Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by टवाळ कार्टा on Sun, 12/30/2012 - 20:29
मुली शोधाण्यातले frustration नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे ) मुलगी type १ डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :( मुलगी type २ मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली २-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद मुलगी type ३ engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली ७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked उरलेल्यांपैकी बर्याच matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????) किंवा (this is classic) नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???) किंवा घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे) जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत??? (पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
  • Log in or register to post comments
  • 125535 views

प्रतिक्रिया

Submitted by मृत्युन्जय on Mon, 12/31/2012 - 13:08

In reply to मराठी भाषांतर of this article by परिकथेतील राजकुमार

Permalink

परा तु too much एक्स्पेक्ट

परा तु too much एक्स्पेक्ट करतो आहेस.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Mon, 12/31/2012 - 15:09

In reply to मराठी भाषांतर of this article by परिकथेतील राजकुमार

Permalink

चिल राहा फ्रेंड. आय सपोज हा

चिल राहा फ्रेंड. आय सपोज हा क्वेश्चन स्क्रॅपबुक मधे प्रॉपर प्रॉपर वाटेल. करेक्ट ना ?
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sat, 01/05/2013 - 05:23

In reply to मराठी भाषांतर of this article by परिकथेतील राजकुमार

Permalink

पर्‍या इतक्या अपेक्षा ठेवशिल

पर्‍या इतक्या अपेक्षा ठेवशिल त तुलाहि ट्क्या सारखी उत्तरं मिळतिल =))
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 12/31/2012 - 13:09

Permalink

हम्म..

अनुभवाचे बोल ऐकयचेत ? जरा तुमच्या अपेक्षा बाजूला ठेवा अन तुम्ही कुणाच्या 'अपेक्षां'मध्ये बसता याचा शोध घ्या. तुमचा शोध तिथेच संपेल..
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 12/31/2012 - 13:38

In reply to हम्म.. by सस्नेह

Permalink

ते सुद्धा सुरु आहे

ते सुद्धा सुरु आहे १ शंका...मुली असाच विचार करतात का??
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sat, 01/05/2013 - 05:25

In reply to ते सुद्धा सुरु आहे by टवाळ कार्टा

Permalink

नै रे ... मुली. खुप छान छान

नै रे ... मुली. खुप छान छान विचार करतात :)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 01/05/2013 - 22:26

In reply to नै रे ... मुली. खुप छान छान by जेनी...

Permalink

"मुली. खुप छान छान विचार

"मुली. खुप छान छान विचार करतात" माहीत आहे...आणि मुले मुलींबद्दल खुप छान छान विचार करतात ;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वलेकर on गुरुवार, 02/14/2013 - 18:41

In reply to "मुली. खुप छान छान विचार by टवाळ कार्टा

Permalink

मुलींचे विचार रोज बद्लत असतात

मुलींचे विचार रोज बद्लत असतात, मनाला लावुन घ्यायचे नाहित. एक नाहि तर पुढे. त्या काय विचार करतात, तो विचार करत बसलात तर....... म्हातारे व्हाल.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 12/31/2012 - 13:36

Permalink

काय नकोय?

थोडक्यात सांगायचं तर "तुम्हाला नक्की काय नकोय?" याची यादी बनवा. ते गुण नसणार्‍या पहिल्या मुलीशी लग्न करा. काय नकोय ची यादी ५ गुणांच्या वर गेली तर तुम्ही लग्नाला तयार नाहित असे समजा
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 12/31/2012 - 13:40

In reply to काय नकोय? by ऋषिकेश

Permalink

हा पर्याय एकदा करुन पाहेलेला

हा पर्याय एकदा करुन पाहेलेला ... त्या वेळी "मी फार निगेटिव्ह विचार करतो" असा शिक्का मारला माझ्यावर परत त्या फंदात पडलो नाही
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 12/31/2012 - 14:04

In reply to हा पर्याय एकदा करुन पाहेलेला by टवाळ कार्टा

Permalink

लोकं काय सगळे शिक्के घेऊन

लोकं काय सगळे शिक्के घेऊन बसले असतात.. तुम्हाला जे योग्य वाटतं ते ज्या देशात रहाता तेथे कायदेशीर आणि शिष्टसंमत असेल तर बिंदास करा
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 12/31/2012 - 13:43

Permalink

साला खालच्या प्रतिक्रियेवर

साला खालच्या प्रतिक्रियेवर एकही प्रतिक्रिया नाही??? http://www.misalpav.com/comment/446870#comment-446870
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 12/31/2012 - 13:44

Permalink

जोडीदार निवडण्याची पद्धत आता

जोडीदार निवडण्याची पद्धत आता चॅट, फेसबुक आणि अन्य ई-अव्हेन्यूजवर विस्तारली आहे हे पाहून आधी ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे आता ते लपूनछपून पाठलाग करणं, माहिती मिळवणं, हाय हॅलो करताना मानेवर मुंग्या येणं, शेवटी फोन नंबर मिळवणं आणि लग्नसमारंभाच्या दिवसापर्यंत आटोकाट प्रयत्नाने सज्जन दिसणं वगैरे असं सगळं सगळं बायपास झालं म्हणायचं. लक्की न्यू जनरेशन...!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Mon, 12/31/2012 - 14:42

In reply to जोडीदार निवडण्याची पद्धत आता by गवि

Permalink

म्हणजे आता ते लपूनछपून पाठलाग

म्हणजे आता ते लपूनछपून पाठलाग करणं, माहिती मिळवणं, हाय हॅलो करताना मानेवर मुंग्या येणं, शेवटी फोन नंबर मिळवणं आणि लग्नसमारंभाच्या दिवसापर्यंत आटोकाट प्रयत्नाने सज्जन दिसणं वगैरे असं सगळं सगळं बायपास झालं म्हणायचं. असे करुन पोरी गटवणार्‍या लोकांबद्दल खरोखरंच आदर आहे. ज्यांना सेल्फ मार्केटिंग करता येत नाही ते अश्राप जीव मैट्रिमोनी सैटींचा आश्रय घेतात याबदद्दल मनोमन खात्री पटलेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Mon, 12/31/2012 - 14:37

Permalink

'आपण हीटवर आलेलो आहोत' हे

'आपण हीटवर आलेलो आहोत' हे सांगण्याचा अत्यंत संयत आणि सुसंस्कॄत मार्ग तुम्ही निवडला याबद्दल कौतुक वाटले. ते 'रोज विथ रोज' असे लिहिणे आणि मुक्ता बर्वेसारख्या मुलीची अपेक्षा हे जरा विचित्रच वाटले. बाकी आपण खाल्लेले धक्के हे धक्केच नव्हेत. पाहिलेल्या फोटोतली मुलगी एक आणि प्रत्यक्षात भेटलेली मुलगी भलतीच असे झाले नाही यातच स्वतःला नशिबवान समजा.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 12/31/2012 - 14:44

In reply to 'आपण हीटवर आलेलो आहोत' हे by अप्पा जोगळेकर

Permalink

खल्लास रे आप्पा. बेष्ट

खल्लास रे आप्पा. बेष्ट परतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Mon, 12/31/2012 - 14:47

In reply to 'आपण हीटवर आलेलो आहोत' हे by अप्पा जोगळेकर

Permalink

...

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 12/31/2012 - 15:16

In reply to 'आपण हीटवर आलेलो आहोत' हे by अप्पा जोगळेकर

Permalink

(No subject)

:D
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 12/31/2012 - 15:28

In reply to 'आपण हीटवर आलेलो आहोत' हे by अप्पा जोगळेकर

Permalink

__/\__ __/\__ __/\__

__/\__ __/\__ __/\__ !!!
  • Log in or register to post comments

Submitted by ब़जरबट्टू on Mon, 02/08/2016 - 15:17

In reply to 'आपण हीटवर आलेलो आहोत' हे by अप्पा जोगळेकर

Permalink

अर्रारा..

'आपण हीटवर आलेलो आहोत' लय बेक्कार फुटलो राव.. :) टका :- सध्या काय Position आहे ? :)
  • Log in or register to post comments

Submitted by इनिगोय on Mon, 12/31/2012 - 14:52

Permalink

नेहमीप्रमाणे लेखापेक्षा

नेहमीप्रमाणे लेखापेक्षा प्रतिसाद भारी.
ट्रस्ट मी फार चिवडाल तर हाताला गाळ येइल.
याची जरूर नोंद घ्या..
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on Mon, 12/31/2012 - 15:09

Permalink

एक म्हण आठवली, उथळ पाण्याला

एक म्हण आठवली, उथळ पाण्याला खऴखळाट फार.
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on Tue, 09/20/2016 - 17:28

In reply to एक म्हण आठवली, उथळ पाण्याला by Dhananjay Borgaonkar

Permalink

सहमत

सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 09/20/2016 - 19:20

In reply to सहमत by वाल्मिक

Permalink

हायला साडे तीन वर्षांनी सहमत

हायला साडे तीन वर्षांनी सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 09/20/2016 - 20:27

In reply to हायला साडे तीन वर्षांनी सहमत by सुबोध खरे

Permalink

तो दर वेळी नवीन आयडीने सहमती

तो दर वेळी नवीन आयडीने सहमती दर्शवतो =))
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजित - १ on Mon, 12/31/2012 - 15:58

Permalink

पुजा ताइस्नि इचारा कि ! त्या

पुजा ताइस्नि इचारा कि ! त्या येक्स्पर्ट हायेत याच्यामांदी ( असे वाटते !! )
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sat, 01/05/2013 - 07:36

In reply to पुजा ताइस्नि इचारा कि ! त्या by अभिजित - १

Permalink

इश्श्श्य ...... तुमचं आपलं

इश्श्श्य ...... तुमचं आपलं काहितरीच हं !! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 01/05/2013 - 22:30

In reply to इश्श्श्य ...... तुमचं आपलं by जेनी...

Permalink

पुजाबै...आमुचा दंडवत घ्यावा

पुजाबै...आमुचा दंडवत घ्यावा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Mon, 12/31/2012 - 18:44

Permalink

माझा एक सल्ला. वर लोकानि

माझा एक सल्ला. वर लोकानि दिलेल्या सल्ल्यापैकी एक पण ऐकू नका. सुनो सब की करो मन की : )
  • Log in or register to post comments

Submitted by एम.जी. on Mon, 12/31/2012 - 19:13

Permalink

टवाळसाहेब, आपण फारच दुराग्रही

टवाळसाहेब, आपण फारच दुराग्रही दिसता... अशाने असेच रिप्लाय येतील.. साधं सरळ प्रपोज करा.. नाही म्हणाली तर पुढं सरका... शेवटी एकीशीच करायचे आहे ना.. ?
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्यपुत्र on Mon, 12/31/2012 - 20:22

Permalink

मुलींकडून

स्पष्ट बोलण्याची अपेक्षा?? -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 12/31/2012 - 20:32

In reply to मुलींकडून by सूर्यपुत्र

Permalink

हा हा हा. भारी!

हा हा हा. भारी!
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Mon, 12/31/2012 - 22:42

In reply to मुलींकडून by सूर्यपुत्र

Permalink

लप जा आता कुठेतरी.

लप जा आता कुठेतरी. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Mon, 12/31/2012 - 23:57

In reply to मुलींकडून by सूर्यपुत्र

Permalink

त्यांच्यामते त्या स्पष्टच बोलतात...

फक्त त्याचा नेमका अर्थ समजावून घेताना ऐकणार्‍याचा गोंधळ उडतो एवढंच ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 01/05/2013 - 22:32

In reply to त्यांच्यामते त्या स्पष्टच बोलतात... by एस

Permalink

मुलीने सांगीतलेल्या वाक्याचा

मुलीने सांगीतलेल्या वाक्याचा "खरा" अर्थ समजाउन घेताना या जगात असा कोण आहे ज्याचा गोंधळ उडाला नसेल :)
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Mon, 12/31/2012 - 23:55

Permalink

पण मी काय म्हणतो...

च्यामारी.. लग्नच कशाला करायचं? रहा की लिव्ह-इन्-रिलेशनशिपमध्ये. जोपर्यंत पटतंय तोपर्यंत एकत्र. नाही पटलं की सरळ आपापले रस्ते धरायचे. सगळा प्रश्नच संपला. अन् नसेल एवढी धमक आयुष्याला सामोरं जायची तर उगाच हा असा अन ती तशी वगैरे गळे काढू नयेत. थांबला तो संपला. बच्चू, चालत रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Tue, 01/01/2013 - 04:32

In reply to पण मी काय म्हणतो... by एस

Permalink

सहा प्रकारची लग्ने

फ्रान्स वगैरे देशात सहा की कितीतरी प्रकारची लग्ने असतात म्हणे. याविषयी आहे का कुणाला काही माहिती? पूर्वी आपल्याकडेही गांधर्व विवाह, राक्षस विवाह वगैरे असायचे...
  • Log in or register to post comments

Submitted by इनिगोय on Tue, 01/01/2013 - 15:59

In reply to सहा प्रकारची लग्ने by चित्रगुप्त

Permalink

अहो काका, इथे एका प्रकारातच

अहो काका, इथे एका प्रकारातच यांना एवढं कन्फ्युजन आहे.. सहा प्रकार?
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 01/01/2013 - 00:22

Permalink

चर्चा वाचतो आहे

चर्चा वाचतो आहे. (आंतरजालावरील वैयक्तिक अनुभवांशी थोडेसे सामांतर्य जाणवले. म्हणून वाचन सहानुभूतियुक्त आहे.) यशस्वी होऊन बाजारपेठेतून बाहेर पडलेल्या लोकांचे अनुभव फारसे उपयोगी पडत नाहीत. कारण प्रत्येक यशस्वी जोडीच्या यशाची किल्ली वेगळीच असते. त्याच जोडीला लागू अशी काहीतरी विलक्षण बाब असते. अपयश अनेकदा हातात येते, म्हणून त्या अनुभवांपासून काहीतरी "तत्त्वे" शोधून काढता येतात. पण बहुतेक यशस्वी जोड्यांना यश एकदाच मिळालेले असते. एका अनुभवातून "तत्त्वे" वगैरे काही शोधता येत नाहीत. पण यशाची तत्त्वे शोधता आली नाहीत, तर नुसती अपयशाची शोधलेली तत्त्वेही असमतोल असतात. फारशी उपयोगी नसतात. निराश न होता शोध चालू ठेवा, आणि अधूनमधून आम्हाला तुमचे गमतीदार अनुभव सांगत राहा, असे प्रोत्साहन देतो.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Tue, 01/01/2013 - 21:10

In reply to चर्चा वाचतो आहे by धनंजय

Permalink

मी पण ,,,,मी पण

असेच प्रोत्साहन देतो. हां पण फार चिकीत्सकपणा करू नका बॉ. शेवटी ऑल क्याट्स ग्रे इन डार्क... तरीपण एक प्रश्न विचारल्याशिवाय राहवत नाही. तुम्ही तुमच्या आईवडीलांशी मनमोकळेपणानी चर्चा केली आहे का ? ही न्युज नातेवाईक चॅनेलमधून ब्रॉडकास्ट झाली आहे का ? त्यांनी ती गांभीर्याने स्विकारली आहे का ? तोपर्यंत आंजावर धुंडो धुंडो रे साजना चालू ठेवा .
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Tue, 01/01/2013 - 02:51

Permalink

honest, frank, outgoing, well

honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker.
पुढच्या वेळी बर्वेंच्या मुक्ताबाईं च्या ऐवजी सावंतांच्या राखीताईंचे नाव घेवून पहा. हेच सगळे गुण त्यांनासुद्धा लागू होतात.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 01/01/2013 - 11:48

In reply to honest, frank, outgoing, well by काळा पहाड

Permalink

बरोब्बर!

बरोब्बर! :D
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 01/05/2013 - 22:34

In reply to honest, frank, outgoing, well by काळा पहाड

Permalink

मला संसार करायचा आहे..

मला संसार करायचा आहे...विरक्ती नाही घ्यायची :(
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 01/01/2013 - 03:41

Permalink

आपण तर बुआ लिव्हिंग रिलेशन

आपण तर बुआ लिव्हिंग रिलेशन शिप मध्ये काही वर्ष काढली आणि पुढे भारतात येउन लग्न केले. त्यामुळे अरेंज मेरेज चा माझा वैयक्तिक अनुभव नाही. पण त्या बद्दल चे किस्से वाचतांना जाम धमाल येते. माझ्या अनेक मित्रांचे लंडन मध्ये असतांना असेच विवाह साईट व मग लग्न जमले व आजतागायत सुरळीत चालले आहे. मात्र त्यांचे एकाच वेळी चार ते ५ मुलींना शॉर्टलिस्ट करून काही महिने चाट करणे व त्यानंतर काही महिन्यांनी वार्तालाप करून झाल्यावर ४ जणींना नाकारून एकीला हो म्हणणे असा प्रकार पहिला तेव्हा त्याची तुलना जॉब इंटरव्ह्यू ची करावीशी वाटते. म्हणजे मुलाखत देणाऱ्या कडे व घेणाऱ्या कडे भरपूर पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे नथिंग पर्सनल , हा एक बाजार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Tue, 01/01/2013 - 04:09

In reply to आपण तर बुआ लिव्हिंग रिलेशन by निनाद मुक्काम …

Permalink

लिव्ह इन एकीशी आणि लग्न

लिव्ह इन एकीशी आणि लग्न दुसरीशी. बराबर ना?
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Tue, 01/01/2013 - 04:17

In reply to आपण तर बुआ लिव्हिंग रिलेशन by निनाद मुक्काम …

Permalink

ऊप्स माफ करा, तुमच्या ब्लौग

ऊप्स माफ करा, तुमच्या ब्लौग वर जाताच खरी गोष्ट ध्यानात आली. अभद्र लिहिण्याबद्दल क्षमा असावी.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 01/01/2013 - 17:03

In reply to ऊप्स माफ करा, तुमच्या ब्लौग by काळा पहाड

Permalink

आंतरजालावर एकदा लिहिले कि

आंतरजालावर एकदा लिहिले कि येणाऱ्या प्रतिसादांचे मी नेहमीच स्वागत करतो. माझ्या पहिल्या वाक्यातून गोंधळ निर्माण होऊ शकतो हे मान्य ,पण दुसरे वाक्य मला अनुभव नाही ,,, ह्यातून खुलासा केला होता. पण आपण जे लिहिले आहे ते अगदी योग्य आहे. माझ्या परिचयात अनेक लिविंग जोडपी होती. त्यांचे अनेक किस्से आहेत ,त्यावर एक लेख लिहावा म्हणजे पंचतारांकित लिविंग रिलेशन शिप अशी कल्पना डोक्यात आली. प्रत्येक जोडप्याची आपलीच एक कहाणी आहे. उलट तुमच्या प्रतिसादाचे मला आभारच मानले पाहिजे त्यामुळे नववर्ष लिहिण्याचा एक विषय मिळाला. मागे मिपावर मी पंचतारांकित किस्से लिहिण्याचं ठरवले होते. ह्या निमित्ताने सुरवात करेन ,
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 01/01/2013 - 21:44

In reply to आंतरजालावर एकदा लिहिले कि by निनाद मुक्काम …

Permalink

तुम्हाला नक्कीच विंग्रजीत

तुम्हाला नक्कीच विंग्रजीत लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणायचे आहे. "लिविंग रिलेशन शिप" नव्हे. होय ना?
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Tue, 01/01/2013 - 04:28

Permalink

मिपावर आणखी एक सदर हवे आहे असे दिसते.

कलादालन, साहित्य, काव्य, भटकंती इ. इ. शिवाय मिपावर आणखी एक सदर : "शुभमंगल" हवे आहे असे दिसते.....
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Tue, 01/01/2013 - 10:07

In reply to मिपावर आणखी एक सदर हवे आहे असे दिसते. by चित्रगुप्त

Permalink

काढुयात की!!

पण इथे सगळेच (काही नेहमीचे अपवाद सोडता)आयदर लग्नाळू किंवा नुकतंच लगीन लागलेले स्वप्नाळू लोकं सल्ले देताहेत त्या बिचार्‍या उनाड कार्ट्याला! हे म्हणजे उघड्याकडे नागडं गेलं अशापैकी आहे!!! तुमच्यासारख्या जुन्या आणि जाणित्या योध्याने चार युक्तीच्या गोष्टी सांगायला हव्यात बॉ त्याला!!! :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com