एव्हरेस्ट मोहिमेचं फलित नेमकं काय?

प्यारे१'s picture
प्यारे१ in काथ्याकूट
22 May 2012 - 12:19 pm
गाभा: 

नेहमीप्रमाणं कफ्युज होऊन काकू टाकतोय.

एव्हरेस्ट सर करुन आपले (महाराष्ट्रातले) वीर परततील. त्यातले दोघे परिचयाचे आहेत.
एव्हरेस्ट मोहिमेबद्दल ऐकलं होतंच. त्याला झालेल्या खर्चाचे आकडे देखील सर्वसाधारणपणे बर्‍याच जणांना ठाऊक असतील. बर्‍यापैकी मोठी असलेली ही रक्कम ह्या वीरांनी लोकवर्गणीतून (बरीचशी) गोळा केली.

सकाळी नाष्टा करताना चर्चा सुरु झालेली...
(कृपया ह्या सगळ्या चर्चेमध्ये कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही नी नव्हता हे ध्यानात घ्यावं. एव्हरेस्ट सर करणं ही अत्यंत धाडसाची, चिकाटीची , नियोजनपूर्वक, अत्यंत संयमानं केलेली तसंच आणखी बरंच बरंच साध्य करवणारी गोष्ट आहेच. )
तरीही जे प्रश्न चर्चिले गेले ते म्हणजे....
१. हे एवढं सगळं करुन नेमकं हाती काय पडलं?
अ. संशोधन, विकसन अशा काही गोष्टी केल्या गेल्या का?
आ. पर्यावरण विषयक काही केलं गेलं का?
२. एव्हरेस्ट सर करणं ही गोष्ट बर्‍याच जणांनी केलेली आहे. नवीन काय?
३. जर हौस म्हणून एव्हरेस्ट सर करायचं होतं तर स्वखर्चानं का केलं गेलं नाही ?
४. लोकांना पैसे मागायचं हे ठीक पण त्या पैशाचा विनियोग झाला त्याचं नेमकं फलित काय?
(तिसर्‍या मुद्द्याशी आनुषंगिक पण झालेल्या खर्चाचं मूल्य समजावून सांगणं हा उद्देश)
५. ह्या मोहिमांचा उपयोग म्हणून नेमका काय नी कसा? (बाकी इतरांना सोडा पण ज्यांनी एव्हरेस्ट सर केलं त्यांच्या पोटापाण्याचा तरी प्रश्न सुटणार आहे का?)

एव्हरेस्ट सर करुन आलेले दोघे माझ्या ओळखीचे आहेत फार भारी वाटतंय.
पण त्याबरोबरच सगळं करुन करायचं काय हा अत्यंत वास्तववादी प्रश्न त्रास देतो आहे.

ह्यावर साधकबाधक चर्चा अपेक्षित आहे.

प्रतिक्रिया

जॉर्ज मेलरीचे प्रसिद्ध वाक्य आठवतय.

कुणीतरी त्याला विचारलं- "Why do you want to climb Mount Everest?"

मेलरी म्हणाला- "Because it's there"

बाकी वरील सर्व प्रश्न गैरलागू आहेत. (विशेषतः खुर्च्या उबवत नाष्टा करता करता)

मेलरीनं दुसर्‍या कुणाकडं पैसे मागितल्याचं आठवतंय का?

इथं मुद्दा 'तोच' आहे. :)

प्रचेतस's picture

22 May 2012 - 12:32 pm | प्रचेतस

शेवटचे वाक्य वाचले नाहीत काय?

शिवाय' पैसे सोडून बोल' हा धन्याचा लेखही आहेच. ;)

प्यारे१'s picture

22 May 2012 - 12:40 pm | प्यारे१

कोट्स नी कोट्या न करता बोला की! ;)

मिलरनं लोकवर्गणी नव्हती काढली हो!
तुम्हाला काय करायचंय ते करा. लोकांकडं भीक का मागता असं एकजण म्हणाला. :(

मूळात अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्यांचा नेमका उद्देश समजत नाही.
उदा. ५०० प्रकाशवर्षं दूर एखादा तारा शोधणं. काय उपयोग होतो त्याचा?

मूळात अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्यांचा नेमका उद्देश समजत नाही.
उदा. ५०० प्रकाशवर्षं दूर एखादा तारा शोधणं. काय उपयोग होतो त्याचा?

तुम्ही अध्यात्म का वाचता, तुम्ही ध्यान का लावता? (याचा उपयोग काय असे आम्ही विचारत नाही) जेव्हा यांचा उद्देश तुम्हाला समजेल तेव्हाच तुम्हाला वरील मुद्दे पटतील. तोपर्यंत या वांझोट्याच चर्चा.

बाकी पैसे जे देतील तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. तुम्ही तर दिले नाहीत ना?

आणि हा मिलर कोण बरे?

रमताराम's picture

22 May 2012 - 12:57 pm | रमताराम

बाकी पैसे जे देतील तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. तुम्ही तर दिले नाहीत ना?
अगदी सहमत. पैसे मागताना ज्या कारणासाठी मागितले त्याच कारणासाठी वापरले, म्हणजे फसवणूक नाही. त्यामुळे ज्यांना द्यायचे नाहीत त्यांनी दिले नाहीत अ‍ॅज सिंपल अ‍ॅज दॅट. मला माझ्या भाचे-पुतण्यांना चॉकलेट द्यावेसे वाटले, दिले. देणारा मी, घेणारे ते यात इतरांचा संबंध कुठे आला? (ते 'ट्याक्सपेयर्स मनी' वगैरे वांझोटे तर्क इथेही होणार असे भाकित करतो)

देणार्‍यांनी पैसे का दिले याची त्यांच्यापुरती कारणे अनेक असतील. कार्य उल्लेखनीय वाटले असेल, त्यांच्या आयुष्यात ते ज्यावर खर्च करतात त्याहून (म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या) यात खर्च करणे अधिक 'सत्पात्री' दान असे त्यांना वाटंत असेल किंवा गेलाबाजार देवस्थानाला अभिषेकासाठी देणगी देऊन पुरोहिताने अभिषेक करून पुण्य आपल्या खात्यावर वर्ग करावे (अस्सल सरकारी वाक्प्रचार) असा काहीसा अप्रत्यक्ष समाधान करून घेण्याचा प्रकार असेल. कारणे काहीही असोत, पैसे त्यांचे खर्च करणारे दुसरेच, आपण चर्चा करून काय साधणार?

उत्तर मिळाले की सांग रे...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 May 2012 - 1:26 am | विश्वनाथ मेहेंदळे

ते अध्यात्माचे काय झाले रे ? त्याचे उत्तर मिळाले का ? ?
व्यष्टी, समष्टी असे शब्द न वापरता कुणी देईल का रे त्याचे उत्तर ??

मोदक's picture

23 May 2012 - 2:25 am | मोदक

>>>ते अध्यात्माचे काय झाले रे ? त्याचे उत्तर मिळाले का ? ?

काय राव विमे.. तू तर (माझ्यासारखाच!) "समोरासमोर नडतो" ब्वा..

अवांतर - खांडस ते भीमाशंकर अशा ३ दिवसाच्या ट्रेकचे प्लॅनींग सुरू आहे... (K2S गुणीले ३ किंवा ४ असावे असे मित्राने सांगीतले आहे..) येतोस काय..? :-)

बाकी चर्चा खरडवहीत करू..

प्रचेतस's picture

23 May 2012 - 8:35 am | प्रचेतस

तुम्हांस लोणावळा भीमाशंकर म्हणावयाचे आहे काय?
खांडस भीमाशंकर जेमतेम ३ तासांचाच आहे.

अवांतर करु नकोस राव वल्ली!! ते विमे अध्यात्माचं कायतरी विचारतायेत, कोणी उत्तर देत असेल तर त्याचं कंफ्युजन नको.

स्पा's picture

23 May 2012 - 9:33 am | स्पा

प्यारे चा बाजार उठलाय का?

तुला "आबुआगा" म्हणायचे आहे का..? ;-)

(इच्छुकांनी अर्थासाठी व्यनी करावा...)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 May 2012 - 1:04 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मिलरनं लोकवर्गणी नव्हती काढली हो!

हा तुमचा अंदाज आहे की पक्की माहिती ?

तुम्हाला काय करायचंय ते करा. लोकांकडं भीक का मागता असं एकजण म्हणाला.

याला म्हणतात राजाचे जाते आणि कोतवालाचे पोट दुखते.

अप्पा जोगळेकर's picture

22 May 2012 - 8:11 pm | अप्पा जोगळेकर

तुमच्या जगण्याचं फलित काय?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 May 2012 - 12:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ह्यावर साधकबाधक चर्चा अपेक्षित आहे.

या चर्चेचे फलित नेमकं काय अपेक्षित आहे ?

यशोधरा's picture

22 May 2012 - 12:57 pm | यशोधरा

लोकांना वर्गणी वा पैसे ह्यासाठी कोणी जबरदस्ती थोडीच केली होती? केवळ आवाहन केलं होतं ना? जबरदस्ती झाली असेल तर वेगळी गोष्ट. प्रत्येक जण कदाचित एव्हरेस्टवर जाऊ शकत नाही, पण अशा चांगल्या मोहीमेला आपल्या परीनं असा हातभार लावता येऊ शकतो ज्यांची इच्छा असेल त्यांना. त्याला भीक मागणे म्हणणे मला तरी पटत नाही. मागे अशी एक मोहीम झाली होती, त्यासाठी मोहीमवीरांनी आपली घरे गहाण टाकून कर्ज काढून पैसे जमवले होतेच की.

प्रत्येक गोष्ट व्यावहारिक फायद्यातोट्यात मोजता येत नाही.

>एव्हरेस्ट सर करुन आलेले दोघे माझ्या ओळखीचे आहेत फार भारी वाटतंय.
पण त्याबरोबरच सगळं करुन करायचं काय हा अत्यंत वास्तववादी प्रश्न त्रास देतो आहे.

= कुणी काय करावं हे त्याचं स्वातंत्र्य आहे पण असं करताना स्वतःच्या हौसेसाठी आपण इतरांना कामाला लावतोय का? असा सूज्ञ विचार प्रत्येकानं करायला हवा. अर्थात असा सूज्ञ विचार सहसा कुणी करत नाही; मग आपल्या हातात काय आहे? तर आपल्याला जे पटत नाही त्यात दुसर्‍याची हौस पुरवायला केवळ भिडस्तपणामुळे सहभागी न होणं.

एकदा सिंबायोसिसचे विद्यार्थी माझ्याकडे मदती करता आले (त्यांच्या मित्राची बायपास करायची होती). मला काहीच कल्पना नसल्यानं मी कारण विचारलं तर ते म्हणाले तुम्ही पेपर वाचत नाही का? मी म्हणालो नाही! यावर ते म्हणाले मदतीचं आवाहन पेपरमधे आलंय. मी म्हणालो किती खर्च आहे? ते म्हणाले दोन ते अडीच लाख! `किती जमलेत ?' , `तीस हजार'; मग मी म्हणालो असे शंभर, दोनशे रुपये गोळा करण्यापेक्षा इथून सरळ सर्जनकडे जा, त्याला सगळी परिस्थिती समजावून तीस हजारात सगळं बसवायला सांगा, तुमच काम एका फटक्यात होईल!

जे आपल्याला पटत नाही त्यात सहभागी न होणं इतकंच आपल्या हातात आहे मग काहीही त्रास होत नाही!

भडकमकर मास्तर's picture

22 May 2012 - 1:06 pm | भडकमकर मास्तर

अभिमानास्पद धाडस कुठे संपते आणि चीप थ्रिल कुठे सुरू होते?

नायगरा धबधब्यातून ड्रममध्ये बसून उडी मारणे , जीव पणाला लावून एवरेस्ट सर करणे आणि रे रोड बॉयीज सारखे मुम्बई रेल्वेतून लटकण्याचे धाडसी (?) व्हिडीओ करणे यात नक्की काय फरक आहे ?
मला व्यक्तिशः त्यात काहीही फरक वाटत नाही...

माझा एक सर्जन मित्र नागफणीवरून क्लाईंब करताना झालेल्या एका जीवघेण्या अपघातात वाचला .. ( त्याच्याबरोबर क्लाईंब करणारा दुसरा डॉक्टर तिथेच वारला ) .. अक्षरशः आपला जीव ज्या बोल्टवर टांगणीला लावायचा तो बोल्ट खडकातून उचकटून बाहेर आला म्हणे.. महाराष्ट्रातल्या बर्‍याचशा सुळक्यांवर हे बोल्ट आधीच मारलेले असतात.. काही दशकांपूर्वी... आता तंत्र खूप सुधारलेले आहे .. पण सर्व क्लाईंबर ग्रुप्स स्वतःचे बोल्ट्स स्वतः मारत नाहीत असे त्या दिवशी समजले... ( त्यानंतर काही वर्षांपूर्वी एका जर्मन क्लाईम्बरने काही सुळक्यांवर जुने बोल्ट काढून स्वतः नवे बोल्ट मारायचा उपक्रम केला होता म्हणे .. सामाजसेवा वगैरे... ) याचा अर्थ इतकाच की धाडस आणि केअरलेस मूर्खपणा यातील सीमारेषा धूसर आहे...
त्या दिवशी मी फार उलटसुलट विचार केला. इज इट वर्थ ? ....

कपिलमुनी's picture

22 May 2012 - 1:17 pm | कपिलमुनी

इथे दिले आहे ....

>>या सगळ्यातून काय मिळतं ?? समाधान! एक वेगळ्याच प्रकारचं, अनाकलनीय, गूढ आणि हे गूढ जितकं अनाकलनीय तितकंच जास्त आनंददायी आहे, हवंहवंस आहे

छोटा डॉन's picture

22 May 2012 - 1:33 pm | छोटा डॉन

खरं तर अत्यंत चपखल किंवा अचूक उत्तर माहित नाही.

तरीही माणसाला हौस असते म्हणुन तो असे काहितरी करतो.
ज्या लोकांची असे काही करण्याची इच्छा असते पण काही कारणाने त्यांना जमत नाही ते लोक जणु आपण स्वतःच ती गोष्ट करत आहोत ह्या भावनेने त्यांना मदत करतात.
काही जणांना ते जे काही करतात त्याचे कौतुक असते म्हणुन ते मदत करतात.
ज्यांना ह्यातले काहीच वाटत नाही ते ह्यातले काहीच करत नाही .... ठेविले अनंते तैशीच रहावे हे ही फारसे वाईट नाही.

बाकी ह्याचे फलित काय, त्याचा फायदा काय असे तौलानिक प्रश्न इथे अगदी अनावश्यक नसले तरी अप्रस्तुत आहेत, ते नक्की का ते सांगता येणार नाही, कदाचित भरमसाट लिहुन भरपुर उदाहरणे वगैरे द्यावी लागतील.
उदा : परवाच आमच्या चेल्सीने 'चॅपियन्स लीग' ही स्पर्धा जिंकली. तुम्ही म्हणाल की ह्याचे आमच्या दृष्टीने फलित काय ? तर त्याचे उत्तर असे की ते शब्दात सांगता येणार नाही.
ती ती घटना घडताना, ती अनुभवताना, ती पाहताना किंवा नुसताच त्याचा दुरुन आनंद घेताना जो कैफ चढतो तो फार अवर्णनीय असतो व त्याचे मोल करता येत नाही असे थोडक्यात सांगतो.

- छोटा डॉन

क्लिंटन's picture

22 May 2012 - 2:08 pm | क्लिंटन

चांगला चर्चाविषय. २-३ वर्षांपूर्वी मी पण मिपावर याच धर्तीवर चर्चाप्रस्ताव लिहिणार होतो त्याची आठवण आली. ती गोष्ट होती दक्षिण आणि उत्तर या दोन्ही ध्रुवांवर विमानातून उडी मारणाऱ्या पुण्याच्या एका मुलीची.तर तुम्ही एव्हरेस्ट सर करणाऱ्यांविषयी लिहित आहात. तेवढा एक फरक सोडला तर बाकीचे मुद्दे बऱ्याच अंशी सारखेच आहेत.

त्या उड्यांसाठी त्या मुलीने बरीच स्पॉन्सरशीप मिळवली आणि थोडे कर्जही काढले. असा धाडसी प्रकार केल्याबद्दल बॅंकेने तीचे कर्ज माफ करावे अशी तिची अपेक्षा असल्याचे तिच्या रेडिओवरील मुलाखतीतून कळले.तिचे कर्ज माफ झाले की नाही याची कल्पना नाही पण ते कर्ज अजिबात माफ व्हायला नको असे माझे वैयक्तिक मत आहे.माझ्यातला फायनान्सवाला म्हणतो की कुठलीच गोष्ट फुकट नसते तर प्रत्येक गोष्टीसाठी कोणालातरी किंमत मोजावीच लागते.या उडीबद्दल तिचे कर्ज माफ केले तर इतर कर्जवाल्यांना/बॅंकेच्या ठेवीदारांना ती रक्कम व्याजाचे वाढीव दर/वाढलेले छुपे चार्जेस याद्वारे प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे भरावीच लागेल. म्हणजे तिला उडी मारायचे थ्रील हवे म्हणून घरासाठी/शिक्षणासाठी कर्ज घेणाऱ्यांवर त्याचा बोजा कशाकरता?

त्यातूनही कोणाला स्वत:च्या पैशातून किंवा इतरांकडून स्वेच्छेने मिळालेल्या पैशातून असले प्रकार करायचे असतील तर जरूर करू दे. पण त्याचा इतर कोणावरही बोजा येता कामा नये. मग ते एव्हरेस्ट सर करणे असू दे किंवा अन्य काही धाडसी प्रकार!!

(अवांतर: उगीचच थ्री इडियट्स मधल्या वीरू सहस्त्रबुध्देची आठवण आली. चंद्रावर जाणारा पहिला कोण? नील आर्मस्ट्रॉंग. आणि दुसरा कोण? ते माहित असणे गरजेचेही नाही. दुसऱ्याचे नाव कोण लक्षात ठेवतो? तसाच एव्हरेस्ट सर करणारे पहिले एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग. नंतर कोणी एव्हरेस्ट सर केले याची कोण गणती ठेवतो?)

भडकमकर मास्तर's picture

22 May 2012 - 4:04 pm | भडकमकर मास्तर

असा धाडसी प्रकार केल्याबद्दल बॅंकेने तीचे कर्ज माफ करावे अशी तिची अपेक्षा असल्याचे तिच्या रेडिओवरील मुलाखतीतून कळले.तिचे कर्ज माफ झाले की नाही याची कल्पना नाही पण ते कर्ज अजिबात माफ व्हायला नको असे माझे वैयक्तिक मत आहे.
>>>>>>>>>>>>>>>

शंभर वेळा सहमत.....

अवांतर : लोक वर्गणीतून मदत मिळवून जालिंदरजींनी दक्षिण ध्रुवावरती जी उडी मारलेली होती त्याचे मूळ इथे होते तर... ? ;)

येस!
अवांतर : लोक वर्गणीतून मदत मिळवून जालिंदरजींनी दक्षिण ध्रुवावरती जी उडी मारलेली होती त्याचे मूळ इथे होते तर... ?

लेख वाचल्या वाचल्या जालिंदरजींची ती जगप्रसिद्ध उडी आठवली होती.

ऋषिकेश's picture

22 May 2012 - 2:37 pm | ऋषिकेश

जोपर्यत पैसे हे दात्याने आपल्या वैयक्तीक कपॅसिटीत व स्वेच्छेने दिलेत तोपर्यंत तो दाता आणि याचकामधला मामला आहे. तिथे वरील प्रश्न गैरलागू ठरावेत.
सरकारी पैसा, कर्ज वगैरे असल्यास वरील प्रश्न लागू ठरावेत. त्यातही कर्ज वगैरे देताना जर कर्ज देणार्‍याला हे कारण योग्य वाटत असेल (त्याचा जो काय क्रायटेरिया असेल त्यानूसार) तर त्याने ते द्यावे त्यातही तुम्ही-मी काय म्हणून बोलणार?
उरतो प्रश्न शासकीय मदतीचा, तिथे सरकारने मदत करावी का असा प्रश्न असल्यास, माझे मत सरकारने मदत केल्यास त्या व्यक्तीला देशाचे किंवा राज्याचे किंवा शहराचे (ज्या पातळीची गव्हर्निंग बॉडी प्रायोजक आहे त्यावर डिपेंड्स) प्रतिनिधीत्त्व करणे अनिवार्य करावे. म्हणजे तो रेकॉर्ड (जर झाला तर) त्या व्यक्तीसोबत त्या राज्याचा, देशाचा, शहराचाही असेल!

माझ्यापुरते मतः मी वैयक्तीक कपॅसिटीत जमेल तशी मदत करेन. कारण एखादी अवघड गोष्ट करण्याचे कसब आणि पैसा एकाच व्यक्तीकडे नेहमी असेलच असे नाही. केवळ पैसा नाही म्हणून संधी असूनही ती वाया जावी यासारखे घटना तिर्‍हाईताच्या बाबतीतही मला दु:ख देऊन जाईल

योगप्रभू's picture

22 May 2012 - 2:52 pm | योगप्रभू

काही मराठी तरुणांनी एव्हरेस्ट सर केले आणि त्यासाठी समाजाने अर्थसाह्य केले, ही चांगली गोष्ट आहे, पण अशी मदत द्यावी का, या मुद्यावर वाद होऊ नयेत. उलट कितीतरी क्रीडापटूंना, कलावंतांना तरुणपणीच नव्हे तर उतारवयातही मदतीची गरज असते. समाजाने हात आखडता घेऊ नये. धनुर्विद्येत जसा लिंबारामसारखा वन्य समाजातील खेळाडू पुढे आला तसे समाजातील तळाच्या/वंचित वर्गातून क्रीडापटू/साहसपटू घडावेत. त्यासाठीही मदतीचे हात पुढे यावेत.

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2012 - 4:17 pm | अत्रुप्त आत्मा

@एव्हरेस्ट मोहिमेचं फलित नेमकं काय? >>>आपल्याला, या संस्थळावर असा लेख लिहायला मिळणं :-p

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 May 2012 - 4:49 pm | निनाद मुक्काम प...

माझ्या मते निसर्गाची रम्य व रौद्र रूपे मानवाला नेहमीच भुलवत राहिली आहेत. कारण मानव ह्या निसर्गाचा घटक आहे. मात्र मेंदू विकसित झाल्यावर मानवाने निसर्गावर मत करण्याचा नेहमीच प्रत्यत्न केला आहे. ह्यात कधी तो विजयी तर कधी निसर्गाकडून परास्त झाला आहे.
पण अधून मधून एवरेस्ट सारख्या अवाढव्य पर्वत सर करणे किंवा इंग्लिश चेनेल पार करणे हे सर्व सामान्य माणसाच्या कुवातीबाहेरील कामे एखादा माणूस सराव ,विज्ञान व सर्वात महत्वाचे म्हणजे अमर्याद इच्छाशक्ती ह्या जोरावर पार करतो. व नथिंग इज इम्पोसिबल हे मानवाच्या प्रगतीमागील ब्रीदवाक्य व दरवेळी प्रगतीची नवनवी शिखरे काबीज करण्याची इर्षा व त्यामागील त्याच्या अथक प्रयत्नांची तेजोशालाका तळपत राहण्यासाठी अश्या मोहिमा फार मोठे काम पार पाडतात.

अवांतर
माझ्या सासरा अल्बर्ट ह्याला वयाच्या साठाव्या वर्षी विमानातून स्काय डायविंग करावेसे वाटले.
कारण आपण म्हातारे झालो आहोत अशी पुसट जाणीव सुद्धा आपल्या भवतालच्या लोकांना किंवा स्वतःला होऊ नये ही त्यामागील कदाचित भावना असू शकते. किंवा अजून न बरेच काही असू शकते जे मला वयाच्या ३० व्या वर्षी आता कदाचित कळणार नाही.
मात्र आपली हौस त्यांनी स्वखर्चाने पूर्ण केली. व त्या बद्दल कौतुक वाटून त्यावर माझ्या जर्मन आख्यानाचा एक भाग लिहिण्याची हौस मी पूर्ण केली. ह्याची आठवण झाली.
माझ्या बायकोचे त्यावेळी व आजही एकच मत होते की सुखासुखी स्वतःचा जीव धोक्यात कशाला घालायचा किंवा मराठी म्हणी नुसार उगाच विषाची परीक्षा का घ्यावी.

प्रभाकर पेठकर's picture

22 May 2012 - 8:47 pm | प्रभाकर पेठकर

अ‍ॅ: ६० वर्षाचा म्हणजे काय म्हातारा झाला काय लगेच.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 May 2012 - 1:28 am | निनाद मुक्काम प...

वय हे मानण्यावर असते असे मी मानतो.

५० फक्त's picture

22 May 2012 - 4:44 pm | ५० फक्त

अजुन एक प्रश्न राहिला काय ? एका ग्रुपचे (गिरिप्रेमी) लोकांनी जेवढा खर्च केला, त्याचवेळी दुस-या ग्रुपने (सागरमाथा) पुण्यातल्याच अशीच मोहिम पहिल्या ग्रुपच्या निम्म्या खर्चात केली म्हणे. याबद्दल काय म्हणणं आहे. आणि एकाच वेळी एकाच शहरातुन दोन दोन वेगळ्या ग्रुपनी हे करण्यापेक्षा एकत्र येउन करणं बरं झालं नसतं का ?

दुस-या ग्रुपमधला एक सदस्य या मोहिमेदरम्यान मरण पावला, पण किमान पेपर मध्ये आलेल्या तरी प्रतिक्रियांवरुन पहिल्या ग्रुपचं कौतुक करणा-या एकानंही त्या सदस्याबद्दल काही बोलल्याचं ऐकिवात नाही.

तसे पहायला गेलो तर कोणत्याच गोष्टीचे फलीत "इज इट वर्थ ?" याला नकारार्थीच उत्तर देते.
उदा: आपण काबाडकष्ट करून मुलाना शिकवतो वाढवतो "इज इट वर्थ ? "
कंपनीला लॉयल म्हणून काम करतो "इज इट वर्थ ? " ( दुसर्‍या कंपनीत गेलेल्या आपल्याइतक्याच एक्सपिरीयन्सवाल्या कलीगला आपल्यापेक्षा जास्त पगार मिळतो)

विनायक प्रभू's picture

22 May 2012 - 4:59 pm | विनायक प्रभू

चला विजुभौ आपण दोघेही वेगवेगळ्या उड्या मारु.
बघा कोण पैसे देतेय ते.
जमा करायची जबाबदारी तुमची.
म्हणत असाल तर नान्या आणि परा ला पण घेउ.
चोता दोन नाही म्हटले तर चेल्सी चे टी शर्ट चे पैसे नक्की देइल(कधी ते सांगता येणार नाही)

कर्ण's picture

22 May 2012 - 7:04 pm | कर्ण

हे एवढं सगळं करुन नेमकं हाती काय पडलं?
प्यारे१ शी सहमत ......

संशोधन, विकसन, समाजसेवा साठी तरी तो पैसा खर्च करायचा .....
वेडे सरकार आणि काही ब्यांका किंवा संस्था आता ह्यांना काहीतरी रक्कम बक्षीस म्हणून देतील....
ह्यांच्या नंतर आणखी तैयार असतीलच एवरेस्ट चढायला

स्वानन्द's picture

22 May 2012 - 7:08 pm | स्वानन्द

तुमच्या त्या दोन मित्रांचं म्हणणं काय आहे?

संजय क्षीरसागर's picture

22 May 2012 - 8:08 pm | संजय क्षीरसागर

मी पहिल्यांदाच म्हटलं की सकृद्दर्शनी साधा वाटणारा हा प्रश्न एकदम फंडामेंटल आहे आणि हरक्षणी पडू शकेल:

>उदा: आपण काबाडकष्ट करून मुलाना शिकवतो वाढवतो "इज इट वर्थ ? "
कंपनीला लॉयल म्हणून काम करतो "इज इट वर्थ ? "

तुम्ही नीट पाहिलत तर प्रत्येक गोष्ट आपण स्वत:साठीच करतो, मग ते समाजकार्य असो की देशसेवा की कौटुंबिक जवाबदारी. कोणतही काम आपण `दुसर्‍यासाठी करतोय ' असं वाटलं तरी `आपल्याला तसं वाटलं' म्हणून आपण ते करत असतो. मग तुम्हाला भीती वाटते म्हणून तुम्ही नोकरी करता आणि त्याला जवाबदारी म्हणता की ओझं वाटू नये म्हणून जवाबदारीला प्रेम म्हणता हा फक्त मानसिकतेचा प्रश्न आहे.

हा फंडा एकदा क्लिअर झाला की पुढच्या सगळ्या गोष्टी फार सोप्या होतात. दुसरा देखिल असाच वागतो, मग वरुन तो काहीही दाखवो आणि तुम्हाला कितीही भावनिक करो, तुम्ही शब्दांना फसत नाही; कारण वास्तविकता तुमच्या लक्षात आलेली असते. मग नित्शेचं थोर विधान तुम्हाला कळतं, तो म्हणतो: `नॉट टू यूज द अदर इज द हायेस्ट मॉरॅलिटी' आणि ते मान्य करून मी म्हणतो `नॉट अलविंग द अदर टू यूज यू इज अल्टीमेट ऑथेंटिसिटी!

ब्रेकफास्टच्यावेळी अशा वांझोट्या चर्चा कशा रंगतात देव जाणे !! रात्रभराच्या झोपेत शरीराला पडलेला अन्नाचा तुटवडा पुन्हा सुरु करण्यासाठीची वेळ ती. बाकी प्रश्न राह्यला फलिताचा तर हौसेला मोल नसतं आणि पैसे द्यायची बळजबरी तर नव्हती ना केली ? ज्यांना पटलं त्यांनी दिले, मी दिले नाहीत त्यामुळे त्यांच्यावर बरे वाईट शेरे मारण्याचा मला अधिकार नाही.

"वांझोट्या" हा शब्द सोडून बाकीच्या शब्दांशी आणि भावनांशी सहमत..

बॅटमॅन's picture

23 May 2012 - 12:45 am | बॅटमॅन

वांझोट्या वगैरे सर्व शब्दांसकट एकदम सहमत. मागणारे मागतात, देणारे देतात, मियाबीबी राजी झाल्यावर मधल्यामध्ये या काजींचा वांझोटा पोटशूळ उगीच का उठतो च्यायला?

(वांझोट्या चर्चांचा फॅन)

संजय क्षीरसागर's picture

23 May 2012 - 12:18 am | संजय क्षीरसागर

मी तुमच्याशी सहमत आहे, सगळ्या चर्चेवरनं आता तुमचा निष्कर्श लिहा!

सर्वांचे आभार!

चर्चा का झाली ते सविस्तर लिहीले आहेच. काही मुद्दे ज्यांची उत्तरं देणं मला शक्य झालं नव्हतं त्याबद्दल उहापोह होऊन मनाला पटेलशी किंबहुना काही ठोस स्वरुपात सांगता येतील अशी उत्तरं मिळतात का हे पहावं असा उद्देश होता.

प्रश्ना ला प्रतिप्रश्न करुन समोरच्याचं तोंड कदाचित बंद करता येऊ शकेल पण प्रश्न तसाच राहतो. उत्तर मिळत नाहीच.
क्लिंटनसाहेब तसंच भडकम कर मास्तरांनी उपस्थित केलेले मुद्दे महत्त्वाचे वाटले. मलाही काही अंशी हेच म्हणायचे होते.
सचिननं बॅटींग करण्याचं तसंच कार्तिकेयननं भन्नाट वेगानं कार चालवण्याचं, सानिया/सायनानं आपापले सामनं खेळण्याचं नेमकं फलित काय हाही मुद्दा आमच्या मूळ चर्चेत होता.
आपण आपला वेळ, पैसा, शक्ती वाया घालवून हे सगळं का करायचं, बघायचं हाही मुद्दा होता.
काही ठिकाणी लोक 'कार्यालयीन कर्तव्ये' न करता अशा स्वरुपाचे उपक्रम करतात तेव्हा त्यांना कार्यालयीन काम खोळंबत ठेवून असे 'नस्ते उद्योग' करण्यात काय मिळतं असाही चर्चेतून उपस्थित मुद्दा होता. तसा एक किस्सा घडलेला आहे. इथं कामं रखडलीत नी आम्ही 'झेंडा लावायला' गेलोय! बाकीचे लोक यांची कामं निस्तरत आहेत. असंही घडतं.

बर्‍याच मिपाकरांचा रोख पैशाचे व्यवहार न फसवता झालेत, आत्मिक समाधान मिळावं ह्या दृष्टीकोनातून पैसे दिले गेलेत, अशा गोष्टी करण्यातून मिळणारं अपरिमित समाधान हे पैशामध्ये मोजता येत नाही तसंच पैसे दिले घेतले गेले ते आरामात आणि तुझं का पोट दुखतंय असा होता. व्यक्तीशः मला एव्हरेस्टवर जाणारांबद्दल अभिमानच वाटतो आहे.

काहींनी अध्यात्म म्हणजे काय असे विचारलंय पण सध्या एवढंच सांगतो की अध्यात्म म्हणजे स्वतःशी निगडीत जे जे ते आणि त्यात परमार्थ म्हणजे जे मिळवण्यास सगळ्यात जास्त योग्य असतं ते. मानवी जन्माला येऊन काय मिळवायचं तर कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थितीवर कधीही अवलंबून न राहता सगळ्या काळात, सगळ्या वेळी आनंदी राहणं....!
इथं एव्हरेस्टवर जाऊन जे सुख मिळतं तो ह्याच आनंदाचा अनुभवच आहे पण हे सुख, हा आनंद आपल्याला परत परत मिळवावा लागतो तो तसा मिळवण्याची गरज भासू नये, ते मिळतं, मिळवता येतं, ते मिळ वल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे आनंद मिळवण्यासाठी धडपड करावी लागत नाही हे दाखवणारा मार्ग म्हणजे परमार्थ मार्ग. अधिक सविस्तर नंतर लिहीता येईलच.

५० फक्त's picture

23 May 2012 - 10:33 am | ५० फक्त

झाली का चर्चा, चा पाणी, बिस्किट फिस्किट काय आहे का आता ? का मिटिंग संपली असं डिक लेअर करायचं आहे.

प्यारे१'s picture

23 May 2012 - 10:39 am | प्यारे१

करा करा. डिक लेयर करा.

मुलांना , महिलांना आणि वृद्धांना आधी बाहेर जाण्याची संधी द्या. धक्काबुक्की करु नका. चप्पला आपापल्याच घाला. ;)

संजय क्षीरसागर's picture

23 May 2012 - 10:41 am | संजय क्षीरसागर

तुम्ही नुसती चर्चा सुरु करुन फलिताविरहित सोडून दिली नाही याबद्दल अभिनंदन! इंटरनेटचा सर्वात मोठा तोटा कोणता असेल तर प्रतिसाद द्यायला कुणी बांधील नाही, मग भले चर्चा त्यानं सुरु केली असो की विरोधी मुद्दा उपस्थित केलेला असो म्हणून अशा चर्चेचा उपयोग होत नाही.

या अनुषंगानं अध्यात्म म्हणजे काय? हा मुद्दाही उपस्थित होणारच होता, त्याविषयी तुम्ही लिहीलयः

>कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थितीवर कधीही अवलंबून न राहता सगळ्या काळात, सगळ्या वेळी आनंदी राहणं....!
इथं एव्हरेस्टवर जाऊन जे सुख मिळतं तो ह्याच आनंदाचा अनुभवच आहे पण हे सुख, हा आनंद आपल्याला परत परत मिळवावा लागतो तो तसा मिळवण्याची गरज भासू नये, ते मिळतं, मिळवता येतं, ते मिळवल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे आनंद मिळवण्यासाठी धडपड करावी लागत नाही हे दाखवणारा मार्ग म्हणजे परमार्थ मार्ग

= ही वाक्यरचना अचूक नसली तरी मथितार्थ बरोबर आहे.

एव्हरेस्टवर जाऊन जे सुख मिळतं ते कमालीचं अस्वास्थ्य निर्माण करणार्‍या इच्छेच्या तृप्तीमुळे काही क्षण जो मनाचा कोलाहल थांबतो त्यामुळे असतं आणि मग थोड्याच वेळात मन नवा भुलावा देतं आणि पुन्हा नव्या इच्छेची आस लागते किंवा तशी इच्छा पूर्ततेपलिकडे असेल तर मग सुख म्हणजे निव्वळ गतस्मृतीत रमणं इतकंच राहतं

प्रभाकर पेठकर's picture

23 May 2012 - 1:52 pm | प्रभाकर पेठकर

सर्वात ताकदवान असा 'निसर्ग' आहे. अथांग खोल सागर, नायगारा धबधबा, एव्हरेस्टचे शिखर इत्यादी त्याच्या ताकदींची वेगवेगळी रुपे आहेत. अशी अनेक, अनंत रुपे आहेत. पण सध्या उदाहरणादाखल आपण ही घेतली आहेत. तर ह्या निसर्गाच्या ताकदींच्या रुपांवर चढाई करून 'विजय' मिळविणे, निसर्गाच्या त्या विशिष्ट रुपाला नामोहरम करणे म्हणजे जगातील सर्वात ताकदवान मानलेल्या 'निसर्गा'वर मात करून, आपण त्याहून ताकदवान आहोत असे 'आभासी' समाधान मिळविणे असा विचार असावा. असे वाटण्याचीही एक नशा असते. आणि नशा म्हंटले की 'त्याचे फलीत' वगैरे विचार दुय्यम ठरतात.

लोकं मदत का करतात? हा दूसरा प्रश्न. ती त्यांची वैयक्तिक कारण असतील. काही जणांना असं काही करायच असतं पण धाडस आणि/किंवा कौशल्य नसतं. मग ते जमेल तशी आर्थिक मदत करून ते त्या धाडसात 'सुरक्षितपणे' सहभागी झाल्याचे समाधान मिळवितात. काही जणांना (कदाचित) मोठेपणा हवा असतो. तर कोणाचे मित्रप्रेम, नातेसंबंध तर कोणाचे काही. सर्वांना त्यात समाधानाचा 'खारीचा वाटा' मिळतो.

फलीत काय? खास काही नाही. त्या घटनेशी निगडीत सर्वांचे 'वैयक्तिक' समाधान.

पुण्यातील ' सागरमाथा ' या संस्थेच्या एव्हरेस्ट मोहिमेचा सदस्य असलेल्या आनंद बनसोडे या सोलापूरकर तरुणावर मोहिमेसाठी खर्चापोटी राहते घर विकण्याची वेळ आली आहे. मोहिमेच्या वेळी अनेकांनी दिलेले आर्थिक मदतीचे आश्वासन बर्फ वितळावा तसे वितळून गेल्याने बनसोडे याच्या कुटुंबापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे....
एव्हरेस्ट मोहिमेसाठी घेतलेले सुमारे २० लाखांचे कर्ज फेडण्यासाठी कोणताही पक्ष वा संघटना पुढे आलेली नाही. खर्चापोटी बनसोडे कुटुंबाला सोने आधीच विकावे लागले आहे. पण अद्याप डोक्यावर असलेला हा कर्जाचा डोंगर कसा सर करायचा , याची विवंचना आनंद याच्यापुढे आहे. .

विस्तृत बातमी .

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15287554.cms