञानेश्वर वयाच्या १६ व्या वर्षी 'भावार्थदीपिका' ग्रंथ लिहू शकतात तर मी १२ व्या वर्षी हे गाणे का लिहू शकत नाही?" काय तेजस्वी बाणा, केवढा आत्मविश्वास, केवढे सामर्थ्य!! म्हणून सावरकर एकमेवाद्वितीय, म्हणून ते स्वातंत्र्यवीर, म्हणून ते महान!! पराक्रमाला आणि तेजाला वय नसते!!! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीयुत संतोष जोशी on Sun, 12/14/2008 - 17:50

Permalink

नमस्कार

बंगालच्या या वाघिणींना मानाचा मुजरा. सर्वसाक्षी तुमचे मनःपूर्वक आभार. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 12/14/2008 - 18:46

Permalink

या दोन

या दोन वाघिणींना मानाचा मुजरा. आणि ज्या कोणी स्त्रिया, मुलींना वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांना 'गेट वेल सून'. (समानतावादी) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Sun, 12/14/2008 - 20:03

In reply to या दोन by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

१+

आदितीच्या मताशी सहमत.:)
  • Log in or register to post comments

Submitted by बगाराम on Sun, 12/14/2008 - 21:11

In reply to या दोन by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

वाईट वाटले

इथे कुणीहि लिंगभेद केलेला नाही, १४ वर्षाची मुले असती तरी देखिल मी हेच म्हणालो असतो. आपण मला उद्देशुन गेट वेल सून म्हणत असाल तर आपण निष्कारण हा नविन वाद इथे आणत आहात असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 12/14/2008 - 22:46

In reply to वाईट वाटले by बगाराम

Permalink

भेद करणार्‍यांसाठीच

तो भेद ज्या कोणी केला होता त्यांच्यासाठी होतं, तुम्ही नाही ना केला भेद (खरं की काय?) तर मग का ते स्वतःवर ओढवून घेत आहात? का खरंच गरज आहे तुम्हाला 'गेट वेल सून'ची? बाकी १४व्या वर्षी मलाही बरीच अक्कल(?) होती असं आठवतं. शाळेत स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास शिकवायचे (वय वर्ष १०-११ पासून) तेव्हाच आम्हा मित्र-मैत्रिणींमधे चर्चा होत असे, "पुन्हा कोणी आपल्या देशावर हल्ला केला तर आपणही असंच क्रांतिकारकांसारखे वागून त्यांना विरोध करु या." आणि या चर्चांमधे कोणाही मोठ्या माणसाचा सहभाग नसे.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Sun, 12/14/2008 - 21:15

Permalink

बंगालच्या

बंगालच्या वाघिणींना अभिवादन ! लेख छानच. एखाद्या क्रांतीने वातावरण भारले जाते तेव्हा तरल, बुद्धीमान, उत्साही, धैर्यवान लोक आपोआपच त्याकडे आकर्षिले जातात. शिवाजी महाराजांशी अश्यांची तुलना नाही केली तरी महाराजांच्या कार्यामुळे प्रेरित झालेल्या एका १३-१४ वर्षांच्या मुलाने एका मह्त्वाच्या लढाईत ध्वज सांभाळत मोठी चकमक विजयी केली होती असे शिवचरित्रात वाचलेले स्मरते. जेव्हा समाजात मोठी उलाढाल होते तेव्हा लहानाप्सून मोठ्या पर्यंत अनेक जण भारले जातात. मुद्द्महुन ब्रेनवॉश केलेले आणि अश्या वातावरणात वयापेक्षा पोक्त विचार करुन कृती करणार्‍यांत फरक केला पाहिजे असे वाटते. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Sun, 12/14/2008 - 22:02

Permalink

मुद्दे

चर्चा वाचली. काही मते मांडतो. याबद्दल मतभिन्नता होऊ शकते. - क्रांतिकारकांचे काम , त्यांनी दिलेले बलिदान याबद्दल एक भारतीय म्हणून मी ऋणी आहे. त्यांची स्मृती सदैव मनात राहील. - ज्यांनी अत्याचार केले त्यांचे रक्त वहात असेल तर एक माणूस म्हणून मला बरेच वाटते. मात्र कायद्याचे राज्य हवे असणारा एक नागरीक म्हणून या मार्गांबद्दल नेहमीच प्रश्न येत रहातील. - अर्थशास्त्रीय बाबींमुळे इंग्रज हा देश सोडून गेले यात तथ्य आहे. पण या निर्णयात निरनिराळ्या उठावा-आंदोलनांचा मोठा भाग होता हेही बरोबर. इट डीड्न्ट मेक द गव्हर्निंग एनी इझीयर. - कुठल्याही उदात्त हेतूने का होईना , पण लहान मुलांच्या हाती हत्यार देणे हे निश्चितच विवाद्य आहे. कुठल्याही एकाच दृष्टीकोनाशी आपण स्वतःला बांधून घेतले ("मॅरींग टू अ सर्टन स्कूल ऑफ थॉट") तर एकूण व्यापक अशा सत्याकडे दुर्लक्ष होते याचे , ही चर्चा म्हणजे एक चांगले उदाहरण आहे. माझी अशी सभासदाना विनंती आहे की , वैयक्तिक शेरेबाजी , अपशब्द टाळा. दुसरा काय म्हणातो ते पटत नसेल तर तसे सांगा. दुसर्‍याची कीव करणे , कमी लेखणे वगैरे वगैरे गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sun, 12/14/2008 - 22:38

In reply to मुद्दे by मुक्तसुनीत

Permalink

सहमत आहे

हा दृष्टिकोण स्वागतार्ह आहे. दुसऱ्याची कीव करणे, किंवा दुसऱ्याचा आवाका मोजणे यामुळे चर्चेत काहीही साध्य होत नाही. लहान मुलांच्या हाती हत्यार देण्याचे कोणत्याही कारणामुळे उदात्तीकरण होऊ नये हे सध्याच्या प्रसंगात सुसंगत आहे. आपला, (सहमत) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sun, 12/14/2008 - 22:03

Permalink

मानाचा मुजरा!

बंगालच्या या दोन्ही क्रांतीकारींना मानाचा मुजरा! वर बरेच काही लिहून झाले आहे त्यामुळे त्यात परत पडत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्तरंजन भट on Sun, 12/14/2008 - 22:08

Permalink

सर्वसाक्षींना सलाम!

माहितीजालावर शहिदांसाठी, क्रांतिकारकांसाठी एवढे लेखन कुणी केले नसेल आणि एवढी प्रकाशचित्रे कुणी पुरवली नसतील. शहिदांसोबतच सर्वसाक्षींनाही सलाम!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 12/14/2008 - 22:14

Permalink

मानाचा मुजरा !

दोघींही क्रांतीवीर वाघींनींना मानाचा मुजरा ! सर्वसाक्षीसेठ, उत्तम माहितीचा उत्तम लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by वाचक on Sun, 12/14/2008 - 22:31

Permalink

काही मुद्दे वेगळे काढून

मगच तपासले पाहीजेत - आता एकेक बघू १. हे 'ब्रेनवॉशिंग' आहे अथवा नाही २. असलेच तर 'तालिबानी' करतात त्यात आणि ह्यात फरक आहे का ? असल्यास कोणता? ३. १४ वर्षांची मुले/ली हे समर्थनिय आहे का ? तर शेवटी प्रत्येक गोष्ट आपण कोणत्या 'काँटेक्स्ट' मधे बघतो ह्याच्यावर सर्व अवलंबून आहे. 'मी त्याला आई बहिणीवरुन शिव्या दिल्या' हे एक नुसते वाक्य 'कारण त्याने माझ्या बहीणीची छेड काढली' ह्या वाक्यानंतर लगेच 'समर्थनिय' वाटू शकते. तेव्हा 'साक्षी़जींनी' दिलेला इतर ईतिहास पहाता 'ह्या कन्या' वीरांगनाच ठरतात. आता एकेका प्रश्नाची उत्तरे माझ्या दॄष्टीकोनातून १. हे 'ब्रेनवॉशिंग' आहे अथवा नाही हो - हे ब्रेनवॉशिंगच आहे आणि प्रत्येक असामान्य नेता जेव्हा आपल्यामागे यायला आपल्या अनुयायांना तयार करतो तेव्हा ते एक प्रकारचे ब्रेनवॉशिंगच असते - दुर्दैवाने ह्या शब्दाला एक काळी किनार लाभली आहे पण शब्द्शः अर्थ लक्षात घेतला तर माझे म्हणणे पटावे. आणि कार्य सिद्धिस जाण्यासाठी त्याची गरज असतेच. आजकालच्या युगातल्या 'कॉर्पोरेट' कंपन्या पण 'मिशन स्टेटमेंट' आणि इतर गोष्टींनी हेच साध्य करत असतात. २. असलेच तर 'तालिबानी' करतात त्यात आणि ह्यात फरक आहे का ? असल्यास कोणता? भारता सारख्या आधी स्वतंत्र असलेल्या देशावर ईंग्रजांनी आक्रमण करुन अत्याचार चालविले होते - अशा वेळी ज्याला जसे पटते त्या मार्गाने त्याचा प्रतिकार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच ठरते. त्याचप्रमाणे रशियन आक्रमण असताना 'तालिबान्यांनी' ह्याचाच अवलंब केला आणि त्यांना यशही मिळाले. नंतर आता तशी परिस्थिती उरलेली नसताना ते त्याच मार्गाचा वापर करत आहेत आणि पाकिस्तानही 'दुसर्‍या' सार्वभौम देशात कारवाया घडवून आणण्यासाठी - हे अर्थातच 'समर्थनिय' नाही - माझ्या दॄष्टीकोनातून कारण मी एक देशभक्त भारतीय आहे पण पाकिस्तानी नागरिकांचे मत वेगळे असू शकेल - मी म्हणतो तो 'काँटेक्स्ट' तो हाच. ३. १४ वर्षांची मुले/ली हे समर्थनिय आहे का ? वय किती आहे ह्याला खरे म्हणजे काहीही अर्थ नाही - एकदा आपण करतो आहोत ते कृत्य स्वतःच्या 'काँटेक्स्ट' मधे योग्य आहे ना मग 'साधनं अनेकता...' विचार व्हावा
  • Log in or register to post comments

Submitted by कलंत्री on Sun, 12/14/2008 - 22:54

Permalink

कोणीतरी न्यायाधिश व्हा रे...

द्वारकानाथजी, हा लेख दोन क्रांतिकारक कन्यांना समर्पित आहे. त्यावर जे काही लिहायचे ते अवश्य लिहा. पण या लेखात गांधीवाद घुसवु नका. आपण त्या विषयावर एक स्वतंत्र लेख लिहा. सर्वसाक्षींच्या लेखाचा अंश. १. सर्वात अगोदर तात्यांनी गांधींवर निष्कारणच टिका केली. तेंव्हा गांधीवाद लेखाच्या आड आला नाही. २. सर्वसाक्षींनी प्रश्न किती गांधीवाद्यानी हौतात्म्य स्विकारले असे विचारले तेंव्हा गांधीवाद आड आला नाही. ३. मग आताच आम्ही गांधीवाद्याना अभ्यास करा आणि उत्तरे द्या तेंव्हा गांधीवाद या लेखाच्या आड कसा आला? वकिल आणि न्यायाधिश एकच होणार असेल तर निर्णय मिळेल न्याय मिळणार नाही. कृपया कोणीतरी निपक्षपाती पणे आम्हाला सांगा आम्ही काय करायचे ते? गरिब गांधीवादी
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sun, 12/14/2008 - 22:59

In reply to कोणीतरी न्यायाधिश व्हा रे... by कलंत्री

Permalink

इसापनीती

कलंत्रीसाहेब, इसापनीतीमध्ये सुंदर गोष्ट आहे. एकदा एक कोल्हा आणि शेळीचे पिल्लू नदीवर पाणी पित असते. कोल्हा पटकन त्या पिलाजवळ जातो आणि म्हणतो, मी तुला मारुन टाकीन. पिलू म्हणते, मी काय केले. कोल्हा म्हणतो, की तू माझे पाणी उष्टे, घाणेरडे करत आहेस. पिलू म्हणते, अहो पण मी उताराच्या बाजूला आहे, तुमच्याकडे पाणी आधी येते आणि नंतर माझ्याकडे. मी कसे काय पाणी घाणेरडे करेन? कोल्हा म्हणतो, अरे साल्या तू नाही तर तुझ्या पूर्वजांनी तरी केलेच असेल ना. मेलं बिचारं ते पिलू नंतर. तात्पर्य समजून घ्या. आपला (लांडगा) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 12/14/2008 - 23:01

In reply to कोणीतरी न्यायाधिश व्हा रे... by कलंत्री

Permalink

कलंत्री

कलंत्री काका, तुमच्या आणि सर्वसाक्षीजींच्या वादात पडण्याची अजिबात इच्छा नाही, तेवढी माझी पतही नाही. पण ज्याला जे आवडतं ते त्याने घ्यावं आणि आपल्या रस्त्याने आपल्या इप्सितस्थळी जावं हे इष्ट नाही का? तुम्ही गांधीवादावर एवढे लेख लिहिले तिथे कुणी क्रांतिकारकांचे गोडवे गायल्याचं दिसलं नाही. मग इथे का गांधीवादावर, गांधीजींवर चर्चा व्हावी? तुम्हाला गांधीजी, गांधीवाद या गोष्टींवर आणखी चार लेख लिहिता येतीलच ना? त्यातून तुम्ही सर्वसाक्षीजींचं अधोरेखित केलेलं वाक्य हे संपादक (मॉडरेटर) मंडळाने मनावर घेऊन तुमचा प्रतिसाद संपादन केला आहे का? आणि खरं सांगायचं तर सर्वसाक्षीजींनी तुम्हाला आणखी "एक लेख लिहा असं सांगितलं आहे", तेवढंच काय ते मनावर घ्या ना? तुमच्यात आणि त्यांच्यात जो काही प्रकारचा वाद आहे तो वैयक्तिक पातळीवर येऊ लागला आहे अशी जाणीव होत आहे अशी शंका येत आहे. माझा हा प्रतिसाद नाही आवडला तर सरळ दुर्लक्ष करा किंवा खरडवही आहेच, तुमच्या गांधीवादात बसेल त्या पद्धतीने माझ्या खरडवहीत हाणाच मला! पण इथे का बादल्या ओतून धुणी धुवायची सुरुवात करायची? अवांतरः गांधीवादात श्रुंगारिक साहित्य वाचणं/लिहिणं मान्य असतं का?
  • Log in or register to post comments

Submitted by बगाराम on Sun, 12/14/2008 - 23:39

In reply to कलंत्री by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अदितिजी

अदितिजी कलंत्री सरांचा प्रतिसाद एकदा नीट वाचा. गांधीवाद ह्या लेखात त्यांनी आणलेला नाही. पहिल्या प्रतिसाद तो तात्यांनी आणलेला आहे. त्यावर त्यांनी प्रत्युत्तर न देता गप्प बसावे ही अपेक्षा म्हणजे दडपशाही नाही का? अवांतरः गांधीवादात श्रुंगारिक साहित्य वाचणं/लिहिणं मान्य असतं का? हा मात्र विषयांतराचा अतीशय चावट प्रयत्न वाटला. इथल्या चर्चेशी त्याचा काय संबंध आहे? संपादकांनी चर्चा भरकटवणाअरी असली विषयांतरे टाळावीत
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 12/15/2008 - 10:38

In reply to अदितिजी by बगाराम

Permalink

पुन्हा तेच!

आणखी एक लेख लिहा पण हा धागा भरकटवू नका असं सुचवलेलं आहे, आणि मी त्याचाच पुनरुच्चार केला आहे. आता यात कसली दडपशाही? (आपण माझे प्रतिसाद नीट वाचून, त्याचा अर्थ लावून मग प्रतिसाद लिहित नाही का? नसेल तर तसं करा.) अवांतराचा मुद्दा हा कलंत्रीकाकांनी सुरु केलेल्या दुसर्‍या धाग्याच्या संदर्भात होता, तो अवांतरच होता आणि त्याकडे दुर्लक्ष करणंच अपेक्षित होतं. बाकी तात्यांनी जर तो मुद्दा आणला होता तर त्याकडे या धाग्यापुरतं दुर्लक्ष करणं आणि वाटल्यास आणखी एक लेख लिहून गांधीजींची महत्त्व विषद करायला कोणीही थांबवलं नव्हतं. अगदी गांधीविरोधकांनीही या धाग्यावर तात्यांच्या त्या वाक्याकडे दुर्लक्ष करुन चर्चा फक्त या दोन वाघिणींपुरती मर्यादित ठेवली होती. तात्यांच्या 'त्या' वाक्याला महत्त्व कोणी दिलं ते जरा बघणार का?
  • Log in or register to post comments

Submitted by बगाराम on Tue, 12/16/2008 - 06:59

In reply to पुन्हा तेच! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

म्हणजे

म्हणजे सुरुवात तात्यांनीच केली होती ना? आणि माझ्या तरी पाहण्यात ह्या धाग्यावर कुणीही गांधींवर लेख लिहिलेला दिसत नाही. बाकी तुम्ही केलेल्या चावट वियषयांतरावर बोट ठेवल्यावर त्या मुद्द्याला मात्र सोयिस्कर बगल दिली आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कलंत्री on Sun, 12/14/2008 - 23:49

In reply to कलंत्री by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

नाही.

गांधींनी पराकोटीचा ब्रह्मचर्यपालनाचा आग्रह धरला होता. त्यामूळे गांधीविचारसरणीत हे संमत नाही. पण या प्रश्नाचा रोख समजला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 12/20/2008 - 19:26

In reply to नाही. by कलंत्री

Permalink

हे काय मला कळाले नाही.

गांधींनी पराकोटीचा ब्रह्मचर्यपालनाचा आग्रह धरला होता. त्यामूळे गांधीविचारसरणीत हे संमत नाही. गांधीजीचे लग्न झाले होते व त्याना ३ मुले होती अशी माहिती मी वाचली आहे.मग वरील वाक्याचा अर्थ मला समजला नाही वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 12/20/2008 - 19:42

In reply to नाही. by कलंत्री

Permalink

दुसऱ्यांसाठी नाही

गांधींनी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्म-समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना या एकादश तत्त्वांचे पालन करण्याचाच प्रयत्न केला. त्यातली सुरुवातीची पंचतत्त्वे ही जैन धर्मातून घेतली आहेत. गांधींनी धरलेला ब्रम्हचर्यपालनाचा आग्रह स्वतःसाठी होता. (तोदेखील मला वाटते मोहापासून मुक्ती मिळवण्यासाठी धरला असावा) दुसऱ्यांनी ब्रम्हचारी राहावे असा त्यांनी आग्रह धरलेला नाही. गांधींचे ब्रम्हचर्यपालन व त्यासंदर्भात केलेले प्रयोग हे बरेच वादग्रस्त होते. तरुण स्त्रियांकडून मसाज करुन घेणे, आश्रमात नग्नावस्थेत अंगाला माती लावून वावरणे, कटाक्षाने स्रियांच्या सहवासात राहणे, सोबत झोपणे वगैरे प्रयोगांची त्याकाळात बरीच निंदा, टिंगल झाली आहे. याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी स्त्रियांच्या व पुरुषांच्या सहवासात शरीराला वेगळे वाटू नये. येशू ख्रिस्त, रामकृष्ण परमहंस यांच्याप्रमाणे शरीराला नैसर्गिक नपुंसकत्त्व यावे अशी त्यांची इच्छा असल्याचे सांगितले. गांधीजींचे याबाबतची मत मला अजिबात पटलेली नाहीत. आपला (गांधीप्रेमी) आजानुकर्ण आठवेल तसे लिहिले आहे. चूक भूल देणे घेणे
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्निल.. on Mon, 12/15/2008 - 14:07

Permalink

धन्यवाद!!!

सर्वसाक्षीजी, आपला लेख अतिशय चांगला आहे. या क्रांतीकारकांची ओळख करुन दिल्याबद्दल आभार. दोन्हीहि क्रांतीकारकांना सलाम!!! स्वप्निल..
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com