संस्कृत काव्यातील 'श्रेय नामांकन', आणि काव्यचौर्याचा निषेध
http://scroll.in नावाच्या संकेत स्थळावर Eric M Gurevitch यांचा लेख (· Jul 25, 2015 · 09:15 am ) वाचण्यात आला.
Eric M Gurevitch त्यांच्या लेखाच्या सुरवातीस म्ह्णतात The West doesn't have a copyright on proper attribution. Here's what Sanskrit commentators and anthologists have to say on the subject.
Eric M Gurevitch यांनी त्यांच्या लेखात, पाचव्या शतकात रघुवंशाच्या लेखनात कालीदासाने आपल्या पुर्वीच्या कवींना अंशतः उल्लेख केला आहे तर सातव्या शतकातील बाणाने स्वतःच्या लेखनावरील प्रभावांची श्रेयनामावली दिली पुढे हि संस्कृत साहित्यात बौद्धीक सातत्य दाखवण्याच्या दृष्टीने प्रभावांचे श्रेय नमुद करण्याची परंपरा चालू झाली, अशी माहिती दिली आहे.
दहाव्या शतकातील सोमदेव सुरीने त्याच्या यशस्तिलकामधून स्वतःपुर्वी लिहिलेले काव्य श्रद्धेने वापरा पण पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य करण्याचा निषेध केला. (म्हणजे बेसीकली पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य होत असल्याकडे सोमदेव सुरीचे लक्ष गेल्याचे दिसते)
सोमदेव सुरीनेखालील श्लोकातून काव्यचौर्याचा निषेध व्यक्त केला आहे. (संस्कृतप्रेमी जाणकारांकडून या श्लोकांचा अनुवाद करून हवा आहे)
कृत्वा कृतीः पूर्वकृताः पुरस्तात्प्रादरं ताः पुनरीक्षमाणः।
तथैव जल्पेदथ यो ऽन्यथा वा स काव्यचोरो ऽस्तु स पातकी च।। १.१३
११व्या शतकातील काश्मिरी पंडीत भिल्लणाने काव्यचोरीचा निषेध खालील श्लोकातून केला आहे.
साहित्यपाथोनिधिमन्थनोत्थं काव्यामृतं रक्षत हे कवीन्द्राः ।
यदस्य दैत्या इव लुण्ठनाय काव्यार्थचौराः प्रगुणीभवन्ति ।। १.११
१४ व्या शतकात पद्धती नावाच्या ग्रंथात सारंगधराने खालील श्लोकातून त्याचे मत प्रकट केले आहे
अन्यवर्णपरावृत्त्या बन्धचिह्ननिगूहनै ।
अनाख्यातः सता मध्ये कविश्चौरो विभाव्यते ।। १९६
उपरोकत संस्कृत श्लोकांचे मराठी अनुवाद करून हवे आहेत.
* ह्या धागालेखातील प्रतिसाद मराठी विकिप्रकल्पांसाठी वापरले जाण्याची शक्यता असल्यामुळे ते प्रताधिकार मुक्त समजले जातील
* आपल्या प्रतिसादांसाठी आणि अनुषंगिका व्यतरीक्त आवांतरे टाळण्यासाठी आभार
प्रतिक्रिया
अरे वा! उत्तम विषय.
Calling Batman
नवीन विषय आहे!
दहाव्या शतकात देखील
धन्यवाद!
तुमचे व श्री. निरंजन घाटे
एकदम सुंदर भाषांतर केलेले आहे
शेवटी .... कुठून तरी माहिती
वा! सुरेख भाषांतर!
नरेन्द्रपण्डिताचे
रोचक आणि माहितीपूर्ण
१०वी कुमारभारती
१० वी कोणते वर्ष ?
१९९५- ९६ पासून पुढील १० वर्षे
रोचक
बरोबर
रोचक माहितीसाठी धन्यवाद.
आम्हालाही होते हे प्रकरण. आणि
नंतर अकरावीला बहुतेक '
पहिलेच होते
आता पर्यंतच्या चर्चा
नरींद्रबासां भेटि अनुसरण.
शाब्बास रे ब्याट्या!!
सहीच रे ब्याट्या.