Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 09/07/2015 - 15:58
पेरणा सांगायलाच पाहिजे का? चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, ....... जरी मतदारसंघ बदलले त्याचे, तो साहेब पडला नाही तो परतून आला राज्यात, भुक न संपली त्याची जाहले अनेक घोटाळे , पण साहेब अडकला नाही ....... उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई ....... समजून तयाला घे तू , तो साहेब सरळसा नाही सर्वस्व लुटले राज्याचे, काही ना बाकी उरले किती स्वतःस हरवून बसले , पण साहेब बधला नाही, .........इतुके न कुणाचे घ्यावे, की भार तयाचा व्हावा ........ बघ तुझ्यातही थोडा आहे, साहेब वेगळा नाही या राज्यातील उपेक्षा, मी मूठ वळवली नाही बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही, ........ साहेबांची होता मेहेरबानी , कार्यकर्ता बने खंडणीस्वार ........ उघड्या नयनांनी बघ तू , महाराष्ट्राचा बनेल बिहार पैजारबुवा,

Submitted by प्यारे१ on Mon, 09/07/2015 - 16:12

Permalink

आमच्या वयोवृद्ध आनि ज्येष्ठ

आमच्या वयोवृद्ध आनि ज्येष्ठ नेत्यावर जे आकख्या महाराष्ट्राचे भूशन आहेत त्यांच्यावर अशी हीन कविता केलेली वाकून आमच्या कोमल(आयडी नव्हे) हृदयावर याठिकानी हे जे घाव घातले गेले आहेत ते बघून त्याठिकानी जनता तुम्हाला तुमची जागा त्याठिकानी दाखवल्याशिवाय राहनार नाही याची खात्री ह्या किंवा त्याठिकानी आम्हाला आहे. समस्त कार्यकर्त्यांनी ह्याठिकानी जास्त दंगा करु नये असं आव्वान जरी आमी केलेलें असलं तरी याठिकानी कार्यकर्ते नक्की काय भूमिका घेतली जाईल ते त्याठिकानी आम्ही सांगू शकत नाही. जै हिन्द जै महाराष्ट्र
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 09/07/2015 - 16:17

In reply to आमच्या वयोवृद्ध आनि ज्येष्ठ by प्यारे१

Permalink

हीण?

हीण? आमी तर मोठ्या कौतुकाने लिहिली होती. तमाम म्हाराश्टाच्या जानत्या राजाबद्दल वंगाळ शबुद येईल का कोनाच्या थोबाडातुन? दातच पाडुन टाकेल त्याचे आहो आम्ही घरात साहेबाचा फोटु सुध्दा बारामती कडे तोंड करुन लावला आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Mon, 09/07/2015 - 16:51

In reply to हीण? by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

___/\__

___/\__ बाकी त्यांचे जुने सहकारी दु. दु. झालेत!
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Mon, 09/07/2015 - 16:22

Permalink

कवितेतील ज्या ओळी अक्षराने

कवितेतील ज्या ओळी अक्षराने सुरु होतात, ते कोणाचे मनोगत व ज्या ओळी टिंब टिंबने सुरु होतात ते कोणाचे मनोगत आहे ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 09/07/2015 - 16:30

Permalink

माऊली सर्वोत्तम विडंबन.

माऊली सर्वोत्तम विडंबन. . जाता जाता श्रीगुरुजींसाठी त्यांचा नेहमीचाच हिट्ट विषय. बनलो असतो रागा, मज मम्मी भेटली नाही. किंवा बनलो असतो नमो, मज (लाल) कृष्ण भेटला नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 09/07/2015 - 16:33

In reply to माऊली सर्वोत्तम विडंबन. by अभ्या..

Permalink

" बनलो असतो दादा, मज चाकू

" बनलो असतो दादा, मज चाकू भेटला नाही " हा सब्जेक्ट मात्र कॉपीराईटेड आहे याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 09/08/2015 - 15:04

In reply to माऊली सर्वोत्तम विडंबन. by अभ्या..

Permalink

खास श्रीगुर्जींसाठी असेल तर

खास श्रीगुर्जींसाठी असेल तर इशयाचे टैटल असे पायजे: "बनले असते माई, मज "हे" भेटले नाहीत". =))
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 09/08/2015 - 15:45

In reply to खास श्रीगुर्जींसाठी असेल तर by बॅटमॅन

Permalink

+१११

फकस्त किरकोळ दुरुस्तीसह.
"बनले असते माई, मज "हे" आडून भेटले नाहीत". =))
नाखु बेडेकर अभामिपातडकफलकदुरुस्तीसंघ
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 09/08/2015 - 16:24

In reply to +१११ by नाखु

Permalink

सहीच!

सहीच!
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Mon, 09/07/2015 - 16:35

Permalink

आवडल..

आवडल..
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Mon, 09/07/2015 - 17:13

Permalink

दंडवत, पैजारबुवा!

स्वतंत्र कलाकृती म्हणून ही व्हॉट्सॅपवर व्हायरल व्हायच्या लायकीची रचना आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Mon, 09/07/2015 - 17:43

Permalink

वा!!!! चपखल!!!

वा!!!! चपखल!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Mon, 09/07/2015 - 17:55

Permalink

:)

झक्कास!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 09/07/2015 - 19:12

Permalink

हाहा!

लै भारी!
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Mon, 09/07/2015 - 19:34

Permalink

=)) सही!

=)) सही!
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Mon, 09/07/2015 - 19:43

Permalink

झकास

एकदम झकास
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Mon, 09/07/2015 - 22:37

Permalink

.

बनलोही असतो अकबर मज जोधा भेटली नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Mon, 09/07/2015 - 23:16

Permalink

चहु दिशांत असे दु:कीर्ती,

चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, यवडं उगडुन सांगायचं नसतं बुवा...
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 09/07/2015 - 23:21

Permalink

ह्या ह्य ह्या ह्या ! =))

ह्या ह्य ह्या ह्या ! =))
  • Log in or register to post comments

Submitted by पीके on Tue, 09/08/2015 - 00:03

In reply to ह्या ह्य ह्या ह्या ! =)) by अत्रुप्त आत्मा

Permalink

गुर्जी, ठसका आडकला जनु नरड्यत

गुर्जी, ठसका आडकला जनु नरड्यत?
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 09/08/2015 - 00:44

Permalink

आमचाही हातभार...

झालो असतो संपादक, मज कात्री (कातरी???) भेटली नाही. झालो असतो कन्हैय्या, मज मयत्रि भेटली नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 09/08/2015 - 15:03

Permalink

ह्या ह्या ह्या =)) =)) =))

ह्या ह्या ह्या =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by नि३सोलपुरकर on Tue, 09/08/2015 - 16:14

Permalink

वाह वाह ..

"उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई"........ चपखल!!!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 09/08/2015 - 16:59

Permalink

भारी!

भारी! आता बिग्रेडी धावून येणार..........
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत लाटकर on Wed, 09/09/2015 - 18:06

Permalink

बनलो असतो पहिला बाजीराव मज

बनलो असतो पहिला बाजीराव मज मस्तानी भेटली नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 09/09/2015 - 18:09

In reply to बनलो असतो पहिला बाजीराव मज by हेमंत लाटकर

Permalink

कावरे कोल्ड्रिन्क्समध्ये

कावरे कोल्ड्रिन्क्समध्ये चौकशी करायची होती ना! गेला बाजार सुजातामध्येपण मिळते.
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Wed, 09/09/2015 - 18:13

In reply to कावरे कोल्ड्रिन्क्समध्ये by एस

Permalink

चूक. ते "भेटली" नाही म्हणत

चूक. ते "भेटली" नाही म्हणत आहेत, "मिळाली" नाही असं नाही. त्यामुळे तुम्ही दिलेले ऑप्शन चूक आहेत. आता त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे नवे ऑप्शन द्या त्यांना :)
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 09/09/2015 - 18:17

In reply to चूक. ते "भेटली" नाही म्हणत by नाव आडनाव

Permalink

अर्रर्र! मग काय माहीत नाय

अर्रर्र! मग काय माहीत नाय ब्वॉ! बुंदेलखंडाला जावे लागेल त्यासाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Wed, 09/09/2015 - 18:23

In reply to अर्रर्र! मग काय माहीत नाय by एस

Permalink

काही लोक म्हणतात तसं.

चहा भेटला नाही, कुठेच बियर भेटली नाही, पेट्रोल भेटले नाही वगैरे...
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 09/10/2015 - 11:30

Permalink

ए झक्कास्स ! याला म्हणतात

ए झक्कास्स ! याला म्हणतात विडंबन !!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 09/10/2015 - 19:57

Permalink

एक लंबर इडंबण !

एक लंबर इडंबण !
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Fri, 09/11/2015 - 18:11

Permalink

आत्ताच मी चंदेरी आणि अशोक

आत्ताच मी चंदेरी आणि अशोक नगरला जाऊन आलो, आजच घरी परतलो आहे. चंदेरी आणि अशोक नगरच्या मधल्या भागात राहणाऱ्यांचे भयानक वास्तव पाहिल्यावर 'श्रीमंत' पेक्षा 'साहेब' बरेच म्हणता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on Sun, 09/13/2015 - 05:26

In reply to आत्ताच मी चंदेरी आणि अशोक by विवेकपटाईत

Permalink

साहेब हा एकाच शब्द कळला

चंदेरी,अशोक नगर आणि श्रीमंत हे तिन्ही नाही कळले. थोडे अधिक सांगता का, प्लीज ?
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sun, 09/13/2015 - 05:45

Permalink

पैजारबुआ ____/\_____

पैजारबुआ ____/\_____
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 18550 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com