✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बागकाम - एक छंद

क
कंजूस यांनी
Sat, 03/21/2015 - 08:59  ·  लेख
लेख

कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा

(फलांच्या प्रदर्शनांतले फोटो साभार) बागकामाची आवड असणारे आपली हौस घराभोवती फळाफुलांची झाडे लावून पुरवतात. शहरातले, इमारतीच्या गच्चीवर अथवा बाल्कनीत फुलझाडे आणि पुदिना,आले,तुळस,गवतीचहा वगैरे उपयुक्त झाडे कुंड्यांतून वाढवतात. अगदी काहीच नाहीतरी खिडकीत एखादा मनिप्लांट असतो. आपल्या बागेतले फोटो इथे दाखवता येतील. काही प्रश्नही विचारता येतील.या छंदाविषयीची माहिती आणि फोटो एकाच ठिकाणी राहतील. आज गुढी पाडव्याच्या दिवशी सुरुवात करुया. बाहेरगावी दहा दिवस गेल्यास बाल्कनीतली झाडे कशी जगवायची? मातीच्या कुंडीतले पाणी लगेच सुकते.- जी झाडे वाळली तरी चालतील -तुळस,सदाफुली,सोनटक्का,हळद,पुदिना अशी बाथरूममध्ये ठेवायची . महत्त्वाची झाडे गुलाब वगैरे,काही चमेली सायली वेली यांचे मातीपासूनचा एक फुट भाग ठेवून बाकी कापून टाकायचा .एक तासभर ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवायची. जी झाडे कुंडीतून काढून प्लास्टिक पिशव्यांत हलवता येतील ती आठ दिवस अगोदरच हलवावीत. पिशव्या पाणी अधिक दिवस धरून ठेवतात. एका ट्रेमध्ये या पिशव्या ठेवून दोन इंच पाणी ठेवावे. बाल्कनीच्या कट्ट्याच्या बाहेर लोखंडी ग्रिलमधल्या कुंड्या काढून आतमध्ये ऊन लागेल अशा जागी ठेवाव्यात.

प्रतिसादातले माझ्या बाल्कनीतल्या बागेतले तीन फोटो-
१

२

३ भातावरच्या मुनिया

कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा

वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
60286 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

माझ्या बाल्कनीतल्या बागेतले

कंजूस
Sat, 03/21/2015 - 09:02 नवीन
माझ्या बाल्कनीतल्या बागेतले तीन फोटो- १ Image removed. २ Image removed. ३ भातावरच्या मुनिया Image removed. पुदिना कसा लावावा : बाजारातून काळसर हिरवी पाने दिसणारी पुदिनाची तजेलदार जुडी आणा. पाने काढून वापरा. आता या काड्या लावायच्या आहेत. एक पसरट ट्रे घेऊन त्याला चार बाजूला कडेला भोके पाडून टांगायची व्यवस्था करा एक इंच मातीचा थर पसरून त्यात मध्ये चारपाच इंच उंच आणि पाच सात इंच आडवी प्लास्टीक पिशवीत(तळाला भोके पाडून) थोडे गांडूळखत मिसळलेली माती भरून ठेवा. पिशवितल्या मातीवर पुदिना काड्या आडव्या पसरून ठेवा. त्यावर काड्या जरा झाकल्या जातील एवढी चाळलेली माती पसरून पाणी द्या. आठ दहा दिवसांत नवीन कोंब येतील आणि दीडमहिन्यात पुदिन्याचा ताटवा होईल.तीन तास सूर्यप्रकाश पुरेसा आहे कोणताही फवारा मारू नका.
  • Log in or register to post comments

पुदिन्याला पाणी रोज घालावे

एस
Wed, 03/25/2015 - 12:21 नवीन
पुदिन्याला पाणी रोज घालावे लागते, नाहीतर सुकून जातो असा अनुभव आहे. एकदा चांगला फुटला की मग फारशी काळजी घ्यावी लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

छान उपक्रम आणि चांगली टिप.

स्रुजा
Sat, 03/21/2015 - 09:09 नवीन
छान उपक्रम आणि चांगली टिप. कोथिंबीर पण अशीच लावता येईल ना? तो फुलपाखराचा फोटो मस्त आलाय.
  • Log in or register to post comments

अहाहा

श्रीरंग_जोशी
Sat, 03/21/2015 - 09:24 नवीन
तुमची बाग खूप आवडली. पहिला अन फुलपाखराचा फोटो तर खासंच आहे.
  • Log in or register to post comments

वा! आमच्या बोन्सायप्रयोगांचे

एस
Sat, 03/21/2015 - 15:48 नवीन
वा! आमच्या बोन्सायप्रयोगांचे फोटो जमेल तितक्या लवकर टाकतो.
  • Log in or register to post comments

मस्त धागा.बागकाम माझा अतिशय

अजया
Sat, 03/21/2015 - 16:18 नवीन
मस्त धागा.बागकाम माझा अतिशय आवडता छंद!लवकरच फोटो टाकते.
  • Log in or register to post comments

धाग्याचं माझं नाव काढून संपा

कंजूस
Sat, 03/21/2015 - 17:17 नवीन
धाग्याचं माझं नाव काढून संपा मंडळ/webmaster/admin करून टाका. =============== "स्वॅप्स बोन्सायला आपल्याला हवी त्या जागी नवीन फांदी फुटायला हवी असेल तर T budding ची युक्ती वापरता येईल का?विशेषतः वडाच्या बोन्सायवर हा प्रयोग करता येईल का?" >>असे T Budding कलम बांधतांना यजमान झाडाचे वरचे शेंड्याकडचे कोंब छाटावे लागतात ते केले तरच कलम जगते. असे नाही करता येणार. यापेक्षा जिकडे फांदी हवी आहे तो भाग उजेडाकडे करा आणि इतर फांद्या कापडी पिशवीने अधूनमधून झाका.(खरडफळ्यावरून इथे आणले) सर्वांचे बागेचे फोटो पाहायला खूप मजा येईल.
  • Log in or register to post comments

वा!!

जुइ
Sat, 03/21/2015 - 19:59 नवीन
खुप छान आहे बाग!!!
  • Log in or register to post comments

मस्त धागा.

खेडूत
Sat, 03/21/2015 - 20:29 नवीन
मस्त धागा. तुम्ही किंवा स्वॅप्स किंवा कुणीही....जमल्यास बोन्साय बाबत अधिक लिहा!
  • Log in or register to post comments

खेडुत ,

कंजूस
Sat, 03/21/2015 - 21:31 नवीन
खेडुत , भायखळयाच्या झाडे -फुलांच्या प्रदर्शनाच्या बोन्साय वर्कशॉपच्या दर्शकाचा फोन नंबरचा काही उपयोग होतो का पाहा Image removed. फोटोची लिँक इथे
  • Log in or register to post comments

पहिला फोटू आणि ते फुलपाखरू

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/21/2015 - 22:06 नवीन
पहिला फोटू आणि ते फुलपाखरू मस्स्स्स्स्स्स्त आहे. ते फुलपाखरू म्हणजे, बालवाडीतून पहिलीत गेलेलं मूल्,वाढदिवसाला नवे कपडे घालुन शाळेला जाताना सारखं गोंदुश गोंदुश दिसतय. :)
  • Log in or register to post comments

खुपच उपयुक्त धागा!! अजुन तरी

पिलीयन रायडर
Mon, 03/23/2015 - 13:46 नवीन
खुपच उपयुक्त धागा!! अजुन तरी मुलगा पान तोडत बसतो म्हणुन फार झाडं लावली नाहीयेत. पण तरीही इथे वाचनमात्र राहीन..
  • Log in or register to post comments

अप्रतिम...... फुलपाखरू मस्त..

मॅक
Tue, 03/24/2015 - 12:29 नवीन
अप्रतिम...... फुलपाखरू मस्त...... Garden Planing/ Garden Designing काही कोर्सबाबत कोणास माहिती असल्यास जरूर कळवा......
  • Log in or register to post comments

मॅक ->>Garden Planing/ Garden

कंजूस
Tue, 03/24/2015 - 16:23 नवीन
मॅक ->>Garden Planing/ Garden Designing काही कोर्सबाबत>> मुंबईत असाल तर कालिना (मुं युनि) येथे बागकाम झाडे वगैरेचा कोर्स (मराठी माध्यम,फी रु दहा हजार ,पाच सहली)आहे .एकदा का याची माहिती झाली की तुम्ही स्वत:च हे करू शकाल. आताच मागच्या बैचची परीक्षा झाली. कोणती झाडे किती मोठी वाढतात, कधी फुलतात, फळतात आणि तुमच्या ठिकाणच्या वातावरणास योग्य आहेत हे कळले की काम सोपे आहे. एक व्यवसाय म्हणून करायचे झाल्यास प्रमाणपत्र असणे फायद्याचे आहे. नंतर जपान अथवा जर्मनीतल्या परीक्षा देता येतील .झाडांची सायंटिफिक नावे माहिती असल्यास संपर्कासाठी उत्तम.एक छंद म्हणून वरील कोर्स बराच चांगला आहे.
  • Log in or register to post comments

खूप धन्यवाद.... माहिती बद्दल

मॅक
Wed, 03/25/2015 - 12:10 नवीन
खूप धन्यवाद.... माहिती बद्दल बरेच दिवस शोध घेत होतो... पण माहिती मिळत नव्हती .... मी दोन वर्षाचा कृषी पदवीका कोर्स केला आहे.... पुढे काहीतरी करायच होत.... सध्या मुंबई महापालिकेत आहे..... पुन्हा एकदा धन्यवाद...
  • Log in or register to post comments

झाडांची माहिती आहेच तर आताच

कंजूस
Wed, 03/25/2015 - 21:22 नवीन
झाडांची माहिती आहेच तर आताच पुस्तके जमवायला सुरुवात करा. जागा आणि संपर्क हवाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मॅक

अरे वा !

सस्नेह
Wed, 03/25/2015 - 12:13 नवीन
तुमच्या गॅलरीत तर माथेरानच अवतरलय की +)
  • Log in or register to post comments

छान कल्पना!! इथे जमेल तसे

पलाश
Wed, 03/25/2015 - 12:57 नवीन
छान कल्पना!! इथे जमेल तसे फोटो टाकते .
  • Log in or register to post comments

बागकामाची...

ब़जरबट्टू
Wed, 03/25/2015 - 16:58 नवीन
बागकामाची लय हौस आहे.. पण जल्ला आमच्या बालकनीत सुर्यप्रकाशच येत नाय.. त्यामुळे फुलांचे ताटवे टिकत नाही... :( सावलीत येणारी काही चांगली फुलझाडे सांगता येतील का ?
  • Log in or register to post comments

एका चांगल्या प्रकल्पाची

पॉइंट ब्लँक
Wed, 03/25/2015 - 22:13 नवीन
एका चांगल्या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

बागेतली टोमॅटो ची फुले :)

पलाश
गुरुवार, 03/26/2015 - 13:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

घरची बाग (छायाचित्रे)

पलाश
गुरुवार, 03/26/2015 - 14:03 नवीन
हे माझ्या बागेतले काही क्षण. चित्रबद्ध करण्याचे श्रेय माझे नाही. फोटो इथे नीट टाकायलाही येत नव्हते. शिकण्याचा आत्ताच प्रयत्न केला. पाहू कसा आहे प्रयत्न ते. :) टोमॅटो. Image removed. जास्वंद Image removed. रातराणी Image removed. अडुळशाच्या फुलांतला मध खायला आलेला (सनबर्ड) सूर्यपक्षी. Image removed. घरटे बांधण्यासाठी कापूस घेऊन चाललेला (टेलरबर्ड) शिंपीपक्षी. Image removed. (टेलरबर्ड) र्शिंपीपक्षी कुटुंब. Image removed. थोड्या वेळासाठी बागेत येऊन खाऊ खाउन जाणारी ही एक पाहुणी खारुताई. Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो

सविता००१
गुरुवार, 03/26/2015 - 14:10 नवीन
आहेत सगळे
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

पलाश
गुरुवार, 03/26/2015 - 14:22 नवीन
धन्यवाद. ही बाल्कनीतली लहानशी बाग आहे. कॅमेर्‍याची कमाल आहे बाकी सगळी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

कमाल कॅमेरा पेक्षा, या

स्पंदना
Mon, 03/30/2015 - 07:49 नवीन
कमाल कॅमेरा पेक्षा, या पक्ष्या प्राण्यांना काहीतरी उपलब्ध आहे या बागेत याची आहे. उगा कोणी येइल होय पलाश ताई?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पलाश

स्पंदना, तुझे निरीक्षण अगदी

पलाश
Mon, 03/30/2015 - 11:07 नवीन
स्पंदना, तुझे निरीक्षण अगदी १०० टक्के बरोबर आहे. :) बाल्कनीतल्या या बागेत थोडा खाऊ आणि थोडं पाणी ठेवते. महत्वाचे म्हणजे घरी आणलेल्या भाजीपाल्याचा टाकाऊ भाग थोडा बारीक करून बादलीत भिजवून दुसर्‍या दिवशी गाळून ते पाणी झाडांना घालते. असे काही दिवस करून जो न विरघळणारा भाग रहातो तो मातीत मिसळते. शिवाय नीम तेल, हळद पूड, मिरची पूड हे कोमट पाण्यात विरघळवून ते कीटकनाशक म्हणून वापरते. गेली २७ वर्षे माझ्या बागेत रासायनिक खत / कीटकनाशक वापरलेले नाही. यामुळे या पक्षीमित्रांना लागणारा कीटकवर्गातला जिवंत खाऊ सुद्धा येथे उपलब्ध आहे. इथे फुलपाखरांचे अंडी, अळी, कोष, फुलपाखरू असे जीवनचक्र पाहायला मिळाले आहे. एकदा पक्षांनी घरटे बांधलेले पाहण्यात आले आहे. इथले नैसर्गिक वातावरण, अन्नपाणी आणि ही माणसे इजा करणार नाहीत असा वाटणारा विश्वास आमच्या बागेतली आकर्षणे असू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

नीम तेल, हळद पूड, मिरची पूड

सानिकास्वप्निल
Tue, 04/28/2015 - 12:39 नवीन
नीम तेल, हळद पूड, मिरची पूड हे कोमट पाण्यात विरघळवून ते कीटकनाशक म्हणून वापरते.
हि टिप नक्कीच लक्षात ठेवेन. फोटो सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पलाश

उत्तम माहिती.

एस
Tue, 04/28/2015 - 13:08 नवीन
धन्यवाद. मीही करून पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पलाश

अप्रतिम फोटो पलाश!+10

कंजूस
गुरुवार, 03/26/2015 - 17:01 नवीन
अप्रतिम फोटो पलाश!+10 तुमची बाग पाहून या छंदाकडे लोक वळणार हे नक्की.पक्षांचे डोळे छान आले आहेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

पलाश
गुरुवार, 03/26/2015 - 19:36 नवीन
धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

आता माझे फोटो टाकणे आले.

स्पंदना
Mon, 03/30/2015 - 07:50 नवीन
आता माझे फोटो टाकणे आले. काढते आणी टाकते फोटो माझ्या शेताचे.
  • Log in or register to post comments

वा...

मदनबाण
Mon, 03/30/2015 - 07:53 नवीन
मस्त फोटो... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी:- लुटा तुम्ही ऐवज इष्काचा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }
  • Log in or register to post comments

पुदिनासाठी पॅालिएस्टर

कंजूस
Tue, 04/28/2015 - 09:26 नवीन
पुदिनासाठी पॅालिएस्टर कापडाची पिशवी(कु्ंडी) आणि टांगण्यासाठी प्लास्टिकचे झाकण. Image removed. पिशवी सच्छिद्र असल्यापे बाहेर आलेली मुळे. Image removed. काचेची बॅाटल आणि लाकडाचा भुस्सा(लाकुड तासलेला) मनीप्लान्ट लावण्यासाठी. भुस्सा ओलावा धरून ठेवतो,डासांच्या अळ्या होत नाहीत,बॅाटल उन्हात ठेवता येते. Image removed.
  • Log in or register to post comments

वा! मस्त.

एस
Tue, 04/28/2015 - 13:09 नवीन
कल्पकता आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वसंतबहार!

अजया
गुरुवार, 05/21/2015 - 22:59 नवीन
खूप दिवसांपासून माझ्या बागेचे फोटो टाकायचे होते.आज मुहुर्त मिळाला!.मोबाईलवर काढलेले फोटो आहेत सर्व. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर आहेत गं, नावं ही देना

सानिकास्वप्निल
गुरुवार, 05/21/2015 - 23:16 नवीन
सुंदर आहेत गं, नावं ही देना सगळ्यांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

वाह!

एस
Fri, 05/22/2015 - 08:39 नवीन
अतिशय नेत्रसुखद! बरेच दिवस वाट पहात होतो तुमच्या बागेच्या फोटोंची. खूप छान आहे तुमची बाग. एकदा फक्त बाग बघण्यासाठी आणि तिचे फोटो काढण्यासाठी भेट द्यायला हवी. इथे शेअर केल्याबद्दल खूप खूप आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

खुपच सुदंर!!

जुइ
Fri, 05/22/2015 - 08:58 नवीन
खुपच सुदंर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

सुंदर आहे बाग!!! वसंतबहार

पलाश
Fri, 05/22/2015 - 11:41 नवीन
सुंदर आहे बाग!!! वसंतबहार खुलून दिसतो आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

जळजळीत फोटो

अमृत
Mon, 06/15/2015 - 14:27 नवीन
:-)आमच्य सदनिकेला कधी असे अंगण मिळणार :-( हिरवागार लॉन बघुन मस्त अनवाणी चालायची इछा झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

जरुर जरुर या.

अजया
Fri, 05/22/2015 - 08:55 नवीन
जरुर जरुर या.
  • Log in or register to post comments

बागेचा वसंतबहार आवडला. दोन्ही

कंजूस
Fri, 05/22/2015 - 10:16 नवीन
बागेचा वसंतबहार आवडला. दोन्ही मोगरे खासच. चिकू आणि हिरवळही सुंदर आहे. कुंडीत शेवग्याच्या शेंगेसारखे काय आहे?पामच्या झाडांनी भिंत झाकलेली कल्पना मस्त.
  • Log in or register to post comments

ते शेवग्यासारखे एक प्रकारचे

अजया
Fri, 05/22/2015 - 10:43 नवीन
ते शेवग्यासारखे एक प्रकारचे कॅक्टस आहे.बिनकाट्याचे.दुर्मिळ जात आहे.माझ्या बागेतलं एक आवडतं झाड आहे ते.मेंटेनन्स शुन्य.एकापासुन आपोआप बाकीची येत रहातात.गुलाबाचे फोटो मात्र नाही देता आले.हिवाळ्यात एकेका झाडाला मोठ्ठे पाच सहा गुलाब आले होते.त्यांना दृष्ट नको लागायला म्हणून फोटो नाही काढले!!!
  • Log in or register to post comments

??

प्रभाकर पेठकर
Mon, 06/15/2015 - 13:34 नवीन
>>>>त्यांना दृष्ट नको लागायला म्हणून फोटो नाही काढले!!! सखेद आश्चर्य वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

गंमतीत लिहिलंय काका!!फोटो

अजया
Mon, 06/15/2015 - 13:39 नवीन
गंमतीत लिहिलंय काका!!फोटो नाही काढलेत ना म्हणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

खुप सुंदर आहे.मलाही बागकामाची

परी१२३४५
Fri, 05/22/2015 - 10:47 नवीन
खुप सुंदर आहे.मलाही बागकामाची खूप आवड आहे.परंतु जागा नाही त्यामुळे ग्यालरी मध्येच कुंड्यांमध्ये झाडे लाऊन बागकामाची हौस पूर्ण करून घेत असते
  • Log in or register to post comments

कापडी कुंड्या---एक प्रयोग.---

कंजूस
Mon, 06/15/2015 - 06:25 नवीन
कापडी कुंड्या---एक प्रयोग.------ १)चहाच्या पिशवीचा स्टेपलर पिन मारून ट्रे केला आहे. बाल्कनी कट्टयावर ठेवता येतो. Image removed. २)मोठ्या पिशव्या असतील तर चौकोनी प्लास्टिक ट्रे घेऊन खाली एक इंच माती अंथरली आहे.कडा काळ्या प्लास्टिकने झाकल्यामुळे उन्हाने ट्रे फाटत नाही. Image removed. ३)संक्रांतिचे सुघड आतमध्ये लाकडाचा भुस्सा भरला आहे-डासांच्या अळ्या होत नाहीत. Image removed. ४)टिपॅायवर ठेवण्यासाठी Image removed. ५) खालचा ट्रे कोमल तेलाच्या प्लास्टिक पिशवीचा आहे. Image removed. ६)गवती चहा.-खाली जुन्या ब्लँकेटची घडी ठेवली आहे पाणी। धरून ठेवण्यासाठी Image removed.
  • Log in or register to post comments

वा!

एस
Mon, 06/15/2015 - 11:13 नवीन
अतिशय कल्पक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कुंड्यातील रोपं वाळू नयेत म्हणून करायचा उपाय

अमृत
Mon, 06/15/2015 - 11:40 नवीन
घरी मेहनीतीने फुलविलेली बाग असली की बाहेरगावी जाताना रोपट्यांना पाणी कोण देणार हा प्रश्न येतो. ऑफिसमधे एका मित्रानी प्रयोग करून पाहीलेत आणि निकाल उत्साहवर्धक होते. एक मोठी बादली किंवा पसरट भांडे घ्या, पाण्यानी पूर्ण भरा. आता ज्या कुंड्यात पाण्याची सोय करायची आहे त्या कुंड्यांच्या मातीत एक जाड दोरी खोचा या दोरीचे दुसरे टोक पाण्याच्या बादलीत घाला. शक्यतोवर ही बादली उंच जागी असावी. केशाकर्शण सिद्धांतानूसार कुंड्या पाणी शोशून घेतील. हा उपाय २ ते ३ दिवसांसाठी नक्कीच फायदेशीर आहे. बादल्यांची संख्या कुंड्यांच्या संखेप्रमाणात कमी जास्त करा. शक्यतो पांढरा सुती नाडा या प्रयोगासाठी वापरावा. टु बी ऑन सेफर साईड घरी असतानच हा प्रयोग करून बघा म्हणजे अंदाज येइल.
  • Log in or register to post comments

एक अजुन उपाय

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 06/15/2015 - 13:22 नवीन
एक मोठी प्लॅस्टीकची पिशवी घ्या. त्यात पाणी भरुन तिचे तोंड दोर्‍याने बांधा. आता सुईने एक बारीक भोक पाडुन कुंडीत ठेवा. दोन दिवस तरी सोय होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा