==================================================================
जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...
==================================================================
...जरा पुढे गेलो आणि नयनरम्य कंबोज निसर्गाने मन मोहायला सुरुवात केली.
आजचा कंबोडियातला शेवटचा दिवस. पण मंदिरांची मालिका काही संपत नव्हती. शिवाय परत तेच बघायला लागले म्हणून एखादे ठिकाण चुकवले असते असेही नव्हते. दर ठिकाण आपल्या विशेषाने उठून दिसत होते. अंगकोरमध्ये अजून काही दिवस रहा असा आग्रहाचा तर सोडाच पण साधा सल्ला न देणार्या आमच्या तथाकथित नामवंत सहल कंपनीबद्दलचा राग मनामध्ये खदखदत होता. त्याला कसेबसे आवरून लवकरच आटपून बाहेर पडलो.
आतापर्यंत देवळांची इतकी अपरिचित नावे जमा झाली होती की पुढची नावे लक्षात ठेवण्याचे निष्फळ प्रयत्न सोडून देऊन केवळ नेत्रसुखावर भर देणे पसंत केले. त्यामुळे आता पुढच्या चित्र सफरीत काही चित्रांच्या तळाला मंदिराच्या नावाचा उल्लेख नाही...
प्रीह् खान ०१ : प्रवेशमार्गाच्या दुतर्फा असलेल्या पुतळ्यांच्या लांबच लांब रांगा
.
प्रीह् खान ०२ : राम-रावण युद्ध
.
प्रीह् खान ०३ : तपस्या करणारे ऋषी आणि इतर कोरीवकाम
.
प्रीह् खान ०४
.
पूर्व मेबॉन ०१
.
पूर्व मेबॉन ०२ : स्वतःच्या सोंडेवर विराजमान गणेश
.
पूर्व मेबॉन ०३ : लक्ष्मी
.
पूर्व मेबॉन ०४ : तोरण
.
बांतीय कदेई ०१
.
बांतीय कदेई ०२
.
बांतीय कदेई ०३
.
.
.
.
.
.
.
.
.
.
रेस्तराँ
.
अपेक्षेपेक्षा बरेच काही पदरात पडले होते त्याचा आनंद मानायचा की हे सगळे नीट बघायला अजून काही दिवस राहता येणार नव्हते याचे दुःख करायचे याचा निर्णय होत नव्हता. पण, एकाद्या ठिकाणची सफर परत करणे शक्य झाल्यास पहिला क्रमांक कुठल्या ठिकाणाचा असेल या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले होते. संध्याछाया पसरू लागल्या आणि जड पावलांनी हॉटेलकडे परतावे लागले. दुसर्या दिवशी सहलीच्या पुढच्या स्थानाकडे जाणारे विमान पकडायचे होते.
(समाप्त)
==================================================================
जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...
==================================================================
प्रतिक्रिया
29 Mar 2014 - 7:48 pm | विवेकपटाईत
धन्यवाद साहेब,असा सुंदर प्रवास पहिल्यांदाच अनुभवला. आपल्या देशात ही निश्चित भव्य आणि सुंदर मंदिरे बांधले गेले असतील. कालचक्रात नष्ट जाहली असतील. पण आहे ते जपण्याचा प्रयास ही होत नाही,हेच दुख:. विभिन्न संस्कृतींचे असेच सुंदर प्रवास वर्णन पुढे ही वाचायला मिळतील ही अपेक्षा. पुन: धन्यवाद.
29 Mar 2014 - 8:20 pm | माहितगार
आपल्या सोबतच्या या प्रवासात लक्षात आलेल्या कंबोडीयाच्या कौतुकाच्या दोन गोष्टी नमुद कराव्याशा वाटतात १) बौद्ध तत्वज्ञान सर्व अनित्य आहे म्हणते त्या प्रमाणे ते राजे तेथे बौद्धेतर हिंदवी धर्म राहीला नसेल पण मंदिरांचे अस्तीत्व बर्या पैकी आहे हे ही नसे थोडके २) कोरीव काम असलेली मंदीरे आपल्याकडेही आहेत पण आपल्या कडील शिल्पकारांना विवीध भारतीय संकल्पना कथा बालपणा पासून मनात रुजत असतील तरच त्या कथांना मुर्तीकलेतून न्याय देता येतो. जी संस्कृतीच दुसरी कडून आली असे नव्हे प्रत्यक्षात बघावयास सुद्धा मिळाली नसेल त्याची संकल्पना लक्षात घेणे आणि काम करणे कौतुकास्पदच !
एक देखणा प्रवास घडवलात मनःपुर्वक धन्यवाद आणि पुढील प्रवास आणि लेखनासाठी शुभेच्छा.
29 Mar 2014 - 7:51 pm | यशोधरा
सुर्रेख!
29 Mar 2014 - 9:19 pm | सुधीर कांदळकर
लागलीच. काही तासापूर्वी ११व्या भागावरचा अभिप्राय लिहायला विसरलो. छे! काहीच सुचत नाही. तुमच्यापासून एक धडा मात्र मिळाला. कधी कंबोडीयात गेलोच तर अंगकोरला जास्त दिवस राहायचे. प्रत्येक भागातून अपरंपार नेत्रसुख मिळाले. अशा लेखमालेची अखेर हुरहूर लावणारच. प्रत्येक चांगली गोष्ट कधी ना कधी संपतेच. तुमच्या पोतडीतून पुढे काय निघते याच्या प्रतीक्षेत.
धन्यवाद.
29 Mar 2014 - 9:39 pm | सौंदाळा
शब्दातीत
सुंदर मालिका.
29 Mar 2014 - 9:41 pm | प्रचेतस
अफाट मालिका झाली ही.
एकापेक्षा एक सरस मंदिरे. अंगकोरवाट तर कळस आहे तरिही सर्वात जास्त आवडलेले मंदिर म्हणजे बायोनचे राजमंदिर. चतुर्मुखी शिखरांमुळे कमालीचे गूढ आणि तितकेच प्रे़क्षणीय वाटले ते.
कंबोडिया सहल आता करायलाच हवी.
31 Mar 2014 - 10:33 am | डॉ सुहास म्हात्रे
कंबोडिया सहल आता करायलाच हवी.
जेव्हा ठरवाल तेव्हा मला जरूर सांगा. बरोबर जावू. तुमच्या टिप्पणींनी ती सहल खूपच माहितीपुर्ण आणि रोचक होईल हे नक्की. तिथल्या मार्गदर्शकांनाही भारतिय संस्कृतीची चांगली आणि खात्रीलायक ओळख होईल :)
29 Mar 2014 - 10:07 pm | पैसा
तुमची एक मालिका संपली की आता पुढे कोणती येणार म्हणून उत्सुकता लागून रहाते. जाता तिथली संपूर्ण माहिती घेत आम्हालाही देता. धन्यवाद!
29 Mar 2014 - 10:49 pm | अत्रुप्त आत्मा
@तुमची एक मालिका संपली की आता पुढे कोणती येणार म्हणून उत्सुकता लागून रहाते.>>> +१ पन..आता पुढे ती सुलतानाची कहाणी हीच मालिका हवी आहे.या सांस्कृतीक ठेव्या इतकाच तो सामाजिक/राजकीय ठेवा बहुमोल आहे. तो (जसा जमेल तसा) उघड व्हायलाच हवा. नाहितर तो कधिच कोणास कळणार नाही. :)
30 Mar 2014 - 10:47 am | खटपट्या
स्वतः च्या सोंडेवर स्वार झालेला गणपती तर क्लासच !!!
30 Mar 2014 - 11:18 am | लॉरी टांगटूंगकर
_/\_
धन्यवाद!
30 Mar 2014 - 11:24 am | बॅटमॅन
ही लेखमाला अतिशय जबरी झाली. अकरावा भाग वाचला होता पण अभिप्राय द्यावयाचे विसरलो. इतकी बहुसंख्येने आणि इतकी देखणी मंदिरे पाहून कलिजा खलासच झाला एकदम!!!! इकडे गेले तर पाहिजेच किमान एकदा तरी. लैच्च भारी!!!!
31 Mar 2014 - 9:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
इकडे गेले तर पाहिजेच किमान एकदा तरी.
नक्कीच !!!
30 Mar 2014 - 11:39 am | माझीही शॅम्पेन
एक्का साहेब सिंदाबाद हेच तुम्हाला योग्य नाव आहे , इतर सर्व सफरींपेक्षा ही सफर जबरदस्त आवडली ...भारता पासून इतक्या दूर हिंदू संस्कृती आणि त्याच अविश्वसनीय अफाट स्वरूप ... हे सगळे अशक्य आहे ... ज्या राजांनी ही मंदिर बांधली आणि तुम्ही ती इथे (मिपा वर) आणली .. तुम्हा सर्वांनाच सलाम !!!
30 Mar 2014 - 12:06 pm | मदनबाण
सुरेख लेखमालिका. :)
30 Mar 2014 - 7:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
विवेकपटाईत, माहितगार, यशोधरा, सुधीर कांदळकर, सौंदाळा, वल्ली, पैसा, अत्रुप्त आत्मा, खटपट्या, मन्द्या, बॅटमॅन, माझीही शॅम्पेन आणि मदनबाण : तुम्हा सर्वांसाठी अनेकानेक धन्यवाद ! तुमच्या सहभागामुळे या माझ्या अत्यंत आवडत्या सहलिचा पुनःप्रत्ययाच्या आनंद व्दिगुणीत झाला !
31 Mar 2014 - 10:03 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
1 Apr 2014 - 3:48 pm | प्रसाद प्रसाद
एक्का साहेब, अंगकोर वट पाहण्याची मला खूप इच्छा आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप भाग्यवान आहात असे वाटते. खरचं, निशब्द व्हायला होतं दगडावरची कलाकुसर पाहून. ह्या लेखमालिकेतील प्रत्येक भाग अप्रतिम झाला आहे.
नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवर ३-४ वर्षापूर्वी एक सेरीज पहिली होती, त्यात सांगितलं होत की अंगकोर वटच्या महामंदिराची जमीन काहीही वास्तूनिर्माणासाठी अयोग्य समजली जायची कारण पावसाळ्यात नदीला आलेल्या पुराने जमीन फुगायची आणि उन्हाळा आला की जमिनीची सखलता नष्ट होऊन भेगा पडायच्या आणि ती उंचसखल व्हायची. त्यावर उपाय म्हणून वास्तुविशारदांनी प्रस्तावित मंदिराच्या जागेभोवती चारी दिशेने मानवनिर्मित कालवे/खंदक तयार केले. आणि त्यातून पाणी फिरवले. त्यामुळे जमीन उंच सखल होण्याची समस्या पूर्णतः नाहीशी झाली.
धन्यवाद साहेब.
1 Apr 2014 - 7:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमची महिती बरोबर आहे. अंगकोरची जमीन वालुकामिश्रित आहे त्यामुळे जर त्या जमिनीची आर्द्रता कमी झाली तर तिच्यावरच्या वजनदार मंदिरांचा तोल केवळ स्वतःच्या वजनाने ढळेल.
सद्याही सतत वाढणार्या पर्यटकांच्या लोंढ्याना सुविधा देण्यासाठी होणार्या विकास कामांसाठी होणार्या जमिनीतल्या पाण्याच्या उपश्याने (यात तलावांतल्या पाण्याची चोरीही आली) कमी होत जाणार्या जमिनीतल्या पाण्याची पातळी हा मोठा काळजीचा विषय झालेला आहे.
जमिनीतिल आर्द्रता राखून ठेवण्याइतकाच या मंदिरांच्या सभोवतीच्या तलावांइतक्या मोठ्या खंदकांतिल पाण्याचा उपयोग नेहमीच्या वापराला आणि शेतीच्या वापराला होत होता. याच शेतीच्या बळावर ख्मेर सम्राट त्याकाळातल्या जगातिल सर्वात मोठी फौज बाळगून होते. या पाण्याकरिता त्यांनी उभारलेले दोन नदीजोडांचे प्रकल्प आणि नदीइतकाच मोठा एक मानवनिर्मीत प्रकल्प ही आजही स्थापत्यशास्त्रिय आश्चर्ये मानली जातात.
1 Apr 2014 - 5:50 pm | कुसुमावती
सुंदर मंदिरांची तितकीच सुंदर ओळख करून दिलीत. कंबोज मंदिरे आणि कला पाहण्यासाठी कंबोडियाला नक्कीच गेलं पाहिजे.
1 Apr 2014 - 7:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
नक्कीच भेट द्या. खूप आवडेल याची खात्री आहे.
1 Apr 2014 - 8:57 pm | शिद
तुमचे हे प्रवासवर्णन देखिल तितकेच मस्त आणि माहितीपुर्ण होते... अश्याच भटकंती करत रहा व आम्हाला तुमच्या लेखमालिकांद्वारे त्याची सफर घडवत जा...!
पुढिल लेखमालिकेच्या प्रतिक्षेत.
3 Apr 2014 - 10:21 am | आत्मशून्य
.
1 Apr 2014 - 10:37 pm | एस
प्रचंड सुंदर ले़ख. प्रत्येक लेखातील मंदिरे, चित्रशिल्पे जितकी अप्रतिम तितकेच त्यांचे वर्णनही. पु.ले.मा.प्र. :-)
2 Apr 2014 - 3:02 pm | झकासराव
अप्रतिम, अप्रतिम आणि केवळ अप्रतिम. :)
2 Apr 2014 - 5:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
शिद, स्वॅप्स आणि झकासराव : अनेक धन्यवाद !
4 Apr 2014 - 6:46 pm | मराठे
गूगल स्ट्रीट व्ह्यु वापरून आता अंगकोर वट चा फेरफटका मारता येईल. त्याबद्धल इथे वाचता येइल. (अर्थात स्वतः तिथे जाउन बघण्याला पर्याय नाहीच पण निदान थोडीफार कल्पना घेता येइल.)
4 Apr 2014 - 8:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
अर्थात स्वतः तिथे जाउन बघण्याला पर्याय नाहीच
याबाबतीत संपूर्ण सहमती. तेथे गेल्याशिवाय अंगकोर किती मोठे आश्चर्य आहे हे कळणे शक्य नाही.
5 Apr 2014 - 2:33 pm | नितिन पाठे
बोले तो एक्दम झकास.......
6 Apr 2014 - 12:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
भौत भौत आभार्स !
9 Apr 2014 - 11:40 am | भाते
संपुर्ण सफर पुन्हा एकदा वाचुन काढली. फोटो आणि माहिती अप्रतिम.
इतकी सगळी माहिती लक्षात ठेवण्याच्या तुमच्या इच्छाशक्तीचे नवल वाटते.
प्रत्येक शिल्पावरील ती कोरीव कलाकुसर केवळ थक्क करणारी आहे.
सुरेख लेखमालेसाठी तुम्हाला धन्यवाद.
9 Apr 2014 - 7:21 pm | अनिरुद्ध प
मालिका संपल्याची हुरहुर मात्र जाणवेल्,असो पु ले शु.