मँगो पार्फे
करायला सोपी आणि अतिशय स्वादिष्ट अशी ही आंब्याची डेलीकसी - मँगो पार्फे (Parfait).
एकदा साहित्य जमवले, आणि फळे कापून तयार असली की काही मिनिटातच तयार होते, आणि तितकीच लवकर फस्त होते! :-)
खास करून लहान मुलांची अतिशय आवडती डीश. आंब्याच्या मौसमाचे आणि उन्हाळ्याचे स्वागत करण्यासाठी अतिशय चविष्ट, थंडगार पाककृती. ह्या प्रमाणात ३ ग्लास मँगो पार्फे तयार होईल.
साहित्य:
कृती:

लुत्फ घ्या थंडगार मँगो पार्फेचा! :D
- ३ मध्यम आकारचे हापूस आंबे, बारिक चिरलेले.
- ३ ते ४ इतर फळे, बारीक चिरलेली. मी १ सफरचंद, २ किवी आणि वाटीभर द्राक्षे घेतली होती.
- स्ट्रॉबेरी किंवा इतर आवडत्या स्वादाचे योगर्ट.
- स्ट्रॉबेरी क्रश ६ मोठे चमचे. इतर कुठलाही आवडता क्रश घेऊ शकता.
- ३ मोठे चमचे बारीक तुकडे केलेला सुका मेवा - मी आक्रोड, काजू आणि पिस्ते घेतले होते.
- थोडेसे मध किंवा बटरस्कॉच सिरप, सजावटीसाठी.
- ग्लासात सगळ्यात खाली आंब्याच्या बारीक फोडि टाकून घ्याव्यात. साधारण १ आंबा एका ग्लासासाठी ह्या प्रमाणात.
- आंब्याच्या फोडींवर २-३ चमचे स्ट्रॉबेरी योगर्ट टाकावे.
- ह्या योगर्टवर २-३ चमचे स्ट्रॉबेरी क्रश टाकून घ्यावे.
- आता ह्यावर बारीक कापलेल्या फळांच्या फोडी टाकाव्यात.
- आता वरून १ चमचा बारीक तुकडे केलेला सुका मेवा आणि ३-४ थेंब मधाचे किंवा बटरस्कॉच सिरपचे टाकावे.
- हे भरलेले ग्लास आता फ्रीजरमधे १५-२० मिनिटे ठेवावेत, ही डीश थंडगार किंवा थोडी बर्फाळच छान लागते - त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे फ्रीजरमधे जास्त वेळ ठेवता येईल.
- बस्स!! फ्रीज मधून बाहेर काढा आणि उन्हाळ्यातल्या एखाद्या दुपारी ह्या थंडगार, स्वादिष्ट 'मँगो पार्फे' वर ताव मारा. लहान मुले असतील तर फ्रीजमधून बाहेर काढल्यावर लगेचच फस्त होईल ह्याची गॅरंटी!


वाचने
15172
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
वाह !! मस्त कलफुल्ल दिसतय की.
खल्लास
In reply to खल्लास by दिपक.कुवेत
ही खरच मस्त आयडीया आहे, करून
ह्याला पार्फे म्हणतात होय.
In reply to ह्याला पार्फे म्हणतात होय. by सूड
मी तिथे नाही खाल्ले कधी. मला
वाह!
In reply to वाह! by पैसा
कमी आंबे टाका आणि प्रभो
In reply to कमी आंबे टाका आणि प्रभो by मनिष
स्वस्त पर्याय - पपई
In reply to स्वस्त पर्याय - पपई by प्रभाकर पेठकर
पिकलेल्या पपईला तर दुसरी
In reply to स्वस्त पर्याय - पपई by प्रभाकर पेठकर
नाही हो! माझ्या ४ वर्षाच्या
In reply to नाही हो! माझ्या ४ वर्षाच्या by मनिष
अगदी माझ्या मुलाला हि हा फरक
यम्मी.
मल आजकाल कोणतेच फोटो दिसत
भारी!! आपल्याला यात योगर्ट
आहाहाहा.... कसला जोवघेणा
In reply to आहाहाहा.... कसला जोवघेणा by शिद
दुरुस्ती
भारीच प्रकरण आहे. कधी खाल्ले
बरेच पार्फे खाल्लेत पण इतका
In reply to बरेच पार्फे खाल्लेत पण इतका by शुचि
ओट्स नाही चांगले लागणार, पण
In reply to ओट्स नाही चांगले लागणार, पण by मनिष
अरेच्या ओटस नाही सॉरी
मस्तानी
In reply to मस्तानी by आजानुकर्ण
कावर्यांची मँगो मस्तानी अन
In reply to मस्तानी by आजानुकर्ण
स्वतः आपण?
In reply to स्वतः आपण? by मनिष
आश्चर्य
In reply to आश्चर्य by आजानुकर्ण
=))
In reply to =)) by प्यारे१
तुम्हाला समजतील असे वाटत नाही
In reply to तुम्हाला समजतील असे वाटत नाही by आजानुकर्ण
विनोद सांगा तरी, नै समजले तर
In reply to आश्चर्य by आजानुकर्ण
असे काय करताय? आपण जुने 'डावे
In reply to मस्तानी by आजानुकर्ण
असावी.
छान दिसते आहे. आता इथे हापूस
सुंदर.
In reply to सुंदर. by प्रभाकर पेठकर
स्वतः पेठकर काकांच प्रतिसाद
मस्त
मस्त नक्की करून बघणार
मस्त
जबराट
कलरफुल!! मला किवी जरा चरचरते
वॉव!!
मुवि, अद्वेय, निवेदिता-ताई,
अप्रतिम ...
अहाहा…
भारीच.... शेवटचा फोटो तर क्या
क्लास !
मनीष अतिशय सुंदर सादरीकरण.
मस्त कलरफुल फोटो !
(स्पा मोड ऑन) हुच्च्भ्रू
कसला क्लास दिसतय !
जबराट !
मस्त रे...