Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पीनी on गुरुवार, 12/11/2014 - 15:06
नमस्कार, मी अडीच वर्षांपूर्वी एल. आय. सी. कडून गृहकर्ज घेतले होते. तेंव्हा इंटरेस्ट रेट साधारण १० च्या आसपास होता. आता तो वाढत वाढत ११.२५ झाला आहे. मला एल. आय. सी. ऑफिसमधून असे कळले की माझे कर्ज ज्या योजनेमध्ये मंजूर झाले त्या योजनेनुसार हे बरोबर आहे आणि बाहेर अथवा एल. आय. सी.मध्येच कितीही कमी इंटरेस्ट रेट असला तरी मला हाच रेट असेल. कर्जाची रक्कम बरीच जास्त असल्याने व इतर काही घरगुती अडचणींमुळे कर्ज डाउन पेमेंट करुन लवकर भरणे ३-४ वर्षात शक्य नाही. आता माझ्यापुढे तीन पर्याय आहेत. १. काही पर्याय न शोधता जास्त रेटने कर्जफेड करत रहावे. २. एल. आय. सी. मधूनच टॉप-अप कर्ज घ्यावे. याचा रेट १०.१०% असेल + प्रोसेसींग फी ०.५%. पण तेही २ वर्षांनी १२ %पर्यंत जाउ शकते असे मला एल. आय. सी. ऑफिसमध्ये सांगितले. ३. एस. बी. आय.ची मॅक्स गेन योजना. याचा रेट १०.१० आहे. पण प्रोसेसींग फी १% + इंशुरन्स मिळून १ लाख जास्त भरावे लागतील. सगळीकडे आर्थिक नुकसान आहेच याची जाणिव मला आहे. याशिवाय काही दुसरा पर्याय आहे का? किंवा यातच कमी तोट्याचा पर्याय कोणता असेल? यासाठी कोणी सल्लागार असतात का? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • 29213 views

प्रतिक्रिया

Submitted by सुबोध खरे on Fri, 12/12/2014 - 12:02

In reply to हो बरोबर by क्लिंटन

Permalink

क्लिंटन साहेब

क्लिंटन साहेब माझे म्हणणे जर वेगळे आहे. आपल टर्म विमा जितका असेल( जर ५० लाख असेल तर) त्यात अजून २० लाखाची( किंवा कर्ज जेवढे असेल तेवढ्या रकमेची) वाढ करावी म्हणजे घराच्या बाबतीतला धोकाही कमी होतो आणि एकदम पैसे भरण्याची कटकट वाचते. आजमितीला तरी टर्म विम्या इतका कोणताच विमा स्वस्त नाही. घराचा विमासुद्धा नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Fri, 12/12/2014 - 12:39

In reply to क्लिंटन साहेब by सुबोध खरे

Permalink

हो बरोबर

अच्छा असे आहे तर. हा विचार मी पण केला होता. टर्म प्लॅनपेक्षा थोडा हा विमा थोडा (फार नाही) महाग पडला ही गोष्ट बरोबर आहे.मी अर्थातच तंबाखू खात नाही (आणि वयही ४० नाही :) ) त्यामुळे जर ४० वर्षाच्या व्यक्तीस ५० लाखाचा २० वर्षांचा टर्म प्लॅन ७१०० रूपयात असेल तर माझ्या इतक्या वयाच्या व्यक्तीस २५ वर्षाचा प्लॅन साधारण ७.५-८ हजार पर्यंत पडेल असा एक अंदाज. (यात सर्व्हिस टॅक्स धरला आहे की नाही माहित नाही अन्यथा प्रिमिअममध्ये आणखी १२.३६% अ‍ॅड करावे लागतील). माझ्या बँकेने दिलेल्या प्लॅनप्रमाणे मला महिना ६७५ रूपये ई.एम.आय जास्त पडतो म्हणजे दर वर्षी ८,१२० रूपये. त्या विम्याच्या २०% रक्कम मला सुरवातीला भरायला लागली आणि घर घेताना इतके खर्च होत असतात तेव्हा सुरवातीला आणखी ही २०% रक्कम हा बोजा झाला होता हे नक्कीच. तसेच टर्म प्लॅनमधून विम्याची रक्कम मिळून, ती आपल्या बँकेत जमा होऊन कर्ज फेडणे ही धावपळ घरच्यांना करायला लागेलच.बँकेच्या विम्याप्रमाणे अशी धावपळ कुटुंबियांना करायला लागणार नाही तर डेथ सर्टिफिकेट दिले की बँकच विमा कंपनीकडून पैसे घेऊन लोन अकाऊंट बंद करेल असे बँकेत मला सांगितले होते. खरोखरच तसे होईल की नाही हे माहित नाही आणि ते मला कळणारही नाही :)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 12/11/2014 - 19:23

In reply to एक दिशा by क्लिंटन

Permalink

फक्त या प्रतिसादामुळेसुध्धा

फक्त या प्रतिसादामुळेसुध्धा हा धागा वा.खू. करण्यासाठी योग्य ठरतो
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 12/11/2014 - 20:53

In reply to फक्त या प्रतिसादामुळेसुध्धा by टवाळ कार्टा

Permalink

+१

सहमत... क्लिंटन यांचा सुयोग्य प्रतिसाद...
  • Log in or register to post comments

Submitted by पीनी on गुरुवार, 12/11/2014 - 21:05

In reply to एक दिशा by क्लिंटन

Permalink

मनापासून धन्यवाद

अत्यंत मुद्देसुद प्रतिसाद आहे. आपल्या सल्ल्याची खूप मदत होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 12/11/2014 - 22:00

In reply to एक दिशा by क्लिंटन

Permalink

उत्तम

उत्तम अभ्यासपूर्ण प्रतिसाद!
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Fri, 12/12/2014 - 14:57

In reply to एक दिशा by क्लिंटन

Permalink

मस्त प्रतिसाद

मस्त प्रतिसाद
  • Log in or register to post comments

Submitted by पीनी on गुरुवार, 12/11/2014 - 21:06

Permalink

सगळ्यांना धन्यवाद

सगळ्यांना धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Fri, 12/12/2014 - 15:12

Permalink

क्लिंटन साहेब गृहकर्जे ही

क्लिंटन साहेब गृहकर्जे ही आधी बांधुन तयार असलेल्या घरासाठीच मिळतात का? मला जर प्लॉट घेवुन मग त्यावर घर बांधायचे असेल तरीही हाच पर्याय उपयोगी पडेल काय?
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Fri, 12/12/2014 - 15:47

In reply to क्लिंटन साहेब गृहकर्जे ही by प्रमोद देर्देकर

Permalink

मला जर प्लॉट घेवुन मग त्यावर

मला जर प्लॉट घेवुन मग त्यावर घर बांधायचे असेल तरीही हाच पर्याय उपयोगी पडेल काय?
तसे कर्ज बँका देतात की नाही याची कल्पना नाही.मी "सेकंड हॅण्ड" घर विकत घेताना बँकांकडून कर्ज घेताना लागणार्‍या गोष्टींची माहिती काढली होती कारण अगदी अलीकडच्या काळात (४-५ महिन्यांपूर्वी) मी त्याच अनुभवातून गेलो होतो.पण इतर गोष्टींची माहिती काढली नव्हती. एखाद्याला कमर्शिअल युजसाठी जमीन विकत घ्यायची असेल तर बँका जमिन विकत घ्यायला कर्ज देत नाहीत.उदाहरणार्थ एखाद्या कंपनीला जमिन विकत घेऊन त्यावर हॉटेल बांधायचे असेल तर बँका हॉटेल बांधण्यासाठी कर्ज देतात पण जमिन १००% आपल्या पैशातून विकत घ्यावी लागते आणि जमिन विकत घ्यायला बँक कर्ज देत नाही (यातूनही पळवाटा काढणारे तशा पळवाटा काढतातच :) ) पण हाच नियम जमिनीचा वापर कमर्शिअल युजसाठी करायचा नसेल (उदा. स्वतःला राहायला घर बांधणे) तर लागू पडतो की नाही याची कल्पना नाही.कदाचित पैसाताईंना याविषयी अधिक माहित असेल. पण जमिन विकत घेतली असेल तर त्यावर घर बांधायला ८०% पर्यंत कर्ज बँकांना द्यायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 12/12/2014 - 16:32

In reply to मला जर प्लॉट घेवुन मग त्यावर by क्लिंटन

Permalink

कर्ज मिळते

जमीन खरेदी करून त्यावर घर बांधण्यासाठी कर्ज मिळते. अशा वेळी घराची किंमत जमीन + घरबांधणी अशा समजली जाते. समजा तुम्ही प्लॉट आधी खरेदी केला असेल तर तो घर बांधणीसाठीच्या कर्जाला मार्जिन म्हणून वापरता येतो. तसेच घर बँकेकडे गहाण टाकताना जमिनीच्या प्लॉटसकट टाकावे लागते. भविष्यात घर बांधण्यासाठी प्लॉट विकत घेण्यासाठीही कर्ज मिळते. मात्र आपण प्लॉट विकत घेतल्यापासून दोन वर्षांच्या आत त्यावर घर बांधू असे अंडरटेकिंग द्यावे लागते. असे घर न बांधल्यास २ वर्षांनी त्या कर्जावर जनरल रेटने (सगळ्यात जास्त असेल तो) व्याज आकारले जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 12/12/2014 - 22:56

In reply to कर्ज मिळते by पैसा

Permalink

दुकानाच्या गाळ्यासाठी बँक लोन

दुकानाच्या गाळ्यासाठी बँक लोन देते काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 12/12/2014 - 23:36

In reply to दुकानाच्या गाळ्यासाठी बँक लोन by खटपट्या

Permalink

हो मिळेल

पण त्याला घराच्या कर्जाचा दर नसतो. वेगळा असतो. जर दुकान गाळा विकत घेऊन खरा धंदा करायचा असेल तर प्रायॉरिटी सेक्टर अंतर्गत लोन मिळेल. पण नुसताच गाळा घेऊन ठेवायचा असेल तर मॉर्टगेज लोन होईल. त्याला व्याज दर बराच जास्त असतो आणि बँकेच्या कर्ज देण्यालायक फंड्सपैकी किती टक्के मॉर्टगेज लोन्स देता येतील यावर निर्बंध असतात. जर बँकेची लिमिट संपलेली असेल तर अशी नवी लोन्स देणे काही काळासाठी बंद होऊ शकते. म्हणजे अमूक एका बँकेत अमूक वेळी मॉर्टगेज लोन मिळेलच अशी खात्री देता येणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 12/12/2014 - 23:46

In reply to हो मिळेल by पैसा

Permalink

ओके, धन्यवाद.

ओके, धन्यवाद. तरी कीती टक्के व्याज दर असेल? होम लोन जर १०% ने मिळत असेल तर गाळ्यासाठी १५% ने मिळेल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 12/12/2014 - 23:55

In reply to ओके, धन्यवाद. by खटपट्या

Permalink

सध्याचा दर

सध्याचा नेमका दर माहीत नाही. पण प्रत्येक बँकेच्या साईटवर तुम्हाला तो मिळू शकेल. उदा. सिंडिकेट बँकेचा सध्याचा दर बेस रेट + २.७५ म्हणजे १३.२५% आहे. इतर बँकांचा याच्या जवळपास असणार.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Fri, 12/12/2014 - 16:26

In reply to क्लिंटन साहेब गृहकर्जे ही by प्रमोद देर्देकर

Permalink

मला जर प्लॉट घेवुन मग त्यावर

मला जर प्लॉट घेवुन मग त्यावर घर बांधायचे असेल तरीही हाच पर्याय उपयोगी पडेल काय? कर्ज मिळते. मात्र बांधकाम होत जाईल तसे कर्ज रिलीज होते. सुरूवातीला पहिला कर्जाचा हप्ता मिळतो, नंतर बांधकाम प्लिंथ लेव्हलला आले की पुढचा हप्ता.. असे टप्प्या टप्प्याने कर्ज मिळते व तशीच व्याज आकारणी होते. (ही व्याज आकारणीही कमीटमेंट इंटरेस्ट + अव्हेल्ड इंटरेस्ट अशी असते) ही अत्यंत वरवरची माहिती आहे. तुम्ही बँकेच्या शाखेतून सल्ला घेणे योग्य.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Fri, 12/12/2014 - 16:01

Permalink

ओक्के धन्यवाद

ओक्के धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Fri, 12/12/2014 - 16:02

Permalink

विमा व प्रोसेसिंग फी

मी नुकतेच गृहकर्ज घेतले. मला स्टेट बँकेने प्रोसेसिंग फी आकारली नाही. तेंव्हा सुरू असलेली प्रोसेसिंग फी माफ असण्याची योजना अजून चालू आहे का, तसेच ती सवलत टेक ओव्हर प्रकारच्या कर्जासाठी मिळेल का, हे अवश्य विचारून पहा. तुंम्ही व्याज दर १०.१ % म्हणत आहात. तो फक्त स्त्री कर्जदाराचे नांव पहिले असल्यासच आहे. अन्यथा व्याजदर १०.१५% आहे, अशी माझी माहिती आहे. वास्तू विमा: हा तुमचा एलआयसीच्या कर्जासाठी आधीच काढला आहे काय? असल्यास स्टेट बँकेला चालेल. माझा प्लॅट रिसेलचा होता. त्यांच कर्ज होते विमाही होता. मला असे समजले की तो मी वापरू शकत नाही, कारण बँकही बदलते व विमा धारकही. दोन्हीपैकी एक जरी तेच असेल, तर तोच विमा मला वापरता आला असता. मला कर्ज मिळाले आहे. अजून प्लॅटचा विमा घेतला नाही. पण लवकरच घ्यावा लागेल. स्वतःचा विमा: तो मी बँकेचाच पण टर्म विमा घेत आहे. कर्ज रकमेच्या इतकी पॉलिसी असलेला. कर्ज विमा अजून स्वस्त पडला असता, पण त्याची रिस्क जसजसे फिटत जाईल तसतशी कमी कमी होत जाते, कारण तो बँकेच्या ग्रुप पॉलिसी खाली आहे व उद्देश फक्त कर्जाची सुरक्षा असा आहे. म्हणजे अर्जदाराचा मृत्यू झाल्यास फक्त कर्ज फिटेल व कुटुंबास काही मिळणार नाही. माझा स्वतःचा विमा विशेष नव्हता त्यामुळे मी टर्म पॉलिसी घेतली आहे. यात पॉलिसीची पूर्ण रक्कम कुटुंबाला मिळेल, त्यातून त्यांनी उरलेले कर्ज फेडल्यास बाकी रक्कम त्यांना मिळेल. तसेच त्यास काहीही मॅचुरिटी बेनिफीट नाही. उद्या समजा लवकर कर्ज फिटले, तर मी हप्ते थांबवू शकतो व त्या लायबेलिटीतून मुक्त होऊ शकतो. - स्वधर्म
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 12/12/2014 - 18:51

Permalink

एज्युकेशन लोन चा सिबिल स्कोअर

एज्युकेशन लोन चा सिबिल स्कोअर वर किती परिणाम होतो? माझं एजुकेशन लोन संपत आलयं (८ महिने अजुन). ते संपलं की घरासाठी एक आणि त्याआधी व्यवसायासाठी (ह्याच्यासाठी मी धागा काढलेला होता आणि ते अजुन २ महिन्यात अ‍ॅप्रुव्ह होईल) कर्ज काढायचं आहे. आजपर्यंत एकही हप्ता चुकलेला किंवा उशिरा गेलेला नाही. कर्जाच्या प्रकाराप्रमाणे सिबिल स्कोअर मधे फरक पडतो का?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 12/12/2014 - 23:39

In reply to एज्युकेशन लोन चा सिबिल स्कोअर by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

रेग्युलर लोन

रेग्युलर लोनच्या बाबत काहीच अडचण नाही. एक किंवा २ हप्ते ओव्हरड्यु झाले तरी मोठा प्रचंड परिणाम होत नाही. मात्र तीन हप्ते थकित झाले तर आणि लोन एन पी ए झाले तर मात्र दुसरे लोन मिळणे जवळपास अशक्य असते.
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Fri, 12/12/2014 - 23:10

Permalink

गावठाण भागात घर घेताना काय

गावठाण भागात घर घेताना काय बाबी तपासायला हव्यात? त्यावर थोडेफार लोन होते असे मला समजले आहे तर ते किती ? भविष्यात काय त्रास होउ शकतो? घर मला रहायला घ्यायचे आहे, गुंतवणुन म्हनौन नव्हे. सानपाडा, बेलापुर ,खारघर येथे गावठाण एरीया आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by hitesh on Sat, 12/13/2014 - 09:51

In reply to गावठाण भागात घर घेताना काय by विलासराव

Permalink

.

घर रहायला घ्यायचे तर गावठाण का शहरठाण कशाला पहायचे ? जसजसे शहर वाढत जाईल तशी गावठाणालाही जास्त एफ एस आय मिळेल्च . अआपल्याला घराची गरज आहे तशी सरकारला इतकी लोकसंख्या अशी अ‍ॅकोमोडेट करायची याची चिंता असेलच . त्यामुळे भविष्यात चांगलि डेवलपमेंट होईलच. :) घर घेणे वाअधिकारस्ते ! मा गावठाण चिन्ता कदाचन. ... श्री भगवान काऊ मुनी उवाच
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 12/13/2014 - 13:24

In reply to . by hitesh

Permalink

घर घेणे वाअधिकारस्ते ! मा

घर घेणे वाअधिकारस्ते ! मा गावठाण चिन्ता कदाचन. ... श्री भगवान काऊ मुनी उवाच
अर्रेच्या...तुम्ही तर गीता टाकाउ आहे म्हणालात ना
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 12/14/2014 - 23:39

In reply to घर घेणे वाअधिकारस्ते ! मा by टवाळ कार्टा

Permalink

त्यांना...

त्यांना... ... श्री भगवान टाकाऊ मुनी उवाच असं म्हणायचं आहे काय ? त्यांचं टंकनकौशल्य यथातथा असल्याचं दिसतं बर्‍याचदा :) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by hitesh on Mon, 12/15/2014 - 04:16

In reply to त्यांना... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

.

टा - काउ मुनी !
  • Log in or register to post comments

Submitted by hitesh on Sat, 12/13/2014 - 10:31

In reply to गावठाण भागात घर घेताना काय by विलासराव

Permalink

.

हिंदुत्वाचा अब्यास वाढवावा. पांडवानी खांडववन घेतले तेंव्हा तिथे गावठाणच काय जंगलठाण होते. नंतर भगवंताच्या कृपेने तिथे इंद्रप्रस्थ उभे राहिले. http://www.misalpav.com/node/29565
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Sat, 12/13/2014 - 11:24

In reply to . by hitesh

Permalink

काव काव ये ... चिव चिव ये....

काव काव ये ... चिव चिव ये.... धागा काढ... प्रतिसाद दे... आणी...भुर्र्रर्रर्रर्रर्र ऊडुन जा.....
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 12/13/2014 - 13:24

In reply to . by hitesh

Permalink

हिंदुत्वाचा अब्यास वाढवावा.

हिंदुत्वाचा अब्यास वाढवावा.
अर्रेच्या...तुम्ही तर गीता टाकाउ आहे म्हणालात ना
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 12/15/2014 - 00:00

In reply to हिंदुत्वाचा अब्यास वाढवावा. by टवाळ कार्टा

Permalink

ते काय?

त्यांच्या मनाला येईल तसा अर्थ काढतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Sat, 12/13/2014 - 13:14

Permalink

गृहकर्ज

गृहकर्जच नव्हे तर इतर कुठल्याही कर्जाच्या बाबतीत वर क्लिंटन साहेबांनी सांगितलेली PMT,(EMI किती) PPMT (EMI मधले Principal किती), nper(no of EMI) याचे गणित स्वतः करता येते. तसे केल्यास आपण घेतो तो निर्णय योग्य किेवा बरोबर याचा व्यवस्थित अंदाज बाधता येतो. इन्शुरंस घेणे आवश्यकच नसते. बँकाचे एजंट ते लादतात. लोन मधून जे पैस मिळतात त्यातून विमा काढायचा असल्याने आपण तयार होतो परंतु त्यात बऱ्याच अटी असतात. मला बंगलोरला घर घेताना ICICI च्या माणसाने विमा काढावाच लागेल वगेरे सांगितले, मी काढला पण मला त्या विम्याचा फारसा फायदा झाला नाही. तुम्ही एसबीआय मधे प्रयत्न करा, प्रोसेसिंग फी च्या बाबतीत बारगेन करा. लोनची रक्कम जास्त असेल तर प्रोसेसिंग फी सवलत मिळतेच. विमा आधी काढलेला असेलच तर परत का काढावा लागतो हे कळले नाही. गृहकर्जाविषयी व्यवस्थ्त माहीती आणि शेवटपर्यंत बारगेन करायची इच्छा असेल तर प्रश्न लवकर सुटतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अतरंगी on Sat, 12/13/2014 - 15:03

Permalink

एस बी आय मधे 31 डिसेंबर

एस बी आय मधे 31 डिसेंबर पर्यंत प्रोसेसिंग फिज आकारण्यात येणार नाही. संपर्क :-Chief ManagerState Bank of IndiaPune Main BranchContact No. 020-66456119/6001
  • Log in or register to post comments

Submitted by प्रफुल्ल on Fri, 12/19/2014 - 11:03

Permalink

IDBI होम लोन माहीती

मी आयडीबीआय मध्ये होम लोन अप्लाय करतोय. प्रोसेसिंग फिज नाहित. पण नतंर इन्शुरंस घ्यावा लागेल आणि मोर्ट्गेज इन्टिमेशन पण करावा लागेल अस एजंट ने सांगितलय. मला मोर्ट्गेज इन्टिमेशन नाही माहित, म्हणजे मी अगोदर एस बी आय मधून होम लोन घेतले होते तेव्हा मोर्ट्गेज इन्टिमेशन वगैरे केले नव्ह्ते. कुणी सांगेल का मोर्ट्गेज इन्टिमेशन काय भानगड आहे??
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com