शहरात राहात असूनही सुदैवाने सकाळ उजाडते ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने. बुलबुलची साद, दयाळचा सूर, इवल्याश्या सनबर्डसचा चिवचिवाट, तांबटाचा टिकटिकाट, देवकावळ्याचे घुमणे, किंगफिशरचा किर्किरात, चिमण्यांची चिवचिव आणि सर्वांवर टिपेला जाणारा पोपटांचा कलकलाट. तसे पोपट पूर्वीपासूनच आहेत पण गेल्या पाच एक वर्षात त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. निलगिरी, सुबाभुळ, शेकट, सोनमोहर अशा अनेक झाडांवर ही मंडळी वावरताना दिसतात. एकाने साद घालायची, तिघा चौघांनी प्रतिसाद द्यायचा, मग सर्वांनी कलकलाट करायचा आणि मग एकसमयाव्च्छेदेकरुन सर्वांनी थव्याने उडुन जायचे हा नित्यक्रम.
पक्षी हा मुक्त व स्वच्छंद विहरतानाच छान दिसतो. पक्ष्यांना पिंजर्यात डांबणे यासारखे क्रौर्य नाही. पोपट पिंजर्यात ठेवलेला पाहवत नाही. विशेषतः जेव्हा पोपटांना असे विहरताना पाहतो तेव्हा पिंजर्यातल्या पोपटांची फार दया येते. इथे दिसणारे पोपट हे एकत्र राहात असले तरी ते भिन्न प्रजातींचे असावेत. काही पोपट पोपटी हिरवे तर काही निळसार झाक असलेले. पिल्ले कंठ न फुटलेली व हलक्या पोपटी व पिवळसर रंगांची. यांनी घारींची फार भिती वाटत असावी. कावळ्यांचा उपद्रव तर असतोच. पण तरीही हे पोपट मोठ्या डौलात झाडांवर बसतात, रुबाबात वावरतात. लाल तुर्यांची फुले यांना नाश्त्याला फार आवडतात.
सकाळी काचा सरकावाव्यात तो फळांनी झाड लगडावे तसे पोपटांनी बहरलेले दिसते. पोपट घरटी करत नाहीत, ते ढोल्यांमध्ये राहतात असे ऐकुन आहे. पण सकाळी भल्या पहाटेपासून मंडळी झादावर वावरताना दिसतात. अनेक वर्षे वावरुन सरावलेले हे पोपट आता निर्धास्त पणे कठड्यावर वा छज्जावर येउन बसतात. वरुन खाली सरळ गेलेली डिशची केबल हा त्यांचा झोपाळा. या केबलवर लटकुन चौकसपणे घरात डोकावणे हा यांचा नित्यक्रम. आता सकाळी चिमण्यांना तांदूळ टाकण्याबरोबर पोपटांच्या लीला पाहणे हा एक नवा छंद जडला आहे. घरबसल्या टिपलेली ही काही चित्रे.
सकाळ झाली. झाड गजबजलं
"ऐकल का?' - बित्तंमातम्या सुरू
खबरबात कान देउन ऐकताना
"फोटो घेताय? घ्या"
कावळे वा घारीची चाहूल लागताच झेपावण्याच्या तयारीत
फांदीवर फिरताना
छोटु
कोवळ्या उन्हाच्या प्रतिक्षेत
परिसराची पाहणी
आळस! आज कामावर दांडी माराय्चा विचार दिसतोय
छोटू अजुन झोपेतून पुरता जागा झाला नसावा
फांदीवर बसून खालच्या झाडावरची पुले शोधताना
"सावधान' पवित्र्यात
उड्डाणाच्या तयारीत
उच्चावलोकन
प्रतिक्रिया
26 Apr 2015 - 8:08 pm | चुकलामाकला
अरे वा! भाग्यवान आहात!
26 Apr 2015 - 8:45 pm | एक एकटा एकटाच
छान फ़ोटो आले आहेत
26 Apr 2015 - 8:46 pm | टवाळ कार्टा
१ शंका...पोपट चावतो कै?
26 Apr 2015 - 8:52 pm | नंदन
या ओळी आठवल्या.
29 Apr 2015 - 5:37 am | यशोधरा
:)
26 Apr 2015 - 9:33 pm | शिव कन्या
भारी आलेत सगळे राघवदास!
28 Apr 2015 - 6:13 pm | स्वामिनी
अप्रतिम
28 Apr 2015 - 7:43 pm | एस
छान फोटो!
28 Apr 2015 - 7:50 pm | पॉइंट ब्लँक
मस्त. नशीबवान आहात :)
29 Apr 2015 - 2:08 am | कंजूस
हे तर पोपटपुराण !जनातलं मनातलं/स्वच्छंद १या नावामुळे लक्ष गेलं नव्हतं. मस्त फोटो अन मथळे .
11 May 2015 - 9:41 pm | कंजूस
मस्त फोटो अन मथळे .
30 Apr 2015 - 12:14 am | सर्वसाक्षी
गेले दोन दिवस बएंगलुरूत पाट्या टाकल्या
28 Apr 2015 - 10:38 pm | सुबोध खरे
सर्वसाक्षी साहेब
तुम्ही राहता कुठे? तुमच्या घरी एक मिपा कट्टा करू. सर्व खर्च आमचा.
आरामात खाऊ पिऊ. पक्षी निरीक्षण करू.
30 Apr 2015 - 12:17 am | सर्वसाक्षी
डॉ. साहेब
आमचे भाग्य उजाडले. एखाद्या, शक्य झाल्यास येत्या रविवारी जमवुया. अवश्य या.
28 Apr 2015 - 10:59 pm | स्वाती दिनेश
साक्षीदेवा, शुकमहाराजांचे फार छान फोटो!
स्वाती
28 Apr 2015 - 11:06 pm | किसन शिंदे
हे क्काय, सगळे पोपटांचेच फोटो? मला वाटलं वर उल्लेख सगळ्याच पक्ष्यांचे फोटो पाहायला मिळतील. बाकी पोपटांच्या भावमुद्राही छान आहेत.
28 Apr 2015 - 11:08 pm | पिवळा डांबिस
मस्त आहेत फोटो!
29 Apr 2015 - 1:00 am | श्रीरंग_जोशी
आजकाल असे मुक्त पोपट बघायला मिळत नाहीत... :-(
खरंच नशीबवान आहात. या लेखनाबद्दल धन्यवाद.
29 Apr 2015 - 5:04 am | जुइ
फारच सुंदर!!!
29 Apr 2015 - 5:38 am | यशोधरा
मस्त! बंगारु तिरुपतीलाही देवळापासच्या झाडाच्या ढोल्यांमधून असेच थव्याने पोपट पाह्यले होते, त्याची आठवण झाली!
29 Apr 2015 - 9:20 am | चिनार
छान फोटो!
29 Apr 2015 - 9:30 am | मदनबाण
झकास्स्स्स... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Nepal earthquake: humanitarian crisis engulfing 8 million people – rolling report
29 Apr 2015 - 10:13 am | स्पंदना
माझ्याकडे किंग पॅरट्स असतात बाहेरच्या फिओजाच्या झाडावर. ही फळं वर्णन न करता येण्याच्या चवीची आहेत. मी आपली सांगायच म्हणुन साधारण पेरुसारखी म्हणते, पण फार वेगळी अन अॅडीक्ट करणारी चव या फळांची!! तर हे सगळे महाशय तेथे येउन अगदी लुटु लुटु चालत एक एक फळ तोडुन ते हातात धरुन (तेच ते एका पायाच्या पंजात) निवांत खात बसतात, मग अर्ध मुर्ध खाउन टाकुन देतात अन पुन्हा नविन फळ. त्यांच्या बरोबर गल्लाह्ज पण येतात. पण गल्लाह्ज झाडाच्या खाली चरत असतात. मग उरले मॅगपाय!! यांना मात्र काहीही चालत. त्यातला एक "काय मालकिण बाई? आज पाणी नाही बर्ड बाथ मध्ये!! नाही म्हंटल आंघोळ राहू दे, निदान प्यायला घोटभर ठेवा! शोभा येइल!!" अस पुणेरी बाण्याने मला सुनवतो.
हा आहे गल्लाह. हा आहे किंग पॅरट हा आहे मॅगपाय. दिसतो कावळ्यासारखा पण कोकिळ कंठी आहे. आपली कोकिळा कशी कुहु कुहु करते तस नाही पण कुळुकुळु अस मंजूळ गातात. कंटाळा येत नाही त्या कुळुकुळु चा.
29 Apr 2015 - 10:20 am | पैसा
खूपच छान फोटो! हे पोपट घरटी बांधत नाहीत तर अंडी आणि पिले कुठे ठेवतात? एवढ्या ढोल्या आतात का?
29 Apr 2015 - 10:31 am | अत्रुप्त आत्मा
अफाट,जबराट,तूफ्फान फोटोज आणि लेखन. प्रत्येक फोटू चोरावासा वाट्टोय! :-D
29 Apr 2015 - 11:09 am | विशाखा पाटील
अप्रतिम फोटो!
29 Apr 2015 - 12:04 pm | सानिकास्वप्निल
काय सुरेख फोटो आहेत अगदी !!
खूप आवडले.
29 Apr 2015 - 12:20 pm | ज्ञानोबाचे पैजार
स्वच्छंद - २ च्या प्रतिक्षेत.
पैजारबुवा,
29 Apr 2015 - 12:45 pm | सस्नेह
काय अदा टिपल्या आहेत पोपटांच्या ! फारच सुंदर !
29 Apr 2015 - 12:47 pm | मराठी_माणूस
शिर्षकांमूळे अधिक छान वाटतात
29 Apr 2015 - 3:24 pm | नाखु
उघडला आणि बिल्कुल "पोपट" झाला नाही.
तर चक्क "शुकशुकाट" दिसला !!
धन्यवाद.
घरी डाळींबाचे झाड असल्याने कधीकधी राघुदर्शनलाभी
नाखु निरिक्षणकर
29 Apr 2015 - 4:40 pm | पिशी अबोली
मस्त फोटो!