आज जाने की ज़िद न करो (एक)

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
12 Oct 2014 - 11:31 am

ही ग़ज़ल म्हणजे एक दुर्लभ योग आहे. खुद्द शायर एका अर्थानं शायरी लिहीतो, आणि गायिका ती गाते तेव्हा तिचं संपूर्ण परिमाण बदलून जातं! फैयाझ हाशमीनी ग़ज़ल लिहिलीय प्रियकराच्या भूमिकेतून आणि फ़रिदा ख़ानुमनं ती गायलीये प्रेयसीच्या आर्जवातून, त्यामुळे अर्थ तोच राहिला तरी, काव्यविषयच बदलून गेलायं.

काव्यविषय इतका जीवघेणा आणि असा काही तरल झालायं की साधेसे शब्द देखिल काव्याला चिरंतन परिमाण देऊन गेलेत. हीच गज़ल आशा भोसलेनी सुद्धा गायलीये, पण तिथे संगीत, आर्जवाला फिकं करतं. आणि एआर रहेमानची ती अत्यंत आवडती ग़ज़ल आहे, पण तो देखिल फ़रिदाचा दिलकष माहौल जमवू शकलेला नाही.
________________________

तर अशी ही ग़ज़ल, आणि काव्यविषय काय तर, प्रेयसीनं प्रियकराला (उत्तररात्री) थांबयाची केलेली विनवणी! ‘आज जानेकी ज़िद ना करो’. आणि तीही कशी तर.... ‘यूंही पेहलूमें बैठे रहो’!

आधीच प्रियकर तिच्या कुशीत आहे आणि तिचा आर्जव काय तर, ‘आज जानेकी ज़िद ना करो’.

फैयाझनी पहिल्या दोन ओळीतच असा काय माहौल केलायं की, प्रत्येक कडव्याला आपण गजलमधे गुंतत जातो. आणि फ़रिदा गायलीये इतकी समरसून की, जणू तिचाच क़लाम आहे. शायरी आणि कलाकार एकरुप झाल्याचा असा अनुभव अत्यंत दुर्लभ. म्हणजे फरिदा शायरीला इतकी समर्पित झालीये की, फैयाझ कुठे संपतो आणि फ़रिदा कुठे सुरु होते कळत नाही. या गजलेत फरिदाच शायरी झालीये. ती प्रियकराला विनवणारी प्रेयसी राहिलेली नाही, फक्त एक आर्जव बनून उरलीये.

आणि ते आर्जव अशा अर्थानं चिरंतन झालंय की, जगात ज्याज्या वेळी प्रेयसी प्रियकराला समर्पित होईल, आणि प्रियकर तिची प्रत्येक अदाकारी रसिकतेनं उपभोगायला तत्पर असेल, त्यावेळी ती म्हणेल;

आज जानेकी ज़िद ना करो, ....यूंही पेहलू में बैठे रहो |
हाए मर जाएंगे, हम तो लूट जाएंगे,
ऐसी बातें किया ना करो,
आज जानेकी ज़िद ना करो ।

आणि त्या आर्जवात तोही इतका रममाण होईल की, तो दिसणार तर कुठेही नाही, फक्त त्याची, तिच्या आर्जवाला तोलून धरणारी, त्याची उपस्थिती जाणवेल.

तर असा हा उत्तररात्रीच्या आर्जवाचा नितांत रमणीय माहौल, फरिदा खानुमच्या दिलकश आवाजात:
_______________________________

आज जानेकी ज़िद ना करो
यूंही पेहलू में बैठे रहो...
हाए मर जाएंगे, हम तो लूट जाएंगे
ऐसी बातें किया ना करो
आज जानेकी ज़िद ना करो ।

तुमही सोचो ज़रा क्यों ना रोके तुम्हें
जान जाती है जब उठके जाते हो तुम
तुमको अपनी कसम जानेजा
बात इतनी मेरी मान लो
आज जानेकी ज़िद ना करो ।

वक्तकी कैदमें जिंदगी है मगर
चंद घडीया यही है जो आजद है
इनको खोकर मेरी जानेजा
उम्रभर ना तरसते रहो
आज जानेकी ज़िद ना करो ।

कितना मासूम-ओ-रंगीन है ये समा
हुस्न और इश्ककी आज मेराज है
कलकी किसको खबर जानेजा
रोकलो आजकी रात को
आज जानेकी ज़िद ना करो ।

(Meiraaj: A series of steps or stairs; a, ladder upon which souls ascend when taken from their bodies)
______________________________________

या भागात गज़लची मजा घ्या, फ़रिदाच्या माहौलमधे रंगून जा. रसग्रहण पुढच्या भागात.

गझलप्रतिभा

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

12 Oct 2014 - 1:06 pm | दिपक.कुवेत

मी पयला.....आता रसग्रह्ण वाचतो सावकाश.

संजय क्षीरसागर's picture

12 Oct 2014 - 2:30 pm | संजय क्षीरसागर

सध्या गज़ल ऐका.

अत्रन्गि पाउस's picture

12 Oct 2014 - 2:40 pm | अत्रन्गि पाउस

किती तब्येतीत गायलीये .....
आवाजातील दाट सायीसारखा मउ मुलायमपण..तरीही कसदार फिरत ..तीही फक्त हवी तिथेच...उगाच गलेबाजी नाही ... ...यमनचे सूर ....
विलक्षण सुखद वेदनादायी अनुभव ...
वा संजय !!! धन्यवाद

अत्रन्गि पाउस's picture

12 Oct 2014 - 2:51 pm | अत्रन्गि पाउस

नेमका रेखीव तबल्याचा ठेका
अतिशय सुरेल हार्मोनियमचे जीवघेणे स्वर ...
अतिशय सुंदर ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Oct 2014 - 5:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय सुंदर गझल ऐकायला दिली. धन्स.

”हाए मर जाएंगे, हम तो लूट जाएंगे
ऐसी बातें किया ना करो
आज जानेकी ज़िद ना करो ”

अहाहा...काय सुंदर गायलंय. खल्लास.

मालक, तितकं रसग्रहणात कसर नका सोडू....
-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2014 - 2:49 pm | अत्रुप्त आत्मा

@ रसग्रहणात कसर नका सोडू....>>> +++१११

मनिष's picture

13 Oct 2014 - 1:17 am | मनिष

जीवघेणी आहे!!! मस्त होते आहे ही सिरीज...लिहित रहा.....नुसती ऐकत रहावी.

असंका's picture

13 Oct 2014 - 2:38 pm | असंका

अविश्वसनीय!!

तीस सप्टेंबरच्या धामधुमीपासून गेले १०/१५ दिवस मी रोज तीन चार वेळा हे गाणं/गझल/ठुमरी ऐकतोय!! मी ऐकतोय म्हणून आजुबाजूचे पण ऐकत होते..सगळ्यांनाच फार आवडत होती!! आणि नेमकं आपणही त्याच गझलीवर लिहिलंयत...

अर्थात, आपली लिंक काय मी ओपन केलेली नाही. कारण हे गायिका वगैरे काही माझ्या माहितीतले नाहीत. माझ्याकडे जे आहे, ते 'मॉन्सून वेडींग' मधले म्ह्णून आहे. तेही चांगलं आहे, पण गायिकेने तबलेवाल्याची चिक्कार परीक्षा घेऊन त्याला कमीत कमी तीन वेळा चित केलेले आहे. आपल्या लिंकमध्ये कसे आहे?

यशोधरा's picture

13 Oct 2014 - 7:30 pm | यशोधरा

वा! वा!

सूड's picture

13 Oct 2014 - 7:35 pm | सूड

लिहीत राहा, पुभाप्र!!