✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा

म
माहितगार यांनी
Mon, 10/20/2014 - 16:07  ·  लेख
लेख
भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते. अर्थात जी गोष्ट नित्याची असते नेमकी त्याचीच दखल कमी घेतली जाण्याची शक्यता असते. या धाग्याचा उद्देश इंग्रजी मराठी आणि इतरही भाषी विकिपीडियातून भारतातील धार्मीक सहिष्णूतेच्या नोंदींची दखल घेणे असा आहे. [[Religious harmony in India]] हा इंग्रजी विकिपीडियावरील लेख आहे तो अद्ययावत करण्यात सहकार्य हवेच आहे. सोबतच मराठी विकिपीडियावरही लेखन करावयाचे आहे त्या साठी Religious_harmony_in_India या शीर्षकाचा मराठी अनुवाद कसा करावा ? भारतातील धार्मीक सहिष्णूता कि भारतातील धार्मीक सलोखा ? यात भारतातील धार्मीक सहिष्णूतेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तत्वज्ञान, धार्मीक सहिष्णूतेची उदाहरणे, धार्मीक सहिष्णूतेच्या प्रसाराचे कार्य या आणि अशा संदर्भाने सर्व शक्य माहिती हवी आहे. भारतातील धार्मीक हिंसा हा तसा या धाग्याचा मुख्य विषय नाही त्यामुळे कुणाला धार्मीक हिंसेची उदाहरणे नोंदवावयाची झाल्यास इंग्रजी विकिपीडियावर Religious violence in India असा एक लोकप्रीय लेख आहे. त्या लेखाला लोकप्रीय म्हणण्याच कारण त्या लेखाला लेखक वाचक अधिक भेटतात. दुखावलेले लोक असतात का भारतीय एकात्मतेचे हितशत्रू असतात का दोन्ही माहीत नाही पण इंग्रजी विकिपीडियावर [[Religious harmony in India]] या लेखावर लेखन करताना अधिक अडथळ्यांचा नियमांचा सामना करावा लागतो म्हणून या लेखासाठीची माहिती संदर्भांसहीत नमूद केल्यास, या विषयावर इंग्रजी विकिपीडियावरचे लेखन करतानाचे अडथळे पार करणे थोडे सोपे जाईल. "भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते." हि वस्तुस्थिती मी नित्य अनुभवत असलो तरी इंग्रजी विकिपीडियावर हे वाक्य नमुद करावयाचे झाल्यास संदर्भ हवा आहे. *अवांतर चर्चा टाळण्यासाठी, प्रतिसादांसाठी धन्यवाद. नित्या प्रमाणे चर्चा विकिपानांसाठीच्या मजकुरासाठी आहे तेव्हा आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
37230 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

धार्मीक सहिष्णूतेची उदाहरणे

मदनबाण
Mon, 10/20/2014 - 16:19 नवीन
धार्मीक सहिष्णूतेची उदाहरणे हिंदूंची हजारो मंदिर पाडुन त्यावर अनेक ठिकाणी मशीदी उभारल्या गेल्या, हजारो स्त्रीयांवर बलात्कार झाले आणि त्यांनी जनान खान्यांची शोभा वाढवली. धर्मावरुन फाळणी झाली तेव्हा बलात्काराला विरोध करु नका असे सांगणारे "महात्मा" हिंदूच होते आणि एव्हढे होउन सुद्धा जगाच्या तुलनेत भारतातील मुस्लिम अधिक सुरक्षित आहेत. या पेक्षा अधिक सहिष्णूतेचे ? उदा. मला तरी देता येणार नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms
  • Log in or register to post comments

.

hitesh
Sun, 11/02/2014 - 20:36 नवीन
युद्ध झाले की जिंकणारा राजा हा पैसा जमीन बायका यांचा मालक असतो. अस पुर्वी नियम होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

. धर्मावरुन फाळणी झाली तेव्हा बलात्काराला विरोध करु नका.....

बाबा पाटील
Tue, 10/21/2014 - 11:53 नवीन
याचा सत्य संदर्भ द्याल काय ?
  • Log in or register to post comments

आपण इथे प्रकट होणार याची

मदनबाण
Tue, 10/21/2014 - 12:20 नवीन
आपण इथे प्रकट होणार याची खात्रीच होती ! http://www.misalpav.com/comment/448681#comment-448681

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

ऐतिहासिक दस्ताऐवज आणी बखरी यात जमिन-अस्मानाचा फरक असतो.

बाबा पाटील
Tue, 10/21/2014 - 20:34 नवीन
तत्कालिन वृत्तपत्रे,इतर दृकश्राव्य माध्यमे अथवा तत्कालिन समाजमान्य व्यक्ती यांच्याकडचा थोडाफार जरी पुरावा समोर ठेवला तर परत गांधीबाबाच नाव घेणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मला वाटत विवाद्यबाजूंचे विषय

माहितगार
Tue, 10/21/2014 - 21:14 नवीन
मला वाटत विवाद्यबाजूंचे विषय मिपावर दोन्ही बाजूने बरेच चघळून झाले असणार त्या साठी दोन्ही बाजूंच्या लोकांसाठी भरपूर धागे आहेत. हिंदू मुस्लीम या शिवाय सुद्धा पार्सी ज्यू इत्यादी इतरही धर्म विचार भारतात होते/आहेत त्यांचे काही चांगले अनुभव भारतात असणार. या धाग्यावर शक्यतो विवादात न अडकता केवळ सौहार्दाची इतर प्रमाण स्रोतांचे संदर्भ देऊन दखल घेण्यात सहकार्य हवे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

@तत्कालिन समाजमान्य व्यक्ती

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/22/2014 - 00:34 नवीन
@तत्कालिन समाजमान्य व्यक्ती यांच्याकडचा थोडाफार जरी पुरावा समोर ठेवला तर परत गांधीबाबाच नाव घेणार नाही. >>> पुरावा म्हणताय ना?,मग मी पुरावा ठेवतो.फक्त परत गांधीबाबाच नाव घ्यायचं की नाही? ..ते तुमचं तुंम्ही ठरवा. (मला त्याच्याशी काहिही कर्तव्य नाही. :) ) संदर्भ :- आचार्य अत्रे यांचं, यंग मॅन्स हिंदू एसोसिएशनच्या, गणेशोस्तवातील दिनांकः-२३/९/१९४७ रोजीचं "मी मुळीच बदललो नाही" हे भाषण. (पुस्तकः- हशा आणि टाळ्या,पानः-२२४.) प्रसंगः- बंगाली स्त्रीयांनी गांधीना विचारलं:- गुंडांनी आमच्यावर हात टाकला,तर आंम्ही काय करायचं?. गांधींचे वक्तव्यः- श्वास रोखुन धरा म्हणजे तुमचे प्राण जातील,आणि अब्रू वाचेल. यावर (काहि) डॉक्टर लोकांनी असे सांगितले,की (अश्या वेळी) श्वास रोखुन धरल्यावर,प्राण न जाता शुद्ध हरपेल,आणि गुंडांचं दुष्ट कार्य झाल्यावर ती शुद्धीवर येइल.(मरणार नाही.) यावर गांधिंचं वक्तव्यः- (स्त्रीयांनी) विषाची कुपी जवळ बाळगावी. (आपल्या समोरील जनसमुदायाला)सदर प्रसंग सांगून (ज्याला फाळणीच्या वेळचा हिंदू-मुस्लिम दंगलीचा संदर्भ आहे.) भाषणात आ.अत्रे अत्यंतीक त्वेषानी आणि तीव्र दुखा:नी जनसमुदायासमोर काय म्हणतात??? आ.अत्रे:- "अहिंसेच्या अतिरेकाची ही तिरस्करणीय पराकाष्ठा आहे. स्त्रीयांनी विष खाऊन मरावे,आणि (दंगलखोर मुस्लिम) गुंडांवर मात्र सूड घेण्यात येऊ नये, हे जर का गांधिजिंच्या अहिंसेचे भयानक तत्वज्ञान असेल,तर आग लागो रे त्या गांधिजिंच्या अहिंसेला! (पुढे भावविवश झालेला जनसमुदाय या निर्भिड वक्तव्यावर काहि काळ टाळ्या वाजवत रहातो.) ============================================================= बाबा पाटील सदर भाषण हे फाळणी केल्यामुळे गांधींवर चिडलेल्या आणि काँग्रेसी व गांधी तत्वज्ञानाला सोडचिठ्ठी दिलेल्या (एकेकाळच्या कट्टर गांधी/काँग्रेससमर्थक) आत्र्यांचे आहे. आपण ज्या अनुषंगानी प्रश्न विचारला अगर मत व्यक्त केले आहे.ते पाहू जाता आपण सदर पुस्तकातील ते छापिल भाषण संपूर्ण वाचणे आवश्यक आहे.(असे मला वाटते. :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

संघर्षकालीन लैंगिक हिंसा

माहितगार
Wed, 10/22/2014 - 08:21 नवीन
संघर्षकालीन लैंगिक हिंसा विषयावर उशिरा का होईना युनायटेड नेशन्सला जाग आलेली दिसते. UN Action Against Sexual Violence in Conflict हि संस्था या विषयावर काम करते आहे. पुरुष मंडळी धर्मग्रंथ स्वतःस सोईस्कर राहतील हे बघतातत आणि संधी मिळाली की पुरुष सुटतात. अयोग्य ते अयोग्यच यात उजवा डावा कसचं काय. अबकड समुदायाचे पुरुषच केवळ वाईट वागतात हळक्षज्ञचे पुरुष वाईट वागत नाहीत असे नसावे. Category:Wartime sexual violence हि इंग्रजी विकिपीडियावरील कॅटेगरीत सगळे एकाच तराजूत असतात हे दाखवणारे पुरेसे लेख आहेत. आपणही एखादा लेख त्या कॅटेगरीत जोडू शकलात तर संघर्षकालीन लैंगिक हिंसा या बद्दलचे दस्तएवजीकरणात मदतच होईल. या बद्दल अधिक चर्चा इतर धाग्यातून करता येईल. या धाग्याचा उद्देश मर्यादीत आहे त्या दृष्टीने धागालेखास अनुसारून प आपल्या सक्रीय सहभाचा अभिलाषी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

"धागालेखास अनुसरून आपल्या

माहितगार
Wed, 10/22/2014 - 08:34 नवीन
"धागालेखास अनुसरून आपल्या सक्रीय सहभागाचा अभिलाषी आहे." असे वाचावे, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

.

hitesh
Sun, 11/02/2014 - 19:54 नवीन
अत्रेंचे भाषण आहे म्हणुन तो प्रसंग खरा घडला होता हे सिद्ध होते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

एक शंका...

शिद
Mon, 11/03/2014 - 15:24 नवीन
तुम्ही पुर्वाश्रमीचे "उद्दाम" का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

त्याच पैकी कुणीतरी १ आहेत...

अत्रुप्त आत्मा
Mon, 11/03/2014 - 15:38 नवीन
त्याच पैकी कुणीतरी १ आहेत... हे नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

सदस्यकाळ 2 weeks 6 days

टवाळ कार्टा
Mon, 11/03/2014 - 16:00 नवीन
सदस्यकाळ 2 weeks 6 days
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

.

hitesh
Mon, 11/03/2014 - 16:17 नवीन
शरीर नष्ट होते. अआत्मा अमर असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

@शरीर नष्ट होते. अआत्मा अमर

अत्रुप्त आत्मा
Mon, 11/03/2014 - 16:22 नवीन
@शरीर नष्ट होते. अआत्मा अमर असतो. >>> व्वा!!! अता तर कळलीच ओळख!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

त्याचं काही विशेष नसतं हो!

अत्रुप्त आत्मा
Mon, 11/03/2014 - 16:20 नवीन
त्याचं काही विशेष नसतं हो! हे अवतारी पुरुष ,वाल भिजत टाकावे , तसे डु आयडी काढून ठेवत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तर परत गांधीबाबाच नाव घेणार नाही

ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 02/10/2016 - 18:12 नवीन
पाटिल साहेब काय ठरलय मग ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

धागालेख व्यवस्थीत लिहिण्यात

माहितगार
Tue, 10/21/2014 - 13:15 नवीन
धागालेख व्यवस्थीत लिहिण्यात मी कुठे कमी पडलो असल्यास क्षमस्व. या धाग्याचा उद्देश कुठल्या लांगूलचालनाची दखल धार्मीक सहिष्णूता म्हणून घेणे असा नसावा. मला नक्की माहित नाही की आता पर्यंत आलेल्या प्रतिसादातील चर्चा "आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान" या धाग्यात अधिक सयुक्तीक असेल किंवा कसे.
  • Log in or register to post comments

धागालेख व्यवस्थीत लिहिण्यात

मदनबाण
Tue, 10/21/2014 - 13:28 नवीन
धागालेख व्यवस्थीत लिहिण्यात मी कुठे कमी पडलो असल्यास क्षमस्व. या धाग्याचा उद्देश कुठल्या लांगूलचालनाची दखल धार्मीक सहिष्णूता म्हणून घेणे असा नसावा. अहं... असे अजिबात नाही ! पण हा देश हिंदूस्थान आहे आणि एक हिंदू म्हणुनच मी माझे व्यक्त केले आहे.सहिष्णूतेच्या नोंदींची दखल ही हिंदूस्थानातील हिंदू लोकां पासुनच करायला हवी ! या हिंदूस्थानाने हिंदूं व्यतिरिक्त सर्व धर्मांना या हिंदूस्थानात त्यांच्या {इतर} धर्मावर कोणतीही बंधने न आणता सर्व स्तरांवर / पदांवर आणि जगण्यात मो़कळीक दिलेलीच आहे की. अहो इतके सहिष्णूता {?} भिनलेला हिंदू समाज जगात विरळाच बघा ! जाता जाता :- लांगूलचालन हा फारच सौम्य शब्दप्रयोग वाटतो. असो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern
  • Log in or register to post comments

मदनबाण; नव्हे, कडकबाण

वेल्लाभट
गुरुवार, 10/30/2014 - 17:06 नवीन
तुमचे वरील सगळे प्रतिसाद जबर आहेत. भावार्थी मी त्यातल्या प्रत्येक वाक्याशी सहमत आहे हे वे सां न ला. पण त्यातील उल्लेखिलेली पुस्तके आता वाचली पाहिजेत. ***!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मदनबाण हयांच्याशी पुर्ण सहमत

होबासराव
Tue, 10/21/2014 - 15:41 नवीन
परधर्माविषयी आदर म्ह्णजे स्वधर्मा साठि अनास्था नव्हे.. आमच्या सहिष्णुतेचा कोणि चुकिचा अर्थ लावु नये
  • Log in or register to post comments

मदनबाण हयांच्याशी पुर्ण सहमत

होबासराव
Tue, 10/21/2014 - 15:41 नवीन
परधर्माविषयी आदर म्ह्णजे स्वधर्मा साठि अनास्था नव्हे.. आमच्या सहिष्णुतेचा कोणि चुकिचा अर्थ लावु नये
  • Log in or register to post comments

अधिक सुयोग्य अनुवाद कोणता ?

माहितगार
Tue, 10/21/2014 - 17:07 नवीन
Religious_harmony शब्दाचा अधिक सुयोग्य अनुवाद धार्मीक सद्भाव अथवा धार्मीक समरसता असेल का ?
  • Log in or register to post comments

अवांतर : कराचीतील दिवाळी आणि दिवाळी बोनस

माहितगार
Tue, 10/21/2014 - 19:14 नवीन
हम्म.. दिवाळीच्या बातम्या बघताना या दुव्यावर कराचीतील दिवाळीची बातमी वाचण्यात आली.
  • Log in or register to post comments

काय बाते पाक माध्यामातून बदला

माहितगार
Tue, 10/21/2014 - 19:27 नवीन
काय बाते पाक माध्यामातून बदला बदला आवाज कशामुळे सर्व ठिक असेल अशी आशा करून, आणखी एक दुवा http://www.dawn.com/news/1138373
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा

धर्मराजमुटके
Tue, 10/21/2014 - 19:15 नवीन
आपला काहितरी गैरसमज होत आहे. भारतातच काय किंबहूना अखंड जगातच धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा नावाची चीज अस्तीत्वात नाही. तसा समज होण्याची कारणे खालीलप्रमाणे. १. बहूसंख्य जनता ही कायद्याला घाबरते. २. बहूसंख्य जनतेकडे बाहूबल नसते. ३. बहूसंख्य जनतेला स्वतःचे डोके नसते. ४. बहूसंख्य जनतेला दुसर्‍याच्याच काय पण आपल्या धर्माविषयी पण पुर्णपणे माहिती नसते. योग्य संधी मिळाली, आपण पकडले जाणार नाही अशी यांची खात्री किंवा गैरसमज होतो तेव्हा हाच समाज धार्मिक सहिष्णूता आणी सलोख्याला हरताळ फासतो. वरील वक्तव्ये अतिरंजीत असली तरी तेच वास्तव आहे. अन्यथा दर १०-२० वर्षांनी जातीय दंगली झाल्या नसत्या. अवांतरः प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो तो येथेही गृहीत धरलेलाच आहे.
  • Log in or register to post comments

मला वाटतं मी या धाग्यासाठी

माहितगार
Tue, 10/21/2014 - 20:04 नवीन
मला वाटतं मी या धाग्यासाठी फार मोठा म्हणजे काही हजार वर्षांचा काळ लक्षात घेतो आहे आणि एवढा मोठा काळ म्हटल्यावर सहाजीकपणे पूर्ण भारतीय उपमहाद्वीपाबद्दलही. ब्रिटीशपुर्व काळात राज्यकर्त्यांच्या कडेलोट, हत्तीच्या पायी देणे, चौरंग करणे अशाही अघोरी सजा होत्या (ब्रिटीशांनी काळेपाणी आणि फाशी असे प्रकार केलेच नाही असे नाही) तरी सुद्धा ब्रिटीशपुर्वकाळात ग्राम व्यवस्थेत राज्यकर्त्यांची दैनंदीन ढवळा ढवळ होती असेही नसावे. किमानपक्षी धार्मीक सौहार्दात कमी पडला म्हणुन सजा झाल्याचे भारतीय प्राचीन इतिहासात वाचनात नाही. संघर्ष प्राचीन इतिहासातही झाले असतील नाही असे नाही. पण जेवढा इतिहास संघर्षांचा असेल तो दुखावलेल्या कोपर्‍यात नोंदवला आणि जागवला जात राहतो. सौहार्द विसरल जात. इतरांबद्दल कशाला, माझ्या व्यक्तीगत बाबीतही, एखाद्या व्यक्तीशी माझे सौहार्दाचे संबंध आहेत जेव्हा संघर्ष होतो तेव्हा आधीचे चांगले मी सगळेच विसरतो, संघर्ष मला स्वतःला विसरण अवघड जात. शिवाजी महाराज धार्मीक सद्भभाव पाळतात हा आदर्शच इतरेजनांसाठी पुरेसा असु शकतो प्रत्येकवेळी कायद्याचा धाकच असेही नसावे. दंगलींची कारण वेगळीही असू शकतात. नरहर कुरुंदकरांनी डेमॉग्राफीक चेंजेसचा उल्लेख केला आहे तो विचारात घेण्या जोगा आहे साधारणतः अत्यल्प मायनॉरिटीज या मेजॉरिटीच समर्थन करतात. एखादी मायनॉरिटी डेमॉग्राफिकली वाढते तसा सुप्त संघर्ष आकारास येत जातो. मुंबईत दक्षीणेच्या लोकांनी डेमॉग्राफिक बदल आणला की त्यांच्या बद्दल अस्वस्थता निर्माण होते, बिहारींनी डेमॉग्राफिक बदल आणला की त्यांच्याबद्दल अस्वस्थता निर्माण होते. अर्थात या धाग्याचा प्रमुख उद्देश हिंसेची चिकित्साकरणे नाही. तुमच्या मतानुसार शांतता अपवाद आहे तर अपवाद म्हणूनच ठिक पण त्या अपवादातील का असेना शांतता आणि सौहार्दाची नोंद घेणे असा ह्या धाग्याचा उद्देश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

धार्मीक सहिष्णुता.

अर्धवटराव
Tue, 10/21/2014 - 21:32 नवीन
स्वातंत्रोत्तर काळात भारतात लोकशाहि डेव्हलप व्हायला सर्व धर्मीयांनी अगदी मनापासुन हातभार लावला. हे सर्वात मोठं धार्मीक सहिष्णुतेचं उदाहरण. मनोरंजन क्षेत्रात, विशेषत: बॉलीवुडने धार्मीक असहिष्णुतेला अजीबात थारा दिला नाहि. लोकांनिही कला क्षेत्रात पंडीतजी आणि उस्तादजींना अगदी समान मान दिला.
  • Log in or register to post comments

+१

माहितगार
Wed, 10/22/2014 - 07:55 नवीन
धागा लेखास अनुसरून प्रतिसादासाठी आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

इतर कट्टर देशांत प्रत्येक

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/22/2014 - 08:07 नवीन
इतर कट्टर देशांत प्रत्येक धर्म पाळायचा अन न पाळायचा एक खाका असतो , भारत त्या बाबतीत लिबरल आहे, धार्मिक सहिष्णुते ची उदहारण आपल्याला इतिहासात आदि मुग़ल काळात भरपूर सापडतील (हवीअसल्यास)कृपया "सतीशचंद्र भाग १,२ अन जे एल मेहता भाग ३" ही पुस्तके वाचावी संदर्भ म्हणून
  • Log in or register to post comments

वाचतो आहे

माहितगार
Wed, 10/22/2014 - 11:50 नवीन
सतीश चंद्र यांचे हे एक पुस्तक गुगलबुक्सवर मिळाले, वाचतो आहे. माहितीपुर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

आपल्या देशात कुण्या एका

वेल्लाभट
गुरुवार, 10/30/2014 - 17:08 नवीन
आपल्या देशात कुण्या एका धर्माचा वेगळा कायदा आहे. काय संबंध???? कसले लाड ***???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

धार्मिक साहिषुणता

आरोह
गुरुवार, 10/23/2014 - 00:20 नवीन
तू नळीवर तारिक फताह किंवा bilatakaluf विथ ताहिर गोरा सर्च करा...मुद्देसुद विवेचन ऐकायला मिळेल.
  • Log in or register to post comments

पण जेवढा इतिहास संघर्षांचा

असंका
गुरुवार, 10/30/2014 - 17:55 नवीन
पण जेवढा इतिहास संघर्षांचा असेल तो दुखावलेल्या कोपर्‍यात नोंदवला आणि जागवला जात राहतो. सौहार्द विसरल जात
करेक्ट...! मग सापडलं का काही मनासारखं?
  • Log in or register to post comments

करेक्ट...! मग सापडलं का काही

माहितगार
Mon, 11/03/2014 - 09:21 नवीन
करेक्ट...! मग सापडलं का काही मनासारखं?
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी (विद्यासागर राव) पुण्यातील ज्यू धर्मीयांच्या लाल देवळाच्या दीडशेव्या वर्धापनदिनी हजेरी लावून "देशाच्या संस्कृतीशी एकरूप होऊन ज्यू नागरिक राहात आहेत." असे तोंड भरून कौतूक केले. अशा नोंदी उपलब्ध होत असतात. कुणी याकडे शासकीय अथवा राजकीय भूमीका म्हणून पाहू शकेल. पण कस आहे तुमच्या माझ्यासारखा सर्वसाधारण व्यक्ती रोजच्या जीवनात एखाद्या वेगळ्या धर्मीयांशी संबंध आल्यास सहसा सौहार्दपुर्ण वागतात हे वास्तव असूनही याची बातमी होऊन येत नाही म्हणून असे संदर्भ मिळण्यास वेळ लागतो. काही उपयूक्त संदर्भ याच धाग्यावर दिले गेले आहेत ते अभ्यासतो आहेच (अर्थात हे मी सवडीने, सावकाश करतो आहे). आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

"मुस्लीम कवींची मराठी कविता"

माहितगार
Tue, 11/11/2014 - 20:57 नवीन
"मुस्लीम कवींची मराठी कविता" हा शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरास सादर केलेला किशोरकुमार कांबळे यांच्या प्रबंधात प्राचीन मुस्लीम (मराठी) कवींची काव्यपरंपरा हे प्रकरण आत्ताच वाचले. या धागा विषयास अनुसरुन खूप चांगली माहिती आहे. आणि अमुक तमुक समाजात बदल होतच नसतात या धारणेस एक छोटासा धक्का आहे यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

हे बघा.....

वेल्लाभट
Fri, 10/31/2014 - 14:37 नवीन
हे बघा कशी गळचेपी चालते ते आपल्या धर्माची. धर्माची; संस्कृतीची. आणि आपण आरक्षणं देतोय ! वा वा वा !
  • Log in or register to post comments

हे फक्त हिंदूंसाठीच झाले का

टवाळ कार्टा
Fri, 10/31/2014 - 15:39 नवीन
हे फक्त हिंदूंसाठीच झाले का त्या शाळेत??? उत्तर नाही असेल तर त्यांनी केलेले बरोबरच आहे उत्तर होय असेल तर त्याबद्दल त्या शाळेला एकदा लेखी निवेदन दिले पाहिजे (ते हिसका दाखवणे नंतरपण करु शकतो) उत्तर माहित नाही असे असेल तर....जौध्या...मीप मिपावर गळा काढणारे कोणी ना कोणी येईलच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

मुद्दा मान्य आहे. शैक्षणीक

माहितगार
Mon, 11/03/2014 - 09:27 नवीन
मुद्दा मान्य आहे. शैक्षणीक क्षेत्रातील अभिप्रेत शीस्त आणि मल्टीकल्चरीझमचा समतोल साधला जावयास हवा. सर्वच शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना ते व्यवस्थीत जमत असे नव्हे पण अशा ठिकाणी सुधारणा हा वेगळ्या चर्चेचा महत्वपूर्ण विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

धन्य तो दैनिक सकाळ

माहितगार
Sun, 11/02/2014 - 22:40 नवीन
वस्तुतः धाग्याच्या कक्षे बाहेरचे विषय इथे चर्चा करून मनातली भडास व्यक्त करणे आणि तू मला सांग मी तूला सांगतो पलिकडे फारसे काही होणार नाही. त्या पेक्षा इंग्रजी विकिपीडियावरील असे सुयोग्य लेख शोधणे आणि माहिती संदर्भा सहीत जोडणे अधिक उचीत होऊ शकेल. किंवा अगदी इनटॉलरन्स इन कॉन्व्हेंट स्कूल्स असा लेख अद्यापतरी इंग्रजी विकिपीडियावर नसावा पण संदर्भासहीत तो तसा काढण्यास हरकत नसावी. किमान पक्षी भारतीय भाषी विकिपीडियांवर आपण असा लेख करून नोंदींची संदर्भासहीत ज्ञानकोशीय दखल घेऊ शकताच. बादवे आपण दैनिक सकाळची बातमी दुवा जो दिला तो अनुवादीत होऊन येई पर्यंत शिळा झाला असावा असे दिसते. दैनिक सकाळ ची दुव्यावरील बातमी वेळ शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2014 - 10:56 AM IST अशी दिली आहे. पण तत्पुर्वीच By Paras Ramoutar Port-of-Spain, Oct 30 (IANS) 14:30 दुपारी Mehndi on hands, Indo-Trinidadian girl back in class अशी बातमी IANS ने दिली आणि दैनिक सकाळला शिळ्याबातमीचा अनुवाद देईपर्यंत आदल्या दिवशीच्या दुपारच्या बातमीची दखल घेऊन अद्ययावत कराविशी वाटलेली दिसत नाही. एनी वे या दुव्यावर हि बातमी विस्तृतपणे वाचण्यास उपलब्ध दिसते आहे. धन्य तो दैनिक सकाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

बुखारींकडून भारताच्या नव्हे

मदनबाण
Fri, 10/31/2014 - 16:51 नवीन
बुखारींकडून भारताच्या नव्हे पाकच्या पंतप्रधानांना निमंत्रण! हिंदूस्थानात राहुन हिंदूस्थानच्या पंतप्रधानांचा असा अपमान ! कोणत्याही अरब देशात असा उध्योग करण्यास कोणी धजावणार देखील नाही !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो की
  • Log in or register to post comments

.

hitesh
Mon, 11/03/2014 - 14:24 नवीन
१९८४ साले इंदिराजीना जगन्नाथ पुरीच्या मंदिरात तिथल्या पुजार्‍याने प्रवेश नाकारला होता.. तेंव्हा तुमच्या पंतप्रधानाचा अपमान झाला नव्हता का ? बुखारीनी मोदीना नाही बोलावले तर इतका दंगा कशाला ? शाही इमामाचे पद जहांगिराने तयार केले होते. भारत मोघलाना 'आपला ' मानत नाही.. पाकिस्तान मात्र स्वतःला मोघलांचा फॉलोअर समजतो.. त्यामुळे कुणाला बोलवायचे कुणाला नाही हे बुखारी ठरवतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

भारत मोघलाना 'आपला ' मानत

टवाळ कार्टा
Mon, 11/03/2014 - 14:41 नवीन
भारत मोघलाना 'आपला ' मानत नाही
नक्की का??? का ह्याच्या अगदी उलटे होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

.

hitesh
Mon, 11/03/2014 - 15:12 नवीन
म्हैत नै ब्वॉ ! बहाद्दुर शह जफर भारतासाठी लढला इतके ऐकुन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

घन्टा तो ७२+ (का ८०+)

टवाळ कार्टा
Mon, 11/03/2014 - 15:59 नवीन
घन्टा तो ७२+ (का ८०+) वर्षांचा असताना लढेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

.

hitesh
Mon, 11/03/2014 - 16:18 नवीन
भीष्माचार्य किती वर्षाचे होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

इंदिरा गांधींना विरोध त्यांनी

प्रचेतस
Mon, 11/03/2014 - 17:22 नवीन
इंदिरा गांधींना विरोध त्यांनी पारशी इसमाशी लग्न केल्यामुळे झाला होता. पारशी अग्यारींमध्ये इतर धर्मीयांना आजही प्रवेश नाही. हल्ली त्यांचे नियम बदलले असल्यास माहित नाही. बाकी धर्माचा मुद्दा सोडून दया. मोदींना बोलवणे अथवा न बोलावणे हा इमामांचा प्रश्न त्याला आक्षेप नाहीच. पण पाकिस्तानी पंतप्रधानांना बोलावणे हे भारताला मुद्दाम खिजवण्यासारखे आहे असे तुम्हाला वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

आणि हो, मोगलांना आपले का

प्रचेतस
Mon, 11/03/2014 - 17:23 नवीन
आणि हो, मोगलांना आपले का मानावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

.

hitesh
Mon, 11/03/2014 - 17:43 नवीन
यात खिजवायचा संबंध कुठे आला ? मोदी चीनच्या प्रमुखाला भेटु शकतात.. इमाम पाकिस्तानच्या प्रमुखाला का भेट शकत नाहीत ? पाकिस्तानला होणारी निम्मी निर्यात मोदींच्या गुजरातमधुनच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पाकिस्तानात जाउन जरुर भेटावे

प्रचेतस
Mon, 11/03/2014 - 17:52 नवीन
पाकिस्तानात जाउन जरुर भेटावे की. बाकी ह्यात व्यापाराचा तसेच २ राष्ट्रप्रमुखांच्या भेटीचा बादरायण संबंध जोडलेला पाहून गंमत वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा