✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नवीन दोस्त

त
तुडतुडी यांनी
Wed, 07/15/2015 - 17:12  ·  लेख
लेख
लहानगा चिंटू खूप खुष होता . किती दिवसांनी त्याला नवीन दोस्त मिळाला होता . आजीलाही ह्या पोराला खेळायला कोणी मिळालं म्हणून बरं वाटलं . नाहीतर किती दिवस नुसत्या त्याच त्याच गोष्टी सांगून त्याला रमवणार. पण गोष्टी त्याच त्याच असल्या तरी आजीची सांगण्याची हातोटीच अशी होती कि चिंटूला त्या पुन्हा पुन्हा ऐकायला आवडत. चिंटू झोपायला त्रास देवू लागला कि मात्र आजी स्वताच्या मनानेच काहीतरी नवीन गोष्ट तयार करून त्याला ऐकवी .गोष्ट सांगितल्यावर मुकाट झोपण्याच्या अटीवर . चव्हाण कुटुंब त्या घरात राहायला आलं . घर बैठ्या पद्धतीच होतं . आजूबाजूची घरंही बैठीच . मिस्टर आणि मिसेस चव्हाण खुश होते . कमी भाड्यात ऐसपैस , हवा खेळती असलेलं घर मिळालं म्हणून मिस्टर चव्हाण . तर आजूबाजूला मोकळी जागा आहे म्हणून मिसेस चव्हाण. त्यांना बागेची आवड होति. आता सुगंधी फुलांची झाडं लावता येतील म्हणून त्यांना बरं वाटलं. चव्हाण दाम्पत्याला दीपक नावाचा छोटा मुलगा होता . साधारण चिंटू च्याच वयाचा . नुकतीच दीपक च्या शाळेला उन्हाळ्याची मोठी सुट्टी लागली होती . चिंटू आणि दीपक ची छान मैत्री जमली . आई कामात गढलेली असली कि हे दोघेही खेळण्यात गढून जात . आई झोपलेली असली कि दीपक चिंटूला खेळायला बोलवे .चिंटू त्याला बाहेर हि घेवून जावू लागला. कसल्या कसल्या लपण्याच्या जागा दाखवू लागला . कसली कसली खेळणी दाखवू लागला. आईने दीपकला जेवायला खायला बोलावले कि चिंटू जायला निघे. दीपक ने आग्रह केला तरी थांबत नसे. आजीने सांगितलाय कोणाच्या घरी काही खवू नये म्हणून .तुझी आई माझ्याशी खेळताना बघून तुला रागवेन म्हणून चिंटू आईचं लक्ष नसताना खेळायला येई . हल्ली आजीला जरा काळजीच वाटू लागली होती . हे पोरगं वेळी अवेळी खेळायला पळतंय म्हणून. दीपक च्या आईला संशय येवू लागला होता. आई ने दीपकच्या बाबांकडे बोलूनही दाखवले . बाबांनी तिलाच वेड्यात काढले . चिंटू आजीच्या मागे लागू लागला . सारखं दीपक च्या आई बाबांची नजर चुकवून खेळावं लागतं. आपण दीपक ला आपल्याकडे आणूया म्हणू लागला . आजीने समजावून आणि थोडं दटाहूनही पाहिलं .पण चिंटू हल्ली हट्ट करू लागला. दीपक थोडा आजारी पडल्यासारखा झाला . औषधपाणी चालू होतं पण ताप वाढूच लागला . दीपक च विचित्र वागणं आईला अस्वस्थ करतच होतं . आताशा बाबांनाही करू लागलं होतं . आता मात्र आजीला काजळी वाटू लागली आणि चिंटूला आनंद. आजीने निर्णय घेतला . नवीन गोष्ट तयार केली . मुकाट झोपण्याच्या बोलीवर चिंटूला ती रंगवून सांगितली . पोरगं कधी पेंगुळलं आणि झोपी गेलं त्याचं त्यालाच कळलं नाही . पहाटेचे ४. ३० वाजले असावेत . आजीने दीपकच्या आई बाबांना हलवून जागं केलं .आपली ओळख सांगितली .आमचा मृत्यू ह्याच घरात झाला होता . गेल्या १५ वर्षांपासून इथंच राहतोय आम्ही. अनेक आले आणि गेले. त्यात लहान मुल कोणीच नवतं . १५ वर्षांपासून खेळायला आसुसलेला माझा नातू आता दीपक ला सोडायला तयार नाही . आपल्याकडे आणूया त्याला असं म्हणतोय .दिपकला वाचवायचं असेल तर लगेच घर सोडून जा म्हणून सांगायला आलेय . एवढं बोलून आजी अदृश्य झाली . असल्या गोष्टींवर विश्वास न ठेवणारे बाबा सुधा चपापले . चिंटू उठायच्या आताच आवरा आवरी करून ते कुटुंब घर सोडून गेलेलं बघून आजीला आनंद हि झाला आणि आता माझं लेकरू पुन्हा नवीन दोस्ताची किती वर्षे वाट पाहणार ह्याचा विचार मनात येवून दुखःही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
kathaa

प्रतिक्रिया द्या
6254 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

गद्य की पद्य ?

पगला गजोधर
Wed, 07/15/2015 - 17:15 नवीन
?
  • Log in or register to post comments

खूप मस्त आहे कथा! असा एक

जडभरत
Wed, 07/15/2015 - 17:18 नवीन
खूप मस्त आहे कथा! असा एक प्रकार मी स्वतः पाहिलेला आहे. म्हणून विश्वास बसतो.
आता माझं लेकरू पुन्हा नवीन दोस्ताची किती वर्षे वाट पाहणार ह्याचा विचार मनात येवून दुखःही.
भयानकच!!!
  • Log in or register to post comments

थोडी विस्त्रुत लिहायला हवी

जडभरत
Wed, 07/15/2015 - 17:20 नवीन
थोडी विस्त्रुत लिहायला हवी होतीत! कारण भयकथा हळूहळूच जास्त रंगत जाते. असो. आपापले मत! -भयकथांचा पंखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत

स्वतः पाहिलेला???

टवाळ कार्टा
Wed, 07/15/2015 - 17:22 नवीन
स्वतः पाहिलेला??? डिट्टेलमध्ये लिहा की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत

नाही हो भाऊ, काही अनुभव असे

जडभरत
Wed, 07/15/2015 - 17:38 नवीन
नाही हो भाऊ, काही अनुभव असे पब्लिकली शेयर करता येत नाहीत. कधी भेट झाली प्रत्यक्ष तर गप्पा मारू, तुमचाबी गैरसमज जाईल की आमी ड्वैयडी आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत

होय . पहिलीच कथा आहे सांभाळून

तुडतुडी
Wed, 07/15/2015 - 17:23 नवीन
होय . पहिलीच कथा आहे सांभाळून घ्या . आणि ती अवतरण चिन्ह , उद्गार वाचक चिन्ह पण द्यायची रहिलि. पुढच्या वेळेस प्रयत्न करेन
  • Log in or register to post comments

सांभाळून घेऊच हो !

पगला गजोधर
Wed, 07/15/2015 - 17:27 नवीन
पण ती 'काव्य' विभागात डकवली तुम्ही, हे म्हणजे साखर समजून चुकून मीठ हाताला आल्यासारखं वाटते नं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

ओह . ते कसं कुठं डकवायचं

तुडतुडी
Wed, 07/15/2015 - 17:40 नवीन
ओह . ते कसं कुठं डकवायचं माहित नाही . पहिलाच लेख आहे माझा मी पा वर.
  • Log in or register to post comments

पहिल्या प्रयत्नाच्या मानाने

उगा काहितरीच
Wed, 07/15/2015 - 20:44 नवीन
पहिल्या प्रयत्नाच्या मानाने छान जमली आहे कथा, थोडी अजून फुलवायला हवी होती. मिपाकर स्पा यांच्या भयकथा वाचा दिवसा , चार पाच माणसे आसपास असताना
  • Log in or register to post comments

सहमत +१०१

एक एकटा एकटाच
Wed, 07/15/2015 - 23:48 नवीन
सहमत +१०१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

गोष्ट आवडली.

रातराणी
Wed, 07/15/2015 - 23:53 नवीन
गोष्ट आवडली.
  • Log in or register to post comments

चांगला प्रयत्न आहे.

एक एकटा एकटाच
Wed, 07/15/2015 - 23:53 नवीन
वरील प्रतिसादांत सुचवल्याप्रमाणे खरच भयकथा किंवा गुढकथा थोड्या फ़ुलवल्या की अजुन गडद होतात. तरी पहिला प्रयत्न तो ही भयकथेचा. त्याबद्दल कौतुक. आणि पुढील लिखाणास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

छान ! भयानक

मास्टरमाईन्ड
गुरुवार, 07/16/2015 - 00:06 नवीन
भयानकरित्या छान.
  • Log in or register to post comments

आवडली

पैसा
गुरुवार, 07/16/2015 - 09:27 नवीन
कथा आवडली. शेवटची कलाटणी मस्त!
  • Log in or register to post comments

हि भयकथा असेल

ऋतुराज चित्रे
गुरुवार, 07/16/2015 - 10:24 नवीन
हि भयकथा असेल तर मी घाबरतो. कथेत संदर्भ लागत नाहीत. चिंटू आजीच्या मागे लागू लागला . सारखं दीपक च्या आई बाबांची नजर चुकवून खेळावं लागतं चिंटू दिपकच्या आईला घाबरतो हे समजले.परंतू त्याच्या बाबांना का घाबरत होता. त्यांना चिंटूचा संशय येतो असे कथेत कुठेही आढळले नाही. आजी व चिंटूच्या म्रुत्यु कशामुळे किवा कोणत्या परिस्थितीत झाला झाला हे सांगितले असते तर चिंटूचे व त्याच्या आजीच्या वागण्याचा संदर्भ लागला असता. आपला पहिलाच लेख असल्यामुळे फार काही मनाला लावुन घेउ नका. सतत लिहित रहा.
  • Log in or register to post comments

कथेत संदर्भ लागत नाहीत.

तुडतुडी
गुरुवार, 07/16/2015 - 12:31 नवीन
कथेत संदर्भ लागत नाहीत. चिंटू आजीच्या मागे लागू लागला . सारखं दीपक च्या आई बाबांची नजर चुकवून खेळावं लागतं. चिंटू दिपकच्या आईला घाबरतो हे समजले. >>> आई बाबांची नजर चुकवून खेळावं लागतं कारण चिंटू भूत आहे . हे पोरगं घरात कुठून आलं हा प्रश्न त्यांच्या आई बाबांना पडणार नाही का? चिंटू दिपकच्या आईला नाही घाबरत . तर दीपक भूताबरोबर खेळताना बघून तीच घाबरेल .मग ते इथून कदाचित निघून जातील म्हणून चिंटू आई बाबांच्या समोर येत नाही
  • Log in or register to post comments

स्पा ह्यां ची 'ते' हि मालिका

तुडतुडी
गुरुवार, 07/16/2015 - 12:36 नवीन
स्पा ह्यां ची 'ते' हि मालिका वाचली . अगदीच काल्पनिक आहे . त्यामुळे भीती नाही वाटली . हि कथा सुधा काल्पनिक असली तरी जडभरत ह्यांनी म्हणल्याप्रमाणे ती खरोखर घडूहि शकते . त्यामुळे हि मला जास्त भीतीदायक वाटते . बघा बरं तुमच्या घरात असा कोणी चिंटू किवा आजी किवा आणिक दुसरा कोणी नाही ना . :-D
  • Log in or register to post comments

कथा आवडली

स्नेहल महेश
गुरुवार, 07/16/2015 - 12:59 नवीन
शेवट मस्त केलाय
  • Log in or register to post comments

कथा जमलीये. अजुन फुलवता आली

मृत्युन्जय
गुरुवार, 07/16/2015 - 13:17 नवीन
कथा जमलीये. अजुन फुलवता आली असती. अवांतरः स्पाच्या "ते " वरच्या कमेंटचे प्रयोजन नाही समजु शकले. त्याच्याशी तुलना करुन स्वतःची प्रौढी मिरवायचे कारण तर अजुनच नाही समजले. "ते" ही एक उत्कृष्ट भयकथा आहे. अतिअवांतर: स्पावड्या माझा डु आयडी नाही. तो आणी मी एका कंपुत नाही. किंबहुना मी कुठल्याच कंपुत नाही. स्पावड्या कुठल्या कंपुत आहे की नाही ते माहिती नाही.
  • Log in or register to post comments

अवांतराशी सहमत

अमृत
गुरुवार, 07/16/2015 - 13:36 नवीन
मलापण खटकलं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

प्रयोजनः त्यांना वर कुणीतरी

स्रुजा
Fri, 07/17/2015 - 19:32 नवीन
प्रयोजनः त्यांना वर कुणीतरी कथा बरी आहे, जरा स्पा च्या कथा वाचा अस सल्ला दिलाय. त्या संदर्भात बोलल्या असाव्यात. बाकी तुमचं आणि आमचं अवांतर सेम, त्यात मी तुडतुडी चा डु आयडी अस मी लिहिलंय ;) अति अवांतरः नवीन लेखकांना अजुन बारकावे वाढवा, अजुन सब्स्टन्स येऊ द्या वगैरे सांगणं वेगळं आणि इथल्याच लोकांची उदाहरणं देऊन जरा बघा, असे सल्ले देणं योग्य वाटत नाही. नवीन लेखकांचा आत्मसन्मान उगाचच दुखावल्यासारखं होतं. सकारात्मक सुचना , सुधारणा द्याव्यात पण असं सांगु नये हे माझं वैयक्तिक मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

कथा आवडली

अमृत
गुरुवार, 07/16/2015 - 13:34 नवीन
इतरांनी म्हटल्याप्रमाणेच अजुन फुलविता आली असती. अजुन येऊ द्या.
  • Log in or register to post comments

नाही हो .आत्मप्रौढी वगेरे

तुडतुडी
गुरुवार, 07/16/2015 - 14:37 नवीन
नाही हो .आत्मप्रौढी वगेरे काही नाही . माझी कथा स्पा च्या भयकथा पुढे काहीच नाहीये हे मला माहित आहे . मी फक्त प्रामाणिकपणे सांगितलं कि काल्पनिक विषयावर असल्यामुळे मला भीती वाटली नहि. ते उत्कृष्ट कथा लिहितात ह्यात वादच नहि. मी त्यांच्या कथा शोध्तेय. पण मला फट 'ते' सापडलं . बाकीच्यांची लिंक असेल तर करा शेअर
  • Log in or register to post comments

छान आहे

Jack_Bauer
Fri, 07/17/2015 - 00:52 नवीन
आवडली पण सर्वांनी सांगितल्याप्रमाणे अजून थोडी मोठी झाली असती तर अजून मजा आली असती वाचताना.
आता माझं लेकरू पुन्हा नवीन दोस्ताची किती वर्षे वाट पाहणार ह्याचा विचार मनात येवून दुखःही.
हा शेवट मात्र खतरनाक
  • Log in or register to post comments

छान आहे कथा. आवडली. कॉन्सेप्ट

पद्मावति
Fri, 07/17/2015 - 14:59 नवीन
छान आहे कथा. आवडली. कॉन्सेप्ट मस्तच आहे. मुख्य म्हणजे भयकथा असूनही शेवटी थोडं त्या आजीविषयी ( म्हणजे त्यांच्या आत्म्याविषयी) सहानुभूतीपण वाटते. ही कल्पना जरा वेगळी आणि मस्तं वाटली.
  • Log in or register to post comments

अगदी ! भुताची पण घुसमट भावली.

स्रुजा
Fri, 07/17/2015 - 19:29 नवीन
अगदी ! भुताची पण घुसमट भावली.. कथा कॉन्सेप्ट म्हणुन खुप आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा