दुर्गे दुर्घट भारी... एक विचार.
गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो.
देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत मला माहिती नाही. इतिहासकारांचा विषय आहे तो. असो. पुराणांमध्ये कुठंतरी सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा देवी नऊ दिवस अनुष्ठानाला बसली नि विजयादशमीदिवशी ह्या महिषासुराचा वध केला (चूकभूल द्या घ्या.)
जास्त प्रस्तावना न करता ह्या दुर्गोत्सवाच्या निमित्तानं मागे गणपती आरतीचा आपण विचार केला तसा देवीच्या आरतीचा विचार करण्याचा प्रयत्न करुया.
सुखकर्ता दु:खहर्ता लेखामध्ये म्हटल्याप्रमाणंच आरती प्रेम असे पर्यंत, अंतःकरणपूर्वक, एकाग्र होऊन, आर्ततेनं आळवली जावी.
आरतीचा विचार करुया.
दुर्गे दुर्घट भारी तुज विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी|
वारि वारि जन्ममरणाते वारि, हारि पडलो आता संकट निवारी ||१||
जयदेवी जयदेवी महिषा सुरमर्दिनी, सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जयदेवी || धृ||
त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही|
साहि विवाद करिता पडिले प्रवाही, ते तू भक्तालागि पावसी लवलाही ||२||
जयदेवी जयदेवी ....
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेषापासुनि सोडी, तोडी भवपाशा|
अंबे तुजवाचोनि कोण पुरविल आशा, नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ||३||
जयदेवी जयदेवी ....
आरती कुणी रचली ह्याबाबत थोडा प्रवाद असावा. नरहरी हे नाव आरतीत येतं. नरहरी सोनार खरंतर शिवाचे भक्त. विठठलाच्या कमरेचा हार बनवण्याचं निमित्त होऊन दोन दैवतामधलं अद्वैत उमजलं अशी कथा आपल्याला परिचित आहे. कदाचित अशी अनुभूति आल्यानंतर त्यांनी ती आरती रचली असावी. कुणी म्हणतं रामदासस्वामींनी रचलेली आरती आहे. रचनाकार कुणीही असला तरी मुळातच दोघेही अत्यंत श्रेष्ठ प्रतीचे भक्त व तत्त्वज्ञ असल्यानं आपण त्याबाबत जास्त विचार न करता ‘आम खाने के पीछे’ जाऊया.
आरती कोणी रचली ह्याबाबत न करता कुणाची आरती केलेली आहे ह्याचा विचार करता आरती देवीची आहे हे मात्र नक्की समजून येतं. मात्र ह्याबाबत थोडा सूक्ष्म विचार करण्याची गरज आहे.
नेमकी आरती कुणाची केली आहे? हल्ली दहा दिवस बाजारात येणार्या आठभुजा असलेल्या, देखण्या, प्रमाणबद्ध मूर्तीची, देवळात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेल्या मूर्तीची की आणखी कशाची?
कधीकधी शब्द थोडे पुढंमागं करुन बघितले की आपल्याला नेमकं विषयाचा गाभा काय ते कळतं.
'जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी' असं म्हटलेलं आढळतं.
इथं एक विशेषण दिसतं... सुरवरईश्वरवरदा.
सुरवरांनाच काय म्हणजे देवतांनाच काय तर ईश्वरालाही वर देणारी, शक्ती प्रदान करणारी अशी जी कुणी ती ही शक्ती आहे. तिची ही आरती आहे.
असं काही असतं का हो? थोडं मागं जाऊ. कुठंच काहीच्च नव्हतं तेव्हा! कधीतरी काहीतरी हालचाल झाली नि सृष्टी निर्माण झाली. चराचराची व्यवस्था अत्यंत पारदर्शकपणं चालवली जाणारी व्यवस्था म्हणजे ईश्वर. तो सृष्टीबरोबर उत्पन्न होतो नि तिच्याबरोबरच लय देखील पावतो. मानवी आयुष्याच्या तुलनेत अत्यंत प्रचंड मोठ्या 'स्केल'वर हे सगळं सुरु असतं. त्यामुळं मानवी मनाला त्याचा विचार तेवढ्या मोठ्या पातळीवर करताना तसाच व्यापक विचार करावा लागतो.
अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये काहीच नाही म्हणताना देखील त्या नाहीमध्ये असणारं अस्तित्व (काहीच नाही म्हणजे निर्वात पोकळी तरी 'आहे' ना?) म्हणजे ब्रह्म तत्त्व नि त्या खालोखाल वर म्हटलेली हालचाल ती मूळमाया. तिच्यातून उत्पन्न गुणमाया मग जडमाया नंतर त्रिविधा प्रकृती, पंचमहाभूते असा क्रम आहे. खरंच थोडा विचार केला तर विज्ञानाला समांतर असा हा विचार आहे. (बाकी मतांतराला वाव आहेच.)
ज्या शक्तीमुळे ईश्वराला कार्य करण्याचं बळ मिळतं, त्या त्या अनुरुप कार्य करणार्या देवतांना (कार्यानुसार नाव ब्रह्मा, विष्णू, महेश नि इतर ) ताकद मिळते (उत्पत्ती- निर्माण करणं, स्थिती- सांभाळणं नि लय- संहार करणं) त्या सगळ्याचा विचार आपल्याला एका 'सुरवरईश्वरवरदा' ह्या शब्दातून करता येतो. तिला आपण मानवानंच माऊलीरुप, मातारुप मानून तिची पूजा करता यावी म्हणून सगुणात आणली. इतकं सगळं कार्य दोन हातातून करता येणं शक्य थोडीच आहे असा विचार करुन तिला अष्टभुजा बनवली नि तिच्या प्रत्येक हातात एक एक वस्तू दिली. पाकिटात असलेला कागदाचा फोटो जसा आपल्या आईवडलांची आठवण करुन देतो तसं ही मूर्ती मला त्या भगवद्शक्तीची आठवण करुन देणारी असली पाहिजे.
आणखी एक शब्द आहे महिषासुरमर्दिनी. वर म्हटल्याप्रमाणं पुराणात कधीतरी एक महिषासुर नावाचा राक्षस सगळ्यांना त्रास देत होता नि त्याला देवीनं मारलं. आपण देवीचा जयजयकार म्हणून गप्प बसावं का? की ह्या महिषासुराचा नि माझा काही संबंध आहे का? तर ह्याचं उत्तर आहे असं आहे.
महिष म्हणजे रेडा. रेडा हे घोर अज्ञानाचं प्रतिक आहे. अज्ञान म्हणजे अशिक्षितपण, अक्षरओळख नसणे. शालेय अभ्यास नसणं ह्या अर्थानं अज्ञान नाही. तर मी कोण? माझं जन्माचं प्रयोजन काय? ध्येय काय? ते समजण्यासाठी काय करावं लागतं? ह्या सगळ्याबद्दलची जाणीव नसणे म्हणजे अज्ञान. त्या दृष्टीकोनातून बरेच लोक अज्ञानी ठरतात. इथं आपण त्रागा करु शकण्याची दाट शक्यता आहे. मात्र ही वस्तुस्थिती आहे. जगण्याची उद्दिष्टं अनेक असू शकतात, ती वेळेनुसार, कालानुरुप बदलू शकतात, बदलावीत. मात्र ध्येय एकच असावं ते म्हणजे आत्मशोध. मी नक्की कोण आहे नि काय मिळवायचंय ह्याचा विचार करुन त्याचा पाठपुरावा करणं हे माणसाच्या आयुष्याचं ध्येय आहे. (शब्दांची अदलाबदल केली 'एक्स' ला वाय नि वाय ला एक्स म्हटलं तरी चालू शकेलच. अर्थ बदलत नाही)
तर अशा ह्या अज्ञानरुपी रेड्याला मारुन आपल्यामध्येच आत असणारी ही दुर्गामाता आपल्याला प्रसन्न होऊ शकते. त्या दृष्टीनं 'महिषासुरमर्दिनी' ह्या नावाचा विचार करण्याची गरज आहे.
वरच्या शब्दांचा पुरेपूर अर्थ समजला की पुढची आरती समजायला मदत होते.
देवीला दुर्गा म्हणताना ह्या प्रपंचाला, संसाराला दुर्घट असं म्हटलेलं आहे. दुर्ग म्हणजे किल्ला नि दुर्गा म्हणजे त्याची किल्लेदार अशा अर्थानंही विचार होतो. ज्याप्रमाणं एखाद्या कारागृहाचा प्रमुख असतो तशी जणू ही दुर्गा आहे नि हा जो संसार रगाडा आहे तो म्हणजे कारागृह आहे. बाहेर पडायचं तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे किल्लेदारालाच पटवणे, त्याच्या मर्जीतलं बनणे.
म्ह्णून म्हणतात, दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ... तुझ्या कृपेशिवाय हा संसाराचा भार खूप अवघड आहे.
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी... इथं पुन्हा थांबायची गरज आहे. काय आहेत हे शब्द?
अनाथनाथ अंबा म्हणजे कुणी अनाथाश्रम उघडलेली एन जी ओ नाही! खरंतर, कोण अनाथ आहे? करुणा म्हणजे काय? विस्तारी म्हणजे? आहे का मुळात करुणा? विस्तारी म्हणजे विस्तार कर, वाढव म्हणजे काय?
इथं थोडा पारमार्थिक विचार आहे. 'तुझिया वियोगे जीवित्व आले' असं समर्थ रामदास म्हणतात. अत्यंत आनंदाचा, सुखाचा अनुभव हेच ज्याचं स्वरुप आहे असा मी, मूळस्वरुपाला विसरलो नि जीवभाव घेऊन जन्म पावलो. एखाद्या अत्यंत श्रीमंत, यशस्वी माणसाचा मुलगा अपघातात स्मृती घालवून बसल्यानं भीक मागू लागतो तसा मी खरा आतमध्ये आनंदरुपच असताना सुखासाठी बाहेरच्या सुखांच्या मागं लागतो नि 'अनाथ' बनतो.
काल सचिन रिटायर झाला. क्रिकेट तेच, खेळ तोच, नियम तेच पण मला आता आनंद वाटेना. सुख खेळात आहे की माझ्या बघण्यात? मी रानावनात अडकून बसलोय, मला प्रचंड भूक लागलीये नि समोर एक सुंदर स्त्री मला आलिंगन द्यायला येतेय. सुख वाटेल? तीच गोष्ट दुसरीकडून. एका अत्यंत गरीब नि ओबड्धोबड दिसणार्या झोपडीत मला शिळी भाकरी नि चटणी मिळाली तर मला ती अत्यंत चांगली वाटेल.
सुख नक्की कुठं आहे नि ते कसं मिळेल हे न समजल्यानं मी अनाथ, पोरका, दीनवाणा झालो आहे. अशा अनाथांची नाथ अशी ही अंबा आपली करुणा विस्तारुन मला पदरात घेऊ दे. करुणा उत्पन्न करुन का नाहीत म्हणत हो? कारण करुणा आधीपासूनच आहे आपल्या लक्षात येत नाहीये. एका बीजापोटी उत्पन्न होणारी अनेक कणसं माणसाच्या आवाक्यातलं काम नाहीये ना? हीच ती करुणा. जगण्याला आवश्यक प्रत्येक गोष्ट ह्याच पृथ्वीवरुन आपण हजारो वर्षांपासून घेत आलेलो आहोत. आजचं चकचकीतपण आपल्याला ते विसरायला भाग पाडतंय एवढंच.
ह्या 'एकोऽहम बहुस्याम' च्या प्रक्रियेमागं नक्की काय दडलंय हे रुक्षपणे जाणून घेण्यातून साध्य काय होणार आहे? त्यापेक्षा त्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली तर आपला अहंकार तरी कमी होईल.
पुढं जाऊन 'वारि वारि जन्ममरणाते वारि हारि पडलो आता संकट निवारी' असं म्हणतात. पुन्हा तेच आहे. वारि वारि म्हणजे हे माते तू ह्याचं निवारण कर. हारि पडलोय- कंटाळलोय. संकटाचं निवारण कर.
जन्माला आल्यापासून आपण काय किंमत देऊन काय कमावतो ह्याचा विचार करता 'सुख कमी नि दु:ख जास्त' असाच विचार पक्का होतो. मिळणार्या सुखामागे देखील किती कष्ट असतात ह्याचा विचार करता हे कधीतरी संपावं हा 'वास्तववादी' विचार डोकावल्यावाचून राहत नाही. त्यामुळंच ह्या जन्ममरणाच्या फेर्यातून सोडव ही विनंती करावी लागते.
मात्र जेव्हा विनंतीच्या मागे; काय विनंती, कुठं करायची, नि कशी करायची हा नेमका विचार असेल, तेव्हा त्या विनंतीचा निश्चितच पाठपुरावा होतो नि जे मिळवायचं ते मिळवलं जातं. गणपतीच्या आरतीत म्हटल्याप्रमाणं अशी भगवंताच्यी, शक्तीच्या निश्चित रुपाची मांडणी समोर आली की माणूस निर्भय बनतो नि त्याला संकट हे संकट ह्या स्वरुपात न वाटल्यानं ते आपोआप निवारलं जातं. दृष्टीकोनच बदलून जातो.
पुढच्या कडव्यांमध्ये बरीचशी वस्तुस्थिती, थोडासा अर्थवाद नि स्तुती आहे. 'त्रिभुवनी पाहता तुज ऐसी नाही, चारी (वेद) श्रमले परंतु (त्यांना तुझ्याबद्दल) न बोलवे काही, साही (शास्त्रं) विचार करुन करुन (जणू प्रवाह)पतित झाले , (अशी) ते तू भक्तालागि पावसी लवलाही.' आज देखील 'विज्ञान' (तंत्रज्ञान नव्हे) सृष्टीच्या उत्पत्तीचा, त्या मूळ शक्तीचा मूलगामी विचार करत आहे. थांगपत्ता लागायला अजूनही तयार नाही. त्याच अनुषंगानं चारी वेद, साही शास्त्रे वर्णन करु शकत नाहीत असं मानलं गेलं आहे. मात्र अशी तू भक्तासाठी मात्र तातडीनं धावून येतेस. अट 'भक्त' असण्याची आहे.
प्रसन्न वदन अशा हे देवी तू आम्हाला प्रसन्न हो.
संसारक्लेषापासून सोडवून, भवपाश तोड.
इथं परत थांबावं लागतं. त्रागा करुन सोडव म्हणणं आहे की मोकळं कर? भवपाश तोड म्हणजे एखादा दोर कुर्हाडीने तोडल्यासारखं तोड असं आहे का?
तर ह्या भवपाशाचं स्वरुप जेव्हा समजेल तेव्हा त्याचक्षणी गळून पडणारा अशा स्वरुपाचं आहे. समजायला थोडं अवघड वाटतं मात्र उदाहरणानं समजेल. एखाद्या बैलाला अथवा गाढवाला लहानपणापासून एखाद्या खुंटीला दोरीनं बांधलं तर तो सुटून जाण्याचा प्रयत्न सुरुवातीला करत करत नंतर दोरी नि खुंटी दिसली की शांत उभं राहून प्रयत्न टाळतो. तसं सातत्यानं 'माझेपणा' नि 'मी' पणाच्या दोरांनी माणूस इतका अडकला जातो की ते बंधन, तो पाश सुटता सुटत नाही.
एक घर आगीत भस्म झाल्याची बातमी येते, आपण शांत असतो, शहराचं नाव ऐकलं की कान टवकारतात, विभाग ऐकला की चौकशी सुरु होते नि माझाच पत्ता ऐकला की धक्का बसतो, अन्नपाणी सुटतं. माझेपणा आला की प्रतिक्रिया येते नि ती तशी आली की बंधन आलंच. बातमी तीच, मात्र प्रतिक्रिया बदलली. प्रतिकूलसंवेदनात दु:खम. पश्चातबुद्धीनं परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायला आपण जास्तच कारणीभूत ठरतो. मात्र देवीच्या भक्त म्हणवणारानं असं असून चालत नाही. सगळ्या सृष्टीच्या निर्मात्याला निर्माण करणारी अंबा, दुर्गा, भवानी माता ही जर माझं आराध्य दैवत असेल तर एका घराच्या जाण्यानं असं काय हळहळ करायची? ते तसं माझ्याच बाबतीत का होतं ह्याचा विचार कर्माचा सिद्धांत ह्या एका 'अझम्शन' ने सुटतो. इथं लक्षात घ्यावं की दुसर्याच्या नावानं खडे फोडण्यात आपला मनस्ताप वाढतो, तसं न करता'योग्य निर्णय घेऊन आपल्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्या कर्माच्या फळाच्या स्वरुपात आला असं मानणं व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं. इथं कुठलाही निराशावाद नाही. हा कर्माचा विचार नि बरोबरच मी आनंदरुप असल्याचा विचार हे 'गणितं' सोडवण्यापुरते वापरावेत नि नंतर अलगद बाजूला सारावेत.
असं हळूहळू करत गेलं की आपोआप पाश सुटतात. भव म्हणजे संसार. नि अशा प्रकारे भवपाश सोडवायला अंबा मदत करते. अशा ह्या जगद्जननी अंबेच्या चरणी तद-लीन,तल्लीन होण्यामध्ये खरं भूषण आहे.
१. हे असं नेमकं कसं होतं त्याबद्दल सर्व संतांचे पाय पकडावे लागतात.
२. ऋणनिर्देश : डॉ. श्री. द. देशमुख ह्यांचे प्रवचन.
वाचने
45715
वाचनखूण
प्रतिक्रिया
123
माझेपणा आला की प्रतिक्रिया
In reply to माझेपणा आला की प्रतिक्रिया by स्पंदना
चूक भूल द्यावी घ्यावी !
पण माझेपण नसेल तर अत्मियता कशी वाटेल? या एका भावनेपोटीच तर सारं जग वाढतय, जे काही चाम्गल वाईट घडतय ते ही याच भावनेपोटीअपर्णाताई , उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय , माझेच बरोबर आहे असा अजिबात दावा नाही ! माझेपण / आत्मीयता ही भावना विसर्जित करणे हेच खरे अध्यात्म आहे ! मी आणि "तो"कोणी वेगळा आहे ही भावना नष्ट करणे हीच शेवट्ची पायरी , तिथे द्वैत सरले ! मग कर्म कसे करायचे ? कार्य घड्णार कसे ? कर्ताच नसेल तर गोष्टी घडतीलच कशा ? ज्याच्याबद्दल आत्मियता नाही ते होणार कसे ? असाच काहीसा तुमचा प्रश्न आहे असे मला वाटते. एकदा द्वैत सरले की "मी माझे" आणि "ते त्याचे" सारे एकच होऊन जाते, मी मीच रहात नाही , तो ही नाही.. अवघा रंग एक झाला ! खेम देऊ गेली तरी पाऊलची ना दिसे , उभाचे स्वयंभू असे ! मग मी आणि तो असा भेद राहीला कोठे ? मग जे घडते ( ज्ञानोत्तर कर्म ) ते सारे त्याचीच इच्छा ! माझा श्वास , माझे जगणे , ही सारी त्याचीच इच्छा ! माझे कर्तृत्व हे देखील त्याचेच ! माझे असे शिल्लक आहे काय? कर्तृत्व त्याचे भोग ही त्याचेच ! त्याचे श्रेय ही माझे नाही आणि अपश्रेय हे माझे नाही ! राम कर्ता ऐसे म्हणशी त्याने पावसी यश कीर्ती प्रताप !माझ घर जळल्यावर मला वाईट नाहे वाटायच तर कोणाला?घर तुझे होते कुठे ? पशु म्हणती आमुचें घर| दासी म्हणती आमुचें घर |घरीचीं म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४४|| पाहुणे म्हणती आमुचें घर| मित्र म्हणती आमुचें घर |ग्रामस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४५|| तश्कर म्हणती आमुचें घर| राजकी म्हणती आमुचें घर |अग्नि म्हणती आमुचें घर| भस्म करूं ||४६|| समस्त म्हणती घर माझें| हें मूर्खहि म्हणे माझें माझें |सेवट जड जालें वोझें| टाकिला देश ||४७|| आई- बाप , बंधू , पुत्र आपले नाहीत , बाकीच्या काय गोष्टी? तुवां भोगिल्या पुनरावृत्ती| ऐसीं मायबापें किती |स्त्री कन्या पुत्र होती| लक्षानलक्ष ||५१|| कर्मयोगें सकळ मिळालीं| येके स्थळीं जन्मास आलीं |तें तुवां आपुलीं मानिलीं| कैसीं रे पढतमूर्खा ||५२||In reply to चूक भूल द्यावी घ्यावी ! by विटेकर
पटल!
In reply to माझेपणा आला की प्रतिक्रिया by स्पंदना
माझेपणा सोडायचा म्हणजे त्याची
interesting !
छान
In reply to छान by प्रचेतस
कुठली शिल्पे आहेत ते लिहा की.
In reply to कुठली शिल्पे आहेत ते लिहा की. by यशोधरा
हाहा.
In reply to हाहा. by प्रचेतस
वल्ली ...
In reply to छान by प्रचेतस
अप्रतिमच.
In reply to अप्रतिमच. by प्यारे१
मला मित्राने असे सांगितले
In reply to मला मित्राने असे सांगितले by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
साडे तीन (?) शक्तीपिठे कोणती
In reply to साडे तीन (?) शक्तीपिठे कोणती by धन्या
अहो क्रम म्हणजे मान किंवा
In reply to नासिक जवळचं वणी हे अर्धं आहे. by प्यारे१
वणी अर्धे
In reply to अप्रतिमच. by प्यारे१
देवीची उपासनापद्धती नेमकी कधी
प्यारे सुरेख विवेचन लिहलेयंस.
In reply to प्यारे सुरेख विवेचन लिहलेयंस. by किसन शिंदे
सुरेख विवेचन
In reply to प्यारे सुरेख विवेचन लिहलेयंस. by किसन शिंदे
+२
In reply to +२ by मूकवाचक
+३
In reply to प्यारे सुरेख विवेचन लिहलेयंस. by किसन शिंदे
ती नरहरींचीच आहे.
In reply to ती नरहरींचीच आहे. by प्रचेतस
अरेच्च्चा ..
In reply to अरेच्च्चा .. by विटेकर
नरहरी हा समर्थशिष्य त्यावेळी
In reply to नरहरी हा समर्थशिष्य त्यावेळी by प्रचेतस
नव्हेत
मग हे संत नरहरी सोनार नव्हेत का?माझ्या माहितीप्रमाणे नरहरी सोनार संत नामदेवांच्या समकालीन होते आणि त्यांचे अभंग पाहिल्यावर ही रचना त्यांची नसावी असे वाटते. बाकी, अवघे करणे जगदिशाचे आणि कवित्व काय मनुष्याचे असे समर्थांनीच म्हणून ठेवले आहे .In reply to अरेच्च्चा .. by विटेकर
आरतीची चाल
वा!
अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये काहीच नाही म्हणताना देखील त्या नाहीमध्ये असणारं अस्तित्व (काहीच नाही म्हणजे निर्वात पोकळी तरी 'आहे' ना?) म्हणजे ब्रह्म तत्त्व नि त्या खालोखाल वर म्हटलेली हालचाल ती मूळमाया. तिच्यातून उत्पन्न गुणमाया मग जडमाया नंतर त्रिविधा प्रकृती, पंचमहाभूते असा क्रम आहे. खरंच थोडा विचार केला तर विज्ञानाला समांतर असा हा विचार आहेपार्टिकल थियरी इथेच येऊन थांबणार आहे !पण आधिक महत्वाचे. सहमत ! काय मजा आहे त्यात..देवा तुझा मी सोनार !आधीचा आणि हा दोन्ही लेख आवडले
हे भक्तीमार्गी काय वाट्टेल ते ठोकतात!
In reply to हे भक्तीमार्गी काय वाट्टेल ते ठोकतात! by संजय क्षीरसागर
प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी
In reply to प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी by प्यारे१
असा समजूतदारपणा माझ्या लेखांवर प्रतिसाद देतांना दाखवा
In reply to असा समजूतदारपणा माझ्या लेखांवर प्रतिसाद देतांना दाखवा by संजय क्षीरसागर
असा समजूतदारपणा माझ्या
In reply to असा समजूतदारपणा माझ्या by बॅटमॅन
अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by धन्या
अगदी अगदी. अन ते उघडपणे
In reply to अगदी अगदी by धन्या
तुमच्या सच्चिदानंदबाबांच्या भोंगळ लेखावर तुम्ही
In reply to तुमच्या सच्चिदानंदबाबांच्या भोंगळ लेखावर तुम्ही by संजय क्षीरसागर
देवीबिवीला घाबरणं किंवा
In reply to तुमच्या सच्चिदानंदबाबांच्या भोंगळ लेखावर तुम्ही by संजय क्षीरसागर
प्राणीनामवाचक सदस्याला काही
In reply to प्राणीनामवाचक सदस्याला काही by बॅटमॅन
न तुम्हाला लेखवविषयाला धरुन चर्चा करता येत
In reply to न तुम्हाला लेखवविषयाला धरुन चर्चा करता येत by संजय क्षीरसागर
मृगजळात लावलेल्या
In reply to मृगजळात लावलेल्या by बॅटमॅन
प्रभाव
मृगजळात लावलेल्या कल्पवृक्षाच्या फुलांची वंध्याकन्येने घातलेली माळ बरी इतके तुमचे शब्दबुडबुडेहा वि स खांडेकर प्रभाव का ? त्यातला फक्त जबरी शब्द बदला ...In reply to प्रभाव by विटेकर
सही पेहेचाना
In reply to सही पेहेचाना by बॅटमॅन
वटवाघूळशास्त्री, तुम्ही मराठी
In reply to वटवाघूळशास्त्री, तुम्ही मराठी by धन्या
हो, वाचत होतो....(महान
In reply to प्राणीनामवाचक सदस्याला काही by बॅटमॅन
टैम्प्लीज!
In reply to तुमच्या सच्चिदानंदबाबांच्या भोंगळ लेखावर तुम्ही by संजय क्षीरसागर
माझा लेख भोंगळ होताच. परंतू
In reply to माझा लेख भोंगळ होताच. परंतू by धन्या
किती घाबरता राव?
In reply to किती घाबरता राव? by संजय क्षीरसागर
मी तुम्हाला किंवा उल्लेखित
In reply to मी तुम्हाला किंवा उल्लेखित by धन्या
सालाबाद प्रमाणे संक्षींनी
In reply to सालाबाद प्रमाणे संक्षींनी by धन्या
कुणाचाही कोणताही प्रश्न मला गैरसोयीचा ठरत नाही
In reply to कुणाचाही कोणताही प्रश्न मला गैरसोयीचा ठरत नाही by संजय क्षीरसागर
आम्ही लाख मुद्याला धरुन काही
In reply to आम्ही लाख मुद्याला धरुन काही by धन्या
कैच्याकै धन्याराव ?
In reply to आम्ही लाख मुद्याला धरुन काही by धन्या
@ धन्या
In reply to तुमच्या सच्चिदानंदबाबांच्या भोंगळ लेखावर तुम्ही by संजय क्षीरसागर
मला प्राण्यांची नावे आवडत
In reply to मला प्राण्यांची नावे आवडत by निराकार गाढव
भारी....
In reply to प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी by प्यारे१
काय हे
In reply to काय हे by अनिरुद्ध प
साहेब,
In reply to साहेब, by प्यारे१
हा हा हा
In reply to साहेब, by प्यारे१
देव कोपतो अथवा रागावतो ह्या
In reply to देव कोपतो अथवा रागावतो ह्या by प्यारे१
देव कोपतो अथवा रागावतो?
In reply to देव कोपतो अथवा रागावतो? by संजय क्षीरसागर
जाऊ द्या हो संजयजी.
In reply to जाऊ द्या हो संजयजी. by प्रचेतस
मस्तच!
In reply to मस्तच! by पैसा
सिंव्ह चावत नस्तो
In reply to सिंव्ह चावत नस्तो by अभ्या..
अबे
In reply to मस्तच! by पैसा
महिषा सुराच्या एका रक्षकाला .
In reply to जाऊ द्या हो संजयजी. by प्रचेतस
@ वल्ली : जाऊ द्या हो संजयजी....
In reply to @ वल्ली : जाऊ द्या हो संजयजी.... by संजय क्षीरसागर
हाहा.
In reply to हाहा. by प्रचेतस
नाही का? उत्तम!
In reply to नाही का? उत्तम! by संजय क्षीरसागर
अहो ते मी तुमच्याबद्दल कुठे
In reply to अहो ते मी तुमच्याबद्दल कुठे by प्रचेतस
बिच्चारा!
In reply to बिच्चारा! by पैसा
(No subject)
In reply to बिच्चारा! by पैसा
भारी!
In reply to बिच्चारा! by पैसा
सर्व, ज्याच्या मर्जीविना
In reply to सर्व, ज्याच्या मर्जीविना by डॉ सुहास म्हात्रे
अरे देवा!
In reply to अरे देवा! by पैसा
आम्हाला कोणताही सुमार्ग
In reply to आम्हाला कोणताही सुमार्ग by डॉ सुहास म्हात्रे
एक नक्की
In reply to एक नक्की by पैसा
छे, छे !!! आम्ही कसले गुरू...
In reply to छे, छे !!! आम्ही कसले गुरू... by डॉ सुहास म्हात्रे
अगदि अगदि
In reply to हाहा. by प्रचेतस
काय रे
In reply to काय रे by पैसा
(No subject)
In reply to (No subject) by प्रचेतस
भगवदगीता इतक्या शॉर्ट अँड
In reply to भगवदगीता इतक्या शॉर्ट अँड by धन्या
कधी जायचे बे?
In reply to कधी जायचे बे? by प्रचेतस
सांभाळून ! बिल कोण भरणार याचा
In reply to @ वल्ली : जाऊ द्या हो संजयजी.... by संजय क्षीरसागर
@संजय क्षीरसागर
In reply to देव कोपतो अथवा रागावतो? by संजय क्षीरसागर
पांडुरंग पांडुरंग!
In reply to साहेब, by प्यारे१
प्यारेकाका तुमचाही वेळ जात
In reply to प्यारेकाका तुमचाही वेळ जात by धन्या
आजचाच दिवस रे.
In reply to आजचाच दिवस रे. by प्यारे१
कल जुम्मा है ।
In reply to हे भक्तीमार्गी काय वाट्टेल ते ठोकतात! by संजय क्षीरसागर
संजय,
In reply to संजय, by अग्निकोल्हा
मान गये...
In reply to मान गये... by धन्या
हम्म!
In reply to मान गये... by धन्या
तुमचे प्रतिसाद वाचल्यानंतर आमचा सख्खा शेजारी आत्मशून्यची
In reply to तुमचे प्रतिसाद वाचल्यानंतर आमचा सख्खा शेजारी आत्मशून्यची by संजय क्षीरसागर
करेक्ट! झुली बदलल्या तरी बैल