हार्टब्लीड (Heartbleed) बग; आंतरजालावरील संस्थळावरील पासवर्ड बदलणे; काही शंका
आंतरजालाची २५ वर्षे झाली याचा आनंद साजरा होतो न होतो तोच मागोमाग फायरवॉल्स आणि अँटीव्हायरस आणि इतरही सुरक्षा वापरून निर्धास्त होऊ पहात असलेल्या सर्वांनाच हार्टब्लीड (Heartbleed) बग ही त्रुटी लक्षात येऊन मोठाच धक्का दिला आहे. जवळपास दोन तृतीयांश (२/३) वेबसाईट्सवर त्यात अगदी विश्वासार्ह समजल्या जाणार्या असंख्य वेबसाईट्स सहित अनेक ठिकाणी नोंदवलेले सदस्य नाव आणि पासवर्ड इतर व्यक्तीगत माहितीची गोपनीयता राखली न गेल्याची हादरवून टाकणारी शक्यता समोर आली आहे की ज्याबाबत सामान्य आंतरजाल उपयोगकर्ता काही म्हणजे काही करू शकत नाही. म्हणजे पाणि शीरलेल्या नौकेत आपण सगळ्यांसोबत होतो एवढेच समाधान.
मी या बातम्या गेल्या दोन दिवसात वाचल्या पण स्वतः या क्षेत्रातील तज्ञ नाही आणि मराठीत गूगलवर शोधून अद्याप काही माहिती दिसत नाही तेव्हा जाणकारांना मराठी बंधु भगिनींकरता मराठीतन अधिक माहिती या धाग्यावर दिल्यास सर्वांनाच बरे पडेल.
बातम्या वाचून मला पडलेल्या काही शंका अशा
१) तंत्रज्ञानाच्या एवढ्या प्रगत काळात अस काही होऊ कस शकत ? सॉफ्टवेअर प्रोग्रामींगच तंत्र विकसीत होण्यात अजूनही कच्चे दुवे कशामुळे आहेत ? सॉफ्टवेअर प्रॉग्रामींग योग्य पद्धतीने सुरक्षीत आहे हे तपासण्याचे मार्ग कोणते ?
२) सर्व सामान्यव्यक्ती अँटीव्हायरस फायरवॉल्सवर खर्च करतात या अँटीव्हायरस फायरवॉल्स विकणार्या कंपन्यांची कायदेशीर जबाबदारी लागू होते का नाही माहीत नाही पण नैतीक जबाबदारी म्हणून त्यांनी प्रयत्न करावयास नकोत का ?
३) या इश्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय संस्थांची (शैक्षणिक, शासकीय आणि खाजगी) सद्य स्थिती क्षमता काय आहेत सुधारणांना वाव आहे का ? असेल तर नेमका कोणता ?
३) मराठी संस्थळांची काय स्थिती आहे, खासकरून मायबोली मिपा मनोगत इत्यादी
४) सामान्य उपयोगकर्त्यांनी त्यांचे पासवर्ड केव्हा बदलावेत ?
* हार्टब्लीड बग इंग्रजी विकिपीडियावर
* न्युयॉर्क टाइम्स मधील लेख टिका Users’ Stark Reminder: As Web Grows, It Grows Less Secure
* अधिक माहिती करता गूगल न्यूज वर Heartbleed bug हे शब्द शोधावेत.
चर्चा सहभाग आनि विषयांतर टाळण्यासाठी धन्यवाद
प्रतिक्रिया
संबंधित बातमी
हा अॅटॅक फक्त सर्व्हर एन्ड
१) तंत्रज्ञानाच्या एवढ्या
जवळपास दोन तृतीयांश (२/३)
आज लोकसत्ता मधे आलेली बातमी
हार्टब्लीड चा फटका अ
श्री.: भाते, मी नाशिककर,
McAfee ने यासाठी एक फ्री टूल