नायक क्रमांक एक
लेखनविषय:
काव्यरस
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी.
या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी.
(कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे)
(ज्याच्या कडे बर्यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे. तिच्या आईने तीला बर्यापैकी कपडे घालुन चित्रीकरणाला पाठवायचे आश्वासन दिले आहे)
सोने कसला महाग आहे, सोन्या सारखा तुझा मेक ,
धडधडते माझे हॄदय, ऐकण्या साठी जरासा टेक, (सुरुवाती पासून सगळे २ वेळा म्हणावे)
तु माझा (५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक, हेSSS
तु माझा (५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक, ||धॄ||
(नायिकेने जवळपास असलेला एखादा खांब पकडुन जोरजोराने कंबर हलवत,( खांब न पाडता), नायिकेने वरील ओळी म्हणाव्या. या वेळेला नायकाने चेहर्यावर कॄध्द भाव ठेवुन अंगाला वेडे वाकडे झटके देत रस्त्याने चालावे. झटके देताना पायातल्या चप्पल उडणार नाही अशा बेताने झटके द्यावे. (चप्पल उडाली किंवा खांब पडला तर रीटेकचे पैसे नायक किंवा नायिकेच्या मानधनातुन कापुन घेण्यात येतील.) मधेच नायिके कडे रागा रागाने पहावे. संपूर्ण गाण्यात नायिकेच्या चेहेर्यावर नम्र भाव आसावे. रस्त्यावरचे लोक आपल्या कडे कुचेष्टेने बघतील पण त्या कडे दुर्लक्ष करावे. (मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे हे लक्षात आले की आपोआप निघुन जातील) येथे टेक हा शब्दाचा मराठी अर्थ गॄहित धरुन त्याप्रमाणे अभिनय करावा)
(यानंतर संगीताचा एक तुकडा वाजेल. तो वाजत असतानाही नायक नायिकेने नॄत्य करायच आहे. आपले ओठ न हलवता)
सोनू तू माझा नायक रे, वेड्या सारखा वागु नको
स्वप्नामधल्या राणीला दूर असा तू लोटू नको
वाईट राग, झटकुन टाक, देईन तुला मी चॉकलेट केक, ||१||
तु माझा (५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक,हेSSS
तु माझा (५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक,
(रस्त्यावरुन जर पी.एम.पी.एम.एल. ची बस जात असताना शक्यतो वरील कडव्याचे चित्रीकरण करावे. बस ड्रायव्हर आणि कंडक्टर ला पटवुन सिनेमात नाचायला घेतो असे सांगुन अडकवुन ठेवावे. म्हणजे बराच वेळ बस चित्रीकरणासाठी उपलबब्ध राहील. जर त्यांनी फारच आग्रह केला तर (कॅमेरा सुरु न करता) दोनतीन वेळा त्यांना कॅमेर्या समोर नाचायला लावावे. नंतर एडिटरने कट केले असे सांगता येते. चालु बस समोर नायक नायिकेने योग्य अंतर राखत, (स्वतःच्या जबाबदारीवर) नाचावे. चॉकलेट केक दाखवण्या साठी जवळच्या बेकरी मधुन एक वाटी केक नायकाला आणायला सांगावा. जर नायकाने त्याचे पैसे दिले नाही तर नायिकेने तो केक नुसताच त्याला दाखवुन परत दिग्दर्शकाकडे जमा करावा किंवा शुटींग संपल्यावर बेकरीवाल्याला तो परत करावा, असे केल्यास केकचे पैसे नायिकेच्या मानधनातुन वळते करावे.)
(यानंतर संगीताचा एक तुकडा वाजेल. तो वाजत असतानाही नायक नायिकेने नॄत्य करायच आहे. आपले ओठ न हलवता)
मन माझे करते बंड, पण तु गोळ्यासम थंड,
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड,
झाले गेले विसरुन दोघे, आता गाठु पाषाण लेक, ||२||
तु माझा (५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक,,हेSSS
तु माझा (५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक,
(यानंतर संगीताचा एक तुकडा वाजेल. तो वाजत असतानाही नायक नायिकेने नॄत्य करायच आहे. आपले ओठ न हलवता)
(कात्रजच्या किंवा पाषाणच्या तलावाच्या काठी किंवा नदिकाठच्या रस्त्यावर वरिल कडव्याचे चित्रीकरण करावे. एखाद्या बाकड्यावर किंवा हातगाडीवर नायकाने झोपावे व नायिकेने कडव्याला सुरुवात करावी. नाचता नाचता मधेच नायकाच्या छातीवर तीन वेळा डोके अपटावे. डोके आपटताना जवळुन व हळुच अपटावे. डोके आपटायला नायिका जर लांबुन धावत येताना दिसली तर नायकाने झटकन बाजुला व्हावे. वरील कडव्यात अंड दाखवताना ते उकडुन घ्यावे. म्हणजे खाली पडले तरी लगेच फुटून वाया जाणार नाही. चित्रीकरण संपल्यावर दिग्दर्शकाकडे अंडे जमा करायची जबाबदारी नायिकेची असेल. दिग्दर्शकाने अंडे व केक चा हिशोब आम्हाला स्वतंत्र पणे द्यावा)
सोने कसला महाग आहे, सोन्या सारखा तुझा मेक ,
धडधडते माझे हॄदय, ऐकण्या साठी जराशी टेक,
मी तुझा (५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक, ||धॄ||
(संगीत पूर्ण संपेपर्यंत नायक नायिकेने नॄत्य करत रहावे)
(वरील कडवे नायकाने म्हणायचे आहे. हे कडवे म्हणताना त्याने स्वतःचा शर्ट अंगातुन काढुन तो डोक्यावर अडकवत नाचायचे आहे. नायकाने बनियन घातला आहे की नाही ते चित्रीकरण सुरु व्हायच्या आधी तपासुन घ्यावे. उगाच त्या सलमान सारखी चित्रीकरण चालु झाल्यावर फजिती नको. बनियन फारच पिवळा पडला असेल किंवा बीनबाहीचा असेल तर शर्टकाढणे रद्द करावे. त्या ऐवजी खिशातुन रुमाल काढुन तो डोक्यावर ठेवावा. चेहर्यावरचे कॄध्द भाव आता नकोत. त्या ऐवजी नायिके कडे हसुन पहात तिच्याशी प्रेमाचे चाळे करत गाणे म्हणावे. नायिकेची आई आमच्या शेजारच्या चाळीतच रहाते याचे नायकाने भान ठेवावे. शेवटचे "मी तुझा (५ वेळा)" म्हणताना जोरजोरात कंबर हलवावी. )
वाचने
12094
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
अरे बापरे....
रोसेश साराभाईच्या कवितांची
In reply to रोसेश साराभाईच्या कवितांची by आदूबाळ
हा, मै भी लुक्खा हुं (
ब्येस्ट
शिशुवर्गाच्या ग्यादरींगची
पैबू काका मज्जा आली .
लै भारी
In reply to लै भारी by श्रीरंग_जोशी
एक चांगली बातमी,
In reply to एक चांगली बातमी, by ज्ञानोबाचे पैजार
हिहिहि पैबू काका इथल्या
In reply to हिहिहि पैबू काका इथल्या by जेनी...
ह्यो घ्या हीरो
In reply to ह्यो घ्या हीरो by अभ्या..
बहुत धण्यवाद हां काय अभ्या
In reply to बहुत धण्यवाद हां काय अभ्या by बॅटमॅन
तुम्हाला हिरवीणीत कशाला
In reply to तुम्हाला हिरवीणीत कशाला by ज्ञानोबाचे पैजार
(No subject)
In reply to हिहिहि पैबू काका इथल्या by जेनी...
ए कोण गं? कोण गं?
In reply to एक चांगली बातमी, by ज्ञानोबाचे पैजार
कोणे हो हिरवीण ? जोशीकाकांना
In reply to एक चांगली बातमी, by ज्ञानोबाचे पैजार
का उगाच चेष्टा करताय गरिबाची
In reply to का उगाच चेष्टा करताय गरिबाची by श्रीरंग_जोशी
(No subject)
In reply to एक चांगली बातमी, by ज्ञानोबाचे पैजार
पाशवी शक्ती >>>>> लोलवा ;)
:-)
आ व रा !!!
खूपच मजेदार.
आम्हाला बी द्या कि एक छोतुसा
हाहाहा!
शेवटी गाण्याचे चित्रिकरण झाले
In reply to शेवटी गाण्याचे चित्रिकरण झाले by यशोधरा
त्या हिरवीणीचे
=)) मजेदार लेख.
हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....
आईशप्पथ!