भ्रमणगाथा - ८ लाइष्टष्टाइनचा धबधबा!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
8 Dec 2008 - 12:56 am

याआधी : भ्रमणगाथा- ७

आपल्याकडे कसे अहमदनगर,नागपूर,वडगांव.. असे नगर,पूर,गाव प्रत्यय लावून गावांची नावं बनतात ना तसे बुर्ग प्रत्यय लावून जर्मन गावांची नावं तयार होतात. हामबुर्ग,वुर्झबुर्ग,साल्झबुर्ग इ. साल्झबुर्ग! साल्झ- मीठ आणि बुर्ग- शहर म्हणजे लवणपूरच म्हणा ना.. येथील ड्युर्नबेर्ग ह्या डोंगराच्या पोटात मीठाच्या खाणी आहेत त्या पहायला अर्थातच आम्ही सारे उत्सुक होतो. वेळाचं गणित कसं जमवायचं हाच मोठ्ठा प्रश्न होता. लिखाळमंडळींची गाडी फ्राफुहून संध्याकाळी ६.३० वाजता सुटणार होती तर इरफानची ७.१५ वाजता,म्हणून मग सक्काळी लवकर निघून लाइष्टनष्टाइनइन्क्लाम हा आल्प्समधला सर्वात लांब,खोल आणि सुंदर धबधबा पहायचा आणि मग खाणी पाहून एकच्या सुमाराला परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची असं ठरलं. त्याप्रमाणे सक्काळी लवकर उठून, आवरुन योहानाचा आणि त्या सुंदर परिसराचा निरोप घेताना परत इथे यायचेच असे प्रत्येकाच्याच मनात आले.

आम्ही धबधब्याच्या एंट्री पॉइंटपाशी पोहोचलो तेव्हा तिकिटखिडकी उघडायला थोडा वेळ होता. बाजूलाच असलेल्या छोट्याशा पार्कातले झोपाळे, डुलणारे घोडे पाहून सगळे जण मूलाहून मूल होऊन तिथे धावले. तिथे एवढावेळ फक्त पक्षीरवच काय तो होता आणि अचानक आमच्या कलकलाटाची भर पडली.

बहुदा आमच्या आवाजानेच खिडकीवरच्या माणसाने लवकर दार उघडून आम्हाला तिकिटे देऊन आत पिटाळले आणि आमच्या गोंगाटातून सुटला एकदाचा..

एका बाजूला उंचच उंच आल्प्स आणि दुसर्‍या बाजूला खोल दरी.. हिरवी पिवळी केशरी झाडं डोंगरमाथ्यावरही होती आणि खाली दरीतही..कच्च्या रस्त्यावरुन आम्ही चढायला सुरुवात केली.थोडे वर गेल्यावर एक लाकडी साकव लागला. कुठेही कृत्रिम बांधकाम वाटणार नाही, त्या निसर्गाचा तोल बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन रस्टिक फिल देऊन तेथील दोन्ही तिन्ही पूल बांधले आहेत,तीच गोष्ट दोन्ही बोगद्यांची आणि दगडी आणि लाकडी पायर्‍यांची..थोडे अजून वर चढल्यावर पाण्याचा खळाळता आवाज ऐकू येऊ लागला.

ग्रोसारल नदीत उडी घेणारा,शेकडो वर्षांच्या स्थित्यंतरांनी तयार झालेला हा जलप्रपात पहायला आतुर झालेल्या पावलांचा वेग आपसूकच वाढला.लाइष्टनष्टाइनचा उमराव जॉन (दुसरा) ह्याच्या आर्थिक मदतीने पैशाअभावी बंद पडलेले येथील डोंगरातील बांधकाम इस. १८७६मध्ये पूर्ण झाले आणि कृतज्ञता म्हणून 'लाइष्टष्टाइनक्लाम' हे नाव दिले गेले.अनुपम सॄष्टिसौंदर्य लाभलेला हा प्रपात म्हणजे लवणपूराची शान आहे!

तो नजारा डोळ्यात साठवून घेत आम्ही वर चढत होतो. शेवाळंभरले दगड,पाण्याच्या आघाताने गुळगुळीत झालेले खडक त्या प्रवाहात दिसत होते.काही ठिकाणी इतके उंच आणि निमुळते डोंगरसुळके की आकाशाचा चतकोर निळा तुकडाच चुकारपणे दिसावा आणि त्या निळाईशी स्पर्धा करणारे खाली खोल वाहणारे खळाळते पाणी..

दुपारच्या वेळी सूर्यदेवांची कृपा असेल तर तेथे मनोहारी इंद्रधनुची रांगोळीही उमटते.सृष्टीचे ते सारे नवल पाहत आम्ही बोगदा ओलांडून पुढे गेलो आणि एका वळणावर त्याचे ओझरते दर्शन झाले.कितीतरी वेळ तिथेच त्या निसरड्या पायर्‍यांवर उभे राहून भारल्या अवस्थेत पाहतच राहिलो.

काही वेळाने त्या गारुडातून जागे होऊन पुढे चढू लागलो.खळाळत्या पाण्याखेरीज आता कसलाच आवाज नव्हता. दुसरा बोगदाही ओलांडून आम्ही पुढच्या वळणावर पोहोचलो आणि 'तो' सामोरा आला.कितीवेळ त्याच्याकडे पाहत राहिलो, मग भानावर येऊन त्याला सामोरा,पाठीशी ठेवून भरपूर फोटो काढून घेतले.

नायाग्रा किवा इग्वासुसारखा हा अतिभव्य धबधबा नाही. त्याच्या तुषारात भिजायला नेणारी धुक्याची पोर नाही. आल्प्स खोदून निमुळत्या डोंगरसुळक्यांतून निसटून खाली ग्रोसारल नदीकडे झेपावणारा हा धबधबा उंचीला उत्तुंग आणि खोलीला अथांग आहे. कधी रंगीत तरी कधी हिरव्या झाडांचा पोषाख ल्यालेला आल्प्स दुधाच्या धारा घेऊन येतो आणि आपल्याला आमोरासामोरा भेटतो,एखाद्या मित्रासारखा! हिवाळ्यात आल्प्सने बर्फाची दुलई गुरफटून घेतली की इथला मार्गही बंद. धबधबा तर गोठतोच पण ह्या चढणवाटेने त्याला भेटायला येणं अशक्य होऊन जातं. वसंतात पुन्हा पाणी खळाळू लागतं आणि ते थेट शिशिराची चाहूल लागेपर्यंत.. तेथून हलूच नये असं वाटत होतं पण लवणखाणींकडेही जायचे होते. नाईलाजाने त्याला ऑफ विडर सेझेन (पुन्हा भेटूया) म्हणून आम्ही ड्यूर्नबर्गकडे निघालो.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

8 Dec 2008 - 4:41 am | मदनबाण

आयला सॉलिडच आहे..निसर्ग माणसाला किती भरभरुन देतो त्याची कल्पनाच करता येत नाही..धबधब्याचा आवाज एक वेगळाच परिणाम करतो..वृतांत आणि फोटो सुंदरच.. :)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

प्राजु's picture

8 Dec 2008 - 6:05 am | प्राजु

वृत्तांत निवांतपणे वाचून मग सविस्तर प्रतिसाद लिहिन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

8 Dec 2008 - 7:58 am | सहज

ही पण व्हि आय पी टुर झाली की. तुम्हा लोकांशिवाय कोणी दिसत नाही आहे. :-)

फोटो, वर्णन सहीच.

विसोबा खेचर's picture

8 Dec 2008 - 9:26 am | विसोबा खेचर

मजा सुरू आहे बा तुम्हा लोकांची! :)

यशोधरा's picture

8 Dec 2008 - 9:31 am | यशोधरा

मस्तच गं!

स्वातीताई तुम्ही वर्णन पण झक्कास करता. खुप छान माहिती मिळते तुमचे प्रवासवर्णन एकुन. पुढे कधी नशिबाने तिकडे फिरायला गेलो तर तुमची माहिती नक्की उपयोगी पडेल. बाकी त्या बागेतल्या झोपाळ्याची अवस्था नतंर कशी होती? =))
लहान लहान मुले खेळताना दिसली म्हणुन विचारले.
वेताळ

ऋषिकेश's picture

8 Dec 2008 - 11:47 am | ऋषिकेश

सुंदर हिरवे उद्यान, तिथे उद्यानातील खेळणारी (जराशी मोठी) बालके ... तो तिकीटधारी .. त्याची संतस्त्र मुद्रा! सगळं डोळ्यासमोर आलं ;)

बाकी हा धबाबा लै आवडला :)

-(गोंधळलेला) ऋषिकेश

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Dec 2008 - 2:08 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरी धबधबा... आणि तिथे जायची वाट पण.

बिपिन कार्यकर्ते

शाल्मली's picture

8 Dec 2008 - 3:09 pm | शाल्मली

स्वातीताई,
आपल्या ट्रीप जशी सुंदर आणि प्रेक्षणीय झाली तसाच हा वृत्तांत वाचनीय झाला आहे. :)
बाकी धबधबा फारच मस्त होता.

--शाल्मली.

चित्रा's picture

8 Dec 2008 - 6:56 pm | चित्रा

वर्णन आणि धबधबा छान.

सुनील's picture

8 Dec 2008 - 5:11 pm | सुनील

वर्णन आणि फोटो सुंदर.

लाइष्टनष्टाइनचा उमराव जॉन (दुसरा) ह्याच्या आर्थिक मदतीने पैशाअभावी बंद पडलेले येथील डोंगरातील बांधकाम इस. १८७६मध्ये पूर्ण झाले आणि कृतज्ञता म्हणून 'लाइष्टष्टाइनक्लाम' हे नाव दिले गेले

अवांतर - लाइष्टनष्टाइन किंवा पर्यायी उच्चार लाइखटन्ष्टाइन (Liechtenstein) हा स्विट्झरलंड आणि ऑस्ट्रिया यांच्या मध्ये वसलेला एक चिमुकला स्वतंत्र देश. रस्त्याने जाताना तुम्हाला जरा डुलकी लागली , तर देश कधी आला आणि गेला हे समजणारही नाही, असा विनोद सांगितला जातो!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

झकासराव's picture

8 Dec 2008 - 5:51 pm | झकासराव

मस्त फोटू आहेत सगळे. :)
धबधबा क्लासच आहे, तिकडे जाणारी वाट मला लयीच आवडली.
स्वाती तैच वर्णन नेहमीप्रमाणेच मस्त. :)

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

नंदन's picture

9 Dec 2008 - 2:28 am | नंदन

असेच म्हणतो, मस्त वर्णन.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

9 Dec 2008 - 2:42 am | धनंजय

असेच म्हणतो.
क्लास फोटो, मस्त वर्णन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2008 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्याकडे कसे अहमदनगर,नागपूर,वडगांव.. असे नगर,पूर,गाव प्रत्यय लावून गावांची नावं बनतात ना तसे बुर्ग प्रत्यय लावून जर्मन गावांची नावं तयार होतात. हामबुर्ग,वुर्झबुर्ग,साल्झबुर्ग इ. साल्झबुर्ग! साल्झ- मीठ आणि बुर्ग- शहर म्हणजे लवणपूरच म्हणा ना..

मस्त !

डुलणार्‍या घोड्यांवर बसलेल्या मंडळींना पाहून घोड्यांची दया आली :)

फेसळणारा धबधबा आणि वर्णन नेहमीप्रमाणेच सुंदर !!!

-दिलीप बिरुटे

मनस्वी's picture

8 Dec 2008 - 6:48 pm | मनस्वी

छानच आहे धबधबा, आणि त्याच्याकडे नेणारा मार्ग अजूनच मजेशीर!

चतुरंग's picture

9 Dec 2008 - 2:54 am | चतुरंग

फोटूही सुंदर आलेत. लाकडी साकवाने वातावरणाचा नैसर्गिकपणा टिकून रहातो हे खरे.
घोड्यांवरची आणि झोपाळ्यावरची 'बालके' बघून ते बनवणार्‍या कंपनीचे कौतुक वाटले! ;)

(मला गिरसप्पाची आठवण झाली तो ही असाच खोल दरीत उतरुन बघावा लागतो. अप्रतिम नजारा!)

चतुरंग

रेवती's picture

9 Dec 2008 - 4:25 am | रेवती

धबधबा आवडला. लेखही छान झालाय, नेहमीप्रमाणे.
हा शेवटचा भाग नसावा अशी अपेक्षा.
अजून सगळ्यांना परत फ्राफूला यायचे आहे. येताना काय गप्पा झाल्या,
आणि फोटोही.

रेवती

शितल's picture

9 Dec 2008 - 8:15 am | शितल

स्वाती ताई,
धबधब्याचे फोटो तर केवळ अप्रतिम टिपले आहेस.
आणि त्याचा पर्यतचा प्रवास ही अगदी छान लिहिला आहेस. :)

धमाल मुलगा's picture

9 Dec 2008 - 12:03 pm | धमाल मुलगा

त्या राकलेटाच्या नादात हा धागा पहायचा राहुनच गेला की!

स्वातीताई, लै भारी गं :)

सह्ही धबधबा आहे..आणि फोटो तर मस्तच.
बाकी, केसु आणि डान्या ह्यांचे झोपाळ्यावरचे फोटो पाहताना असं वाटतंय की पायाखालची ती पानं पाघरलेली जमीन खरी नाहीच्चे! स्टुडिओमध्ये त्यांचा फोटो काढलाय असं वाटतंय :)
असो,

ह्या धबधब्याला पहायचं म्हणजे असं लांबूनच पहायला देतात का? की नायगारा/नायाग्रा सारखं जवळही जाता येतं?
बहुतेक नसावं, नाहीतर डान्या तिकडं आलाच नसता...भांग विस्कटेल म्हणुन :D

सोनम's picture

9 Dec 2008 - 1:18 pm | सोनम

प्रवासाचे वर्णन चा॑गले केले आहे. आणि त्यात चित्राची भर त्यामुळे अति उत्तम . :S :S :S :S :S :S

(पुण्याची सोनम) राम राम मिपा

मिंटी's picture

9 Dec 2008 - 6:21 pm | मिंटी

मस्तच गं स्वाती ताई..... नेमहीप्रमाणेच सुंदर वर्णन :)
धबधबा तर केवळ अप्रतीमच :)

सर्वसाक्षी's picture

9 Dec 2008 - 8:33 pm | सर्वसाक्षी

मन प्रसन्न करणारी चित्रे.

लिखाळ's picture

9 Dec 2008 - 10:24 pm | लिखाळ

मस्त वर्णन आणि चित्रे :)
वाचताना पुन्हा एकदा सर्व आठवून मजा आली.
-- लिखाळ.

भडकमकर मास्तर's picture

10 Dec 2008 - 12:07 am | भडकमकर मास्तर

मस्त लेख...
... असं फिरायला मजा येतेय... योग्य जागी उत्तम फोटो आणि मोजक्या वाक्यांत मस्त वर्णन...

एक शंका...
त्या धबधब्याकडे जाणार्‍या वाटेवर संगम सिनेमामधल्या राज्-वैजयंतिमालावरील एका प्रसंगाचे शूटिंग झालंय का? असं काहीसं पाहिल्याचं आठवतंय...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

12 Dec 2008 - 12:40 am | स्वाती दिनेश

सहजराव, आम्ही तिकिटवाल्याला खिडकी उघडायला लावली. एवढ्या सक्काळी,त्यातून रविवार.. कोण येणार? आम्ही परतताना मात्र लोक रांग लावून उभे होते. पण आमची व्हीआयपी टूअर झाली खरी..:)
सुनील, लाइष्टनष्टाइनच्या माहितीबद्दल धन्यवाद.
मास्तर, तो संगमवाला धबधबा हा नव्हे, तो स्वीस आणि ऑस्ट्रीयाच्या सीमेवर आहे.
सर्व मिपाकरांना भ्रमणमंडळाच्या वतीने मनापासून धन्यवाद,
लवणखाणी अर्थात सॉल्ट माइन्स येथे पहा.
स्वाती

सुवर्णमयी's picture

12 Dec 2008 - 12:54 am | सुवर्णमयी

स्वाती, मस्त वर्णन. आवडले. छायाचित्रे सुद्धा सुरेख आहेत.
सोनालि