✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग १

ह
हुकुमीएक्का यांनी
Tue, 06/03/2014 - 03:44  ·  लेख
लेख
सिंहगड व्हॅलीमध्ये मी खुप वेळा गेलोय. पण ते फक्त सिंहगडवर जाण्यासाठी. परंतू व्हॅलीमध्ये पक्षी पहाण्यासाठी म्हणून गेलो ते माझ्या एका मित्रासोबत. तेव्हा ठरवले की पुन्हा वेळ काढून नक्की जायचे. ’चॊकटराजे’ ना विचारले, ते तयार झाले. शक्यतो फक्त फोटोग्राफीसाठी एवढा खटाटोप कशाला असे बरेच जणांचे म्हणणे असते. परंतू राजेसाहेब याला अपवाद आहेत. शेवटी ०९ मे ला जायचे ठरले. ०९ मे ला सकाळी ५ वाजता चिंचवड वरून प्रस्थान केले. सकाळी लवकर बाहेर पडण्याचा फायदा हा की रस्त्यावर अजिबात वर्दळ नसते आणि आपण नियोजित स्थळी नियोजित वेळी पोचू शकतो. सकाळी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो मिळतात. तसेच नॅचरल लाईट असल्याने कॅमेराशी जास्त खेळावे लागत नाही. असो, वाटेत खडकवासला येथे थांबून ’महाराजाचा’ फोटो घेतला. तो खाली पहावा. प्रत्येक फोटोखालीच EXIF डेटा लिहला आहे. जेणेकरून फोटोची टेकनिकल माहिती मिळेल. ’महाराजाचा’ फोटो Maharaja EXIF Data - Camera Mode - Manual Shutter Speed - 1/1000 sec. Aperture - F/6.3 ISO - 100 तिथेच एका Indian Pond Heron किंवा भुऱ्या बगळ्या ने छान दर्शन दिले . . . Indian Pond Heron Camera Mode - Manual Shutter Speed - 1/40 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 तिथेच शेजारी उगवलेल्या कमळाचा फोटो. वास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हे कमळ दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे.. Lotus Camera Mode - Manual Shutter Speed - 1/80 sec. Aperture - F/5.6 ISO - 100 त्यांनतर सिंहगड व्हॅलीकडे प्रस्थान केले. शक्यतो ७ पुर्वी सिंहगड व्हॅलीमध्ये जावे जेणेकरून नॅचरल लाईट जास्त मिळेल. सिंहगड व्हॅलीमध्ये ६.१८ वाजता पोचलो. चिंचवडवरून सिंहगड व्हॅलीमध्ये पोहोचायला साधारण १ तास २० मिनिटे लागतात. सिंहगड पायथ्याला असलेल्या एका हॉटेल मध्ये चहा व पोहे खुप छान मिळतात...तेथे पोहे व चहा घेऊन पुढे वाटचाल सुरू केली. पायथ्यापासून सिंहगडची वाट चालू लागल्यावर एक मंदीर लागते तिथून डाव्या हाताला गेल्यावर सिंहगड व्हॅली सुरू होते... आणि सरळ वर गेल्यावर सिंहगड ट्रेक सुरु होतो. व्हॅलीमध्ये उतरल्यावर लगेचच एक Green Bee-eater किंवा रानपोपट दिसला त्याचा हा फोटो. Green Bee Eater Camera Mode - Manual Shutter Speed - 1/250 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 थोडे पुढे गेल्यावर "मल्ल्या कंपनी" चा सिंबॉल White-throated Kingfisher किंवा खंड्या दिसला. त्याची मस्त पोटपुजा चालू होती. त्याचा फोटो. KingFisher Camera Mode - Manual Shutter Speed - 1/50 sec. Aperture - F/6.5 ISO - 160 तिथून थोडे पुढे गेल्यावर दुर झाडावर थोडी हालचाल झाली. तिथे होती Black-shouldered Kite किंवा कापशी घार. तिचा फोटो Kite Camera Mode - Manual Shutter Speed - 1/405 sec. Aperture - F/6.5 ISO - 200 तेथे एका विहीरीजवळ बसलेल्या Spotted Dove किंवा ठिपकेदार होला चा फोटो Spotted Dove Camera Mode - Manual Shutter Speed - 1/500 sec. Aperture - F/5.6 ISO - 400 झाडाच्या शेंड्यावर बसलेल्या Common Sparrow किंवा चिमणी चा फोटो. Common Sparrow Camera Mode - Manual Shutter Speed - 1/50 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 ज्याची शेपटी बसल्यावर 'V' आकाराची दिसते त्या Black Drongo किंवा कोतवाल चा फोटो. Black Drongo Camera Mode - Manual Shutter Speed - 1/100 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 निघता निघता काढलेला एका Brahminy Myna किंवा ब्राह्मणी मैना चा फोटो. Brahminy Myna Camera Mode - Manual Shutter Speed - 1/160 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 त्या दिवशी बरेच फोटो मिळाले. व्हॅलीमधून साधारण १०.०० वाजता पुन्हा एकदा हॉटेलमध्ये चहा घेऊन पुन्हा नक्की यायचे असे ठरवून सिंहगड व्हॅलीमधून चिंचवडकडे प्रयाण केले. ...समाप्त...
  • सिंहगड व्हॅलीमधील फोटो - भाग २

Book traversal links for सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग १

  • सिंहगड व्हॅलीमधील फोटो - भाग २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
119419 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

अफलातून आहेत फोटो .४००एमेम

कंजूस
Tue, 06/03/2014 - 06:45 नवीन
अफलातून आहेत फोटो .४००एमेम आहे का लेन्स ?चांगले आहे .किंगफिशर छानच .पक्षांचा डोळा फार महत्त्वाचा तो होल्याचा छान आला आहे .थोडीशी लकब पकडण्याचा ,पिसे साफ करताना ,वाकडी मान करतांना ,पंख उघडून आळस देताना शटर दाबून फोटो मिळवा ते या तुमच्या लेन्सने शक्य आहे . पाचगणी ,सज्जनगड ,बनेश्वर इथे काही खात्रीने पक्षी मिळतात आणि बुजरे नाहीत .सिन्नरपासून वीस किमी वरचे नांदूर माध्यमेश्वरही भेट देण्यासारखे आहे .थंडीत स्थलांतरीत बदके येतात .एरवीपण छान आहे .कामशेतहून वीस किमी जांभिवली /कोंडेश्वर/ढाकचे रान आहे .पक्षी शोधावे लागतात .लोणावळा अॅंबिवैली पेठ शहापूर रस्त्याला भरपूर पक्षी आहेत .फ्लायकैचरसचे रान आहे फ्लेमिंगौ आणि पाणपक्षांचे फोटे पाहून आता कंटाळा आला .रानपक्षी छान .आवडले .
  • Log in or register to post comments

लेन्स

हुकुमीएक्का
Tue, 06/03/2014 - 21:58 नवीन
लेन्स 24 - 1200 mm एम-एम आहे. मी पक्ष्यांचे वेगवेगळ्या लकबींमधले फोटो काढले आहे. पुढील धाग्यांमध्ये पहावयास मिळतील. @कंजूस आपण दिलेली ठिकाणे माझ्या फोटोग्राफी places च्या List मध्ये ADD केली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

चांगले टेलिफोटो लेन्स

कंजूस
Wed, 06/04/2014 - 06:52 नवीन
चांगले टेलिफोटो लेन्स (४००एमेम अधीक १.३X )नसल्यामुळे बऱ्याच जणांना केवळ दुर्बिणीतून पक्षी पाहण्यावर समाधान मानावं लागतं . पुढील फोटोंची वाट पाहतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

खरयं

हुकुमीएक्का
Wed, 06/04/2014 - 23:53 नवीन
खरय बुवा. शेवटी एम एम किती आहे यावर तर फोटोचं नशीब असता ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मी साक्षीदार

चौकटराजा
Tue, 06/03/2014 - 07:25 नवीन
या सगळ्या खटाटोपाला मी साक्षीदार होतो. लहान पक्षी फारच चंचल असतात. ते कोठून कोठे भुर्रकन उडून जातील नेम नाही.बाकी ती पहाट सकाळ फारच रम्य होती. त्या परिसरात रात्री थोडा पाउस पडून गेला होता. @ कंजूसश्री, आपण दिलेल्या ठिकाणांची नोंद घेतलीय. त्या बद्द्द्ल धन्स !
  • Log in or register to post comments

फोटो आवडले.

आतिवास
Tue, 06/03/2014 - 07:36 नवीन
फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

भिमाशंकराच्या जवळच्या झाडीतले

कंजूस
Tue, 06/03/2014 - 08:43 नवीन
भिमाशंकराच्या जवळच्या झाडीतले पक्षी सापडत नाहीत फक्त ऐकू येतात .खाली गणपती घाटात जी झाडी आहे त्यांतमात्र ते सहज दिसतात .फोटो काढा अन आम्हाला दाखवा .बाकी तुमचे NDA ,तानसा वैतरणाच्या तुळशी तलावाकडच्या संरक्षित भागात आणि ठाण्यातल्या येऊरच्या एरफॉर्सच्या रानात जो जाईल तो खरा नशिबवान .श्रीवर्धनचे कुसुमावती ,गणपतीपुळेजवळ मालगुंड आपली वाट पाहत आहे .
  • Log in or register to post comments

भीमाशंकरच्या जंगलात स्वर्गीय

प्रचेतस
Tue, 06/03/2014 - 09:03 नवीन
भीमाशंकरच्या जंगलात स्वर्गीय नर्तक अथवा नंदननाचण खूपदा पाहिलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

बरोबर .हा जो पक्षी आहे तो खरं

कंजूस
Wed, 06/04/2014 - 15:51 नवीन
बरोबर .हा जो पक्षी आहे तो खरं म्हणजे फ्लायकैचर प्रकारातला आहे .बारीक उडणारी चिलटं पकडतो .(तसे मोठाले नाकतोडे पण अख्खे गिळतो )उंबरं आणि अळू (चिकूसारखे असतात ते) खाली पडून सडायला लागली की त्यावरची येणारी चिलटं पकडायला हवेत कसरती करतो पांढरी लांबलचक शेपूट फिरवत .तेव्हा ती जागा सोडायला तो तयार नसतो .पण बाकीचे हरेवा ,कांचन सारखे पक्षी झाडांचे शेंडे सोडत नाहीत आणि दिसत नाहीत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छान फोटो... आवडले.

इन्दुसुता
Tue, 06/03/2014 - 08:58 नवीन
छान फोटो... आवडले.
  • Log in or register to post comments

फोटो

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/03/2014 - 09:14 नवीन
फोटो मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त निघालेत! *i-m_so_happy* अवांतरः- @वास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हे कमळ दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे.. =))
  • Log in or register to post comments

अगदी...

ब़जरबट्टू
Wed, 06/04/2014 - 10:07 नवीन
@वास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हे कमळ दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे.. असेच सपस्टीकरन तुम्ही महाराजाचा फटू काढतांना... वास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हा सुर्य दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे.. दिलेला नसल्यामुळे निषेढ...... :)) बाकी फोटो जबरदस्त .. अजुन येऊ द्या.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

. . .

हुकुमीएक्का
गुरुवार, 06/05/2014 - 00:16 नवीन
*biggrin* चुक-भुल द्यावी-घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

सुंदर फोटो !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/03/2014 - 10:34 नवीन
सुंदर फोटो !
  • Log in or register to post comments

असं का बरं?

एस
Tue, 06/03/2014 - 11:13 नवीन
*unknw* मला शेवटचे दोनच फोटो दिसत आहेत.
  • Log in or register to post comments

मलाही

त्रिवेणी
Wed, 06/04/2014 - 17:33 नवीन
मलाही *unknw*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मस्त फोटो, कोणती लेन्स?

शैलेन्द्र
Tue, 06/03/2014 - 11:13 नवीन
मस्त फोटो, कोणती लेन्स?
  • Log in or register to post comments

कॅनन

हुकुमीएक्का
Tue, 06/03/2014 - 22:00 नवीन
लेन्स 24 - 1200 mm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

24 - 1200 mm

एस
Wed, 06/04/2014 - 11:12 नवीन
ही कोणती लेन्स आहे? लेन्स चा दुवा देऊ शकाल का? कॅमेरा कोणता होता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

माझ्या मते कॅनन PowerShot

प्रचेतस
Wed, 06/04/2014 - 13:34 नवीन
माझ्या मते कॅनन PowerShot SX50 HS असावा. पॉइन्ट अ‍ॅण्ड शूट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

PowerShot SX50 HS

एस
Wed, 06/04/2014 - 13:53 नवीन
मलाही तीच शंका आली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

होय तोच आहे

हुकुमीएक्का
Wed, 06/04/2014 - 23:57 नवीन
वल्ली साहेब तोच कॅमेरा आहे. कॅनन PowerShot SX50 HS. Point & Shoot परंतु काही features SLR चे दिले आहेत यांत समाधान ! तसही SLR ची तोड Point & Shoot कॅमेरांना येत नाही. पण Picture Quality च्या बाबतीत. थोडं फार जवळपास जाता येतं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मस्त फोटो..........

मनराव
Tue, 06/03/2014 - 12:48 नवीन
मस्त फोटो..........
  • Log in or register to post comments

आवडली पक्षीचित्र.

प्रभाकर पेठकर
Tue, 06/03/2014 - 13:21 नवीन
अतिशय सुंदर काढली आहेत छायाचित्र. पक्षांची छायाचित्र काढताना तिक्ष्ण नजर आणि काटेकोर फोकसिंग ह्यांचा समन्वय पाहिजे. तो प्रत्येक छायाचित्रात जाणवतो आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

हुकुमीएक्का
गुरुवार, 06/05/2014 - 00:07 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

जबरदस्त फोटो ! मस्तच ! वा वा.

वेल्लाभट
Tue, 06/03/2014 - 13:46 नवीन
जबरदस्त फोटो ! मस्तच ! वा वा.
  • Log in or register to post comments

खूप सुंदर छायाचित्रे. लै

बॅटमॅन
Tue, 06/03/2014 - 13:48 नवीन
खूप सुंदर छायाचित्रे. लै आवडली. अजून येऊद्यात.
  • Log in or register to post comments

खूप देखणे आलेत फोटो!

प्यारे१
Tue, 06/03/2014 - 14:06 नवीन
खूप देखणे आलेत फोटो! पु छाचि/प्रचि शु ;)
  • Log in or register to post comments

कमळाचा तर अफलातून!

नरेंद्र गोळे
Tue, 06/03/2014 - 18:22 नवीन
वा! सुरेख आहेत फोटो. कमळाचा तर अफलातून!
  • Log in or register to post comments

मस्त फोटो आले आहेत सगळे..

शिद
Tue, 06/03/2014 - 18:44 नवीन
मस्त फोटो आले आहेत सगळे...खासकरुन कापशी घारीचा. ते लालबुंद डोळे कुठलं तरी सावज हेरताहेत असं वाटतंय.
  • Log in or register to post comments

लै

केदार-मिसळपाव
Tue, 06/03/2014 - 19:04 नवीन
भारी फोटु
  • Log in or register to post comments

सुप्पर

झकासराव
Tue, 06/03/2014 - 19:13 नवीन
सुप्पर :)
  • Log in or register to post comments

मस्त फोटो..

मुक्त विहारि
Tue, 06/03/2014 - 19:35 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

देखणे

विकास
Tue, 06/03/2014 - 20:16 नवीन
मस्तच काढले आहेत फोटो! प्रतिमेवरून प्रत्यक्षाच्या देखणेपणाची कल्पना येत आहे. इंग्रजी शब्दांबरोबरच या पक्षांची मराठी नावे दिली त्याबद्दल धन्यवाद! अजून येउंदेत! :)
  • Log in or register to post comments

फक्त दोनच फोटो दिसतात

मराठी_माणूस
Tue, 06/03/2014 - 20:43 नवीन
फक्त दोनच फोटो दिसतात
  • Log in or register to post comments

एक होलो आणि चिमण्येचो तेवडोच

सूड
Tue, 06/03/2014 - 22:26 नवीन
एक होलो आणि चिमण्येचो तेवडोच फोटो दिसतांय माका, बाकीचे खंय असत?
  • Log in or register to post comments

माझेही दोन पैसे.

प्रचेतस
Wed, 06/04/2014 - 08:49 नवीन
माझेही दोन पैसे. देवगिरी किल्ल्यावर टिपलेला बहिरी ससाणा (Common Kestrel) Image removed. अजिंठ्यात टिपलेला लालबुड्या बुलबुल (Red Vented Bulbul) Image removed. भर समुद्रात टिपलेला सीगल Image removed.
  • Log in or register to post comments

वल्लींचे आठ पैसे .हे पण जमतंय

कंजूस
Wed, 06/04/2014 - 15:33 नवीन
वल्लींचे आठ पैसे .हे पण जमतंय तुम्हाला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मधला

चौकटराजा
Wed, 06/04/2014 - 17:19 नवीन
मधला लय मस्ताड आलाया ! कोन्ची लेन्स ? ( आरं, फटूग्राफरला काई म्हत्व द्येताल की नाय ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अन् तिकाटणं धरून बसतुया

कंजूस
Wed, 06/04/2014 - 19:49 नवीन
अन् तिकाटणं धरून बसतुया त्याला बी महत्त्व द्या की .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

धन्यवाद.

प्रचेतस
Wed, 06/04/2014 - 22:31 नवीन
धन्यवाद. हे फोटू तिकाटणं न वापरताच काढलेले आहेत. साधे रैंडम क्लिक्स आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हा पण छंद आहे म्हणायचं

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/04/2014 - 17:33 नवीन
हा पण छंद आहे म्हणायचं तुम्हाला ! मस्त फोटो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तेह्या कड

चौकटराजा
Wed, 06/04/2014 - 17:36 नवीन
तेह्या कड म्होटा क्यामरा आन तिवई हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

इतक्ये झ्याक फोटू काडायला

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/04/2014 - 18:27 नवीन
इतक्ये झ्याक फोटू काडायला क्यामेर्‍यामागचा मानुसबी तसाच कलाकार आसावा लागतुया नव्हं? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कसचं कसचं.

प्रचेतस
Wed, 06/04/2014 - 22:32 नवीन
कसचं कसचं. ;) तसा प्राणी पक्ष्यांचे फोटू काढायचा अजिबात छंद नाही. दगडांचे फोटो काढायला मात्र आवडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मस्तच!

विकास
Wed, 06/04/2014 - 21:16 नवीन
वल्ली, तुम्ही काढलेले फोटो पण मस्तच आहेत! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्यवाद विकासदा.

प्रचेतस
Wed, 06/04/2014 - 22:34 नवीन
धन्यवाद विकासदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

वल्लीनी काढलेल्यातला तिसरा

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/04/2014 - 22:43 नवीन
वल्लीनी काढलेल्यातला तिसरा उडत्या पक्ष्याचा फोटो घारापुरीहून परतताना लाँचितून घेतलेला फोटू हाय! त्या दिवशी ती लाँचिच्या मागे चालेल्ली उडत्या पक्ष्यांची साखळी आणि त्यांचं मासे टिपणं, हे पहाण्यासाठी आणि व्हिडो शुट'ण्यासाठी परत जायला हवं..लै मंजे लै भारी परकार हाय त्यो! माझा घेतलेला व्हिडो कुटं गायबला कार्डात काय कळ्ळच नाय! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वा झकास!

हुकुमीएक्का
गुरुवार, 06/05/2014 - 00:05 नवीन
बुलबुल आणि सीगल चा फोटो आवडला. सीगल चा फोटो तर अप्रतिम आलाय. Common Kestrel चा आवडला पण त्यात त्याचा डोळा दिसला असता तर अजुन भारी वाटला असता. अर्थात बहिरी ससाण्याचा एव्हडा सुरेख फोटो मिळणं मुश्कील असता. पण छान आलाय. बहुतेक क्लिक करताना त्याने मान फिरवली असावी. फोटो एकदम झकास आलेत. सीगल च्या फोटोचा EXIF कळेल का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सीगलच्या फोटोचा EXIF

प्रचेतस
गुरुवार, 06/05/2014 - 09:11 नवीन
सीगलच्या फोटोचा EXIF Canon EOS 550D Lens Canon EF-S55-250mm f/4-5.6 IS II Focal Length 65 mm Exposure 1/320 F Number f/7.1 ISO 100 Camera make Canon
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा