मखर, अर्थात मकरतोरण
मिपा गणेशोत्सव स्पर्धेतील मिपाकरांनी केलेल्या विविध सुंदर सजावटी, मखरे पाहून मलाही कैतरी फोटू द्यावेसे वाटू लागले. पण सजावट करायच्या कामात मी अगदीच ढ आणि त्यातून उत्साहाने असे काही करायचा प्रचंड कंटाळा. त्यामुळे स्वतः कै करायच्या ऐवजी मध्ययुगीन कालखंडात निर्मिती झालेल्या काही मंदिरांवर असलेल्या मखरांचे फोटू द्यायचा विचार केला.
मखर, याचा उगम मकर अथवा मगरापासून होतो. मगरीच्या (मकराच्या) मुखातून निघालेले तोरण म्हणजे मकरतोरण. याचाच पुढे अपभ्रंश होत जाऊन आजचे मखर तयार झाले. काळानुरूप बदल होत जाऊन हल्ली तोरणाचा उगम मूळ मकरमुख जरी फारसे दिसत नसले तरी नक्षी मात्र अगदी तशीच आहे.
१. वेरूळच्या कैलास लेण्यातील गंगा. बघा ही मकरावर आरूढ असून तिच्या दोन्ही बाजूंच्या स्तंभांवर मकरतोरण आहे.
२. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील महावीराची प्रतिमा. मस्तकी असलेल्या कळसावर मकरतोरण आहे.
३. खिद्रापूरच्याच मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजून एक मकरतोरण
४. खिद्रापूरच्याच मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजून एक मकरतोरणांकित प्रतिमा
५. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील स्तंभावरील माहेश्वरी (प्रतिहारी)
६. गोंदेश्वराच्याच स्तंभावरील अजून एक मकरतोरण
७. अंजनेरीच्य विष्णूमंदिरातील वैष्णव प्रतिहार
८. अंजनेरीच्या विष्णूमंदिराच्या बाह्य भागावरील मकरतोरणात असलेला विदारण नरसिंह
९. नारायणपूरच्या नारायणेश्वराच्या राऊळातील शैव प्रतिहार
१०. भुलेश्वर मंदिरातीलल मकरतोरण सभोवती असलेला भैरव प्रतिहारी
११. भुलेश्वरातील मकरतोरणांकित मूषकारूढ विनायकी, नंदीवर आरूढ असलेली माहेश्वरी आणि मयुरारूढ कौमारी
१२. भुलेश्वरातील मकरतोरणांकित प्रेतवाहिनी चामुंडा, गजारूढ ऐन्द्री
१३. सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिरातील अत्यंत देखणे मकरतोरण. मध्यभागी शिवतांडवनृत्य
१४. हे मकरतोरण मात्र सर्वात अर्वाचीन. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराच्या दर्शनी भिंतीवर. १८ व्या शतकातील.

८. अंजनेरीच्या विष्णूमंदिराच्या बाह्य भागावरील मकरतोरणात असलेला विदारण नरसिंह
९. नारायणपूरच्या नारायणेश्वराच्या राऊळातील शैव प्रतिहार

लेखनविषय:
वाचने
36014
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
वा..
अप्रतिम!
In reply to अप्रतिम! by पैसा
तोरणात मकराला स्थान द्यायचे
मखराची नवीन ओळख आवडली.
वल्लीबुवा सुरेख तोरण लावलेत
In reply to वल्लीबुवा सुरेख तोरण लावलेत by अभ्या..
तोरणाच्या शीर्षस्थानी
In reply to तोरणाच्या शीर्षस्थानी by प्रचेतस
वल्ली साहेब,
अॅज युज्वल छानच लेख!
In reply to अॅज युज्वल छानच लेख! by प्यारे१
+१
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
+२
व्वा. छानच
In reply to व्वा. छानच by चित्रगुप्त
तशी बरीच उदाहरणे आहेत.
अतिव सुंदर ! तुमचा जुन्या
In reply to अतिव सुंदर ! तुमचा जुन्या by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद
यावरून आठवले
In reply to यावरून आठवले by चित्रगुप्त
तुमी ना काका लगीच सुरू
अहो खरेच घडले होते असे.
सुंदर..
फोटो अप्रतिम , माहिती पण
अप्रतिम
देवा! डोळे मिटुन परंपरा
तुझ्या अभ्यासाला दंडवत.
In reply to तुझ्या अभ्यासाला दंडवत. by मृत्युन्जय
+१
अप्रतिम चित्रे!!!! खिद्रापूर,
वल्ली साहेब, खरच ऐकदम सुंदर. तुम्ही ही व इतर अजुन काही लेख
In reply to वल्ली साहेब, खरच ऐकदम सुंदर. तुम्ही ही व इतर अजुन काही लेख by निश
+++++१११११
अप्रतिम
खूपच
उत्तम चित्रे.
एक अप्रतिम संग्रह!
अजोड ......