टोमॅटो बास्केट सलाद
मायबोली.कॉम वर गणेशोत्सवा निमित्त आता कशाला शिजायची बात नामक स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत माझ्या खालील कलाकृतीला प्रथम क्रमांकाचे पारीतोषि़ मिळून माबो मास्टर शेफ हा इ-अॅवॉर्ड मिळाला.
साहित्यः
४ मोठे लालबुंद कडक सालीचे टोमॅटो
१ गाजर
१-२ पाती कांद्याचे छोटे कांदे
कोबी थोडा चिरून
बिट चे २-३ पातळ स्लाईस
काकडी (गोल चकट्या व थोडी बारीक चिरुन)
डाळींबाचे दाणे
पुदीना व कोथिंबीर सजावटीसाठी
चाट मसाला
कृती:
टोमॅटो स्वच्छ धुवून, पुसून घेऊन त्याच्या वरच्या बाजूला अर्ध्यापर्यंत दोन खाचा अशा मारा की मध्ये परडीची दांडी तयार होईल.
जिथपर्यंत अर्धवट कापल आहे त्याची एक एक बाजू मध्यावरून सरळ कापुन घ्या.
दोन्ही बाजू कापल्यावर असे दिसेल.
आता दांडीला लागलेला व राहिलेल्या टोमॅटोच्या भागातील गर काढून टाका म्हणजे असे बास्केट तयार होईल.
गाजर स्क्रॅपरने सोला आणि स्क्रॅपरच्या दातांच्या सहाय्याने गाजरावर सरळ रेषा ओढून गाजराचे गोल काप करा.
कांदा पातीच्या छोट्या कांद्यांना सोलून त्याचे मुळ काढून त्याला सुरीने खाचा पाडून त्याचे फुल बनवा व हवी तेवढीच दांडी ठेवा.
बिटाच्या पातळ स्लाईसला गोल दुमडा
कोबीच्या पानाचा छोटासा भाग घेऊन त्याची गुंडाळी करा.
आता बास्केट भरायला घ्या.
एका बास्केट मध्ये सगळ्या सलादची फुले भरून परडी सजवा. प्रत्येक परडीत पुदीना किंवा कोथिंबीरीची पाने सजावटीसाठी एक्-दोन ठिकाणी ठेवा.
आपल्याला हव्या त्या सलादच्या परड्या तुम्ही भरू शकता.
मी दूसरी परडी गाजराच्या फुलांची केली.
तिसरी परडी काकडीचे तुकडे व डाळींबाचे दाणे
चौथी परडी बारीक चिरलेल्या कोबीने भरली.
अशा प्रकारे चार परड्या भरून घेतल्या.
काकडीचे गोल काप करून ते डिशमध्ये मध्ये ४ व भोवती गोलाकार लावले. मधल्या चार कापांवर ४ परड्या ठेवल्या व बाजूच्या कापांच्या मध्यभागी फुलाच्या परागाप्रमाणे डाळींबाचे दाणे लावले. एका ठिकाठी पुदीन्याची छोटी फांदी घेऊन ती दोन काकड्यांच्या कापांमध्ये अडकवून त्यावर हलकी गाजराची फुले ठेवली.
आता चवीसाठी वरून चाट मसाला भुरभुरवला. आणि अशाप्रकारे टोमॅटॉ बास्केट सलाद तयार झाले.
अधिक टिपा :
सलादचे महत्व आपल्या अन्नामध्ये किती आहे हे मला तुम्हा सुज्ञांना सांगायलाच नको.
लहान मुले अशी बास्केट पाहुन खुष होतात.
तुमच्या आवडीप्रमाणे त्यात अजून सलादचे प्रकार घालू शकता.
माझ्या सा.बांनी तर सुंदर दिसते म्हणून तोडलेच नाही तसेच फ्रिजमध्ये ठेवले.

वाचने
10727
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
सुंदर आहे. कल्पकतेला दाद..
In reply to सुंदर आहे. कल्पकतेला दाद.. by गवि
नयनसुख आणि बाय प्रॉडक्टस.
In reply to सुंदर आहे. कल्पकतेला दाद.. by गवि
अरेच्चा! ही सजवलेली सॅलेद्स
सहीच
सुंदर आहे. कल्पकतेला दाद..
अभिनंदन.
जागुताई...
अभिनंदन जागु!!
अभिनंदन...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारलेगवि धन्यवाद. तुमचे म्हणणे
दंडवत शेफ माऊली !
सोप्पा सुटसुटीत परंतु अतीव
मस्त
मस्त पण तेव्हढ्याच निगूतीनं
व्वा व्वा... मस्तच !!
@माबो मास्टर शेफ हा इ-अ
सुन्दर !!!
मस्त,प्रथम क्रमांकास अगदी
वाह
अभिनंदन जागु!!
जागु मस्तच
मस्त
वा वा अभिनंदन
मस्तय की