प्रथमच एक गझल लिहण्याचा प्रयत्न केला आहे.
मी प्रथमच एक गझल लिहण्याचा प्रयत्न केला आहे. ओढून ताणून आणलेल्या शब्दापेक्षा त्यामध्ये भावना याव्यात या हेतूने लिहलेली माझी ही पहिली गझल आहे. या गझल मध्ये मी ऱ्हस्व - दीर्घ, नुकता, रदीफ किंवा काफिया या पैकी कशाचाही योग्य वापर केला नाही याची मला कल्पना आहे. (गोड मानून घ्या)
- साजीद पठाण
गीत
आयुष्याचे गीत गाण्या, जमते ‘खास’ एखाद्याला
वेचतात दु:खात फुले, येतो ‘सुवास’ एखाद्याला !!
वेदनांना टाकून पाठी, ज्यांची चालण्याची रीत
टेकतो हात विधाता, देऊन ‘त्रास’ एखाद्याला !!
मैफल जमवण्यासाठी, लागते जवळ हातोटी
होऊन वाहतात झरा, घेऊन ‘श्वास’ एखाद्याला !!
सुंदरतेच रहस्य, फुललेल्या शेवाळाच्या ओठी
जीवनातील खडक वाटतो, ‘वसंत मास’ एखाद्याला !!
मंद्ज्योत करते जिथे, पराजित वादळाला
लाचार तो कसा छळेल ? ‘दु:स्वास’ एखाद्याला !!
आनंदाचा गांव त्यांचा, ‘साजीद’ कसे तुला कळावे ?
राहून उपाशी भरवतात, तोंडातला ‘घास’ एखाद्याला !!
श्री. साजीद यासीन पठाण
गजल काही घंटा समजत नाही पण....
+१ हेच म्हणतो.
सहमत...
मस्त..
छान !
उत्तम प्रयत्न
ते
आवडली कविता. सुंदर भावना
वेदनांना टाकून पाठी, ज्यांची चालण्याची रीत ,,,,,,
आनंदाचा गांव त्यांचा, ‘साजीद’
उत्तम प्रयत्न, छान जमली ! ! !
सुंदर ...
गवि यांनी आपल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे....
छान आवडली गझल.
छान
तुफ्फान !!
ही गझल (?) मी माझ्या वडिलांना डोळ्यासमोर ठेऊन लिहली आहे.
ओह्ह
रचना आवडली.