डॉ दाढे यांचे अभिनन्दन

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
14 Aug 2008 - 6:29 pm

आपले मित्र मिपासदस्य डॉ दाढे यांचे अभिनन्दन
त्यानी गेल्या आठवड्यात एक विक्रमही केला.
दंत चिकेत्सेत शल्यविषारद असलेल्या डोक्टरानी एका दिवसात आठ मायनर आणि एक मेजर केस केली! त्या आठवड्यात एकूण तीन मेजर झाल्या!
डोक्टर साहेब तुमच्या ज्ञानाने लोकांचे आयुष्य सुखी होते. आपले अभिनन्दन

समाजअभिनंदन

प्रतिक्रिया

सहज's picture

14 Aug 2008 - 6:34 pm | सहज

डॉक्टर साहेब आभिनंदन.

टारझन's picture

14 Aug 2008 - 7:23 pm | टारझन

डॉ.साहेब अभिनंदन बरका !! झकास.... अशाच वेगाने प्रगती करा....
अवांतर : किती सर्जरी नंतर एक तुम्ही फ्री मधे करता हो ? तसा नंबर लावायला .. ;)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

धनंजय's picture

16 Aug 2008 - 1:26 am | धनंजय

अभिनंदन!

मदनबाण's picture

14 Aug 2008 - 6:35 pm | मदनबाण

दाढे साहेब हार्दिक अभिनंदन ! ! !

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

विसोबा खेचर's picture

14 Aug 2008 - 6:40 pm | विसोबा खेचर

दाढेसाहेब,

आपले मन:पूर्वक अभिनंदन. आपल्यासारखी गुणी मंडळी येथे आहेत याचा मिपाला अभिमान आहे.

ही बातमी इथे कळवल्याबद्दल गुज्जूभाईचेही आभार.. :)

तात्या.

नीलकांत's picture

14 Aug 2008 - 6:42 pm | नीलकांत

विक्रमविरांचं अभिनंदन !

नीलकांत

अवलिया's picture

14 Aug 2008 - 6:43 pm | अवलिया

वा वा वा
डॉ दाढे यांच्या पराक्रमाची कथा वाचुन अतिशय आनंद वाटला.
दाढे साहेब हार्दिक अभिनंदन ! ! !
दाढे साहेब हार्दिक अभिनंदन ! ! !
दाढे साहेब हार्दिक अभिनंदन ! ! !

लोकांचे दात नीट करण्या साठी (का उपटण्यासाठी :$ ) परमेश्वर त्यांना दिर्घायु करो ही सदिच्छा

(स्वगत - नान्या तुच ही अभिनंदनाची पद्धत चालु केली ना ... )

(सध्या तरी ३२ दात शाबुत असलेला) नाना

प्राजु's picture

14 Aug 2008 - 6:45 pm | प्राजु

आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चिन्या१९८५'s picture

14 Aug 2008 - 6:49 pm | चिन्या१९८५

डॉ.दाढेंचे मनःपुर्वक अभिनंदन!!!!!!

आनंदयात्री's picture

14 Aug 2008 - 6:52 pm | आनंदयात्री

अभिनंदन डॉक्टर !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Aug 2008 - 6:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अभिनंदन माझ्याकडूनही!

केशवसुमार's picture

14 Aug 2008 - 6:59 pm | केशवसुमार

डॉक्टरसाहेब..
(आनंदित)केशवसुमार.

विजुभाऊ,
अनेक शंका..
हा नक्की कसला विक्रम आहे? लिमकाबुक? ग्रिनिजबुक?
नॉर्मली दंतशल्यविशारद किती मायनर आणि किती मेजर केस करतात? पुर्वीचा विक्रम काय होता?
(गोंधळलेला)केशवसुमार
स्वगतः केश्या ही माहिती विजुभाऊ कदाचित क्रमशः देणार असतील..तुला उगाच फाजिल चौकशा.. बाकीच्यांनी बघ कस गुपचुप अभिनंदन केले

लबाड मुलगा's picture

14 Aug 2008 - 7:06 pm | लबाड मुलगा

त्याच काय आहे कि आपले इजुभावु तव दिवशी बसले लायन लावुन
यांचा नंमर आला तवा डागदर म्हणले आज लय विक्रम जाला नंतर फावु
पन यांनी कलटी घेतली व ठरिवले की त्यांचे अभिनंदन कलुन टाकायचे व फी कमती करुन घेयाची
मनुन अभिनंदन
(डागदर बाबु गंमत बर का)
अभीणंदन

सखाराम_गटणे™'s picture

14 Aug 2008 - 9:43 pm | सखाराम_गटणे™

मला पण ह्या शंका आहेत.

सखाराम गटणे

विजुभाऊ's picture

15 Aug 2008 - 8:15 pm | विजुभाऊ

मला पण ह्या शंका आहेत
गटण्या फुकटात दात काढुन घेण्यासाठी उगाच चॅलेन्ज देउ नकोस.
डॉ साहेब कु ख उर्फ टार्‍या ला रीसेप्शन वर स्वागताला बसवतात फुकट्या पेशन्ट साठी.
तो त्या अगोदर दंत विमा ही उतरुन देतो. ( दोघांचा फायदा. टार्‍याचा आणि तुझाही)
तू आपल्या परीने अर्थ काढ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

रामदास's picture

14 Aug 2008 - 7:07 pm | रामदास

मनःपुर्वक अभिनंदन!!!!!!
हे सगळं करता करता आमच्यासाठी पण वेळ देता.धन्य हो प्रभू.

शितल's picture

14 Aug 2008 - 7:14 pm | शितल

अभिनंदन. :)

मुक्तसुनीत's picture

14 Aug 2008 - 7:24 pm | मुक्तसुनीत

डॉ. दाढे ,
तुमच्यासारखे चांगले आणि निष्णात लोक इथे येतात; आमच्याबरोबर घटका दोन घटका घालवतात ही फार आनंदाची बाब आहे :-)
मनःपूर्वक अभिनंदन !

संदीप चित्रे's picture

14 Aug 2008 - 8:42 pm | संदीप चित्रे

डॉ. साहेब .. तुम्ही तर एकदम षटकार मारलात..
असेच अनेक विक्रम आणि लोकसेवेची कामे यशस्वी होवोत.

डॉ.प्रसाद दाढे's picture

14 Aug 2008 - 8:46 pm | डॉ.प्रसाद दाढे

मित्रहो मनापासून आभार! मी तस॑ पाह्यला गेल॑ तर फार काही मोठे केले नाहीये. सर्वसामान्य ओरल सर्जन एका दिवसात जास्तीत जास्त चार ते पाच मायनर सर्जरी करतात, पण मला थोड्या जास्त करण्याची स॑धी माझ्या प्रिय रूग्णा॑नी दिली. त्या॑चेही आभार. तसेच मागच्या आठवड्यात मी रस्त्यावरच्या दुर्घटनेत चेहरा व जबडा छिन्नविछिन्न झालेल्या तीन रूग्णा॑च्या शस्त्रक्रिया केल्या. आन॑दाची गोष्ट म्हणजे त्या यशस्वीही झाल्या व ते तिन्ही रूग्ण हसतमुखाने घरीही गेले! मला खूप आन॑द झाला व ही गोष्ट मी सहज विजूभाऊ॑ना सा॑गितली तर त्या॑नी एकदम बातमीच करून टाकली. :)
मी खूप लहान आहे व अजुन बराच पल्ला बाकी आहे. जे काही झाले ती परमात्म्याची व माझ्या गुरू॑ची कृपा होती. पुढचे गड काबीज करण्यासाठी त्या॑ची व मिपा मित्रा॑ची अशीच सावली सोबत असू दे..

सखाराम_गटणे™'s picture

15 Aug 2008 - 10:07 am | सखाराम_गटणे™

हा तुमचा नम्र पणा आहे.

सखाराम गटणे

भडकमकर मास्तर's picture

15 Aug 2008 - 8:28 pm | भडकमकर मास्तर

मस्त रे... :)
आपला निष्णात हात असाच चालत राहूदे...

( महिन्यातून दोनदा तरी डॉक्टरांचं कार्यनैपुण्य पाहणारा )
भडकमकर मास्तर
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग's picture

14 Aug 2008 - 8:50 pm | चतुरंग

डॉक्टरसाहेब आपले आभिनंदन!

पुढचे गड काबीज करण्यासाठी त्या॑ची व मिपा मित्रा॑ची अशीच सावली सोबत असू दे..
च्या ऐवजी मी चुकून -

पुढची दाढ काबीज करण्यासाठी त्या॑ची व मिपा मित्रा॑ची अशीच सावली सोबत असू दे..
असं वाचलं हो! B) :B

चतुरंग

सुचेल तसं's picture

15 Aug 2008 - 9:09 am | सुचेल तसं

>>पुढची दाढ काबीज करण्यासाठी त्या॑ची व मिपा मित्रा॑ची अशीच सावली सोबत असू दे..

:) :) :) १ नंबर जोक!!!

डॉक्टरसाहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन!!!

http://sucheltas.blogspot.com

अभिमानास्पद, हार्दिक अभिनंदन व शुभेच्च्छा

ब्रिटिश टिंग्या's picture

14 Aug 2008 - 9:11 pm | ब्रिटिश टिंग्या

दाढे साहेब,
अभिनंदन अन् शुभेच्छा!

- (शुभेच्छुक) टिंग्या :)

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Aug 2008 - 9:12 pm | llपुण्याचे पेशवेll

डॉ साहेब, आपले हार्दिक अभिनंदन.
इतके लोक एकाच दिवशी दात काढायला(म्हणजे खरोखरचे दात काढून घ्यायला) आले यातच त्यांचा तुमच्या ज्ञानावरील विश्वास दिसून येतो.
पुण्याचे पेशवे

सखाराम_गटणे™'s picture

14 Aug 2008 - 9:41 pm | सखाराम_गटणे™

अभिनंदन, चांगली गोष्ट आहे.
मिपावर पण जरा काही खास (आपापल्या परीने अर्थे लावावा) पेशंट लोकांचे किस्से टाकत जा. बरेच दिवस काही विनोद वाचायला भेटले नाही.

सखाराम गटणे

सर्वसाक्षी's picture

15 Aug 2008 - 9:59 am | सर्वसाक्षी

डॉ. साहेबांचे हार्दिक अभिनंदन!

तसाही मला दंतवैद्यांविषयी दोन कारणांमुळे विलक्षण आदर आहे

१) हे लोक कसलाही चमत्कार न करता समोरच्याला ' आ ' वासायला लावतात.
२) कुणी दुसर्‍याला नुसते 'दात तोडीन' असे म्हटले तरी त्याच्यावर फिर्याद होऊ शकते; मात्र हे लोक समोरच्याचे दात पाडतात वर त्याच्याचकडुन त्याचे पैसेही घेतात (आणि समोरचा ते खुषीने देतो)

संजय अभ्यंकर's picture

16 Aug 2008 - 11:13 am | संजय अभ्यंकर

आपल्या हातून रुग्णांची उत्तम सेवा धडो व आपली उत्तरोत्तर प्रगती होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे's picture

16 Aug 2008 - 8:09 pm | डॉ.प्रसाद दाढे

सर्व मिपा-मित्रा॑चे पुन्हा एकदा आभार.. खूप बरे वाटले