अप्रकाशित...

सरपंच's picture
सरपंच in जनातलं, मनातलं
27 Nov 2008 - 6:24 pm

राम राम,

कायदे तज्ञांच्या सल्लामसलतीनुसार काही सुरक्षिततेच्या कारणांकरता सध्या सुरू असलेल्या मुंबईच्या हल्ल्याशी निगडीत सर्व धागे व प्रतिसाद अप्रकाशित करण्यात येत आहेत...

आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी या चर्चेत गांभिर्याने भाग घेऊन आपापली मते मांडली त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार...

कृपया सहकार्य करावे...

तात्या.

हे ठिकाणधोरणमांडणीवावरप्रकटनमाहिती

प्रतिक्रिया

विसुनाना's picture

27 Nov 2008 - 6:31 pm | विसुनाना

???

आजानुकर्ण's picture

27 Nov 2008 - 6:33 pm | आजानुकर्ण

फार तर प्रक्षोभक वाटणारे प्रतिसाद उडवावेत असे वाटते...

अनामिका's picture

27 Nov 2008 - 6:34 pm | अनामिका

काय तात्या
ऐनवेळीच घात. :S
"अनामिका"

विसोबा खेचर's picture

27 Nov 2008 - 6:38 pm | विसोबा खेचर

प्रश्न घाताचा नाही.. प्रत्येक गोष्टीला काही एक बाजू असतात आणि त्यावर आधारितच सदर निर्णय घेतला गेलेला आहे..उगाचच्या उगाच सगळे धागे अप्रकाशित करायला मी मूर्ख नाही..

कायद्याच्या काही एक बाजू समजून घेतल्यानंतर काही लेखन पुन्हा प्रकाशित करण्यात येईल..

कृपया मिपाकरांनी सहकार्य करावे...

तात्या.

विसोबा खेचर's picture

27 Nov 2008 - 6:35 pm | विसोबा खेचर

हा निर्णय उगिचंच किंवा बेजबादारपणे घेतलेला नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.. मी स्वत: सुरू केलेले धागेही अप्रकाशित केले आहेत..

तात्या.

अनामिका's picture

27 Nov 2008 - 6:49 pm | अनामिका

बरे केलेत आता पुन्हा सुरु करे पर्यंत वाट बघु
"अनामिका"

व्यंकु's picture

27 Nov 2008 - 6:53 pm | व्यंकु

बरं केलत नाहीतर आपली एक एक वक्तव्ये बघून 'त्यांच्या' आधी आपल्यालाच मोक्का लावला असता

अनंत छंदी's picture

27 Nov 2008 - 6:56 pm | अनंत छंदी

अशा आणिबाणीच्या परिस्थितीत सर्व धागे बंद करण्याचा निर्णय घेण्यामागे कारणही तसेच असेल, ज्या प्रमाणे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीला संपादक जबाबदार ठरतात त्याप्रमाणे तात्या या संकेस्थळावरील मजकुराला जबाबदार ठरत असावेत, त्या मुळे त्यांनी घेतलेला निर्णय आपण सर्वांनी मान्य करायला हवा. घडलेला प्रकार चीड आणणारा आहे हे निर्विवाद, पण आपल्या प्रतिक्रियांचा दुष्परिणाम या संकेतस्थळावर होता कामा नये, त्या उलट हे संकेतस्थळ आपल्यापरीने आपद्ग्रस्ताना मदत कशी करू शकेल पाहिले पाहिजे. त्या दृष्टीने मी कृती करूया हा धागा सुरू केला आहे तो पाहून काय करता येईल यावर विचार करून प्रत्यक्ष कृती करण्यास सुरुवात करुया असे मला वाटते.

विसोबा खेचर's picture

27 Nov 2008 - 7:10 pm | विसोबा खेचर

पण आपल्या प्रतिक्रियांचा दुष्परिणाम या संकेतस्थळावर होता कामा नये, त्या उलट हे संकेतस्थळ आपल्यापरीने आपद्ग्रस्ताना मदत कशी करू शकेल पाहिले पाहिजे.

समजून घेतल्याबद्दल धन्यवाद..

या उदाहरणावरून एक महत्वाचा मुद्दा समोर येतो तो असा की मिपाकर कुठल्याही सामाजिक, राजकीय समस्येवर अगदी त्वरीत आपली मते नोंदवून हे संकेतस्थळ सामाजिक/राजकीय दृष्ट्या जागृत असल्याचाच प्रत्येय देतात. ही अत्यंत चांगलीच बाब आहे याबद्दल दुमत नाही..परंतु काही वेळेला कायद्याच्याही काही बाजू पाहाव्या लागतात.. खास करून मुंबईत अद्यापही संपूर्णपणे युद्धजन्य परिस्थिती असतांना काही गोष्टी सांभा़ळाव्या लागतात..

या निमित्ताने मिपाचे आभासी अस्तित्व आणि त्या संदर्भातील कायद्याची बाजू किंवा एखादी व्यवसायिक लीगल टीम/सल्लामसलतकार सध्या तरी मिपाकडे नाहीत.. अर्थात, भविष्यात याचाही विचार अगदी अवश्य केला जाईल एवढीच ग्वाही सध्या देऊ इच्छितो..

त्याचप्रमाणे एखाद्या वृत्तसमुहाइतकी ताकद आजतरी मिपाकडे नाही हाही एक मुद्दा आहे..

त्यातूनही हे सर्व धागे पुरेसा कालावधी मिपावर होते आणि त्यावर अगदी भरभरून आणि महत्वाची चर्चा झाली होती हा मुद्दाही लक्षात घेतला पाहिजे..

त्या दृष्टीने मी कृती करूया हा धागा सुरू केला आहे तो पाहून काय करता येईल यावर विचार करून प्रत्यक्ष कृती करण्यास सुरुवात करुया असे मला वाटते.

आततायीपणेच विचार केला असता तर हा धागाही अप्रकाशित केला असता, परंतु तसे केलेले नाही हे सहज लक्षात यावे..!

असो.. याहून अधिक कुठले स्पष्टीकरण मी देऊ शकेन असे मला वाटत नाही.. तरीही घेतलेल्या निर्णयबद्दल जर कुणाची काही असहमती असेल तर तूर्तास तरी मी फक्त त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू शकतो..

तात्या.

सरपंचांचा अत्यंत योग्य निर्णय!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

इनोबा म्हणे's picture

27 Nov 2008 - 7:17 pm | इनोबा म्हणे

सहमत आहे.
अशावेळी सर्वांनी सहकार्याने वागावे असे वाटते.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

इनोबा म्हणे's picture

27 Nov 2008 - 7:17 pm | इनोबा म्हणे

सहमत आहे.
अशावेळी सर्वांनी सहकार्याने वागावे असे वाटते.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विकास's picture

27 Nov 2008 - 7:18 pm | विकास

मिपा आणि तात्यांना व्यक्तिशः काही त्रास होवू नये म्हणून ह्या निर्णयास पाठींबा.

मात्र इंटरनेट हे मुक्त माध्यम आहे आणि तेथे विचार व्यक्त करण्यात जगभर काही गैर अथवा बेकायदेशीर धरले जात नाही. त्यामुळे निर्णयाला नाही पण अशा सल्ल्याला असहमती आहे.

विचार करा, म.टा., सकाळ आदी माध्यमे आणि येथे (अमेरिकेत) तर अनंत माध्यमे त्यांच्या संकेतस्थळावर वाचकांना विचार मांडून देतात तर मिपाने काय घोडे मारले?

असो, मी माझा एक प्रतिसाद अप्रसिद्ध केला आहे.

अवलिया's picture

27 Nov 2008 - 7:25 pm | अवलिया

हेच म्हणतो

तरी पण तात्यांचा निर्णय मान्य

-- अवलिया

http://awaliyaonweb.blogspot.com/

अवलिया's picture

27 Nov 2008 - 7:25 pm | अवलिया

हेच म्हणतो

तरी पण तात्यांचा निर्णय मान्य

-- अवलिया

http://awaliyaonweb.blogspot.com/

परिकथेतील राजकुमार's picture

27 Nov 2008 - 7:45 pm | परिकथेतील राजकुमार

पुर्णपणे सहमत !!

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

अभिजीत's picture

27 Nov 2008 - 8:40 pm | अभिजीत

तात्यांनी घेतलेल्या भूमिकेशी सहमत.

- अभिजीत

प्राजु's picture

27 Nov 2008 - 8:57 pm | प्राजु

अतिशय योग्य निर्णय..
मी आपल्या या निर्णयाचे स्वागत करते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

एकलव्य's picture

28 Nov 2008 - 6:22 am | एकलव्य

काळजी घ्या...

कलंत्री's picture

28 Nov 2008 - 10:32 pm | कलंत्री

सध्याचा काळात माहितीचा ( खर्‍या / अफवा / खोट्या / पूर्वग्रहदुषित) स्फोट होत असतो. बरेच लोक संवेदनशील असतात. त्यांच्या काळज्या / व्यथा / विचार अशा वाद / संवादातून आपसूकच दुर होत असतात.

बरे अशा चर्चेतून मतमतांतरेच व्यक्त होत असतात.

तरीपण एकदा निर्णय घेतल्यावर त्यावर आपण अंमलबजावणी केलीच पाहिजे.

आबा पाटिल जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपले लिखाण स्थगित.

अतिरेक्यांच्या हल्ल्याचा मिपावरही परिणाम झालातर....

"गांधीवादातून अतिरेक्यांचा खातमा कसा करता येईल" या माझ्या लेखाला तोपर्यंत ताटकळत राहावे लागेल.

अनंत छंदी's picture

29 Nov 2008 - 11:23 am | अनंत छंदी

कलंत्रीजी
तुमचा "गांधीवादातून अतिरेक्यांचा खातमा कसा करता येईल" हा लेख वाचण्या इच्छा अनावर झाली आहे कृपया मला खरड कराल का?

विसोबा खेचर's picture

29 Nov 2008 - 11:29 am | विसोबा खेचर

इथे प्रकाशित केला तरी चालेल..

विकास's picture

29 Nov 2008 - 11:33 am | विकास

"खातमा" हा शब्द गांधीवादात शोभेल असे वाटत नाही :-)

कलंत्री's picture

29 Nov 2008 - 6:54 pm | कलंत्री

गांधीनी शिक्षणाच्या प्रयोगाला नयी तालिम असा शब्द दिला / प्रचलित केला होता.

मुख्य म्हणजे आपल्याकडे काही विचारधारा असावी. शेवटी अतिरेकीही माणसेच असतात आणि त्यांना भरकटवले जाते. आपण अतिरेक्यांचे वय पाहिले तर ती तरुण ( २०/२५च्या वयात) आणि विवेकाला पारखी असलेली मुले असतात. आता येथे पट्टीचे लोक असतांना गांधीवादाने खरेच का ही विचारधारा वश / निष्प्रभ होऊ शकते असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे.

असो. तात्यांनी परवानगी दिल्यामुळे आता काहीतरी विचार करावाच लागेल. ( नाहीतर झाकली मूठ सव्वालाखाची असे करता आले असते.)

विसोबा खेचर's picture

29 Nov 2008 - 12:38 am | विसोबा खेचर

या संबंधात अप्रकाशित केले गेलेले लेखन तूर्तास पुन्हा प्रकाशित करण्यात येत आहे.. अर्थात, संबंधित लेख आणि त्याला आलेले प्रतिसाद गरज वाटल्यास पुन्हा संपादित किंवा अप्रकाशित करण्याचा हक्क राखून ठेवण्यात येत आहे..

सर्व संपादकांना विनंती - कृपया या लेखांना आलेले प्रतिसाद वेळ मिळेल तसे नजरेखालून घालावेत. मूळ विषय (मुंबईतील युद्धजन्य परिस्थिती) अत्यंत गंभीर असल्याने सारासार विचाराने ठरवून कुठलेही भडक/अवांतर/विषयांतर करणारे प्रतिसाद अप्रकाशित करावेत ही विनंती..

तात्या.

वेताळ's picture

29 Nov 2008 - 11:40 am | वेताळ

हम तुम्हारे साथ है. समजु शकतो आपली भावना.
वेताळ