Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मेघना भुस्कुटे on Wed, 08/20/2008 - 13:57
  • Log in or register to post comments
  • 35774 views
  • वादग्रस्त, चाकोरीबाहेरची, धक्कादायक पुस्तकं - २

Book traversal links for वादग्रस्त, चाकोरीबाहेरची, धक्कादायक पुस्तकं

  • वादग्रस्त, चाकोरीबाहेरची, धक्कादायक पुस्तकं - २ ›

प्रतिक्रिया

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 08/21/2008 - 12:55

Permalink

कोबाल्ट ब्लू

हेच ते पुस्तक ज्याच्यावरच्या चर्चेवरुन हा धागा सुरू केला. नावः कोबाल्ट ब्लू, लेखकः सचिन कुंडलकर (अका: 'रेस्टॉरंट' या चित्रपटाचा दिग्दर्शक), प्रकाशकः $ man cobalt_blue पुस्तक सुरू होतं ते 'तनय'च्या कथनातून, आणि तो मुख्यतः लिहित असतो त्यांच्याकडे पूर्वी असणाय्रा एका पेइंग-गेस्टबद्दल! "तो" येण्याच्या आधीच तनयला तो नकोसा झाला असतो, पण त्यांच्यातले संबंध प्रथमभेटीतच कडू रहात नाहीच. "तो" आणि तनय यांची मैत्री होते आणि मग ते नातं मैत्रीच्याही पुढे जातं. तनयला यापुढे दुसय्रा कोणाशीही शरीर-संबंध ठेवायचे नाही आहेत आणि "त्या"च्यामधेच तो संपूर्ण गुंतलेला आहे. मधेमधे येत रहातात ते 'अनुजा'चे, तनयच्या बहिणीचे उल्लेख, जी सध्या "त्या"च्याबरोबर पळून गेली आहे. घरच्यांना वाटत रहातं अनुजाचं घरातून जाणं तनयनी सर्वात जास्त मनावर घेतलं आहे. अनुजा एकदम बिनधास्त मुलगी आहे, घरात सांगून ही मुलगी चार-चार दिवस एकटीच गड-किल्ल्यांवर फिरणारी, अंगावर दागिने घालून मिरवण्यापेक्षा चेहरा-हातावरचा तांबूस टॅन आवडणारी! तिच्या अपरोक्ष तनय आणि"त्या"चं नातं फुलत जातं. एक दिवस अनुजा परत येते, विमनस्क मनःस्थितीत, आणि तरीही अर्थातच तनय उद्विग्नच राहतो, आपल्या प्रेमाच्या आणि प्रेमिकाच्या विरहात! अर्ध्यात सुरू होते अनुजाची डायरी, ती घरी परत आल्यानंतरची! तिला सायकियाट्रीस्ट सुचवते तुला जे वाटतं ते लिहीत जा आणि या त्रिकोणी नात्याचा दुसरा कोन मोजता येतो. "तो" कलाशाखेचा विद्यार्थी असल्यामुळे त्याला आणि त्याच्या मित्रांना मॉडेल हवी असते चित्र काढायला. त्यामुळेच अनुजाला जाणीव होते आपल्या सुडौल शरीराची! या वेळी वाटणारं 'प्रेम' अनुजाला समजतं आणि तनयच्या अपरोक्ष "त्या"ची एकाच घरातली दुसरी कहाणी सुरू होते. आणि एक दिवस अनुजाच्या म्हणाण्यावरून अनुजा "त्या"च्या बरोबर घर सोडते (मुद्दामूनच पळून जाते असं मी इथे लिहिलं नाहीये). आता अनुजा ठीक होत आहे, ती अजूनही "त्या"चा विचार करतच रहाते, "काय चुकलं, कुठे बिनसलं, काही क्लूजकडे दुर्लक्ष झालं का?". पण तिला घरात राहून स्वतःवर आणखी बंधनं नको आहेत, ती वेगळी रहायला लागते; तनयही घरातून बाहेर पडतो, अनुजाप्रमाणेच स्वतःच्या पायावर उभा रहायला! आणि आपण विचार करत रहातो, का असं वागला असेल "तो"? त्याच्या लहानपणच्या अनुभवांमुळे तो असा झाला असेल का काही लोकं 'अशीच' असतात, उभयलिंगी संबंधात रस असणारी? अतिशय सुंदर आणि तरीही सोप्या शब्दात, अतिशय वेगात तनय, "तो" आणि अनुजा आपल्याला भेटून जातात. तनय या नावातच शरीराला जास्त प्राधान्य आहे, आणि अनुजा त्याचीच धाकटी बहीण! शरीर आणि मनाचे खेळ, जे रोज दिसतीलच असं नाही ते इथे दिसतात. आई, बाबा, अनुभव, दादा, रश्मी, वगैरे मंडळी वेगवेगळ्या प्रसंगांमधून येतात आणि बाकीचं जग "नॉर्मल" आहे याची जाणीव करून देत रहातात. आणि पुस्तक एका बैठकीत संपवल्यावर डोक्यात काही विचित्र विचार मनात येत रहातात, त्यासाठी मला अजूनतरी शब्द सापडले नाही आहेत. अवांतरः हे पुस्तक मला आवडलं तसं सगळ्यांनाच आवडेल असं नाही. आणि समलिंगी/उभयलिंगी संबंध यांच्यावर चर्चा हा या धाग्याचा हेतू नाही. तेव्हा पुस्तकपरीक्षण किंवा समलिंगी/उभयलिंगी संबंध यांच्यावर बोलायचं असल्यास आपण इथेच, पण वेगळ्या धाग्यावर बोलू शकतो. दुसरं म्हणजे मी खूपच कमी (अबतक तीन) कादंबय्रा वाचल्या आहेत. त्यामुळे चुकांची मापी असावी! (क्वचितच कादंबय्राही वाचणारी) यमी
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on गुरुवार, 08/21/2008 - 13:56

In reply to कोबाल्ट ब्लू by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

थँक्यू

थँक्यू यमुताई. या पुस्तकातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे - 'तो' किंवा त्याचे उभयलिंगी संबंध नाही विशेष धक्कादायक वाटत. पण बाईचं शरीर असो वा पुरुषाचं. आपल्याला किती लहानपणापासून शरीर दडवून ठेवायला, त्याच्या गरजांवर सामाजिक बंधनांची चौकट घट्ट बसवायला, चार लोकांसारखं'च' वागायला शिकवलं जातं - ते लक्षात येतं. आणि अशा चौकटीत धाडस न करू शकणार्‍या किती माणसांना आपलं वेगळेपण दडपून जगावं लागत असेल त्याचं भान येतं. ते चूक की बरोबर हा तर पूर्ण वेगळाच मुद्दा. कसलेही अश्लील उल्लेख टाळून साध्या-सरळ भाषेत लिहिलंय हे पुस्तक. काही काही ठिकाणी काही परिच्छेद, काही ओळी परत परत येतात. पण त्या खटकत नाहीत. त्यानं या गोष्टीला एक छानसा फील येतो - दर कडव्यानंतर पुनरावृत्त होणार्‍या धृपदाचा. महान पुस्तक आहे असं नाही, पण वेगळं नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 08/21/2008 - 15:43

In reply to थँक्यू by मेघना भुस्कुटे

Permalink

मेघना,

मेघना, यमी.... तुम्ही खरंच एक चांगला धागा सुरू केला आणि पुढे नेत आहात. कोबाल्ट ब्ल्यु ची ओळख छान आणि उत्सुकता चाळवणारी आहे. फक्त ही पुस्तके भारताबाहेर कशी मिळवायची हा एक मोठा प्रश्न आहे. या धाग्यावर ईंग्रजी पुस्तकांबद्दल लिहिता येईल का? बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 08/21/2008 - 15:52

In reply to मेघना, by बिपिन कार्यकर्ते

Permalink

बर्ट्रांड रसल

या धाग्यावर ईंग्रजी पुस्तकांबद्दल लिहिता येईल का? या दोन दिवसात मी काही लोकांना बर्ट्रांड रसल बद्दल सांगितलं. आता त्यांच्याबद्दल एक लेखच लिहिला तर बरं असं वाटायला लागलं आहे, तर हे काम एक-दोन दिवसात करते. त्यांची सगळीच पुस्तकं आंग्ल भाषेत आहेत. आणि माझ्या मते तुम्हाला जर कोणती ईंग्रजी पुस्तकं आवडली असतील तर जरूर लिहा, आमचा काही लोकांचा वाचनाचा वेग कमी होईल एवढंच! यमी
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 08/22/2008 - 09:26

In reply to थँक्यू by मेघना भुस्कुटे

Permalink

यमु आणि

यमु आणि मेघना, कोबाल्ट ब्लू ची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद... ... वाचेन नक्की... पण शीर्षक कोबाल्ट ब्लू का यावर काहीतरी लिहा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 08/21/2008 - 23:59

In reply to कोबाल्ट ब्लू by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

परीक्षण

आवडले. आता रसेलबद्दल वाचण्याची उत्सुकता आहे. त्याचेच 'मॅरेज अँड मॉरल्स' हे विवाहसंस्थेच्या इतिहासावर, रुढ झालेल्या परंपरांवर आणि त्यामागच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारे पुस्तक आहे. वर झालेल्या चर्चेवरून त्याची आठवण झाली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 08/21/2008 - 19:23

Permalink

गुरुचरित्र

गुरुचरित्र म्हने बायामान्सांनी वाचु नये. कारन ते धक्कादायक हाये. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on Fri, 08/22/2008 - 09:30

In reply to गुरुचरित्र by प्रकाश घाटपांडे

Permalink

मंडळी,

मंडळी, कृपा करून नव्या धाग्यावर लिहाल काय? इथे दर वेळी पान उलटावे लागते. हा त्याचा दुवा - http://www.misalpav.com/node/3160
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com