[शतशब्दकथा स्पर्धा] येक रुपाया! (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध)
पूर्वार्ध - येक रुपाया! नुस्ता गुंधूळ वर्गात. बाई कायतरी लिहीत व्हत्या, तेवढ्यात शिपाय आला नोटीस घिवून. सगळ्यान्ला वाटल उद्या सुट्टी! बाईंनी वाचल, "सर्वांना कळविणेत येते की, पंधरा ऑगस्टनिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा आहे. भाग घ्यायचाय त्यांनी वर्गशिक्षकांकडे फी जमा करणे. नोटीस दिनांक १/८/१९९२." शाळा सुटल्यावर तीन ढांगात घरी! तायला म्हन्लो, "ताये मला येक रुपाया दी, शाळत चित्रकला पर्धा हाय." धुनं वाळू घालीत म्हन्ली, "त्यान्ला न्हाय काम आन तुला नाय धंदा!" धा रोज तायच्या म्हाग लाग्लो. रडलोबी. एक दिवस शाळला जाताना तायनी रुपाया दिला. पुना तीनच ढांगा! हाजरी झाल्याझाल्या बाईन्ला म्हन्लो, "बाई, फी!" बाई म्हन्ल्या, "संदीप, मुलांची यादी कालच जिल्हा परिषदेला दिली." म्हाग फिरल्यावर बस्करपट्टीबी दिसाना!=========== येक रुपाया! - उत्तरार्ध =========== गावातन प्रभातफेरी झाली, झेंडा फडकला, बिस्कीटपुडा मिळ्ळा, झाल पंधरा ऑगस्ट! पर्धेला नाव दिल्याली थांबली शाळेत, बाकी घरला! व्हरांड्याच्या खिडकीतन आमच्याच वर्गात बसल्याली पोर दिसली. शिपाय बस्ल्याला खुडचीत, कुणालाबी खवळत नव्हता. ढेऱ्याचा सच्या सतराबाऱ्या कायतरी काडायचा पुना खुडायचा! मला य म्हन्ला आत. गेलो, त्याज्यापशी बस्लो, म्हन्ला, "संदीप्या चितार काडून दी की लका, तुला रूपाया दिईन." गावातलच तळ, त्याज्यात बदक, व्हडी नावाडी, शेतं, झाडं आन माळाच्या रस्त्यावर दपतार घितल्याली पोर काडली. रंग दिला. बाई याया लागल्यावर सच्या म्हन्ला, "ब्रूस दी, तू जा." त्यादिशी शिपायानी फळा धुऊन रन्गखडूनी चांगल्या आक्शरात लेहल, "सचिन ढेरे - जिपप्रा शाळा तुर्केवाडी, जिल्हा परिषद चित्रकला स्पर्धेत तिसरा. हार्दिक अभिनंदन!"
वाचने
18033
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
+१
+१
वा! +१
+1
+१
+१
सुंदर !
+१
+१
हाय भाऊ जबरा दम कथेत. लैच
In reply to हाय भाऊ जबरा दम कथेत. लैच by अभ्या..
अभ्या, तुझाच तर आयडी नाही ना
+१
+1
आमाला पण अनुभव हाय असा.
+१ भावस्पर्शी कथा :)
जमलीय..
छान कथा!
+१
In reply to +१ by समीरसूर
+१
+१
+१
+१
+१
मस्त
मस्त मस्त मस्त
+१
सर्वांचे खूप आभार…
+1
+१
+१
+१
+१ आवडली
+ १. कथा आवडली. पण रुपाया
+१
मस्त
+१
+१
मस्तच!
.
+१
छान लिहिलीये! मस्त!
+१
+१
+१
+१
+१
+१
अप्रतीम कथा !
+१ आवडली !