भटकंती - ५ लग्नाला गेले मी ओसाकापुरा

इन्ना's picture
इन्ना in जनातलं, मनातलं
19 Mar 2014 - 6:43 pm

भटकंती -५

लग्नाला गेले मी ओसाका पुरा..

माझ्या भटकेपणात मौज आणणारी, काही अनपेक्षित दिसलेली इंद्रधनुष्ये आहेत. उन पावसाचा खेळ पहाताना ,ओल्या मातीचा वास घेत , अचानक दिसलेली कमान , अजूनही 'हैला कस्ल भारी' अस वाटवते, तसेच हे भटकंतीत अचानक ठाकलेले प्रसंग !!

जपानात नविन काम मिळालं होते आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून तोक्यो हून ,ओसाका नावाच्या शहरात जायच होत. आदला आठवडा कामानी पिट्ट्या पडला होता, म्हणून ओसाकात पोचले की गुमान पडी मारायची अस ठरवल होतं. पण शिंकान्सेन नी जाताना सहज खिडकीतून पाहिले तर फुजी सान ! (एक जपानची वारी केली की सगळ्याना सान जोडायची सवय करून घ्यायची अस मला शिकवलय ;) ) का कोण जाणे हे महाशय दिसले की आश्वस्त वाटत. सगळी मरगळ गेली . म्हटल ओसाका मधे मिळणारी रिकामी दुपार सत्कारणी लावायचीच.

13

बाडबिस्तरा मुक्कामी टाकून लगेच मी बाहेर पडले. ओसाका मधे जायची पहिलीच वेळ. त्यात तोक्यो, योकोहामा मधे तुरळक दिसणारं इंग्लिश इथे लापता होतं. हॉटेल लॉबी मधल्या मुलीला ,'हाताशी ४ तास आहेत इथे जवळ पास काय पहाता येइल " हे साभिनय ,जापनीज अ‍ॅक्सेंट्च्या इंग्लीश मधे , चित्र काढून विचारायचा प्रयत्न केला पण गाडी पुढे सरकेना.

शेवटी ओसाका कॅसल नावाची इमारत झळकवणारं ब्रोशर दिसल. ओसाका कासल हे शब्द सोडून उर्वरीत मजकूर अर्थात जपानीत , मी निरक्षर. मी ते चित्र दाखवून विचारल? त्यावर तिनी एका बस चा नंबर सांगितला . म्हटल, मुग्धाच्या रंगित गोष्टी सारख तिथवर पोचले की पुढचा पत्ता विचारता येइल. :)

6

बस मधून उतरून कॅसल च्या प्रवेश द्वारातून आत शिरले. पत्ता विचारण्यात वेळ घालवण्यापेक्षा रमत गमत फॉल कलर्स मधे रंगलेली पान पहात जाव असा विचार केला.

11

prachi 1

निंजा ड्रेसिंग ची परेड होती तिच्या बरोबर चालले थोदावेळ. सगळे बहुधा कॅसल च्या मुख्य प्रांगणातच चालले होते.
12
वाटेत एक पारंपारिक कपडे घातलेला घोळाका दिसला. मी परेड सोडून त्यांच्या मागे निघाले. :)

मंडळी एका देवळाअपाशी थांबली.
7

तिथे एक फोटोग्राफर दिसला. मोडक्या इंग्लिश मधे त्याला विचारल की नाटक आहे का ? का कल्चरल प्रोग्रॅम. तो म्हणाला लग्न आहे. आपुन खुश ! जपानी लग्न पहायला मिळणार! लग्नाच्या फोटोग्राफर ह्यापेक्षा अधिक चांगला वशिला मिळणार मला . पण त्यानी माझ्या कडे येडी झाली का तू अश्या स्वरूपाचा कटाक्ष टाकला आणि म्हणाला तू काय मलाही आत एंट्री नाही ये. आता मी येझाकातू कटाक्षाची परतफेड करून टाकली. त्याला सांगितल आम्च्या इंडियात लग्नात , नवरा नवरीपेक्षा फोटोग्राफर महत्वाचा असतो. :)

ह्या गप्पा होइपर्यन्त वर्‍हाडी जमा व्हायला लागले. मुलीकडचे १०-१२ मुलाकडाचे तेवढेच. त्यातल्या एकाला विचारल , तुमची हरकत नसेल तर मला हा सोहाळा पहाता येइल का ? अत्यंत नम्र शब्दात त्यानी नकार दिला आणि समजावल. कुटुंबिय सोडून इतर कोणी देवळात येउ शकत नाही. पण तू नंतरच्या भोजनास अवश्य ये. मी मनातल्या मनात म्हटल माझा नवरा माझ्याबरोबर नाही हे बरय. असा भोचकपणा करण्याबद्दल माझे त्याचे अगणीत वाद घडलेत. मी पडेल चेहेरा केल्यावर काका म्हणले देवळात नाही आलीस तरी खिडकीच्या उभ्या फटीतून पहा. आवाज मात्र करू नकोस, आणि फोटो काढू नकोस. ओक्के म्हणून मी आणि फोटोग्राफर खिडकीला नाक लावते झालो.

तेवढ्यात मुख्य प्रिस्ट आले. काय तो रुबाब!!

2

त्यांच्या मागुन दोघी असिस्टंट प्रिस्ट्स ! ह्या बासरी सद्रुश वाद्य वाजवून एव्हिल स्पिरिट्स (ह्याला भुताखेताना हा शब्द योग्य वाटेना) दूर ठेवतात.

4

ह्या तिघांचा मागोमाग नवरी आणि नवरा. नवरीचा लग्नाचा किमोनो ३२ किलो चा होता. आणि केसांचा टोप आणि त्यातल्या स्पेशल पिना ,मेकप तयारीला ३ तास लागतात म्हणे. ही माहिती पुरवणारा फोटो ग्राफर. आमच कस तुमच कस? हो का? अगदी सेमच रे अश्या स्वरूपाच्या गप्पा चालल्या होत्या.

दांपत्यापाठोपाठ नातेवाईक.

8

ही नक्की वरमाई आणी ती शेजारची तिची बहिण ! ह्यावर फोग्रा चकीत! तुला कस कळल? म्हटल तुमच आणि आमच सेम असत :) तोरा सेम ;)
3

आतले विधी अत्यंत शांततेत गंभिरपणे चालू होते, हे मात्र आप्लया अगदी उलट गडबड आवाज गोंधळ नाही ते लग्न कसल? असो, इथे त्या दोघी बासरीवादक मुली मंद्र सप्तकात सूर लाउन होत्या. मुख्य भटजीबुवा एकदा नवर्‍यामुला समोर मग नवरी समोर उभे राहून मंत्र पुटपुटत होते. नंतर ३ ग्लासातून साके ठेवली गेली. नवरा नवरी नी ते प्यायले मग असेच ३ ३ सुंदर प्याले वर्‍हाडाचा समोर गेले त्यांनी ते प्यायले. आणि लग्न संपन्न झाले. इथे माझा नवा मित्र सरसावून उभा राहिला. अवजारं परजली आणि दरवाज्यासमोर पळाला. हे का ते कळलेच थोड्या वेळात. मुख्य भटजींनी दरवाजा उघडून नव दांपत्याला जगा समोर पेश केले.
9

9

टाळ्या वाजल्या. सख्यांचे मागुन अभिनंदनाचे चित्कार ऐकू आले. धार्मिक रितीरिवाज संपवून सोहाळा सुरू झाला. :) फोग्रा बिझी झाला , नवरीचा कपडेपट , मेकप , केशरचनाकार मुली सरसावल्या. तेवढ्यात ते परमिशन वाले काका दिसले. मुलाचे वडिल होते बहुधा. त्याना माझ्या पोतडीत असलेली छोटी गणपतीची मुर्ती दिली. एलिफंट गॉड पाहून काका खूष झाले. मी नवपरिणित दांपत्या चे अभिनंदन केले आणि काढता पाय घेतला.

एरवी कुठे जाणार असले की थोडीफार माहिती शोधलेली असते. पण हे अचानक दिसलेल इंद्र धनुष्य. नंतर,' समुराई लगिन' म्हणून गुगल देवाला साकड घातल तरी बरच कळल असत पण तस करावस वाटल नाही. फोटोग्राफर्शी मोडक्या इंग्लिश मधे मारलेल्या गप्पा, त्यातून हाताला लागलेले विविध रंग, समोर दिसलेला नव्या जोडप्याच्या डोळ्यातला आनंद , वरवधू पित्यांची कार्य सुखरूप पार पाडण्या साठी केलेली धावपळ, अन पार पडल्यावर चेहेर्‍यावर झळकणारी कॄतार्थता सगळे रंग झकास दिसत होते. मला अनपेक्षित दिसलेलं इंद्रधनुष्य!!

संस्कृती

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2014 - 6:53 pm | पिलीयन रायडर

छान लेख..

पण एक कळाल नाही..

फोटो काढु नको म्हणुन सांगितलं ना त्यांनी.. मग हे फोटो कुठुन आले?

केदार-मिसळपाव's picture

19 Mar 2014 - 6:59 pm | केदार-मिसळपाव

मंदिरातले फोटो काढू नको असे सांगितले... मंदिराच्या बाहेरचे फोटोंवर बंदी नाही.

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2014 - 7:05 pm | पिलीयन रायडर

असय होय.. मला वाटलं की कशाचेच फोटो काढु नका..

धार्मिक कार्यक्रमाच खासगीपण ते असोशीने जपू इच्छीत होते. त्यामुळे मंदिराच्या आतल्या विधिंचे फोटो नाहीयेत.

केदार-मिसळपाव's picture

19 Mar 2014 - 6:57 pm | केदार-मिसळपाव

मज्जा आली वाचतांना...
नियमीत लिहीत रहा.

सहीच!! नाही म्हणता लग्न फारच आटोपशीर झालं हो. आमच्या बदलापूरात अजूनही लग्नाच्या दिवशी सकाळीच सीमांतपूजन वैगरे विधी झाले तर लोकांचे कटाक्ष बघण्यासारखे असतात. ;)

मृगजळाचे बांधकाम's picture

19 Mar 2014 - 7:22 pm | मृगजळाचे बांधकाम

सोलिड आलेत फोटू! छान छान

जेपी's picture

19 Mar 2014 - 8:16 pm | जेपी

आवडल .

अवांतर -इन्ना या शब्दाचा अर्थ काय? आमच्या आत्याच्या सासुचे नाव प्रतिभा असुनही त्यांना सगळे इन्ना मनायचे .

विवेकपटाईत's picture

19 Mar 2014 - 8:31 pm | विवेकपटाईत

आव्द्ल नेहमीपेक्षा अलग प्रवास वर्णन, मजा आली.

भटकंती आवडली. भारताशी तुलना करता मानवी स्वभावातली साम्यस्थळांचं (तसंच काही वेगळेपणाचंही) वर्णन आवडलं. आधीच्या इतर प्रतिसादाप्रमाणे, एक वास्तुविशारद म्हणून प्रत्येक शहरात/ देशात तुम्हाला काय नोंद घेण्यासारखं वाटलं तेही वाचायला आवडेल.

शेवटचा भाग आधी आणि मग शोधून काढून आधीचे भाग वाचले. (सलगपणा रहावा म्हणून पुढच्या प्रत्येक भागात आधीच्या सर्व भागांचे दुवे दिलेत तर बरं असं सुचवेन, इथे भाग , , आणि यांचे दुवे देतो आहे.)

मुक्त विहारि's picture

19 Mar 2014 - 9:28 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

vrushali n's picture

19 Mar 2014 - 9:21 pm | vrushali n

आवडलच.....

शेखरमोघे's picture

19 Mar 2014 - 9:27 pm | शेखरमोघे

एका खिडकीतून पाहिले तर फुजी सान ! आणखी एका खिडकीतून पाहिले तर लग्न सान (जपानी लग्नालाही सान जोडायलाच हवे ना?)!! छान खिडक्या मिळतात बुवा तुम्हाला!!!

मुक्त विहारि's picture

19 Mar 2014 - 9:28 pm | मुक्त विहारि

आवडले

बॅटमॅन's picture

19 Mar 2014 - 9:29 pm | बॅटमॅन

जबराट!

असं अचानक ठरलेलंच जबरी अन सुखावणारं असतं असा अण्भव आहे खरा!

भ ट क्या खे ड वा ला's picture

19 Mar 2014 - 9:50 pm | भ ट क्या खे ड वा ला

लिहीत रहा

सुंदर लेखन आणि फोटो ! मजा आली वाचायला.

मधुरा देशपांडे's picture

19 Mar 2014 - 11:10 pm | मधुरा देशपांडे

असेच म्हणते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Mar 2014 - 10:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त फोटो आणि लिखाणाची खुसखुशीत शैली... दोन्ही आवडले !

संजय क्षीरसागर's picture

20 Mar 2014 - 12:24 am | संजय क्षीरसागर

क्या बात है! ही जगण्यातली उत्स्फूर्तता स्पर्शून गेली.

रेवती's picture

20 Mar 2014 - 12:34 am | रेवती

एकदम भारी!

अत्रुप्त आत्मा's picture

20 Mar 2014 - 1:36 am | अत्रुप्त आत्मा

@पण हे अचानक दिसलेल इंद्र धनुष्य. नंतर,' समुराई लगिन' म्हणून गुगल देवाला साकड घातल तरी बरच कळल असत पण तस करावस वाटल नाही. फोटोग्राफर्शी मोडक्या इंग्लिश मधे मारलेल्या गप्पा, त्यातून हाताला लागलेले विविध रंग, समोर दिसलेला नव्या जोडप्याच्या डोळ्यातला आनंद , वरवधू पित्यांची कार्य सुखरूप पार पाडण्या साठी केलेली धावपळ, अन पार पडल्यावर चेहेर्‍यावर झळकणारी कॄतार्थता सगळे रंग झकास दिसत होते. मला अनपेक्षित दिसलेलं इंद्रधनुष्य!!>>> एक कडक शेल्यूट! _/\_

पाषाणभेद's picture

20 Mar 2014 - 2:02 am | पाषाणभेद

सान सान

इन्ना's picture

20 Mar 2014 - 4:08 pm | इन्ना

सॅल्युट नको हो :)
इंद्रधनुष्याची कमान दिसल्यावर आभाळाअतले पाण्याचे थेंब त्यातुन परावर्तित झालेला स्पेक्ट्रम अशी चिरफाड केली की ती कमान तिच इंद्रधनुष्यपण हरवते आणि ते निव्वळ तानापिहीनीपाजा असे रंग होतात.

स्पंदना's picture

20 Mar 2014 - 4:32 am | स्पंदना

मस्त !!
एकूण लग्नाबददल बराचसा आदरभाव दिसतो. नाहीतर हल्ली आप्लयाकडे मी फोटोत कशी दिसते याचच टेन्शन.

"एकूण लग्नाबददल बराचसा आदरभाव दिसतो". मोजक्याच लोका॑ना आत प्रवेश ते ही सगळे ओळिने ( आपल्या कडची वरात आणि त्यात नाचणारे आठवा *dance4* *DANCE* :!!),अतिशय शा॑त पणे पार पाडलेले विधी, खरच॑ आपल्याकडे पण लग्नात असा आदरभाव यायला हवा. आपल्याकडे तर विवाहस्थळ कोणते आहे आणि भोजन व्यवस्था कुणाची आहे ,हे बघुन लग्नाला येतात. मुख्य कार्यात कुणी फारसे लक्ष देताना दिसत नाही. सगळ्यात कहर म्हणजे पत्रिकेतली तळटिप* " क्रुपया आहेर व पुष्प्गुच्छ स्विकारले जाणार नाहीत."
सुजाण नातेवाईक आणी मित्रम॑डळी ही टिप आपल्यासाठी नाहीच असेच समजतात कि॑वा आजकाल ती पत्रिकेत टाकयची पध्द्त झालिये त्या कडे लक्ष द्यायच नसत अस म्हणतात *ok* आणि आहेर घेणे नघेणे या वरुन तिथेच वाद सुरु होतात *stop* _ *aggressive*
पण तुम्ही टाकलेले फोटो आणी माहीती आवडली.

प्रमोद देर्देकर's picture

20 Mar 2014 - 10:36 am | प्रमोद देर्देकर

वेगळी माहिती खुप छान!

मृत्युन्जय's picture

20 Mar 2014 - 12:34 pm | मृत्युन्जय

मस्त लेख.

सविता००१'s picture

20 Mar 2014 - 12:48 pm | सविता००१

छान माहिती

इशा१२३'s picture

22 Mar 2014 - 3:06 pm | इशा१२३

वेगळी माहीती आवडली..

जातवेद's picture

24 Mar 2014 - 8:02 pm | जातवेद

अहो आम्ही पण परवा निक्को ल गेलो होतो, तेव्हा तिकडे एक असेच लग्न पहायला मिळले, पण आमचीच कार्यक्रम-पत्रिका व्यस्त असल्यामुळे तिकडे जास्त वेळ थांबता आले नाही. बाकी फारच हळू आवाजात चाललेले असतात सगळे विधी त्यामुळे लई कंटाळा येतो.

छायाचित्रे सुरेख आणि वर्णन शैली उत्तम .

संदीप चित्रे's picture

27 Mar 2014 - 9:02 pm | संदीप चित्रे

बाकीची इंद्रधनुष्यंही शोधतो आता :)
शक्य असल्यास 'भटकंती'च्या प्रत्येक भागात, आधीच्या भागांचे दुवे द्याल का?

पैसा's picture

29 Mar 2014 - 12:53 pm | पैसा

मस्त आणि केवळ मस्तच!! मोग्यांबो खुश हुवा!