मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजस्थानी मावा कचोरी

सानिकास्वप्निल · · अन्न हे पूर्णब्रह्म
साहित्यः १ वाटी मैदा १/४ वाटी ताजा खवा / मावा २ टेस्पून साजूक तूप ३-४ टेस्पून काजू+बदाम+पिस्त्याची पावडर १ वाटी साखर + २ टेस्पून खव्यात मिसळण्यासाठी (साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी - जास्त करणे) १ टीपून बदामाचे काप १ टीस्पून पिस्त्याचे काप १/४ टीस्पून केशर १/२ टीस्पून वेलचीपूड चांदीचा वर्ख सजावटीसाठी (ऐच्छिक) . पाकृ: मैद्यात तुपाचे मोहन घालून, थंड पाण्याने साधारण घट्ट पीठ भिजवावे. पीठ १०-१५ मिनिटे झाकून ठेवावे. नॉन - स्टीक पॅनमध्ये खवा मंद आचेवर कोरडाच , बदामी रंगावर परतून घ्यावा. गॅस बंद करून वेगळ्या भांड्यात काढावा व हलका कोमट असतानाच त्यात सुकामेव्याचीपूड मिक्स करुन घ्यावी. खवा पूर्ण थंड झाला की त्यात २ टेस्पून साखर व वेलचीपूड घालून एकत्र करावे. मैद्याच्या पीठाचे सारखे गोळे करुन घ्यावे. एक गोळा घेऊन, चपटा करुन त्याची पारी तयार करून घ्यावी. त्यात चमच्याने खव्याचे सारण भरुन, कडा उचलून बंद करुन घ्याव्यात. हलकेच तळहातावर चपटे करुन घ्यावे, लाटायचे नाही. . वनस्पती तूप गरम करुन घ्या व हल्क्या हाताने कचोर्‍या त्यात सोडून मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या. कचोर्‍या खुसखूशीत झाल्या पाहिजेत. तळलेल्या कचोर्‍या पेपर टॉवेल वर काढून घ्याव्यात. एक वाटी साखर + १/२ वाटी पाणी + केशर + वेलचीपूड एकत्र करुन २ तारी पाक तयार करुन घ्यावा. पाक गरम असतानाच त्यात कचोर्‍या घोळवून घ्याव्यात. तयार कचोर्‍यांवर चांदीचा वर्ख लावून, बदाम+पिस्त्याचे काप पेरावे. . राजस्थानी मावा कचोरी खाण्यासाठी तयार आहे. . .

वाचने 74279 वाचनखूण प्रतिक्रिया 46

स्पंदना Wed, 08/07/2013 - 04:02
आई ग्ग! मला एक सांग सानिका या कचोर्‍यांना ते लेअर्स कसे आणायचे? माझी ती कायस्थ मैत्रीण करते त्या कचोर्‍यांना सुरेख पडदे सुटलेले असतात. शेवटचा फ्प्टो पाहुन ..बघ लिहीताही येइना....जीव कासाविस झाला.

In reply to by स्पंदना

सूड Wed, 08/07/2013 - 14:38
कायस्थ आहे ना, मग ती नक्की मैद्याच्या लाट्यांना साजूक तूप आणि तांदळाच्या पिठीचं साटं लावत असणार असं वाटतंय. खुसखुशीत करायच्या असतील तर मैदा कमी मळा म्हणजे ग्लुटेन फॉर्म होत नाही. मैदा कमी मळलात तर पदार्थ अधिक खुसखुशीत होतात असा अनुभव आहे. बाकी अनुभवी लोक सांगतीलच.

रमेश आठवले Wed, 08/07/2013 - 07:35
मी आत्तापर्यंत कचोरी हा नमकीन व चिंचेच्या किंवा फुदिन्याच्या चटणी बरोबर खायचा पदार्थ आहे असे समजत होतो. माव्याची गोड कचोरी हा माझ्यासाठी एकदम नवीन प्रकार आहे. गजानन महाराजांचे शेगाव कचोरीसाठीही प्रसिद्ध झाले आहे. त्या कचोरीचे फोटो येथे पहा https://www.google.co.in/search?q=shegaon+kachori&client=firefox-beta&hs=SVu&rls=org.mozilla:en-US:official&tbm=isch&tbo=u&source=univ&sa=X&ei=bakBUtC_BMzOkgW0yoCQCg&ved=0CC4QsAQ&biw=1280&bih=602 शेगाव मधील तीर्थराम यांच्या कचोरीला नुकतेच iso cerificate मिळाले आहे व देशात आणि परदेशात तीचा खप आहे. या बद्दलचा तू नळी धागा खाली पहा. http://www.youtube.com/watch?v=dcxiIHOEtkk

मदनबाण Wed, 08/07/2013 - 09:52
आहाहा... आहाहा आणि आहाहा... ;) खव्याची कचोरी पण बनते हे माहित नव्हते ! बाकी शेगावची कचोरी मागच्याच आव्ड्यात खायला मिळाली होती. :) (मावा प्रेमी बोका) ;)

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआ.....................! पर्वा ह्योच प्रकार रबडी टाकूनशान खाल्ला. अजून ती नशा मेंदूत हाय. :) शेवटून दुसर्‍या फोटूला सल्लाम! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-408.gif समांतर- मला त्या द्रोण/पाकळ्यां-मुळे रांगोळ्यातली एक नवी आयड्या आली. http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-864.gif

सूड Wed, 08/07/2013 - 14:40
अत्याचार आहे हा!! ह्या सगळ्या अन्नपूर्णांच्या हातातल्या पळ्या श्रावणापुरत्या तरी बाजूला ठेवायला लावा रे कुणीतरी. ;)

In reply to by माणिकमोति

स्पंदना Sun, 08/11/2013 - 13:43
माणिकमोती खव्याबद्दल विचारत असाल तर खवा घरी मायक्रोवेव्ह (मावे) मध्ये बनवायचा. काही नाही थिकन्ड क्रिम मध्ये मिल्क पावडर मिसळायची जरा घट्ट्सर गोळा बनवायचा अन २-२ मिनीट असे करत मावेत गरम करायचा. जास्तीत जास्त ६-७ मिनीट लागतील.

मीनल Sat, 08/10/2013 - 02:38
ही बाई आणि हिच्या पाककृती अल्टिमेट आहेत !!! शेगाव च्या कचोरी बद्दल आश्चर्य वाटले. दर वर्षी शेगावला जाऊन ही तिथली स्टेशनवर मी कचोरी खात नसे. मला नेहमी वाटायचे की ते तिथल्या toilet मधले पाणी वापरत असतील. आता न चुकता खाइन. ही कचोरी अमेरिकेत कुठे मिळते ?

In reply to by मीनल

रमेश आठवले Sat, 08/10/2013 - 10:59
गुगल वर शोधल्यावर कचोरीच्या तीर्थराम यांच्या दुकानाची खालील माही मिळाली. तुम्ही किंवा तुम्ही अमेरकेत असलात तर तुमच्या भारतातील नातेवाईकांनी फोन करून चौकशी केल्यास अमेरिकेत त्यांच्या कचोर्या कुठे मिळतील ते समजू शकेल. त्यांचा इ मेल पत्ता काही मला सापडला नाही. T R Sharma Gagan`s Shegaon Kachori Centre, Opp Railway Station, Shegaon, Station Road, Shegaon, BULDHANA - 444203 | View Map 9423445920, 9561614342