मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उकरपेंडी

मधुरा देशपांडे · · पाककृती
नाश्त्याला किंवा दुपारच्या वेळी खायला केला जाणारा हा विदर्भातील एक खाद्य प्रकार. साहित्य: २ वाट्या कणिक ४-५ कढीपत्त्याची पाने २-३ हिरव्या मिरच्या किंवा १ चमचा तिखट १-२ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून शेंगदाणे मीठ चवीनुसार चिमुटभर साखर २ मोठे चमचे तेल मोहरी, हिंग https://lh5.googleusercontent.com/-gaTXBXc0ofU/U16hLlXMmRI/AAAAAAAAC5A/j3TJQhN5Zac/w866-h577-no/DSC_0243.JPG कृती: सर्वप्रथम कणिक नुसती किंचित तेलावर भाजून घ्या. त्यानंतर तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि कांदा घालून परता. कांदा थोडा लालसर परतला की कणिक घालून पुन्हा हलवत राहा. साधारण ५-७ मिनिटात कणिक व्यवस्थित भाजली गेली की मीठ, साखर घालून अंदाजाने पाणी घाला. यात थोडे दही सुद्धा घालू शकता. किंवा पाण्याऐवजी ताक सुद्धा चालते. थोडी आंबट चव मस्त लागते. झाकण ठेवून एक वाफ काढा. वरून कोथिंबीरीने सजवा. तयार आहे गरमागरम उकरपेंडी. https://lh4.googleusercontent.com/-rUJet2RSutU/U16hJXg4XlI/AAAAAAAAC40/VODnVNix41w/w866-h577-no/DSC_0246.JPG याचाच उकड्पेंडी असाही अपभ्रंश आहे.

वाचन 30031 प्रतिक्रिया 0