मेरा भारत महान
लेखनप्रकार
हा लेख वाचल्यावर कदाचित माझ्याबद्दल तुम्ही मला नकारात्मक विचार करणारा म्हणून हिनवाल. काही लोक मला देशद्रोही असल्याचा शिक्का मारून देश सोडायला देखील सांगतील. पण खरच मित्रांनो मला कधी कधी खूप राग येतो या देशाचा, या देशाचा म्हणण्यापेक्षा या देशातील लोकांचा आणि त्यांच्या मानसिकतेचा. राग येतो या देशातील राज्यकर्त्यांचा आणि सिस्टीम चा.
नुकतीच घडलेली एक घटना. माझ्या एका मित्राच्या घरी चोरी झाली. जवळपास १ लाख रुपयांचा ऐवज घरातून चोरी झाला. मित्राने पोलिसांकडे मदत मागितली तेव्हा पोलिसांनी ती तक्रार नोंदवून न घेता त्याला २ दिवसांनी ये, तोपर्यंत आम्ही तपास करू असे सांगितले. दुसर्या दिवशी मित्राला पोलिसांकडून फोन आला कि ताबडतोक पोलिस स्टेशन ला ये. तिथे गेल्यावर ते चोर सापडल्याचे कळाले. इन्स्पेकटर ने सांगितले कि हे एक लाख रुपये घे आणि हे प्रकरण इथेच मिटवून टाक. हीच तुला तुझी नुकसान भरपाई मिळाली असे समज. जर का तुम्ही कोर्ट आणि इतर प्रक्रिया करत बसलात तर तुम्हाला तुमचे चोरी गेलेले सामान मिळणे तर दूरच पण सगळ्या प्रक्रियेमुळे वैतागून तुम्ही स्वतःहून केस मागे घ्याल. तेव्हा मिळतेय ते घ्या आणि इथून सटका. त्यानंतर मित्राच्या समोरच त्या इन्स्पेकटर ने त्या चोरांना देखील सांगितले कि हे प्रकरण मिटवायला तुम्हाला मला देखील ५०,००० रुपये द्यावे लागतील. चोरांनी काहीही न बोलता ५०,००० रुपये इन्स्पेकटर ला देण्याचे मान्य केले. अश्या प्रकारे १.५ लाखामध्ये हि केस मिटवली गेली. चोर मोकाट सुटले.. आणि सज्ज झाले पुन्हा नवी चोरी करण्यासाठी आणि जर सापडलेच तर पुन्हा नवीन इन्स्पेकटरशी सेटलमेंट करण्यासाठी .
वर वर पाहता हि घटना कदाचित क्षुल्लक वाटू शकते. पण अश्या प्रकारच्या घटना किंवा या पेक्षा देखील किती तरी मोठ्या घटना या रोज आपल्या देशात घडतात. किती तरी गुन्हेगार असेच उजळ माथ्याने फिरतात.
मला कधी कधी प्रश्न पडतो कि खरच आपण स्वतंत्र आहोत. ? भारतीय राज्यघटने मध्ये सांगितलेली न्याय समता स्वातंत्र्य बंधुता इ गोष्टी आज आपण उपभोगतोय..??? माझ्या मते भारत हा एक वाया गेलेला देश आहे. आपल्या देशातील लोकांना स्वातंत्र्य कसे जगावे आपल्या हक्कांबाबत कसे जागरूक राहावे हे कधीच कळले नाही. कारण हा देश नेहमीच कोणाच्या तरी अधिपत्याखाली किंवा गुलामीखाली राहिलेला आहे. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला पण स्वातंत्र्य आमच्या रक्तामध्ये कधी भिनलेच नाही. इंग्रज सरकार गेले आणि भारतीय सरकार आले. किंबहुना गोरे केले आणि काळे आले. हाच काय तो फरक झाला. बाकी परिस्थिती जैसे थे. याच काळात स्वतंत्र झालेल्या इतर काही देशांकडे पहिले तर ते भारताच्या कितीतरी पुढे गेलेले दिसतात. आपण मात्र फक्त एकाच गोष्टीत पुढे गेलोय ती म्हणजे आपली लोकसंख्या. प्रत्येक वेळी राजकीय लोक " गरीबी हटाओ " सारखे लोकप्रिय नारे देऊन इथे सत्ता स्थापित करतात आणि आपल्या घरातील तिजोर्या भरण्याचे काम चालू करतात. रस्ते वीज पाणी निवारा इत्यादी मुलभूत सेवा देण्यात देखील आपण ६८ वर्षे प्रयत्न करून यशस्वी नाही, कोटी कोटी रुपयांची पैकेजेस जाहीर होतात पण प्रत्यक्षात गरीब जनतेपर्यंत एक रुपया देखील पोचत नाही. सरकारच्या प्रत्येक खात्यामध्ये भ्रष्टाचार गुंडगिरी वशिलेबाजी आहे. आणि याविरुद्ध आवाज उठवणार्या माणसांना हे लोक जीवे मारण्यात सुद्धा मागेपुढे पाहत नाहीत. दोनच दिवसांपूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली. आश्या समाज सुधाराकांना दिवसाढवळ्या मारले जात असेल तर आपण स्वतंत्र कसे?
या गोष्टीचे मूळ कारण शोधून काढण्याचा प्रयत्न जर केला तर कळेल कि या सर्व परिस्थितीचे मूळ हे प्रत्येक भारतीयाच्या मानसिकते मध्ये आहे. इथल्या लोकांना देश, देशप्रेम न्याय आपले हक्क कर्तव्ये आणि जबाबदार्या यांच्याशी काहीही घेण देण नाहीये. याचे ताजे उदाहरण सांगितले तर कदाचित तुम्हाला पटेल. आपले पंतप्रधान तिकडे ओरडून ओरडून सांगत आहेत कि स्वच्छता पाळा. पण कोणी मला पुण्यामधला एक तरी भाग दाखवू शकेल काय जिथे लोकांनी हि गोष्ट मनावर घेवून आपला भाग स्वछ ठेवला आहे. पहिले ३-४ दिवस नाटकी झाली. ती हि पेपर मध्ये आपला फोटो छापून येण्यासाठी पण पुढे काय.?? ये रे माझ्या मागल्या. माझी खात्री आहे कि असे १००० मोदी जरी स्वच्छतेच्या नावाने बोंबलले तरी भारतात काहीच फरक पडणार नाही. कारण इथल्या लोकांना कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यावे हे खरच कळत नाही. म्हणजे एखादा साधा नगरसेवक जरी निवडून आला तरी त्याच्या ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढतील पण एखादा मिलेट्रि मधला जवान सीमेवर पराक्रम गाजवून किंवा एखादे शौर्य पुरस्कार जिंकून आला तर त्याला कुत्र पण विचारत नाही गावी आल्यावर. भारतातील किती लोक सीमेवर शहीद झालेल्या जवानांबद्दल जागरूक असतात. एखादा जवान जर लढताना शहीद झाला तर त्याच्या कुटुंबियांना किती मदत मिळते? एखादा माणूस गोर गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी भरीव कार्य करतो त्याला काडीचीही प्रसिद्धी किंवा मानसन्मान मिळत नाही. पण एखादी फालतू बातमी आपले लोक फार मनापासून वाचतात आणि त्यावर चर्चा करतात. जसे कि आमुक अमुक हिरोइन ने नुकतेच पळून जाऊन गुपचूप लग्न केले. आपल्या इथे लोक एखादा व्यक्ती गरीब भुकेला असेल तर त्याला अन्न देणार नाहीत पण गणपती दुध पितो असे समजल्यावर हजारो लिटर दुधाची नासाडी करतील. एखाद्या गरीब गरजू माणसाला १ रुपया देणार नाहीत पण तिरुपती बालाजी, शिर्डी अश्या ठिकाणी लाखोंची देणगी देतील. आपल्या जवानांनी शत्रू सैनिकांना किंवा अतिरेक्यांना जर ठार केले तर त्याबदाल कोणी बोलणार पण नाही आणि त्याचा कोणाला अभिमान पण नाही. पण भारताने पाकिस्तान ला क्रिकेट मध्ये हरवले तर मात्र इथे लोक दिवाळी साजरी केल्यासारखे आनंदाने वेडेपिसे होतात. भारतीय लोक क्रिकेट मैचेस चौका चौकात प्रोजेक्टर आणि पडदे लावून पाहतील. पण, नेमबाजी, बॉक्सिंग हॉकी बुद्धिबळ इ जागतिक दर्ज्याचे खेळ आणि त्याच्या खेळाडूंना कोणी ओळखत पण नाही.
भारतीय लोक हे आणखी एका गोष्टीत खूप पुढारलेले आहेत. ती गोष्ट म्हणजे "नियम मोडणे" . ज्या लोकांना आपले अधिकार आणि स्वातंत्र्य नीट माहित नाही. ते लोक आपली कर्तव्ये आणि जबाबदार्या तरी काय पळणार म्हणा. अगदी सध्या सध्या गोष्टीत देखील भारतातील लोकांचा मागासलेपणा लक्षात येतो.
एखादा व्यक्ती जर सिग्नल सुटायचा आहे म्हणून थांबला असेल तर मागच्या गाड्यांचे ड्रायवर होर्न वाजवायला चालू करतात. जसे कि यांच्या होर्न वाजवण्याने सिग्नल लवकर हिरवा होणार आहे. एखादा माणूस जर नियम पळत असेल तर त्याचीच अक्कल काढली जाते. एखादा माणूस जर रस्त्यावार थुंकला आणि आपण त्याला का थुंकलास म्हणून विचारायला गेलो तर इतर लोक आपल्या बाजूने उभे राहायचे सोडून "बहुतेक याचा स्क्रू ढिल्ला झालाय " अशी प्रतिक्रिया देतील . सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिण्यास बंदी आहे हे माहित असून देखील स्वतःच्या बापाचे राज्य असल्यासारखे झुरके मारत फिरणारे महाभाग पहिले कि पायतानाने त्याला झोढून काढावा असे वाटते. प्रत्येक गल्लीमधील रस्ता हा माझ्या मते बराच मोठा आसतो. एका वेळी २ वाहने आरामात जातील इतका. पण आपले लोक त्या रस्त्यावर आपल्या चार चाकी गाड्या दुतर्फा पार्क करून त्या मोठ्या रस्त्याची वात लावून टाकतात. अरे जर तुमच्याकडे पार्किंग साठी जागा नाहीये तर गाडी घेतलीत कशाला तुम्ही? रस्ता हा वाहुतुकीसाठी आहे. तुमच्या गाड्या पार्क करण्यासाठी नाही . या बद्दल कोणी बोलायला गेल तर आजूबाजूचे तुम्हाला च वेड्यात काढून हसतील. (मला अनुभव आहे ) . आजकाल पुण्यामध्ये कचरा गोळा करण्यासाठी गाडी येते. त्या गाडीमध्ये स्पीकर वरून सूचना होत असते कि तुम्ही ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणे कायद्याने बंधनकारक आहे असे नसेल तर रुपये ५००० दंड आहे. पण आमच्या इथे सगळे लोक हे मिक्स कचरा आणि तो हि प्लास्टिक च्या पिशवीमध्ये भरून त्या गाडीत टाकत असतात.
कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जा. प्रत्येक गोष्टीचे दर फिक्स आहेत. अगदी जन्मलेल्या मुलाल्चे रजिस्ट्रेशन करून त्याचा दाखला मिळवण्यासाठी पण चिरीमिरी द्यावी लागते. म्हणजे इथे आयुष्याची सुरवात च भ्रष्टाचार करून होते. वास्तविक पाहता सर्व शासकीय कामांना नियम आहेत. पण ते कोणीच पळत नाही. सर्व नियमबाय्ह कामे असे पैसे देऊन नियमात बसवून घेतली जातात. शासनाने अगदी हगन्या- मुतन्या पर्यंत नियम केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी हे विधी करताना जणाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगली पाहिजे. पण आपले लोक कुठेही हे विधी सुरु करतील. मुंबई मध्ये एकदा रेल्वेने सकाळी प्रवास करत असताना हे असे मोर आणि काही ठिकाणी लांडोरी पण रेल्वे रुळाच्या आजूबाजूला दिसल्या होत्या.
आपण विदेशातील लोकांबद्दल तेथील स्वच्छता , टापटीपपणा , रस्ते वीज आरोग्य आणि इतर सोयी सुविधांबद्दल नेहमीच बोलतो त्यांची स्तुती करतो. पण जेव्हा आपल्या स्वतःच्या देशाकडे पाहतो तेव्हा काहीच वाटत नाही. साधी लाज पण वाटत नाही.
बोलायचे झाले तर हा विषय खूप मोठा आहे. पण व्यक्तिश: मला असे वाटते कि २०२० कि ३०२० पर्यंत देखील भारत प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. भारत हा एक वाया गेलेला देश आहे. जिथे लोकशाही फक्त नावाला आहे. स्वातंत्र्य समता न्याय इत्यादी विशेषणे फक्त संविधानामध्येच आहेत वास्तविक जीवनामध्ये नाहीत . भारत हा असा एक देश आहे ज्याच्याकडे खूप ताकद आहे पण आपण ती नको तिथे वापरत आहोत. कोणी काहीही म्हणो , मला मात्र कधी कधी भारतीय असल्याची लाज वाटते. जाता जाता नाना पाटेकर च्या एका सिनेमातील संवाद आठवतो
" सौ मे से अस्सी बेईमान.. फिर भी मेरा भारत महान "
*संपादित*
वाचने
6322
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
खरं लिहीलय...
प्रचंड असहमत
हा प्रतिसाद कोणतरी देणार...
In reply to हा प्रतिसाद कोणतरी देणार... by बाप्पू
बाप्पूसाहेब,
In reply to बाप्पूसाहेब, by संदीप डांगे
त्यांच्यातही काही अवगुण
In reply to बाप्पूसाहेब, by संदीप डांगे
संदीप .. आपला राग मी समजू शकतो. पण...
In reply to संदीप .. आपला राग मी समजू शकतो. पण... by बाप्पू
हवा सोडुन द्यायची एक दिवस
In reply to हवा सोडुन द्यायची एक दिवस by कॅप्टन जॅक स्पॅरो
हे जोक म्हणून किंवा जशास तसे
In reply to हे जोक म्हणून किंवा जशास तसे by हाडक्या
सद्ध्यातरी विनोदानी म्हणालोय.
In reply to संदीप .. आपला राग मी समजू शकतो. पण... by बाप्पू
त्यांच्यात अवगुण आहेत म्हणून
In reply to संदीप .. आपला राग मी समजू शकतो. पण... by बाप्पू
एकाला त्याच्या सुधारणेच्या
In reply to एकाला त्याच्या सुधारणेच्या by मराठी_माणूस
हाच मुद्दा मला..
In reply to हाच मुद्दा मला.. by बाप्पू
बरं मग आता काय?
आता अशी वेळ आहे की ह्या लाज
आता अशी वेळ आहे की ह्या लाज आणणार्या परिस्थितीला बदलण्यासाठी तुम्ही-आम्ही काही करणार आहोत का?आणी,मग आता बोला, काय करता येइल देशात सकारात्मक बदल घडवण्यासाठी?भलत्याच अपेक्षा बॉ तुमच्या!! अस काय करायच नसत.. (स्वार्थी) जेपीबाप्पू यांचे बोलणे पटले
In reply to बाप्पू यांचे बोलणे पटले by आकाश कंदील
भाऊ, जरा प्रतिसाद नीट तरी
कोणताच देश परिपूर्ण नसतो पण ..
In reply to कोणताच देश परिपूर्ण नसतो पण .. by चौकटराजा
+१
In reply to कोणताच देश परिपूर्ण नसतो पण .. by चौकटराजा
+१