"नकळत सारे घडले"
माझे मन तुझ्यावर जडले
तु माझी "ती फुलराणी" कधी झालीस?
हे माझे मलाच न कळले
प्रेमामध्ये रुसवा-फुगवी अन् "हसवा फसवी"नेच जम्मत आहे
प्रेम एकदा करुन तर बघ "हिच तर प्रेमाची गम्मत आहे"
प्रेमाचा पुर्वार्ध वाटेल "कुर्यात् सदा टिंगलम्"
प्रेमाचा उत्तरार्ध असेल साक्षात् "लग्नम् गोंधळम्"
"यदाकदाचित" माझ्या प्रेमाला प्रथम म्हणशील तु नाही रे नाही
प्रेम माझ्याशी करुन तर बघ ,नक्की म्हणशील " सही रे सही"
प्रतिक्रिया
23 Nov 2012 - 2:51 pm | ज्ञानराम
छान कल्पना :०)
23 Nov 2012 - 3:18 pm | रसायन
धन्यवाद :)
23 Nov 2012 - 3:26 pm | श्री गावसेना प्रमुख
आज तुमचा वाढदिवस आहे का हो
23 Nov 2012 - 4:59 pm | ५० फक्त
असेल हो, पण तुम्ही समाधीवर उधळल्यासारखी फुलं का उधळताय ?
23 Nov 2012 - 5:40 pm | श्री गावसेना प्रमुख
ते आनंदात असे होते कधी कधी,
26 Nov 2012 - 3:58 pm | ह भ प
रसायना.. जमेश रे भावा..
मस्त आहे आयडियाची कल्पना..
28 Nov 2012 - 2:49 pm | पियुशा
अरे तु कवितापण करतोस ? छान प्रयत्न आहे :)
30 Nov 2012 - 9:30 am | रसायन
हो...:)
3 Dec 2012 - 11:08 am | अनिल तापकीर
मस्त जमलय
3 Dec 2012 - 11:13 am | रसायन
:)
3 Dec 2012 - 11:15 am | परिकथेतील राजकुमार
मला आवलली कविता
परा
इयत्ता दुशली तुकली ब
3 Dec 2012 - 11:19 am | रसायन
थांकू :)
3 Dec 2012 - 9:18 pm | जेनी...
पल्या , अजुन तु त्याछ तुकलीत??
पूजा
इयत्ता पैली तुकली अ
3 Dec 2012 - 11:06 pm | अत्रुप्त आत्मा
@पल्या , अजुन तु त्याछ तुकलीत?? >>>
@पूजा
इयत्ता पैली तुकली अ>>>
===================================================================
आत्मू......... प्ले ग्रुप
3 Dec 2012 - 11:19 pm | प्रचेतस
>>>आत्मू......... प्ले ग्रुप
हो. ते तर दिसतंच आहे.
3 Dec 2012 - 11:29 pm | अत्रुप्त आत्मा
@हो. ते तर दिसतंच आहे.>>> आंsssssssssssss दु...दु...हल्कत,अच्रत,बव्लत आगोबा :-p
4 Dec 2012 - 7:46 am | ५० फक्त
अरे अरे कसे हो तुम्ही, तुम्हाला ते बिटविन द वर्डस, प्ले आणि ग्रुपच्या मध्ये बॉय लिहिलेलं दिसलं नाही का ?
4 Dec 2012 - 11:37 am | बॅटमॅन
अरारारा अगोबा :D :P
4 Dec 2012 - 10:51 am | परिकथेतील राजकुमार
तुझ्यासाथी थांब्लोय ना. :( तू आली की मग मी लैन मालीन तुझ्यावल.
4 Dec 2012 - 9:32 pm | प्यारे१
पर्या लेका,
नंबरं लागल्यात हितं लायनी माराया आन त्वा काय सांगायलाहेस... ;)
'पूजा का स्वयंवर' नाम की सीरियल लवकरच आने वाली है... पूजा तू लाव शेंड्या सगल्यांना! ;)
3 Dec 2012 - 11:50 pm | अगोचर
नाटकांचे रसायन चांगले जमवले आहे .. पण
लेकुरे उदंड झाली पर्यंत न्यावा कि राव
पुढील लेखनाला ऑल द बेस्ट !
- अगोचर तो मी नव्हेच
4 Dec 2012 - 9:54 am | रसायन
नक्किच :)
4 Dec 2012 - 11:36 am | बॅटमॅन
उत्तम प्रयोग!
4 Dec 2012 - 1:18 pm | रसायन
धन्यवाद बॅटमॅन राव..........
4 Dec 2012 - 5:23 pm | स्पा
मस्तच लिहील आहे
रसायन राव.. अशीच उत्तमोत्तम कला येथे पेश करत राहा
आम्ही आस्वाद घेऊच
4 Dec 2012 - 5:25 pm | परिकथेतील राजकुमार
येवढा गोग्गोड प्रतिसाद ?
कोणा 'अधिकार्याने' सत्यप्रतिसाद दिल्याबद्दल व्यनीतून हाग्यादम भरला का काय ?
4 Dec 2012 - 5:26 pm | स्पा
अरेरे किती तो नव सदस्यां प्रती राग
त्यांनाही आपलं म्हणा
4 Dec 2012 - 5:28 pm | परिकथेतील राजकुमार
ओक्के स्पाबाना आझमी.
तुमच्यासाठी काय पण !
4 Dec 2012 - 9:19 pm | अत्रुप्त आत्मा
@स्पाबाना आझमी.>> बाजार
4 Dec 2012 - 5:27 pm | पैसा
हल्ली त्यांचे हृदयपरिवर्तन झाले आहे अशी बातमी ऐकली.
4 Dec 2012 - 6:27 pm | ५० फक्त
त्यांना हृदय हरवण्याची किवा कुणीतरी पळवायची काळजी पडली आहे आणि तुम्हाला परिवर्तनाचं कौतुक.
4 Dec 2012 - 7:15 pm | सस्नेह
कवितेखालील (एकच) प्रश्न.
वरीलपैकी खर्रेखुर्रे प्रतिसाद कोणते अन खोट्टे कोणते हे ओळखा.
4 Dec 2012 - 8:49 pm | तिमा
मराठी सिनेमांची नांवे घेऊनही कविता लिहावी ही विनंति!
4 Dec 2012 - 9:59 pm | रसायन
समस्त प्रतिक्रियांबद्दल आभारी :):):)
4 Dec 2015 - 2:58 pm | एस
चांगली कविता आहे. कागदावर लिहून रॉकेट बनवून मुलींच्या बाकड्यांकडे उडवायला. ;-)