✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सेल्समन भाग - १

म
मराठमोळा यांनी
Sat, 05/26/2012 - 19:05  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी.. हि कथा आहे एका सेल्समनची. कदाचित एखाद्या डेली सोप प्रमाणे.. कदाचित.. असो. ************************************************************************************** माई : ए बाळा उठ ना... राहुलः हो गं माई.. थोडा वेळ झोपु दे ना.. माई : अरे आज तुझा रिझल्ट आहे ना. राहुल फटकन उठतो. १५ मिनिटात तयार.. माई नास्त्याचं विचारेपर्यंत राहुल स्कुटरला किक मारुन पसार.. आज राहुलचा विंजीनीरींगच्या दुसर्‍या वर्षाचा निकाल.. राहुल तसा हुशार.. पण आज त्याच्या काळजात भितीची लहर उठत होती.. आज काय होणार? हा प्रश्न राहुलला तसाच त्याच्या आई-वडिलांना सतावत होता.. ११ वाजता रिझल्ट लागणार होता. गेलं एक वर्ष राहुलने कॉलेज अ‍ॅटेंड केलं नव्हतं. कसंबसं परीक्षेला बसता येईल इथपर्यंत काळजी घेतली होती. पण भिती कायम होती, कारण अभ्यासाच्या नावाखाली केलेली टंगळमंगळ आज दिवे लावणार होती. आज राहुलने त्याचा लकी शर्ट घातला होता. जो तो प्रतिक्षेत.. अमितः ए रावल्या.. काय रे.. तुला काय वाटतं.. काय व्हईन रे आप्लं? राहुलः माझी आधीच फाटलीये यार.. थांब जरा.. ११ वाजता कळेलच कुणाची किती फाटलीये ते. दोघे खळखळून हसतात.. मग मंग्या, सुन्या, केतकी, जाड्या, पंक्या त्यांना जॉइन होतात... मागचं एक वर्ष क्रिकेट आणि फुटबॉल खेळुन आपण काय दिवे लावलेत हे आज त्याना कळणार होतं. राहुलः आपल्याला तर कोंफिडेंस हाय राव.. हे बघ.. तुला, सुन्याला, केतकीला मी मॅथस शिकवलं, एक पेपर स्क्रॅच केला.. म्हंजे ए.टी.के.टी पक्की.. बाकी राहिलं ते म्हन्जे १-२ विषय.. त्यात एखाद्या मधे तरी मटका लागलंच. अमितः हा राव. तुझं बराय. आमचं काय? आमी तर सगळीकडंच दिवे लावलेत..) राहुल: अरे टेंशन नको घेऊ. सगळे पास होतील. केतकी: "आपण सगळे एकत्र पास नाही झाले तर मग आपण भेटणार नाही ना.." असं म्हणून केतकी मुसमुसायला लागली.. आणि सगळे चुप झाले.. शेवटी सगळे कँटीन मधून एचओडी च्या डिपार्टमेंट कडे निघाले.. कुणाचे हात घामेजलेले तर कुणाचे कपाळ.. क्रमशः (भाग छोटा आहे.. पण क्षमस्वः, पुढचा भाग नक्कीच मोठा लिहिन तुम्हाला आवडला तर)
  • सेल्समन भाग - २
  • सेल्समन भाग - ३

Book traversal links for सेल्समन भाग - १

  • सेल्समन भाग - २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
4984 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

लिहा लिहा पण जरा मोठा भाग

नाना चेंगट
Sat, 05/26/2012 - 19:08 नवीन
लिहा लिहा पण जरा मोठा भाग लिहा... :)
  • Log in or register to post comments

अहो पण आवडावे असे काय आहे या

कान्होबा
Sat, 05/26/2012 - 19:31 नवीन
अहो पण आवडावे असे काय आहे या भागात?
  • Log in or register to post comments

छान लिहिलय

निवेदिता-ताई
Sat, 05/26/2012 - 19:37 नवीन
छान लिहिलय
  • Log in or register to post comments

मोठे भाग टाका की जरा!!

शिल्पा ब
Sun, 05/27/2012 - 04:26 नवीन
मोठे भाग टाका की जरा!! एवढ्याश्या सँपलवर कसं काय सांगणार?
  • Log in or register to post comments

डेली सोप चे भाग एवढेच असतात..

जोशी 'ले'
Sun, 05/27/2012 - 16:04 नवीन
डेली सोप चे भाग एवढेच असतात.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

प्रत्येक ओळीनंतर कॅमेरा

किचेन
Wed, 05/30/2012 - 23:12 नवीन
प्रत्येक ओळीनंतर कॅमेरा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाऊन झूम इन आणि झूम ओउत होतोय अशी कल्पना करा.आणि पाठीमागे धडाम धाम धडाम असा आवाज हि आहे अशीही कल्पना करा.डेली सोपच्या दोन भागात न्हाहून निघाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

मधे मधे तिप्पट आकाराच्या

खटासि खट
Sun, 05/27/2012 - 16:12 नवीन
मधे मधे तिप्पट आकाराच्या साबणाच्या जाहिराती टाकल्या एक पूर्ण भागाचा एपिसोड होईल.. मग वाटेल ब्वॉ डेली सोप
  • Log in or register to post comments

आणखी येऊ द्या!

पैसा
Sun, 05/27/2012 - 16:56 नवीन
म मो, नेहमीच छान लिहिता, आज थोडक्यात का आटपला हा भाग?
  • Log in or register to post comments

टुकार इतकेच म्हणेन दुनियादारि

चांगभलं
Mon, 05/28/2012 - 08:40 नवीन
टुकार इतकेच म्हणेन दुनियादारि वाच्ल्त काय इत्क्यात?
  • Log in or register to post comments

ममो, निराश केलंय इतकंच

वपाडाव
Mon, 05/28/2012 - 11:53 नवीन
ममो, निराश केलंय इतकंच म्हणेन...
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Mon, 05/28/2012 - 11:55 नवीन
ह्म्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

ए गपा ए!

स्पंदना
Wed, 05/30/2012 - 14:54 नवीन
ये तो सिर्फ ट्रेलर है । पिक्चर अभी बाकि है । उगा निराश बिराश व्हायच काम नाही. ममो लिहा. मेरी तरफसे एक कोंबडी (पकायी हुइ ) लागु.
  • Log in or register to post comments

ए गपा ए!

स्पंदना
Wed, 05/30/2012 - 14:55 नवीन
एको??
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा