असणे नसणे
लेखनविषय:
काव्यरस
जगण्यात उगिच सजते असणे
अक्षरांत झिंगवते नसणे
असणे नसणे ओसांडे मन
हसण्यात सदा किण किण श्रावण
आभास सदा पथदूर कुठे
शोधासा कठिण पडते कोडे
मेघावळ पिंजुन एकांती
धड धड करते काळिज वेडे
आकाश; खोल पोकळ वासा
आवेग; न ठावे थांग जसा
पवनासाहि ना कळलेले हे
वाहतो सवे निशिगंध कसा
………………… अज्ञात
वाचने
3205
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
पावना के पवना?
In reply to पावना के पवना? by स्पंदना
"पवना" च हवे. पण पला इथे
In reply to "पवना" च हवे. पण पला इथे by अज्ञातकुल
केल्या गेल्या आहे.
In reply to केल्या गेल्या आहे. by स्पंदना
हे कस झालं मला माहित नाही.
नेहमीसारखी
In reply to नेहमीसारखी by मिसळलेला काव्यप्रेमी
असाही प्रतिसाद मिळाला तरी
In reply to नेहमीसारखी by मिसळलेला काव्यप्रेमी
+१
+१ मिका
अक्षरांत शिंगवते
अक्षरांत शिंगवतेहे समजण्याची वाट पाहते आहे.In reply to अक्षरांत शिंगवते by आतिवास
हो,
In reply to अक्षरांत शिंगवते by आतिवास
खरं तर ते "झिंगवते" असं आहे
In reply to खरं तर ते "झिंगवते" असं आहे by अज्ञातकुल
दुरुस्ती केली
In reply to दुरुस्ती केली by पैसा
"शोधासा" ऐवजी "शोधास" असे