Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 10:46
पेर्णा - http://www.misalpav.com/node/29834 वर्जीनल कवीची मापी मागून :) ------------------------------------------------------------------------ ये जरा "बसायला", घे बाटलीतले तीर्थ इथे गाठी शेवया मागाया, काय सांग जाते तुझे ll १ ll अट्टल पिणारे लाजतील, येता (बाटली) तुझ्या हातावरी अंगावरल्या समस्त वस्त्रांस, जरा जडू दे गंध तुझे ll २ ll या शर्ट-प्यांटवरील, पुसती जरी साऱ्या खुणा ती अशी खमकी असता, गालावरचा रंग सजे ll ३ ll सखे ग सहवास तुझा, रंगतो लाल गालांवरी पुन्हा होईल भेट तोवरी, ग्लास वाहील काय ओझे ll ४ ll - पीकेबोध

Submitted by मुक्त विहारि on Fri, 12/26/2014 - 11:01

Permalink

जमलंय...

प्रगती होत आहे. ("झेंडूची फुले आणि मिपाची काव्य सुमने" ह्या विषयावर पी.एच.डी. करावीशी वाटते.)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 11:03

In reply to जमलंय... by मुक्त विहारि

Permalink

ठ्यांकू

ठ्यांकू
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Fri, 12/26/2014 - 11:01

Permalink

यमे आलीस का तु.

"अ"त्म्याचे शिष्यगण तुम्ही, लागले तुम्हास भाग्य असे, हव्या तेवढ्या जिल्ब्या पाडु, शब्दांचे वावडे नसे, काव्य करु नवे वा करु विडंबन अनुभवांचे बोल जसे, शाब्दिक बाण पोकळ ते, उगा कोणी ना रुसुन बसे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 12/26/2014 - 11:05

In reply to यमे आलीस का तु. by प्रमोद देर्देकर

Permalink

शाब्दिक बाण पोकळ ते, उगा कोणी ना रुसुन बसे....

पम्या... लाख मोलाचे बोललास. इस बात पे एक मिसळ खावू.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 11:06

In reply to शाब्दिक बाण पोकळ ते, उगा कोणी ना रुसुन बसे.... by मुक्त विहारि

Permalink

आधी त्याला कोणीतरी खरोखर बघू

आधी त्याला कोणीतरी खरोखर बघू दे =))
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 12/26/2014 - 11:18

In reply to आधी त्याला कोणीतरी खरोखर बघू by टवाळ कार्टा

Permalink

भेंडी...

तुला ना नसत्या शंकाच फार. अरे मिसळीचे नांव काढल्यावर पम्या येणारच.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Fri, 12/26/2014 - 11:25

In reply to आधी त्याला कोणीतरी खरोखर बघू by टवाळ कार्टा

Permalink

काय रे सारखं तेच तेच. तु आधी

काय रे सारखं तेच तेच. तु आधी ठाण्याच्या कट्टया अगोदर कुठे दिसला होतास काय? त्यात फोटोही अस्पष्ट. आणि तुलाही शक्य झालं तेव्हाच ना तु हजेरी लावलीस? आणि तुलाच भेटायला वावडे आहे. म्हंटलं तर तु कधीही भेटु शकतोस. तिकडे पुण्याला बघ दोघे असले तरी भेटतात. पण नाही.जावु दे. शिवाय मला तुझी बाईक बघायची आहे. सल्ला हवा आहे. कारण मला पण बाईक घ्यायची आहे. @ मुवी :- तुम्हाला तहसिलदारची एक मिसळपाव माझ्याकडुन लागु. आपण दोघेच जावु.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 11:29

In reply to काय रे सारखं तेच तेच. तु आधी by प्रमोद देर्देकर

Permalink

तुला चिटकलेले कारण लगेच

तुला चिटकलेले कारण लगेच निघणार नाही...सगा कडून ना हरकत प्रमाणपत्र आण तसे :) फोटोही अस्पष्ट >> ह्याला कारण मी कसा काय "मला तुझी बाईक बघायची आहे." "सल्ला हवा आहे. कारण मला पण बाईक घ्यायची आहे." >> संबंध काय या २ वाक्यांचा...तुझ्या रिक्वायरमेंट व्यनी कर...मी सुचवतो
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Fri, 12/26/2014 - 11:37

In reply to तुला चिटकलेले कारण लगेच by टवाळ कार्टा

Permalink

व्यनी केलाय

व्यनी केलाय
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 12:46

In reply to व्यनी केलाय by प्रमोद देर्देकर

Permalink

कृपया "बाइक कशी हवी आहे ते

कृपया "बाइक कशी हवी आहे ते मलाच माहिती नाही कारण माझा गोंधळ उडालाय." अशी रिक्वायरमेंट पाठवू नये...मी ब्रम्हदेव नाही ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 12/26/2014 - 11:34

In reply to काय रे सारखं तेच तेच. तु आधी by प्रमोद देर्देकर

Permalink

पम्या...

कशाला चिडतोस? आणि टका, घे की जरा समजून... मस्त धागा काढला आहेस, घेऊ की जरा आस्वाद....
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 11:46

In reply to पम्या... by मुक्त विहारि

Permalink

घेतले समजून...घेउ आस्वाद

घेतले समजून...घेउ आस्वाद
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Fri, 12/26/2014 - 11:15

Permalink

स्तुत्य प्रयत्न !

एकंदर, आत्मुसबुवांचा शिष्यगण वाढीस लागला आहे खरंच ..!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 11:16

In reply to स्तुत्य प्रयत्न ! by सस्नेह

Permalink

इथे "बाटली" संप्रदाय असेल तर

इथे "बाटली" संप्रदाय असेल तर आत्मुबुआ त्यात असतील असे वाटत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 12/26/2014 - 11:18

In reply to इथे "बाटली" संप्रदाय असेल तर by टवाळ कार्टा

Permalink

सहमत आहे.

सहमत आहे. मात्र ह्यालाही अपवाद आहेच. आत्मूदांनी एकदाच कच्ची ताडी वापरली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 11:23

In reply to सहमत आहे. by प्रचेतस

Permalink

पण त्या ताडीचा उपयोग "त्याच"

=)) पण त्या ताडीचा उपयोग "त्याच" कामासाठी केलेला...तस्मात ते बाटली काव्य नाही
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Fri, 12/26/2014 - 11:19

In reply to इथे "बाटली" संप्रदाय असेल तर by टवाळ कार्टा

Permalink

बाटली-संप्रदायाचे काही माहिती

बाटली-संप्रदायाचे काही माहिती नाही बॉ ! आम्हाला 'किंचित'कवी संप्रदाय अभिप्रेत आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 11:24

In reply to बाटली-संप्रदायाचे काही माहिती by सस्नेह

Permalink

'किंचित'कवी...हा हे चालेल

'किंचित'कवी...हा हे चालेल
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 12/26/2014 - 11:27

In reply to 'किंचित'कवी...हा हे चालेल by टवाळ कार्टा

Permalink

टका...

आजकाल तू चक्क कविता का करायला लागला आहेस? "आदमी सिर्फ दो ही बार कवि बनता है. या तो कोई मिलने के बाद या किसी को खोने के बाद" अँटोनी चारसोबीस
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 16:13

In reply to टका... by मुक्त विहारि

Permalink

सूडला सांगितले तेच परत

सूडला सांगितले तेच परत http://misalpav.com/comment/644394#comment-644394
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Fri, 12/26/2014 - 11:30

In reply to 'किंचित'कवी...हा हे चालेल by टवाळ कार्टा

Permalink

किंचित'कवी..>>>> नको नको

किंचित'कवी..>>>> नको नको "किंकाळणारे कवी" कसे वाटते बघ.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 12/26/2014 - 14:35

In reply to किंचित'कवी..>>>> नको नको by प्रमोद देर्देकर

Permalink

पटलं तरच घ्या...

"किंचीत" ऐवजी "कुंथीत" कवी परस्पर भागवत मित्रमंडळ ओसाडवाडी खु||
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 14:41

In reply to पटलं तरच घ्या... by नाखु

Permalink

मग डायरेक्ट अजरामर "मल

मग डायरेक्ट अजरामर "मल कुन्वीत" ठेउया की नाव ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 12/26/2014 - 11:20

In reply to इथे "बाटली" संप्रदाय असेल तर by टवाळ कार्टा

Permalink

बुवा पण "बाटली" वालेच...

त्यांची बाटली वेगळी... आपण नशेत बाटलीतले द्रव्य इकडे-तिकडे उडवतो. बुवांच्या बाटलीतले द्र्व्य आधी उडते आणि मग नशा चढते.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 11:25

In reply to बुवा पण "बाटली" वालेच... by मुक्त विहारि

Permalink

अत्तराचे बाटली असे पूर्ण लिहा

अत्तराचे बाटली असे पूर्ण लिहा...गैरसमज नको ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 12/26/2014 - 11:37

In reply to अत्तराचे बाटली असे पूर्ण लिहा by टवाळ कार्टा

Permalink

बुवांचे अत्तरायण....

साता समुद्रापार गेलेले आहे... विशेषतः "कस्तूरी-हीना." तो बुवा नाहीये तो पर्यंत मज्जा करू. आला की तुला आणि मला दणके मिळणार. बंदूका आणि स्टेनगन, अगोबा आणि खाटूक साठी राखीव ठेवल्यात, असे तो मला काल स्वप्नात सांगत होता.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 12/26/2014 - 15:27

Permalink

टक्स! जमतयं, जमतयं, आता

टक्स! जमतयं, जमतयं, आता जर्र्र्र्राआआआआआअ वळण घ्या आनी हुन जौ दे खरी खुरी कविता. विडंबनावर कीती दिवस भागणार तुमच?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 16:02

In reply to टक्स! जमतयं, जमतयं, आता by स्पंदना

Permalink

शंकाच आहे...मी ना सध्ध्या

शंकाच आहे...मी ना सध्ध्या प्रेमात आहे...ना प्रेमभंगाचे दुखः घेउन जगतोय...ना हे जग "दवणीय" वाटते...ना मिपावर कोणाशी पंगे घेउन विद्रोही साहित्य लिहिले जाईल...त्यामुळे जशा जिल्ब्या पडत जातील तसेच एक दिवस कविता जमेल ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 12/26/2014 - 15:39

Permalink

अर्र्र्र्र्र्र!! पार खरडफळा

अर्र्र्र्र्र्र!! पार खरडफळा करुन टाकलाय राव धाग्याचा. तुमच्या गुरुंच्या शौचकाव्यांची सर नाही याला. तांब्या, पीठ, डोसा, जिल्बी, बुळुक्कन, हीहीही असे शब्द न दिसल्याने भ्रमनिरास झाला. =))))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 15:58

In reply to अर्र्र्र्र्र्र!! पार खरडफळा by सूड

Permalink

अजूनही हात अडखळतात "ते" शब्द

अजूनही हात अडखळतात "ते" शब्द लिहिताना :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 12/26/2014 - 16:06

In reply to अजूनही हात अडखळतात "ते" शब्द by टवाळ कार्टा

Permalink

सिरीयस नोटः काव्य लिहायचंच

सिरीयस नोटः काव्य लिहायचंच असेल स्वत:चं असं काहीतरी लिवा आणि स्वतःला मनापासून आवडलं तरच मिपावर टाका. दिसामाजि काहीतरी लिहील्याने फक्त वेळ वाया जाईल, नंतर अति झालं आणि हसू आलं अशी गत होईल. अर्थात तुम्ही काय करावं हा तुमचा प्रश्न आहे, मी एक निरीक्षण नोंदवलं.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 16:11

In reply to सिरीयस नोटः काव्य लिहायचंच by सूड

Permalink

भौ...विडंबन मनापासून होतेय

भौ...विडंबन मनापासून होतेय म्हणून लिहितोय...मला नाही आवडले तर मी इथे लिहिणारच नाही
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 12/26/2014 - 16:12

In reply to भौ...विडंबन मनापासून होतेय by टवाळ कार्टा

Permalink

जशी आपली इच्छा!!

जशी आपली इच्छा!! ॥इति लेखनसीमा॥
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 12/26/2014 - 15:54

Permalink

+१२०/३००

"गंध माझे" हे नवशौचकवींच्या कवितेचे नाव पाहुन धागा नाक मुठीत धरुन उघडला.परंतु शिष्यास अजून बराच पल्ला गाठावा लागेल, परसतीराला पोहोचायला हे सपष्ट झाले आहे, हे या ठिकानी जाहिर करन्यात येत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 15:59

In reply to +१२०/३०० by अजया

Permalink

मग "जुन्याशौचकवींच्या" कवीता

मग "जुन्याशौचकवींच्या" कवीता वाचताना मास्क लाउनच धागा उघडता??? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 12/26/2014 - 16:08

In reply to मग "जुन्याशौचकवींच्या" कवीता by टवाळ कार्टा

Permalink

मग काय कवितेच्या प्रकारच तसा

मग काय ^_~ कवितेच्या प्रकारच तसा दरवळणीय आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/26/2014 - 16:03

In reply to +१२०/३०० by अजया

Permalink

आणि ४० मिळाले...बास्स की..

आणि ४० मिळाले...बास्स की...वींजीनेरला आणखी किती पाहिजे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sat, 12/27/2014 - 18:57

Permalink

!

मला वाटतं की विडंबन करणार्‍यांनी तरी मूळ कवितेच्या धाग्यावर जाऊन एखादा प्रतिसाद दिला पाहिजे. तिथे इनमिनदोनच प्रतिसाद आहेत. निदान एवढे सौजन्य दाखवायला काही हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 10596 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com