(टाळतो)
केदार पाटणकर ह्यांचे 'टाळणे' बघून आम्हाला आमची वारंवार चालणारी टाळाटाळी आठवली! ;)
रोजचा छळवाद आता टाळतो
मी जरा व्यायाम आता टाळतो
पाहिजे आहे तनाला शांतता
कोणतीही चाल आता टाळतो
गोड 'केका'ची खुमारी आगळी
वरण-भाता हळुच आता टाळतो
सोडले पळणे, तरण केव्हाच मी
'जीम'चीही वाट आता टाळतो
घेर ढेरीचा कितीही वाढला
घोरण्याचे मी न आता टाळतो!
चतुरंग
वाचने
2958
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
अहो चतुरंग,
तुमचे संपादकीय लिहून महिनाही नाही झाला हो... !!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
In reply to बापरे.. by प्राजु
अहो चतुरंग,
तुमचे संपादकीय लिहून महिनाही नाही झाला हो... !!!
प्राजुसारखेच म्हणते,:)
स्वाती
In reply to असेच.. by स्वाती दिनेश
(खुद के साथ बातां : रंग्या, असलं संपादकीय देताना निदान डिसक्लेमर तरी द्यायचा नाही का? की "लेखात व्यक्त केलेले विचार हे फक्त विचारच असून ह्यांच्या अंमलबजावणीचा संपादकांचा मानस असेलच असे नाही!" आता साईडने फोटो न काढताही चेहरा (की पोट?) लपवायची पाळी आली तुझ्यावर.)
चतुरंग
In reply to शूऽऽऽहळू बोला! चारचौघात कशाला बोलताय? by चतुरंग
कविता १ नंबर, प्राजूची प्रतिक्रिया दस नंबरी आणि वर तुमची सूचना तर सिक्सरच आहे!
In reply to बापरे.. by प्राजु
हा हा हा...
प्राजुताईंनी एकदम जबरा प्वाईंट मांडलाय!! :D
बाकी मूळ गझल अन् तुम्ही केलेले विडंबन, दोन्ही छान.
मुमुक्षु
In reply to बापरे.. by प्राजु
हेच म्हणतो!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
In reply to बापरे.. by प्राजु
कविता मस्त...
एकूणच आहार व्यायाम पोटाचा घेर हे विषय सतावण्याचं वय कोणतं बुवा? :?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
घेर ढेरीचा कितीही वाढला
घोरण्याचे मी न आता टाळतो!
हे बाकी मस्त रे रंगा...! :)
आपला,
(ढेरपोट्या) तात्या.
बापरे..