शिव्यांना शिव्या देऊ नये.
अगदी खरं सांगतो, शक्यतो मी शिव्या देत नाही. पण तरी त्यांच्याबद्दल मनात एक आत्मीयता आहे. एक आपुलकीचा आणि कृतज्ञतेचा भाव आहे. विशेषतः मराठी शिव्यांबद्दल; नव्हे, फक्त मराठी शिव्यांबद्दलच. बाकी भाषांमधल्या शिव्या अतिशय नेभळट वाटतात... तर हा एक शिव्यांबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न. [ज्या शिव्या लेखात दिसतील त्या मी स्वतः कोणाला देत नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे केवळ एक (प्रभावी आणि परिणामकारक) शब्द म्हणून पाहिलं जावं ही विनंती. रसभंग होईल या भितीने शक्य तिथे शि* असं न लिहीता शिवी असं पूर्ण लिहीलं आहे, तेव्हा थोर मनानं सांभाळून घ्या.]
सुरुवात झाली 'अईला!!' पासून. कोणी 'आयला' म्हणतं, कोणी व्यवस्थित 'आईला' म्हणतं, कोणी 'च्यायला' म्हणतं. मी पहिल्यांदा ऐकलं, काही मित्रांच्या तोंडी!! पहिलीत!! 'अईल्ला!!!' आपण आईगं म्हणतो, तसं हा आईला म्हणतोय, काही विशेष फरक मला वाटला नाही. घरी प्रयोग करून पाहिला आणि पाठीत आजीचा दणका मिळाला... "ही शिवी आहे, ती आईला लागते, ही कधी द्यायची नाही. याद राख पुन्हा कधी म्हटलंस तर..." कदाचित तेव्हा शिवी म्हणजे काय हे सुद्धा तिला मला समजवावं लागलं असणार... आत्ता नेमकं आठवत नाही. मग मीसुद्धा ठरवलं, की कोणालाही शिवी घालू देता कामा नये. चौथीपर्यंत, प्रामाणिकपणे, माझ्यासमोर मला पेलवेल अशा कोणत्याही मुलाने शिवी घातली की त्याला एक वाजवून दिली आहे. वर चोंबंडेपणा नसानसांत भिनलेला, त्यामुळे त्याची शाळेच्या बाईंकडे सुद्धा 'बाई हा त्याला गांडू म्हणाला' अशा तक्रारी केलेल्या आठवतात. माझ्या या चोंबडेपणाला घाबरून (आणि माझ्यामुळे प्रेरित झालेल्या काही इतर चोंबड्यांना घाबरून) चौथीपर्यंत तरी वर्गातल्या कुणी कधी शिवी दिलेली मला आठवत नाही. निदान, माझ्या तोंडावर तरी नाही.
तेव्हा आमच्या सोसायटीतले सगळे मोठे टगे, माझ्याहून किमान आठ-दहा वर्षांनी सिनिअर असलेले दादा लोक्स माझ्यावर दादागिरी करत बसायचे. मला पांडु म्हणून चिडवायचे आणि मधलं बोट दाखवायचे. मला गम्मत वाटायची. मी सुद्धा दाखवायचो. पण मला ते असं का करतात ते कळायचं नाही. घरी मी विचारलं, तर कोणी धड सांगेना. "जाऊ दे, आपण लक्ष नाही द्यायचं. ते असंच उगाच करतात. फार विचार करु नकोस." पुढे अर्थ कळला तेव्हा हे लक्षात आलं की शिव्यांना विशिष्ट भाषेचं बंधन नसतं. सांकेतिक खुणांनीही त्या देता येतात.
सहावीत सोसायटी बदलली, आणि माझं शिव्यांबद्दलचं ज्ञान किती अगाध आहे, याची प्रचिती मला वेळोवेळी येऊ लागली. माझ्याहून चारेक वर्षांनी मोठ्या असलेल्या दोघांच्या गप्पांमध्ये सारखं आपलं मध्ये मध्ये चुत्या-चुत्या काहीतरी येत होतं. मी न राहवून अर्थ विचारला, तर दोघेही हसायला लागले आणि त्यांनी मला सांगितलं की चुत्या म्हणजे नाणं. माझा विश्वास बसला नाही. घरी गेलो, तरी डोक्यात या नवीन शब्दाचाच विचार चालू होता. जर चुत्याचा अर्थ नाणं असता, तर चौथी स्कॉलरशिपसाठी समानार्थी शब्दांचा अभ्यास करताना तो शब्द येऊन गेला असता. मी स्वयंपाकघरात बसलो होतो. समोर दादा सफरचंद खायच्या तयारीत होता. आई काहीतरी काम करत होती. दादाने सफरचंदाचा चावा घ्यायला आणि मी माझी शंका प्रकट करायला एकत्र तोंड उघडलं - "आई चुत्या म्हणजे काय??" दादाला ठसका बसला. आईने फक्त "आं!! असं नाही म्हणायचं" असं काहीतरी दरडावलं आणि लगेच तिथून निघून गेली. मला कळलं, ही शिवी दिसते. बास!! त्या दिवशी माझ्या लैंगिक शिक्षणाचा पाया माझ्या दादाने रचला. पाहता पाहता वर्षभरात मी त्यात एसएससीही झालो. आणि माझं शाळेतल्या शिक्षकांना ते इतिहास-भुगोल वगैरे शिकवत असताना अख्ख्या वर्गासमोर मध्येच उठून निरागसपणे "सर पूर्वी हॉस्पिटल्स नव्हती मग बायका जन्म कशा द्यायच्या?" असे प्रश्न विचारून भंडावून सोडणंही बंद झालं. अशाप्रकारे शिव्या ह्या जिज्ञासा वर्धक असतात आणि कल्पनाविश्व वाढवणा-या देखील असतात हे मला उमगलं.
शिव्यांबाबतीत अगदी वेळीच मला पुरेसं ज्ञान मिळालं असं म्हणायला हवं, नाहीतर पुढच्याच वर्षी सातवीत आमच्या वर्गात नॉन-व्हेज विनोदांना जो ऊत आला, त्याला मी मुकलो असतो. साहित्याच्या या एका नव्याच प्रकाराशी माझी ओळख झाली होती, हळूहळू तिचं मैत्रीत रुपांतर झालं, आणि शेवटी मी त्याच्या प्रेमातही पडलो. आणि एकेकाळी साधं कोणी 'आयला' म्हटलं म्हणून त्याला चोपणारा मी आता स्वतः सर्रास शिव्या देत सुटलो होतो. प्रत्येक वाक्यात शिवी असायची. वयानं सिनिअर असलेल्या मित्रानं उन्हाळ्याच्या सुट्टीत मला याबद्दल बरंच झाडलं, आणि त्याच्या संगतीत राहून मी फक्त गरजेपुरतं शिव्या द्यायला शिकलो. दुस-या शब्दांत सांगायचं म्हणजे मी शिव्या टाळणं शिकलो. तरी त्या अश्लील साहित्यप्रकाराबद्दलचं माझं प्रेम कमी झालं नव्हतं. ते कमी होणारच नव्हतं. पण यामुळे शिव्या या मनोरंजकही असतात हे लक्षात आलं.
नववीत असताना शाळेची फुटबॉल टीम काढावी या हेतूनं ब-याच वर्षांत कदाचित प्रथमच इंग्रजी आणि मराठी माध्यमाची पोरं एकत्र आली. आमच्या आधीच्या बॅचेसमध्ये मराठी-इंग्रजीच्या पोरांत हमखास राडा व्हायचा. आम्ही मात्र हातमिळवणी केली. आणि अजुन एका नव्या शब्दानं आयुष्यात एंट्री घेतली. 'फक!!' ही शिवी इंग्रजी माध्यमाची पोरं जाऊदेत, पोरी सुद्धा हमखास द्यायच्या. आणि प्रसंगी त्या मराठमोळ्या शिव्या सुद्धा द्यायच्या!! आम्ही चाटच पडलो. मराठी माध्यमाच्या पोरींसमोर शिव्या द्यायला आम्ही घाबरायचो, काय भरोसा पोरगी चुगली करायची. आणि इकडे बघतोय तर मुली स्वतःच शिव्या देताना दिसल्या. शिव्यांच्या मार्फत का होईना, पण स्त्री-पुरुष समानता वाढीस लागल्याचं दिसून आलं. (पुढे हिमालयाची सावली हे नाटक पाहताना रोहिणी हट्टंगडी यांना रांडेच्या, गाढवीच्या अशा शिव्या देताना पाहून अवाक् झालो होतो. आईने खुलासा केला, म्हणाली की पूर्वी बायकाच जास्त शिव्या द्यायच्या. चांगल्या, उच्च जाती-वर्णाच्या घरंदाज बायकासुद्धा अपवाद नव्हत्या म्हणे. पटलं. तेव्हा वाटलं की शिव्या द्यायला पहिल्यांदा स्त्रियांनीच सुरुवात केली असली पाहिजे. एकतर दुस-यांना नावं ठेवायची सवय पुरुषांपेक्षा त्यांना जास्त, आणि एवढ्या कल्पक शिव्या पुरुषांना कशा काय सुचतील? एक शंका आहे - शिंच्या म्हणजे नक्की 'कोणा'च्या? किंवा 'कशा'च्या?)
असो. हळूहळू आमच्या वर्गातल्या मुली सुद्धा हळूच एखादी शिवी तोंडातून लाजत लाजत सोडून द्यायला शिकल्या. अशाप्रकारे, शिव्यांनी मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीला हातभार लावला.
पण मला सगळ्यात जास्त त्रास दिला, तो फक या शिवीने.. शिवीसुद्धा म्हणणार नाही मी तिला. भ-भे-भो-चु इ शिव्या देताना जी उर्जा बोलणा-याला आणि ऐकणा-याला जाणवते, ती फक-फकर या नेभळट शिव्यांमध्ये अजिबात दिसून येत नाही. याचं उत्तम उदाहरण आहे माझ्याकडे. कॉलेजमधला एक मित्र अजिबात शिव्या द्यायचा नाही. त्याला आम्ही मंदू म्हणायचो. एकदा तो फक म्हणाला. आम्ही सगळे आश्चर्यचकित्!!! आयला आपला मंदू चक्क फक म्हणाला?? तर तो म्हणतो, "हो मी फक बोलतो, त्यात काय?" त्याला पुन्हा एकदा फक म्हणायला सांगितलं. बिनधास्त म्हणाला - फक. मग म्हटलं आता 'चोद' म्हण. "नाही ते नाही म्हणणार मी. किती घाण वाटतं ऐकायला" अरेच्चा!! अर्थ एकच ना दोघांचा!! शिवी द्यायची नाही म्हणतोस तर असा भाषेनुरुप भेदभाव का?? म्हणजे शिवी मराठीत घातलीत तर घाण, - सॉरी, ग्रोस!! आणि तिचं इंग्रजीत भाषांतर करून घातलीत तर सॉफिस्टिकेटेड?? छान!! धन्य!! या मंदू सारखी विचारसरणी ब-याच मुलींमध्येही दिसून येते. इंग्रजीत सगळ्या शिव्या घालतील, पण त्याच अर्थाच्या मराठी शिव्या यांच्यासमोर दिल्या, तर किती घाणेरडा आहे हा मुलगा असं म्हणतील. पण याबद्दल वाईट वाटून घेणं मी सोडून दिलंय. कारण अशा व्यक्तींना शिव्या इंग्रजीत देताना, आपण शिवी देतोय असं जाणवतच नसावं. तितका दमच नाही त्या भाषेत. त्यामुळे एखाद्याला शिवी हासडायचीच, म्हणून जर शिवी द्यायची असेल, तर ती मराठीतून दिल्याशिवाय परिणामकारक ठरतच नाही अशा निष्कर्षाप्रत मी आलो आहे. साधं उदाहरण देतो. एखाद्याला आपण "यू बेगर!!" असं म्हटल्यानं एवढं काही होईल असं नाही पण "अरे भिकारड्या!!" असं म्हटलं तर त्या एखाद्याची खोपडी फिरेलच ना.
शिव्या देणं चांगलं, असं माझं म्हणणं नाही. पण एक मात्र आहे, की मराठी भाषेला जिवंत ठेवण्यात शिव्यांचा मोठ्ठा वाटा आहे, असेल. माणूस भले मराठीतून शिक्षण घेवो, अगर इंग्रजीतून. तो शिवी घालतो, ती मराठीतूनच. राग, मत्सर, द्वेष, कटकट, वैताग, उद्गार यांना जेव्हा उत्स्फूर्तपणे व्यक्त करायची वेळ येते तेव्हा अनाहुतपणे माणूस 'ओ फक' म्हणण्याऐवजी 'आयचा घो' म्हणण्याचीच शक्यता जास्त वाटते. कारण माणूस जेव्हा आंग्लाळलेल्या सॉफिस्टिकेटेड शिव्या देतो, तेव्हा सहसा आपण कसे सॉफिस्टिकेटेड आणि मॉडर्न आहोत हे शो ऑफ करण्याचा त्याचा प्रयत्न असतो, त्या शिव्या विचारपूर्वक दिल्या जातात. त्याउलट मनातली भावना, विचार करण्यात वेळ न दवडता उत्स्फूर्तपणे व्यक्त करताना आपसूकच मायबोलीतल्या शिव्या तोंडावाटे बाहेर निघतात, कारण त्या मनापासून दिलेल्या असतात आणि मन हे कायम मायबोलीवर प्रेम करतं. अर्थात, फुशारक्या मारण्यासाठी मराठीतूनही शिव्या देणारी मंडळी असतातच, पण मी गरजेपुरतं शिव्या देणा-यांबद्दल बोलतोय. आयला ह्या शिव्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासही मदत करतात!!!! मस्तच वाटलं जाणीव झाल्यावर!!
तर अशाप्रकारे शिव्या ह्या माणसाला, त्याच्या संस्कृतीला, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या मनाला, घडवणा-या, फुलवणा-या चेतवणा-या असतात. शिव्या घालताना आणि त्या अंगावर घेताना मनात हलकल्लोळ उडत असतो. लोकलमध्ये सभ्य भाषेत वाद घालणा-या दोन प्रवाशांपैकी एकाने दुस-याला एक जरी शिवी घातली तरी दुसराही आपसुकच सभ्यपणा सोडून पहिल्याला उलट्या शिव्या ऐकवतो, आणि कोणी मध्यस्थी केली नाही तर दोघांचेही हात सहज एकमेकांच्या कॉलरी पकडण्यासाठी सरसावतात. माणसातला पशू बाहेर डोकावू लागतो. अशा प्रकारे शिव्या या माणसाला निसर्गाच्या जवळ नेतात.
शिव्यांचे असे विविधढंगी विविधरंगी फायदे आहेत. शिव्या ह्या सर्वव्यापक आहेत. त्यामुळे शिव्या जरी आज मी उगाच देत नसलो, तरी त्यांच्याबद्दल आधी नमूद केल्याप्रमाणे मला भयंकर आदरभाव, आपुलकी आणि जिव्हाळा आहे. शिव्यांचे माझ्यावर अगणित उपकार आहेत. त्यांनी माझे आत्तापर्यंतचे आयुष्य असे रमणीय केले आहे आणि यापुढेही करत राहतील त्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋणी राहीन. शेवटी शिव्यांना याच शुभेच्छा देईन की जशी त्यांच्या मानवी जीवनातील या महाकार्याची उपरती मला झाली, तशी ती एक दिवस सगळ्यांना व्हावी आणि मग कोणीही शिव्यांना शिव्या देऊ नये. :)
वाचने
33033
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
खरय
मी खुपच कमी शिव्या दिल्या
In reply to मी खुपच कमी शिव्या दिल्या by मदनबाण
+१
In reply to मी खुपच कमी शिव्या दिल्या by मदनबाण
शिव्या आणि स्कारपियो
In reply to शिव्या आणि स्कारपियो by कपिलमुनी
असे म्हणा.
In reply to असे म्हणा. by प्रभाकर पेठकर
@ कपिलमुनी आणि पेठकर काका,
In reply to @ कपिलमुनी आणि पेठकर काका, by मदनबाण
माज आणि मस्तवालपणा....
In reply to @ कपिलमुनी आणि पेठकर काका, by मदनबाण
बाणा सांभाळ रे. हल्ली दुचाकी
In reply to @ कपिलमुनी आणि पेठकर काका, by मदनबाण
मला जर एका दिवसाचा हुकुमशहा
In reply to मला जर एका दिवसाचा हुकुमशहा by काळा पहाड
अगा बाब्बौ
In reply to @ कपिलमुनी आणि पेठकर काका, by मदनबाण
तु त्याला उगाच तसचं सोडुन
In reply to मी खुपच कमी शिव्या दिल्या by मदनबाण
पुण्यात आलेले दिसतात
In reply to मी खुपच कमी शिव्या दिल्या by मदनबाण
जर्मन वर्मन धाग्यातला यशो आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly FurtadoIn reply to जर्मन वर्मन धाग्यातला यशो आणि by मदनबाण
फिश म्हणायचे ;)
+१
*** ** ,लै भारी लेख आहे राव.
शिवी म्हणजे...
ही केवळ पोच.
भें**...मस्तच
साहीत्य संमेलनाच्या
In reply to साहीत्य संमेलनाच्या by खटासि खट
चुकून कधी सासं चा अध्यक्ष
च्यायला, काय जबराट लेख आहे.
लोकसाहित्य शोध आणि समीक्षा
In reply to लोकसाहित्य शोध आणि समीक्षा by प्रचेतस
मराठी साहित्यातील असभ्य म्हणी
अत्यंत प्रसंगनिष्ठ लेखन!
In reply to अत्यंत प्रसंगनिष्ठ लेखन! by अत्रुप्त आत्मा
लेखात किती तरी अश्लील शब्द
प्रेसेन्तिन्ग- Osho
>>>शिव्या ह्या सर्वव्यापक
लिखाण आवडले
मस्त लिखाण
शिवीने भाषेला जोर येतो
In reply to शिवीने भाषेला जोर येतो by सुबोध खरे
सहमत.
काबे साल्या
In reply to काबे साल्या by निपा
कडे का-बे, साल्या पासूनच
In reply to कडे का-बे, साल्या पासूनच by वडापाव
असाच आमचा एक मित्र.
एक शंका आहे - शिंच्या म्हणजे
In reply to एक शंका आहे - शिंच्या म्हणजे by आदूबाळ
___/\___
In reply to एक शंका आहे - शिंच्या म्हणजे by आदूबाळ
हायला शिंच्याचा अर्थ असा आहे,
जबराट लेख. मस्त पञ्चेस घेतले
जबरा लेख आणि
जेव्हा मित्रांच्या आठवणी
शिव्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत
बापूस, सांगा कुणाचा
कोकणात सिंधुदुर्गात मायझ* हि
In reply to कोकणात सिंधुदुर्गात मायझ* हि by खटपट्या
अवांतर
In reply to अवांतर by बॅटमॅन
मस्त किस्सा सांगितला
In reply to अवांतर by बॅटमॅन
अत्रे
ब्बाहौ …. कसल्या रसरशीत
एवरी आगावू एक्शन देअर इज शिवीने रिअकशन ….
कॉलेजातले दिवस आठवले. हल्ली
जबरदस्त विवेचन.मुंबईच्या
माणदेश बोली भाषा
मस्त आहे धागा. मजा आली
इकडे आणि पल्याड काहींनी मला