मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अरे रे, मन्ना दा गेले!

बहुगुणी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
वाईट वार्ता बहुधा खरी ठरते, आताच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक मन्ना डे यांचं बेंगलुरु येथे दीर्घ आ़जाराने निधन झाल्याचं वाचलं, खूप वाईट वाटलं. Manna Dey त्याना श्रद्धांजली म्हणून काही गाणी खाली देतोय, वेळ मिळेल तशी भर रसिक घालतीलच. आणि हे शोले मधलं किशोर बरोबरचं गाणं बाकी यारी है इमान मेरा, ऐ भाय ज़रा देख़ के चलो, वगैरे गाणी खालच्या संकलनात मिळतील.

वाचने 3195 वाचनखूण प्रतिक्रिया 15

सुधीर गुरुवार, 10/24/2013 - 22:57
पं. भीमसेन जोशी गेले त्या दिवशी त्यांची एक मुलाखत डीडी वर प्रसिद्ध झाली होती. तेव्हा भीमसेन जोशी आणि मन्ना डे यांनी गायलेली ही जुगलबंदी कायमची स्मरणात राहीली. http://www.youtube.com/watch?v=vcqmOaQSPDA गाणं: "केतकी, गुलाब, जुई" चित्रपटः बसंत बहार (१९५६) सं. दि.: शंकर जयकिशन

वाटाड्या... Fri, 10/25/2013 - 00:15
खरोखरीच चांगली गाणी गाणारा एक गवई गेला आपल्यातुन. चांगली शास्त्रीय बैठक असलेला असा एखादाच. असो. विनम्र श्रद्धान्जली मन्ना डेंना !!! - (सांगितीक) वाट्या...

उपास Fri, 10/25/2013 - 00:30
खूप काही दिलय मन्नादांनी, त्यांच्या आवाजामुळे आयुष्यातले कित्येक क्षण समृद्ध झालेत, त्यांच्या आवाजाने ते कायमच आपल्यात राहातिल. त्यांना चिरशांती लाभो!

In reply to by मदनबाण

प्रभाकर पेठकर Fri, 10/25/2013 - 09:56
आवर्जून मराठी गाण्यांच्या जोडण्या (लिंक्स) टाकल्याबद्दल धन्यवाद. मन्ना डे ह्यांनी एकूण ५५ मराठी गाणी गायली आहेत.

नानबा Fri, 10/25/2013 - 09:51
शास्त्रीय संगीताचा तगडा बाज असणारा, तरीही सगळ्या प्रकारची गीतं सहजरित्या गाणारा एक गुणी गायक हरपला.. संगीताच्या तिन्ही पट्ट्यांमधला त्यांचा सहज वावर कायम स्मरणात राहील. "ऐ मेरे प्यारे वतन" मधला मंद्र सप्तकातला स्वर असो, "आजा सनम मधूर चांदनी में हम" मधला मध्य सप्तकातला असो, किंवा "यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी" किंवा "याल्ला याल्ला दिल ले गयी" मधला तार सप्तकातला खडा स्वर असो, मन्ना दा कायमच स्मरणात राहतील..