Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पुष्कर on Tue, 12/18/2007 - 10:59
  • Log in or register to post comments
  • 22747 views

प्रतिक्रिया

Submitted by अवलिया on Tue, 12/18/2007 - 14:37

Permalink

अतिशय सुंदर विषय

आपण अतिशय सुंदर विषय निवडला आहे. चाणक्य मालिके मुळे ही व्यक्तिरेखा अनेक लोकांना माहित झाली असली तरी तिचे कार्य व त्याचे आजही असलेले अपरंपार महत्व ब-याच लोकांना उमजत नाही. चाणक्याचे अर्थशास्त्रावरील अनेक मते आज लोकांना कदाचित पटणार नाहित कारण चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. त्यातुनच अमेरीकेचे उखळ पांढरे होत आहे ही गोष्ट अलाहिदा. परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे तसेच कमीतकमी किंमत मोजुन बाहेरिल वस्तु देशात याव्या व देशातील वस्तु बाहेर जातांना त्यांना जास्तीत जास्त किंमत मिळावी. याचबरोबर देशांतर्गत व्यवहार स्वयंपुर्ण असावा याचा आग्रही चाणक्य .... विचार करा ..भारतीय चाणक्याचे विचार अमेरीकनांनी उचलले व इतर जगाला उल्लु बनविले. आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते. शुभेच्छा नाना
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 12/18/2007 - 15:40

In reply to अतिशय सुंदर विषय by अवलिया

Permalink

चांगला प्रतिसाद,

नानासाहेबांचा प्रतिसाद आवडला... आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते. पुष्कररावांनी या गोष्टीवर अवश्य विचार करावा असे वाटते! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर on Wed, 12/26/2007 - 09:16

In reply to अतिशय सुंदर विषय by अवलिया

Permalink

नक्कीच

प्रतिसादाबद्दल आभारी आहे. "आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते." नक्कीच. मी सुरुवातीला वर्णनात्मक अंगाने हे लिखाण करायचं ठरवलं होतं, पण अश्या विषयावर लिहिताना आणखीन जबाबदारीने लिहिण्याची गरज आहे असं वाटतं. मला कौटिलीय अर्थशास्त्राबाबतीत आणखीन अभ्यासाची गरज आहे. तुमचं मार्गदर्शन मिळालं तर बरंच होईल. पुन्हा एकदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सृष्टीलावण्या

Submitted by सृष्टीलावण्या on Wed, 03/26/2008 - 08:53

In reply to अतिशय सुंदर विषय by अवलिया

Permalink

एके ठिकाणी

हा आपला चणुकबुवा म्हणतो... पैसा हेच पैश्याला खेचून आणणारे खरे नक्षत्र आहे व त्यासाठी आकाशातील नक्षत्रे पाहाणे हा बालीशपणा आहे... > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Sat, 07/03/2010 - 11:40

In reply to अतिशय सुंदर विषय by अवलिया

Permalink

परंतु सोने

परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे याचा अर्थ आज वस्तुविनिमय आणावा असा तर नाही ना. म्हणजे एक कोंबडी द्या आणि पसाभर धान्य आणा. एक हार्डडिस्क द्या आणि बदल्यात एक आयपॉड आणा असं झालं तर अवघड होईल. चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. इसवी सनपूर्व ३३० च्या आगेमागे जे जे करणे योग्य होते उत्तम होते ते चाणक्याने केले, चंद्रगुप्ताने केले. म्हणूनच ते थोर आहेत. त्यांनी तेंव्हा जे लिहिले ते त्रिकालाबाधित सत्य कसे असेल? आज चलन स्वरुपातील पैसा श्रेष्ठ मानू नये तर काय श्रेष्ठ मानावे. नुसता गोंधळ झालाय. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते जरा अधिक नीट स्पष्ट कराल का?
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 12/18/2007 - 15:31

Permalink

पुष्करराव,

छान लिहिले आहे. पुढील भागांची उत्सुकता आहे.. सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल... अवांतर - गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. दूध काढण्याला 'गोरसदोहन' म्हणतात, हे माहीत नव्हते! असो, आपला, (मुंबई विद्यापिठात शिकलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर on Wed, 12/26/2007 - 09:22

In reply to पुष्करराव, by विसोबा खेचर

Permalink

धन्यवाद

तात्या. तुमचा प्रतिसाद वाचून हुरूप आला. सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल... हम्म्म. खरंय तुमचं. मलापण हा भाग जरा छोटाच वाटला. पण वेळ मिळत नसल्याकारणाने अनेक दिवस कंटाळून शेवटी तयार झालेला छोटाच भाग प्रकाशित करून टाकला. बघा ना, आता तुमच्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद द्यायलाही मी किती वेळ लावला! आम्च्या नशिबात 'मोकळा वेळ' आणि 'आंतरजाल सुविधेची उपलब्धता' ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येणं तसं दुर्मिळच. पुढचे भाग प्रकाशित करण्यापूर्वी तुमच्या सूचनेचा नक्कीच विचार करीन.
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Tue, 12/18/2007 - 18:41

Permalink

थोडीशी भर

पुष्कर महोदय, खूपच सुंदर विषयास तुम्ही हात घातला आहे. मी देखील चाणक्य भक्त आहे. पुढील भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे. असेच छान लिहीत रहा. तुम्ही योग्य ती तयारी आणि अभ्यास केला असेलच. तरी आवडीचा विषय असल्यामुळे थोडीशी भर टाकू इच्छीतो पुढील ग्रंथ तुम्हांस मिळाले तर संदर्भासाठी त्याचा नक्की चांगला उपयोग होईल आणि तुमची ही सुंदर कथा अधिक अर्थपूर्ण होईल. बारीकसारीक तपशीलांनी कथानकास विद्वत्तेचा साज चढतो असे मी मानतो. कौटिलीय अर्थशास्त्र - ब.रा. हिवरगांवकर (यांच्याइतका अधिक उपयोगी दुसरा ग्रंथ कौटीलिय अर्थशास्त्रावर उपलब्ध नाही.) अशोक आणि मौर्यांचा र्‍हास - शरावती शिरगांवकर भारतवर्षाचा इतिहास - गुंडोपंत हरिभक्त चाणक्य (कादंबरी) - आनंद साधले चाणक्य (कादंबरी) - भा.द.खेर आर्य चाणक्य (कादंबरी) - लेखकाचे ओठावरचे नाव विसरलो :( असो... वाटले म्हणून लिहीले... (चाणक्यभक्त ) सागर
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर on Wed, 12/26/2007 - 09:09

In reply to थोडीशी भर by सागर

Permalink

आभार

सागर साहेब, आपला मनापासून आभारी आहे. तुमचा या विषयावरचा व्यासंग खूप मोठा आहे असं दिसतंय. तुम्ही दिलेल्या यादीमधली "आर्य चाणक्य" ही भा.द.खेरांची कादंबरी मी वाचली आहे. हिवरगांवकरांचं "कौटिलीय अर्थशास्त्र" मी खूप दुकानांमध्ये शोधलं. मिळालं नाही. तुमच्याकडून मला या विषयावर आणखी माहिती मिळवायला नक्कीच आवडेल. -पुष्कर
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Wed, 12/26/2007 - 13:15

In reply to आभार by पुष्कर

Permalink

ब.रा. हिवरगांवकर यांचे कौटिलिय अर्थशास्त्र येथे मिळेल

पुष्कर, ब.रा. हिवरगांवकर यांचे कौटिलिय अर्थशास्त्र विकत घ्यावयाचे झाल्यास पुण्यात अप्पा बळवंत चौकात रसिक साहित्य वा उज्वल ग्रंथ भांडार यांच्याकडे नक्की मिळेल. आणि ग्रंथालयात हवे असेल तर पुणे मराठी ग्रंथालय व पुणे नगर वाचन मंदीर या दोन्ही ग्रंथालयात हे पुस्तक नक्की आहे (मी सदस्य असताना हे पुस्तक पहिल्यांदा नगर वाचन मंदीरातूनच घेतले होते). तुम्ही मुंबईत असाल तर मुंबईच्या बर्‍यापैकी जुन्या वा मोठ्या ग्रंथालयात हे पुस्तक मिळेल असे वाटते. या माहितीचा कदाचित उपयोग होईलसे वाटते... धन्यवाद सागर
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Sat, 07/03/2010 - 11:33

In reply to थोडीशी भर by सागर

Permalink

उत्तम

उत्तम लिखाण चालू आहे. 'सहा सोनेरी पाने' आणि रोमिला थापर यांचे 'अर्ली हिस्टरी ' पण उपयोगी पडू शकेल. आणि अर्थातच पंडित नेहरुंचे 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' सुद्धा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Tue, 12/18/2007 - 20:23

Permalink

चाणक्य..

चाणक्यावर वाचायला नक्कीच आवडेल. सुरूवात छान झाली आहे,पुढील भाग लवकर टाका. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 12/18/2007 - 20:37

Permalink

आवडले.

वा वा! पुढिल लेखन ललित अंगाने जाऊन अर्थशास्त्रातील कठिण तत्त्वांवर/सिद्धांतांवर सुलभतेने भाष्य करेल ही अपेक्षा. पुढिल लेखनास अनेक शुभेच्छा! (उत्सुक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 12/18/2007 - 20:57

Permalink

छान सुरुवात..

सुरुवात छान झाली आहे. पुढील भागांच्या प्रतीक्षेत... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 12/19/2007 - 07:24

In reply to छान सुरुवात.. by सुनील

Permalink

+१

सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर on Wed, 12/26/2007 - 09:26

In reply to +१ by सहज

Permalink

उत्साही

स्वाती, ऋषिकेश, सुनील आणि सहज, तुमचा उत्साहवर्धक प्रतिसाद वाचून खूप बरं वाटलं. आता पुढचे भाग लवकरच टाकतो. -(उत्साही) पुष्कर
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Tue, 12/18/2007 - 22:50

Permalink

छान विषय

छान विषय निवडलात. ह्यावर वाचनास मजा येईल. येउ द्या मस्त लिखाण ह्यावर. एक शंका: काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात. हे दोन शब्द आजकालच्या जगातील दृष्ये दाखविण्यात जास्त हातभार लावतात असे वाटते, राजाच्या काळात विसंगत वाटतात.
  • Log in or register to post comments

Submitted by जुना अभिजित on गुरुवार, 12/20/2007 - 14:06

In reply to छान विषय by देवदत्त

Permalink

बरोबर

नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता. घागरः घडे ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 12/27/2007 - 18:04

In reply to बरोबर by जुना अभिजित

Permalink

नागरिक ठीक

नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता. पौरजन व जानपद हे त्याकाळचे प्रचलित शब्द आहेत नाना
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर on Wed, 12/26/2007 - 09:41

In reply to छान विषय by देवदत्त

Permalink

छान विषय

छान विषय निवडलात. धन्यवाद. येउ द्या मस्त लिखाण ह्यावर. लवकरच आणतो. नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात. तुमची शंका योग्य आहे. पण माझ्या मते हे शब्द बरोबरच आहेत. तक्षशिला नगरात राहणारे ते 'नागरिक'. यालाच 'नगरजन' असाही शब्द आहे. सध्या आपण ''स्वतंत्र भारताचे नागरिक" हा शब्दप्रयोग वापरून वापरून चोथा केला आहे. त्यामुळे कदाचित तो शब्द आपल्याला काल-विसंगत वाटत असावा. त्याच प्रमाणे 'गृहस्थ आणि गृहिणी' हे शब्दही जुने आहेत. आपण सध्या फक्त नोकरी न करणार्‍या स्त्रियांना 'गृहिणी' म्हणतो. तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. 'गृहस्थाश्रमी स्त्री' अर्थात 'गृहिणी'. मोठा डॉन उर्फ अभिजीतने सुचवलेला 'प्रजाजन' हा शब्दही बरोबर आहे. तुम्हाला 'नागरिक' आवडला नसेल तर 'नगरजन' किंवा 'प्रजाजन' असं वाचा.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Tue, 12/18/2007 - 23:07

Permalink

उत्तम विषय

आणि छान सुरुवात. पुढील भाग वाचायची उत्सुकता वाढली आहे. (उत्सुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर on Wed, 12/26/2007 - 09:42

In reply to उत्तम विषय by बेसनलाडू

Permalink

आभारी

तुमचा आभारी आहे. पुढचे भाग लवकरच टाकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 12/19/2007 - 00:45

Permalink

चांगली कल्पना

आणि तपशीलवार प्रसंगवर्णनासाठी कल्पनाविलास लागतो, हे आहेच. काही कल्पना कालबाह्य असतील, पण फार बाऊ करून घेऊ नका. थोडी काळाजी घेतली तरी पुरते. काही केले तरी या साहित्यप्रकारात रंजकता हरवता कामा नये. ते ध्यानात ठेवून ऐतिहासिक नेमकेपणा काही प्रमाणात दुय्यम मानावा. (बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.) लगे रहिए.
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर on Wed, 12/26/2007 - 09:47

In reply to चांगली कल्पना by धनंजय

Permalink

हेच

हेच डोक्यात आहे माझ्या. तुम्ही अगदी नेमकं ओळखलंत. पुढचे भाग तयार करता करता आणखीन अभ्यासही चालू आहे ह्या विषयावर. (बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.) हे वाक्य खूप आवडलं. :-) -(चावट) पुष्कर
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 12/19/2007 - 01:35

Permalink

वा वा..

आनंद झालाय एकदम.. खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. लवकर लिहा. तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका... - प्राजु.
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर on Wed, 12/26/2007 - 09:50

In reply to वा वा.. by प्राजु

Permalink

खूप

खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. माझं अहोभाग्य. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. तुम्हाला फार प्रतिक्षा करायला लावणार नाही. तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका... खरंय, पण मी सुद्धा थोडा आळशी आहे बरं का. :-) -(आळशी) पुष्कर
  • Log in or register to post comments

Submitted by जुना अभिजित on Wed, 12/19/2007 - 09:11

Permalink

सुंदर

कथा साधारण माहित असली तरी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लेखकांच्या नजरेतून वाचण्याची मजा काही औरच असते. छान लिहीताय. पुढचे भाग येऊ द्या पटापट. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 12/26/2007 - 09:35

Permalink

लेखन सुंदर झाले आहे.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on गुरुवार, 12/27/2007 - 17:29

Permalink

छान.

पुढील भागांची वाट पाहात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बापु देवकर on Wed, 03/26/2008 - 11:58

Permalink

आतुरर्तेने

पुढील भागांची आतुरर्तेने वाट पहात आहे..... राज....
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर on Fri, 07/02/2010 - 11:26

Permalink

धन्यवाद

सर्व प्रथम मी सर्वांची क्षमा मागतो, कारण दुसरा भाग प्रकाशित करायला मी दीड वर्ष घालवलं. सुचत नव्हतं हे पहिलं कारण, आणि सुचलं तेव्हा वेळ मिळेना हे दुसरं कारण. आता दुसरा भाग टाकला आहे. वाचून बघणे - विष्णुगुप्त - २
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com