काश्मिरी फिरनी (फिरुन)
काश्मिरी फिरनी वुईथ लिटल ट्विस्ट :)
साहित्यः
१ लिटर दूध
१/४ वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून २-३ तास भिजवणे
१/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१०-१२ भिजवलेले बदाम, सालं काढून
१ टीस्पून वेलचीपूड
पिस्त्याचे काप व केशर सजावटीसाठी
खायचा चांदीचा वर्ख (ऐच्छिक)
रोझ एसेन्स किंवा रोझ वॉटर (गुलाबजल) असल्यास जरूर घाला, माझ्याकडे नव्हते म्हणून नाही घातले.
पाकृ:
भिजवलेले तांदूळ व बदाम एकत्र मिक्सरला लावून भरडसर वाटून घ्यावे.
दुध उकळायला ठेवावे, दुधाला उकळी आली की त्यात भरडसर वाटलेली तांदूळ-बदामाची पेस्ट घालावी.
मध्यम आचेवर तांदूळ शिजेपर्यंत सतत ढवळत रहावे.
दुध हळू-हळू दाट होऊ लागेल.
त्यात साखर घालून ती विरघळेपर्यंत ढवळावे.
दुध कस्टर्ड्सारखे दाट झाली की त्यात वेलचीपूड, पिस्ते व केशर घालून मिक्स करावे व गॅस बंद करावा.
तयार फिरनी वेगळ्या भांड्यात काढून ती रुम टेंपरेचरला थंड होऊ द्यावी.
पारंपारीक पद्धतीने सर्व्ह करायची असल्यास मातीच्या बाऊलमध्ये फिरनी घ्यावी,त्यावर बदाम-पिस्त्याचे काप पेरावे, केशर घालावे व वरून चांदीचा वर्ख लावावा.
फिरनी थंडच सर्व्ह करावी.
पण मी इथे वेगळ्या पद्धतीने फिरनी सर्व्ह केली आहे. सर्व्हींग ग्लास मध्ये थोडी फिरनी घालून फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवली. स्ट्रॉबेरी जेलीच्या पाकीटावर दिलेल्या सुचनेप्रमाणे जेली बनवून घेतली. ती हलकी कोमट असतानाच थंड फिरनीवर ओतली व पुन्हा फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवली. सेट झालेल्या जेलीवर व्हिप्ड क्रीम व पिस्त्याने सजावट करुन सर्व्ह केली.
आपण नेहमी फ्रुट कस्टर्ड बरोबर किंवा फ्रुट सॅलॅड वुईथ आयस्क्रीमबरोबर जेली सर्व्ह करतो, पण फिरनीबरोबर ही जेलीचे कॉम्बिनेशन सुरेख लागले :)
पारंपारीक पद्धतीने सर्व्ह करायची असल्यास मातीच्या बाऊलमध्ये फिरनी घ्यावी,त्यावर बदाम-पिस्त्याचे काप पेरावे, केशर घालावे व वरून चांदीचा वर्ख लावावा.
फिरनी थंडच सर्व्ह करावी.
वाचने
68184
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
सुरेख रेसिपी. क्यूटच दिसतीये
हे घरात बनवलय? शक्यच नाही.
मस्तं आहे फिरनी..
In reply to मस्तं आहे फिरनी.. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सानिकास्वप्निल
सहमत आहे.
कौतुकास्पद सातत्य......
In reply to कौतुकास्पद सातत्य...... by जयंत कुलकर्णी
+१
In reply to कौतुकास्पद सातत्य...... by जयंत कुलकर्णी
+१
In reply to कौतुकास्पद सातत्य...... by जयंत कुलकर्णी
+ ११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
In reply to + ११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ by मुक्त विहारि
+1
In reply to कौतुकास्पद सातत्य...... by जयंत कुलकर्णी
+१
In reply to कौतुकास्पद सातत्य...... by जयंत कुलकर्णी
+१११११११११
In reply to कौतुकास्पद सातत्य...... by जयंत कुलकर्णी
+१
In reply to +१ by सुधीर
+१
मस्त दिसते आहे फिरनी.
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
फोटू काळजात घुसले
लै भारी!
अप्रतिम सादरीकरण...सानिकाताई.
आई आई गं..... फिरनी ही लागली
ज ह ब ह रा...
अ प्र ति म....
अप्रतिम आहे.
अतिब्येकार....
मातीच्या कटोर्यातली..
***** शेफ !!
अप्रतिम फोटो
अत्यंत सुंदर फोटो
अप्रतिम..... सुरेख........
काय काकू बाईसारखं किचन एके
वाह अप्रतिम फोटो आणि रेसीपी
अप्रतिम
लाख लाख दुआ देतो तुला.
नको रे मना मोह हा लाळगाळी!
In reply to नको रे मना मोह हा लाळगाळी! by मराठे
+११११११११११११११११११११.
__/\__
नजरबंदी करणारे फोटो.
गेले ८-१० तास...
अशक्य
हे फिरनी प्रकरण अपेक्षेपेक्षा
छान रेसिपी.
In reply to छान रेसिपी. by गौरीबाई गोवेकर
धन्यवाद
सॉल्लिड !!
जियो जानेमन...... जबरी !!
In reply to जियो जानेमन...... जबरी !! by जयवी
जयवीतै ला अशा प्रकारे
माझ्या लेकीने आताच फोटो
धन्यवाद :-)