माहिती हवी आहे

राघव's picture
राघव in काथ्याकूट
13 Apr 2014 - 8:58 am
गाभा: 

अर्थमंथन आणि अंतर्नाद या दोन मासिकांची वार्षिक वर्गणी भरून नियमित अंक घ्यायचे आहेत. त्यासाठी संपर्क पत्ते व दूरध्वनी क्रमांक हवे आहेत. कुणास माहित असल्यास सांगावेत.

तसा अंतर्नाद साठीचा संपर्क पत्ता जालावर एके ठिकाणी मिळाला, पण तो सध्याचा पत्ता आहे किंवा नाही हे माहित नाही. -

अंतर्नाद
सी-२, गार्डन इस्टेट जवळ
वायरलेस कॉलनी जवळ
औंध, पुणे.. ४११००७

राघव

प्रतिक्रिया

दोन्हींचे एकेक ह्या महिन्याचे अंक कोणत्याही स्टॉलवरुन घेतले तर त्यांचे लेटेस्ट पत्ते मिळून जातील ना?

माहितगार's picture

13 Apr 2014 - 11:40 am | माहितगार

वाचकांबद्दल माहित नाही लेखकांना गरज असू शकते. एखादा लेख लिहिल्या नंतर एखाद्या विशीष्ट माध्यमाच्या श्रोतृवर्गाकडे जावा म्हणून त्या विशीष्ट मासिक / वृत्तपत्राच्या माध्यमाचा अधिकृत पत्ता उपयूक्त ठरू शकतो. बरेच मराठी लेखक परराज्यातून आणि परदेशातून लिहित असतात आणि त्यांना एकतर अंक विकत मिळण्याची शक्यता दुर्मीळ असते. अगदी चांगल्या दर्जेदार नियतकालीकांचे अंक महाराष्ट्रातील स्टॉल्सवरही मिळतील का याची शंका असते.

बहुतांश नियतकालीक खासकरून साप्ताहीके मासिकांचे पत्ते आजच्या काळात आंतरजालावर एका ठिकाणी उपलब्ध आहेत का आणि का असू नयेत ?

यशोधरा's picture

13 Apr 2014 - 2:46 pm | यशोधरा

असावीत की. मी कुठे नको म्हटलंय?
आपणही विकीवर लिहीता ना? तेह्वा जमल्यास आपणही उपलबध करुन द्यावी, कदाचित अशी एखादी सूची वगैरे टाकू शकाल तिथे.

माहितगार's picture

13 Apr 2014 - 4:03 pm | माहितगार

हम्म.., मराठी आंतरजालावर या माहितीची मोठी कमतरता आहे, मला स्वतःला ही अडचण जाणवलेली त्यातूनच शेवटी आंतरजालावरील अनुपस्थित मराठी ही धागा मालिकाच लिहिण्यास घेतली त्याच्या अनुषंगिक विषय दिसल्याने प्रतिसाद दिला. विकिवर वस्तुतः अधिकृत संस्थळ उपलब्ध असल्यास त्याचाच तेवढा पत्ता अंतर्भूत करता येतो. सविस्तर पोस्टल पत्ते दुरध्वनी इत्यादी संपर्क विकिं लेखांच्या कक्षेत येत नाही. कुठे प्रताधिकार मुक्तते विषयी चर्चा असल्यास तेवढ्या पुरते उल्लेख चर्चा अथवा संबंधीत प्रकल्प पानावर येऊ शकतात. म्हणूनच विकि मुक्त आहे पण त्याच्या परिघास मर्यादा आहेत असे आम्ही म्हणत असतो. असो.

चौकटराजा's picture

14 Apr 2014 - 9:00 am | चौकटराजा

माझ्या माहितीनुसार परिघ हा शब्दच " मर्यादा" असा अर्थ दर्शवितो. फारतर हा शब्दप्रयोग" व्याप्तीस मर्यादा" असा असला पाहिजे.. काय..?

माहितगार's picture

14 Apr 2014 - 12:51 pm | माहितगार

ओके, अर्थछटा आणि संवादाची परिमाणकारकता या अंगाने अभ्यासून विचार करून बघेन. अजून काही चपखल शब्द प्रयोग / उदाहरणे मिळाल्यास स्वागतच असेल.

लक्षवेधी प्रतिसादाकरीता धन्यवाद

आतिवास's picture

13 Apr 2014 - 12:00 pm | आतिवास

'अंतर्नाद'चा पत्ता बहुतेक बरोबर आहे, पण मला खात्री नाही.
अधिक माहितीसाठी संस्थापक आणि संपादक यांना संपर्क साधावा: bhanukale@gmail.com
'मटा'मध्ये ६ एप्रिल रोजी आलेला हा लेख, पण तिथं संपर्क साधण्यासाठी काही माहिती नाही.

आयुर्हित's picture

14 Apr 2014 - 9:01 pm | आयुर्हित

जयवंत दळवी म्हणत, 'शाळेत शिकत असताना भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे तीन काळ मी शिकलो होतो, पण साहित्य क्षेत्रात आल्यानंतर चौथा काळ शिकलो, तो म्हणजे पडता काळ.' निराशावादी सूर आळवण्याची परंपरा साहित्य क्षेत्राला नवी नाही. मात्र भानू काळे हे निराशेचे सूर आळवणारे संपादक नाहीत. ते आशेचे किरण शोधतात. महाराष्ट्रातल्या अतिशय दुर्गम भागातला लेखकही त्यांच्या संपर्कात असतो आणि परदेशातल्या नव्याने लिहू लागणाऱ्या लेखकांशीही त्यांची मैत्री असते. अशा लेखकांना लिहायला प्रवृत्त करून, त्यांचा स्वाभिमान न दुखावता त्यांना खुबीने पुनर्लेखन करायला भाग पडून, त्यांच्या लेखनावर संपादकीय संस्कार करून ते त्या लेखकाचं उत्तम साहित्य 'अंतर्नाद'मध्ये प्रसिध्द करीत असतात

पाषाणभेद's picture

13 Apr 2014 - 3:28 pm | पाषाणभेद

'माहिती हवी आहे' हे आगा पिछा नसलेले वाक्य लिहीण्यापेक्षा 'अमुक अमुकबद्दल माहिती हवी आहे' असे असले धागे काढणारे का लिहीत नाहीत.

राघव's picture

14 Apr 2014 - 11:00 am | राघव

प्रतिसादांबद्दल आभार.

@यशो:
मी ही दोन्ही मासिकं ३-४ ठिकाणी शोधलीत पण मिळाली नाहीत. म्हणून इथं धागा टाकला.

@माहितगार:
सहमत आहे. अशी माहिती जालावर सहजी सापडत नाहीये.

@आतिवासः
माहिती व दुव्याबद्दल धन्यवाद.

@पाषाणभेदः
नोंद घेतलेली आहे. आजवर कधी माहितीसाठी धागा टाकला नाही. पुढल्यावेळी कधी गरज पडली तर तुमची सूचना नक्की लक्षात ठेवेन.

राघव