✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फक्त बडवे रोखण्याला

स — सटक, Tue, 07/07/2015 - 01:09
वाहिले आकाश सारे, बरसता रात्रीत काळे गंध सारे विठ्ठ्लाच्या मूर्तीचे वाहून गेले !! राहिले निर्माल्य केवळ, हरविले ते पुण्यधारे एक फत्तर बस उभा तो, भंगले देवत्व सारे !! तुम्ही ते चढवा चढावे, अन करा मिन्नती हजारे वायद्याच्या कायद्याचे, भरजरी गंडे नी दोरे !! नाक घासा पयरीवर, उंबर्यावर शीष ठेवा गंध कोरून घ्या कपाळी, दक्षिणा परि साथ ठेवा !! लाख ह्यांच्या पाद्यपूजा, लाख गोंधळ लाख फेरे फत्तराच्या मूर्तिला त्या ताटव्यांचे रोज भारे !! मागणे तुमचे नि माझे, आज कळू दे विठ्ठ्लाला कष्ट आम्ही भोगू सारे, फक्त बडवे रोखण्याला !!

प्रतिक्रिया द्या
3645 वाचन

💬 प्रतिसाद (16)

छान कविता.

एस
Tue, 07/07/2015 - 06:59 नवीन
फत्तरच्या मूर्तिला त्या ताटव्यांचे रोज भारे !!
नेमके!
  • Log in or register to post comments

.

dadadarekar
Tue, 07/07/2015 - 08:59 नवीन
छान... काही ओळीत वृत्त बिघडले आहे.
  • Log in or register to post comments

मागणे तुमचे नि माझे, आज कळू

होबासराव
Tue, 07/07/2015 - 12:16 नवीन
मागणे तुमचे नि माझे, आज कळू दे संपादकाना कष्ट आम्ही भोगू सारे, फक्त डुआयडी रोखण्याला !!
  • Log in or register to post comments

मस्त!

पथिक
Tue, 07/07/2015 - 14:10 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

कवितेचा आशय सुंदर आहे. पण

विशाल कुलकर्णी
Tue, 07/07/2015 - 14:17 नवीन
कवितेचा आशय सुंदर आहे. पण दादा दरेकर म्हणतात त्याप्रमाणे बहुतेक द्वीपदीत वृत्तभंग आहे. टायपो/शुद्धलेखनावर थोडे लक्ष द्या. काही ठिकाणचे वृत्तभंग या टायपोंमुळे झालेले आहेत. पुलेशु.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

सटक
Tue, 07/07/2015 - 17:25 नवीन
तुमचे बरोबर आहे. फालतू चुका झाल्या आहेत टायपोंच्या!! "कपाळी" ऐवजी "कपळी", "फत्तराच्या" ऐवजी "फत्तरच्या". एडिट करायचे तर कसे हे ही माहिती नाही. पुढील वेळी लक्श देईन....तो "क्ष" ही आत्ता मिळाला आहे!! इतर वृत्तभंग सांगितलेत तर तेही सुधारता येतात का बघेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

यांच्याशी संपर्क साधा.

यसवायजी
Tue, 07/07/2015 - 17:32 नवीन
यांच्याशी संपर्क साधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सटक

इतर वृत्तभंग सांगितलेत तर

विशाल कुलकर्णी
Tue, 07/07/2015 - 21:04 नवीन
इतर वृत्तभंग सांगितलेत तर तेही सुधारता येतात का बघेन. तुमची कविता 'व्योमगंगा' या वृत्तात बांधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. व्योमगंगा वृत्ताची लगावली असते गालगागा गालगागा गालगागा गालगागा आता तुमच्या कवितेतल्या द्वीपदी पाहुयात... वाहिले आकाश सारे, बरसता रात्रीत काळे गंध सारे विठ्ठ्लाच्या मूर्तीचे वाहून गेले !! यातली पहिली ओळ वृत्तात आहे. पण दुसर्‍या ओळीत "मूर्तीचे वाहून गेले" (गागागागा गालगागा ) इथे वृत्तभंग आहे. राहिले निर्माल्य केवळ, हरविले ते पुण्यधारे एक फत्तर बस उभा तो, भंगले देवत्व सारे !! यात ही पहिली ओळ वृत्तात. मात्र दुसर्‍या ओळीत "एक फत्तर" (गागालल) इथे वृत्तभंग आहे. तुम्ही ते चढवा चढावे, अन करा मिन्नती हजारे वायद्याच्या कायद्याचे, भरजरी गंडे नी दोरे !! इथे उलटे झालेय. दुसरी ओळ व्यवस्थीत वृत्तात आहे. पहिल्या ओळीत "तुम्ही ते चढवा" (गागागागा), या ओळीत मात्राही जास्त होताहेत. नाक घासा पयरीवर, उंबर्यावर शीष ठेवा गंध कोरून घ्या कपाळी, दक्षिणा परि साथ ठेवा !! इथे पहिल्या ओळीत 'पायरीवर' असे केल्यास वृत्त साधले जाईल. दुसरी ओळ वृत्तात आहे. (जर 'कोरुन' चा 'रु' र्‍हस्व असेल तर) लाख ह्यांच्या पाद्यपूजा, लाख गोंधळ लाख फेरे फत्तराच्या मूर्तिला त्या ताटव्यांचे रोज भारे !! ही द्वीपदी वृत्तात आहे. (अर्थात 'मूर्तिला' या शब्दात तुम्ही सुट घेतली आहे. कविता असल्याने चालुन जाईल, पण गझल असती तर नसते चालले. खरेतर कवितेत सुद्धा चालायला नकोय कारण ती शुद्धलेखनाची चुक आहे. तो शब्द 'मुर्तीला' असा हवा आहे) आणि आता शेवटचे कडवे.. मागणे तुमचे नि माझे, आज कळू दे विठ्ठ्लाला कष्ट आम्ही भोगू सारे, फक्त बडवे रोखण्याला !! यात "आज कळू दे" (गागागागा) आणि "भोगू सारे" (गागागागा) यामध्ये वृत्तभंग होतोय. हे जिथे जिथे वृत्तभंग झालेला आहे, तिथे तिथे ती ओळ "गालगागा गालगागा गालगागा गालगागा" मध्ये बांधता येते का पाहा. पुलेशु. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सटक

राहिले निर्माल्य केवळ, हरविले

विशाल कुलकर्णी
Tue, 07/07/2015 - 21:06 नवीन
राहिले निर्माल्य केवळ, हरविले ते पुण्यधारे एक फत्तर बस उभा तो, भंगले देवत्व सारे !! क्षमस्व , इथे 'एक फत्तर' बसतेय वृत्तात. माय मिस्टेक , क्षमस्व !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

धन्यवाद!!

सटक
Tue, 07/07/2015 - 21:13 नवीन
मला खरे तर "बस" मधील "स" चा पाय मोडायचा आहे...पण कसे करायचे ते मिळाले नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

__/\__!!

सटक
Tue, 07/07/2015 - 21:11 नवीन
तुमचे जेवढे आभार मानावे तितके थोडेच आहेत! मी ह्यावर काम करतो. पाहू काही सुधारणा करता येतात का!! परत एकदा..खूप खूप धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

_/\_

रातराणी
Wed, 07/08/2015 - 00:01 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

सुधारणा

सटक
Wed, 07/08/2015 - 00:23 नवीन
बघा जमलेय का... वाहिले आकाश सारे, बरसता रात्रीत काळे गंध सारे विठ्ठ्लाचे, गोमटे वाहून गेले !! राहिले निर्माल्य केवळ, हरविले ते पुण्यधारे एक फत्तर बस उभा तो, भंगले देवत्व सारे !! रोजचे आता चढावे, रोजच्या मिनत्या हजारे वायद्याच्या कायद्याचे, भरजरी गंडे नी दोरे !! नाक घासा पायरीवर, उंबर्यावर शीष ठेवा गंध कोरुन घ्या कपाळी, दक्षिणा परि साथ ठेवा !! लाख ह्यांच्या पाद्यपूजा, लाख गोंधळ लाख फेरे फत्तराच्या मूर्तिला त्या ताटव्यांचे रोज भारे !! (मूर्तिला हे शुद्धलेखनी बरोबर आहे असे वाटते आहे, मूळ शब्द मूर्ती) मागणे तुमचे नि माझे, पोचवा त्या विठ्ठ्लाला कष्ट आम्ही लाख भोगू, फक्त बडवे रोखण्याला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

हे वाचा.

dadadarekar
Tue, 07/07/2015 - 17:53 नवीन
http://www.maayboli.com/node/21889
  • Log in or register to post comments

मनापासून धन्यवाद!!

सटक
Tue, 07/07/2015 - 18:29 नवीन
अतिशय सुरेख माहितीचा खजिनाच उपलब्ध करून दिलात!! वाखु साठवली आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

आवडली कविता.

विवेकपटाईत
Tue, 07/07/2015 - 19:36 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा