चांदोबाचा दिवा- (बालकविता)
'
आई ग आई ,
चांदोबाचा दिवा
किती चांगला -
उंच उंच आकाशात
कुणी टांगला ..
आई ग आई ,
चांदण्यांच्या पणत्या
किती चांगल्या -
उंच उंच आकाशात
कुणी लावल्या ..
आई ग आई ,
दे ग शिडी मला
उंच उंच चढून -
चांदोबा-चांदण्या
आणीन मी काढून ..
आई ग आई ,
चांदोबा-चांदण्या
ठेऊन अंगणात -
रात्री छान खेळेन
त्यांच्या प्रकाशात ..
.
छान,सुंदर,निरागस बालकविता
+१
+१ मस्स्स्स्त!
वा! काय छान कविता...
प्रतिसाद-
कविता आवडली.
या बालकविता वयाने मोठे झालेल्या बालकांसाठी आहेत !
प्रतिसाद-
तुम्ही समजून घेतलं याबद्दल प्रतिआभार
कविता आवडली
twinkle twinkle little star