वि.कुं ची क्षमा मागून्.आणि खरे काकांना दंडवत घालून (शीर्षकात खरे शब्द वापरू दिल्याबद्दल)
वाचनापूर्वी (गर्भीत) सूचना :काव्यरस व लेखन विषय नजरेखालून घालावा नंतर पश्चाताप नको.
नेहमी प्रमाणे यावरील खुलाश्यास वा स्पष्टीकरणास आम्ही बिलकुल बांधील नाहीत तेव्हा अपेक्षा करून मुखभंग करून घेऊ नये. :-| :| =| :-|
वि.सू. आम्ही स्वयंभू असल्याने नो प्रेरणा-बिरणा
=================================================================
धाग्याच्या पुढती उभे अजुनही आशाळभुत चोर १ ते
भाषा कृद्ध, तिची अनेक शकले, चर्चेतुनी सांडते
स्व आरतीत मने समस्त नीजली मिपा झाले खुजे
नेमाने लिहती अता, कचरले चर्चेस मज मूढ ते
मसीहा उठतो बातमी २ बघता.., “साकी” ३ त्या झंकारते
अजुनही स्फुरली, कशी विसरली? आश्चर्य त्या वाटते
बोभाटा मग त्यां भरात करतो, शोधी नवे सोबती
आप४च्या मिटल्या खुणा मग माज ५ मनात आकरते
मसीह्यास असा पुचाट बघुनी इतरांसही प्रश्न पडे
माझ्याहून इथे असे कुणितरी नाठाळ ज्याचे काही ना खरे
"सत्तेवीण६ उदास लेखन जसे भकास होउन सुजे७"
मसीहा हसतो जनांस म्हणतो "माझेच म्हणणे खरे"
आहे ज्ञान जरी जहाल, स्वावलंबन हे साक्षात घ्या जाणुनी
प्रश्नांचा अपुल्या पडे विसरही त्याला 'स्वरा८' पाहुनी
<=======================>
कठीण शब्दार्थ (अनर्थ होऊ नये म्हणून)
१.जे आम्हाला हितोपदेश करतात ते सारे चोर आहेत (च)
२.बातमी :सामन्य वाचकांना ही अस्वस्थ करणारी बळिराजाची बातमी
३.साकी हे साहित्यीक किडा चे लघुरूप आहे
४.आप म्हणजे पक्ष नव्हे आत्मपरीक्षण
५.माज (ह्या विषयात मीच एकमेव तज्ञ असल्याने आलेला दंभ)
६.सत्ता-राजकारण्-सत्ता अश्या त्रिकोणाभिलाषी
७.कांही आजारात शरीरातील अपायकारक पदार्थ शरीराबाहेल पडले नाहीत तर सूज येते त्याला अनूसरून वैचारीक सूज
८.स्व मग्न राजकारण
प्रतिक्रिया
5 Jan 2015 - 11:20 am | अन्या दातार
=))))
बाजार उठला.
5 Jan 2015 - 11:34 am | सतिश गावडे
पण त्याचं काये काका, स्वस्तुतीमग्न पुरुषांच्या लक्षणांनुसार "जन काय म्हणतात" याच्याशी त्यांना काही कर्तव्य नसते.
अशांना कधीतरी मग अपचन होते आणि त्यांची जालिय प्रतिमा "हेवनवासी" होते.
5 Jan 2015 - 11:40 am | मदनबाण
साकी हे साहित्यीक किडा चे लघुरूप आहे
खपलो ! *LOL*
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || अच्युतम केशवं ||
5 Jan 2015 - 11:43 am | मुक्त विहारि
झक्कास..
5 Jan 2015 - 1:21 pm | विशाल कुलकर्णी
हाण तिच्या मारी... ;)
5 Jan 2015 - 1:51 pm | मितान
लय भारी ! आवडेश !!!
5 Jan 2015 - 2:35 pm | नि३सोलपुरकर
पार टेम्पोत बशिवलात ना राव.
लघुरुप तर एकदम भारी..आवडेश !!!
5 Jan 2015 - 3:37 pm | अजया
:-))))
5 Jan 2015 - 4:12 pm | प्रचेतस
भारी.
बाकी फूटनोट्स पाहून आमचे एक कवी मित्र पूर्वी कविता अशाच प्रकारे समजावून द्यायचे त्याची आठवण झाली.
5 Jan 2015 - 4:19 pm | सूड
=))))
5 Jan 2015 - 4:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारी !
साकीत केलेला किडा तर लै भारी !!
5 Jan 2015 - 7:32 pm | पैसा
हाहाहा!
5 Jan 2015 - 11:26 pm | अत्रुप्त आत्मा
पार मार्केटयार्ड उठवलं कि ओ! =))))))
6 Jan 2015 - 12:35 pm | बॅटमॅन
पार सुपरमार्केट, मार्केटयार्ड, मंडई सगळंच उठिवलासा बगा =))
6 Jan 2015 - 1:18 pm | स्वप्नज
तुमच्या काप्र९ ला मप्र१०.
कठीण शब्दार्थ (अनर्थ होऊ नये म्हणून)-
९. काप्र - काव्यप्रतिभा
१०. मप्र - मनापासून प्रणाम.
7 Jan 2015 - 3:56 pm | अद्द्या
=))
7 Jan 2015 - 8:10 pm | विवेकपटाईत
मसीहा उठतो बातमी २ बघता.., .., तुम्हाला ही बातमी वाटते. ??????
26 Sep 2016 - 2:07 pm | नाखु
ती बातमीच असते,
सुखद असो व दु:खद असो ती बातमीच असते.
नक्की काय आक्षेप आहे ते टंका.