गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु ,
गुरुर देवो महेश्वरा |
गुरुर साक्षात परब्रम्हा ,
तस्मयी श्री गुरुवे नम: ||
आज शि़क्षक दिन, सर्व गुरुवर्यांना वंदन करुन आजचा दिवस गोडाने सुरु करुयात :)
साहित्य:
१ वाटी बासमती तांदूळ ( स्वच्छ धुवून , निथळत ठेवावे)
१/२ वाटीपेक्षा थोडीच जास्त साखर
३-४ लवंगा
१ टीस्पून केशर ( हलकेच भाजून घेणे )
१ टीस्पून वेलचीपूड
तूप
काजू, बदामाचे काप, बेदाणे
पाकृ:
पॅनमध्ये तूप गरम करून काजू हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊन बाजूला काढून ठेवणे.
आता त्याच पॅनमध्ये लंवगा घालून, निथळून ठेवलेले तांदूळ घालून परतणे.
परतलेल्या तांदळात २ वाट्या पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्यावा.(मी मायक्रोवेव्हमध्ये शिजवला आहे)
शिजवलेला भात ताटात काढून पसरवून घ्यावा.

पॅनमध्ये साखर व पाव वाटीपेक्षा थोडे कमी पाणी घालून एकत्र करा.
त्यात भाजलेले केशर घाला व गोळीबंद पाक करावा.
पाक खूप पातळ राहता काम नये नाहीतर भात मिसळताच तो पांचट होईल.
पाक चिकट झाला की त्यात गार केलेला भात घालून एकत्र करा.
त्यात तळलेले काजू, बदामाचे काप व बेदाणे घालावेत व झाकून मंद गॅसवर एक - दोन वाफा काढाव्यात.
वरुन थोडे साजूक तूप सोडावे.
थोडा गार झाला की वेलचीपूड घालावी.

हा भात आदल्या दिवशी करुन ठेवावा म्हणजे छान मुरतो व चवीला ही छान लागतो.
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच...
आय शपथ !!!
भारीच!! इथून पुढे दर बुधवारची
छळ मांडीयेला.
तोंपासु ~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~
(No subject)
पाकृ मस्तच, धन्यवाद. अवांतर
सकाळी सकाळी असे धागे उघडले की
झकास!!!!!
निषेध !
वरील सर्वांशी सहमत.
उम्म्म्म्म्म्म
साखरभात माझ्या आवडीचा आहे..
मस्त!
शेवटचा फटू नेहमीप्रमाणे
हो भात पूर्णपणे शिजलेला
In reply to शेवटचा फटू नेहमीप्रमाणे by रेवती
ओक्के. धन्यवाद.
In reply to हो भात पूर्णपणे शिजलेला by सानिकास्वप्निल
अभिनंदन.
सुरेख!!!
मस्त
अहा !!!
'जर्दा' ?
साखरभाताचं चित्रं छानच आहे,
काल किचनचा ताबा घेऊन हा भात